गरोदरपणात आपले शरीर अत्यंत असुरक्षित असू शकते, कारण शरीरात संप्रेरकांचे असंतुलन होत असते आणि रोगप्रतिकार शक्ती कमी होते. गरोदरपणात स्त्रियांना तोंड द्यावी लागणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे ताप येणे. ताप आल्यावर शरीराचे तापमान वाढते त्यामुळे खूप अशक्तपणा येतो, थंडी वाजते, नाक वाहू लागते आणि सर्दी होते. ताप असंख्य कारणांमुळे येऊ शकतो, जसे की: विषाणूंचा संसर्ग […]
गर्भारपण हा स्त्रीच्या आयुष्यातील एक रोमांचक टप्पा असू शकतो परंतु त्यासोबत येणारा मॉर्निंग सिकनेस नक्कीच स्वागतार्ह नाही. सुमारे ७०–८०% स्त्रिया पहिल्या तिमाहीत मळमळ, उलट्या आणि थकवा (मॉर्निंग सिकनेसची सामान्य वैशिष्ट्ये) अनुभवतात. मॉर्निंग सिकनेस साधारणपणे गरोदरपणाच्या सहाव्या आठवड्यापासून सुरू होतो आणि आठव्या व नवव्या आठवड्यात खूप वाढतो. तुम्ही गरोदर असताना तुमचे शरीर ह्युमन कोरिओनिक गोनाडोट्रोफिन (HCG) […]
गरोदरपणात मासे खावेत की खाऊ नयेत ह्याविषयी तुम्हाला परस्पर विरोधी मते वाचायला मिळतील. त्यामुळे मासे खाणे सुरक्षित आहे की नाही याबद्दल संभ्रम निर्माण होईल. परंतु, माशांमध्ये बरेच सकारात्मक गुण आहेत. माशांच्या काही जाती वगळता, गरोदरपणात मासे खाणे सुरक्षित मानले जाते. ह्या लेखात, आपण गरोदरपणात मासे खाण्याच्या सर्व संभाव्य पैलूंवर चर्चा करू आणि शक्य तितक्या प्रश्नांची […]
तुम्ही गरोदर आहात की नाही हे जाणून घेण्यासाठी अनेक घरगुती युक्त्या आणि तंत्रे आहेत. कुणी त्यासाठी शाम्पूचा वापर करते तर कुणी साखर वापरून पाहते. ह्या चाचण्या कमीत कमी तयारीसह घरच्या घरी केल्या जाऊ शकतात. अशा चाचण्या गर्भधारणेची प्राथमिक कल्पना देऊ शकतात, परंतु ह्या चाचण्या वैद्यकीय चाचणी इतक्या अचूक नसतात. असे म्हटल्यावर, साखरेचा वापर करून गर्भधारणेची चाचणी […]