Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास १० महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

१० महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

१० महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

तुमचे बाळ आता १० महिन्यांचे झाले आहे तुम्ही तुमच्या बाळामध्ये लक्षणीय बदल पहिले आहेत. तुमच्या छोट्याश्या बाळाचे एक स्वतःचे स्वतः खेळणारं, इकडे तकडे फिरणारं तसेच  सगळ्यांशी बोलणाऱ्या  बाळामध्ये झालेले रूपांतर बघणे म्हणजे खरंच खूप सुंदर भावना आहे.

१० महिन्यांच्या बाळाच्या विकासाच्या टप्प्यांचा तक्ता

ह्या टप्प्यावर बाळामध्ये कुठले बदल अपेक्षित आहेत ह्यावर खालील तक्त्याद्वारे दृष्टिक्षेप टाकत आहोत.

पार पडलेले विकासाचे टप्पे  पुढे विकसित होणारे विकासाचे टप्पे 
रंगते आणि उभे राहण्याचा प्रयत्न करते आधाराने चालते
काही शब्दांचे अर्थ कळू लागतात साधे शब्द समजते आणि बोलते
पोटावर झोपवलेले असताना बसते उभे राहिलेले असताना बसते
विनंती समजते इतर मूलभूत सूचना समजते
मूलभूत क्रिया बघून करते निरीक्षणानंतर क्रिया पुन्हा करून पाहते
लपवलेल्या गोष्टी पहाते वस्तूंची जागा लक्षात ठेवते
घाबरवणाऱ्या प्रसंगांना प्रतिक्रिया देते जास्त प्रकारच्या परिस्थितीना प्रतिक्रिया देते
आकलनावर पकड वस्तू उचलण्यासाठी संपूर्ण हाताचा वापर करते
दृष्टिकोन विकसित होतो दृष्टिकोन सुधारतो आणि डोळे आणि हात ह्यांचा समन्वय सुद्धा सुधारतो
काही दात असतात पहिल्या वाढदिवसाला ८ दात असतात

१० व्या वाढदिवसापर्यंत तुमचे बाळाचे विकासाचे टप्पे

तुमचे १० महिन्यांचे बाळ आता त्याच्या स्वातंत्र्याचा आनंद घेत आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या गोष्टींचा शोध घेत आहे. त्या टप्प्यावर बाळे रांगू शकतात, तसेच बसवल्यावर आधार घेऊन उभे राहू शकतात. काही तरी धरून आजूबाजूचा भाग बघू शकतात. काहींनी चालण्यास सुरुवात केली असेल आणि ज्यांनी अजून केली नसेल ती बाळे लवकरच चालण्यास सुरुवात करतील. बाळ गोष्टी लगेच बघू शकतात आणि त्यांचे डोळे आणि हातांचा समन्वय त्यांना वस्तू लगेच पकडण्यास मदत करतात. त्यांना वेगवेगळ्या खेळांमध्ये मग्न राहायला आवडते ज्यामुळे त्यांचे हालचाल कौशल्य वाढते.

आकलन विकासाचे टप्पे

  • वस्तूंचे अस्तित्व ओळखणे आणि लपवलेल्या वस्तू शोधून काढणे: १० व्या महिन्यात बाळाला एखादी वस्तू दिसली नाही तरी ती अस्तित्वात आहे हे समजते आणि आई बाबा दिसेनासे झाले तरी  ते कमी चिंतीत  होतात. त्याबरोबरच बाळाची उत्सुकता वाढते आणि बाळ त्यांच्या द्रुष्टीआडच्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करू लागते.
  • चित्र आणि फोटोंचा आनंद घेऊ लागते: खूप चित्रे असलेले पुस्तक उघड आणि तुमच्या लक्षात येईल की तुमचे बाळ त्यामध्ये गर्क झालेले दिसेल. तुमच्या बाळाला गोष्टी ऐकायला आवडतील आणि रंगीबेरंगी चित्रांद्वारे बाळ शब्द, आवाज आणि वाक्यांचा अर्थ लावायला लागेल
  • शब्दांचे आकलन करून त्यांचे अर्थ लावते: तुमचे १० महिन्यांच्या बाळाला आता वस्तू आणि त्यांची नावे ह्यांचा संबंध लावता येतो तसेच “हाय” “नाही” “हो”  आणि “बाय” हे शब्द समजतात आणि त्यानुसार ते प्रतिसाद देते.
  • क्रिया बघून  तसंच करून पहाते: १० महिन्यांचे बाळ बऱ्याचशा क्रिया करून पहाते. त्यांच्या क्रिया लक्षात ठेऊन त्याप्रमाणे ते प्रतिक्रिया देतात. तुम्हाला बरेचदा लक्षात येईल की तुमचे बाळ तुमच्या कडे बघून तुमचा प्रतिसाद मिळवण्यासाठी बरेचदा मान हलवते.
  • विनंती समजते: १०व्या महिन्यात तुमच्या बाळाला सूचना/ विनंती समजू लागते आणि बाळ प्रतिक्रिया देते. तुमच्या बाळाला एखादी वस्तू तुम्हाला देण्यास सांगा आणि बाळ लगेच ती तुमच्या हातात देईल.

आकलन विकासाचे टप्पे शारीरिक विकासाचे टप्पे

हे विकासाचे टप्पे म्हणजे शारीरिक वैशिष्ट्ये आणि हालचाल कौशल्ये होय.

  • रांगणे: तुमचे बाळ आता ऑलिम्पिक च्या पातळीचे रांगू लागले आहे आणि आधाराशिवाय चालण्याचा प्रयत्न सुद्धा करू लागले आहे. बाळावर लक्ष ठेवा कारण रांगताना बाळ घराच्या प्रत्येक कोपऱ्यात काय आहे ह्याचा शोध घेईल.
  • बोटांच्या पकड घट्ट होऊन त्यांचा वापर होणे: तुमचे बाळ आता खूप परिणामक रित्या तर्जनी आणि अंगठ्याचा वापर करून छोट्या गोष्टी धरू लागेल. ह्यामुळे फिंगर फूड उचलून खाण्यास मदत होते.
  • आधाराशिवाय बसू लागते आणि उभे राहताना पुढे झुकते: पोटावर झोपण्याचा कंटाळा आला की पाठीचे आणि पोटाचे स्नायू बळकट झाल्यामुळे तुमचे बाळ स्वतःचे स्वतः बसू  लागते. तुमचे बाळ कशाचातरी आधार घेऊन तसेच एक पाऊल पुढे टाकून चालण्याचा सुद्धा प्रयत्न करू लागते. कालांतराने तुमचे बाळ आधार घेऊन छोटी छोटी पावले टाकून एकीकडून दुसरीकडे जाऊ लागेल.
  • मधले दात दिसू लागतात: आठव्या महिन्यात खालचे मधले २ दात दिसू लागतात तर १०व्या महिन्यात वरचे मधले २ दात दिसू लागतात. ह्यामुळे बाळास अन्न चावण्यास मदत होते.
  • दृष्टी सुधारते आणि समन्वय भावना: बाळाची दृष्टी सुधारते आणि तुमचे बाळाला वस्तू किती अंतरावर आहे ते समजते आणि त्यामुळे हात आणि डोळे यांचे समन्वय सुधारते.

सामाजिक आणि भावनिक विकासाचे टप्पे

हे विकासाचे टप्पे तुमच्या बाळाच्या सामाजिक क्षमता आणि भावनिक स्वभाव दर्शवतात

  • हात हलवून ‘बाय’ करणे: तुमच्या १० वर्षांच्या बाळाला सामाजिक हावभावाचे महत्व समजेल आणि तुमच्या बाळाने तुम्हाला हात हलवून बाय केल्यावर तुम्ही हसत ऑफिसला जाल. जर तुम्ही लकी असाल तर तुम्हाला ‘ बाय बाय’ असे त्यांच्या तोंडातून निघालेले बोबडे बोल सुद्धा ऐकू येतील.
  • अनोळखी लोकांविषयी चिंता: तुमच्या १० महिन्यांच्या बाळाला अनोळखी व्यक्तींसोबत आरामदायक वाटणार नाही आणि ते त्यांच्याकडे जाण्यास नकार देतील.
  • वेगळे होताना दुःखी होणे: संशोधनाद्वारे असे दिसून आले आहे की १० महिन्यांनंतर बाळांना वेगळे होताना चिंता वाटते. ते तुम्हाला किंवा त्यांची काळजी घेणाऱ्यांना चिकटून राहतात आणि तुम्ही त्यांना सोडू नये म्हणून चिडचिड करतात.
  • परिस्थितीला प्रतिसाद देतात: वेगवेगळ्या परिस्थितीला बाळे वेगवेगळा प्रतिसाद देतात. मोठा आवाज ऐकल्यावर बाळाला भीती वाटू शकते किंवा गाणाऱ्या पक्षाचा आवाज ऐकून बाळ आनंदी होते.

संवाद कौशल्य

  • ह्या टप्प्यावर बाळे सर्वात चांगले मिमिक्री कलाकार असतात आणि तुम्ही केलेल्या सगळ्या क्रिया करून बघतात. तुम्ही हात हलवून टाटा केलेत तर बाळ सुद्धा तसे करून पाहते.
  • बाळे शब्दांचा आवाज ऐकतात आणि तुमच्या प्रतिक्रिया पडताळून बघतात. तुम्ही विव्हळण्याचे नाटक केले तर बाळ रडू लागते.
  • १० महिन्यांच्या बाळाला काही सूचना समजतात उदा: टाटा कर, टाळ्या वाजव, किंवा होकारार्थी मान हलवणे.
  • ह्या टप्प्यावर बाळाला त्याचे नाव अचूक समजते आणि त्यांच्या नावाला ते प्रतिसाद सुद्धा देऊ लागते.

झोपण्याचे टप्पे

  • १० व्या महिन्यात तुमचे बाळ दिवसा १ तासाची झोप घेते
  • काही बाळे दिवसातून २ वेळा छोटीशी झोप काढतात
  • दुपारच्या जेवणानंतर त्यांना झोप काढूदे त्यामुळे त्यांची रात्रीपर्यंत चिडचिड होणार नाही.
  • जर झोप झाली नाही तर बाळ रात्री एखादा तास जास्त झोपेल किंवा रात्रभर शांत झोपेल.

खाण्याचे टप्पे

  • तुमच्या बाळाच्या ताटात काही घनपदार्थांचा समावेश करा
  • उकडलेले गाजर, बटाटे आणि बाळ चाऊ शकेल असे इतर पदार्थ सुद्धा बाळाला द्या, बाळ ते पुढच्या दातांनी
  • चावून खाईल.
  • घशात अडकणारे पदार्थ जसे की सुकामेवा, द्राक्षे आणि टणक पदार्थ टाळा. बोटांची पकड घट्ट होण्यासाठी त्यांना फिंगर फूड द्या.
  • त्यांनी थोडे अन्न सांडवले तरी चालेल पण त्यांना चमचा देऊन स्वतःचे स्वतः खाण्यास प्रोत्साहन द्या. त्यांचे पोट भरल्यानंतर शेवटचा घास त्यांचा त्यांना खाऊ द्या. त्यामुळे ते स्वतंत्र होतील.

खाण्याचे टप्पे 

काळजी केव्हा करावी?

विकासाच्या उशिरा दिसणाऱ्या लक्षणांवर लक्ष ठेवा

  • १० महिन्यांची बाळे कुठलाही त्रास न होता अगदी सहज रांगतात आणि जर तुमचे बाळ रांगत नसेल तर मात्र काळजीचे कारण आहे. काही बाळे आधाराशिवाय उभी राहतात आणि चालण्याची ती पहिली पायरी आहे.
  • १० महिन्यांचे बाळ बोलायला सुरुवात करत नाही परंतु वेगवेगळे आवाज काढते. जर तुमचे बाळ खूप शांत असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • ह्या वयात बाळाचे पुढचे दात येतात आणि जर ते आले नाहीत तर दातांची समस्या आहे असा त्याचा अर्थ होतो.
  • जर तुमचे बाळ चेहरे ओळखत नसेल तर दृष्टी किंवा आकलन क्षमतेमध्ये समस्या आहे असा त्याचा अर्थ होतो

तुमच्या १० महिन्यांच्या बाळाला महत्वाच्या टप्प्यांच्या विकासात मदत करण्याचे मार्ग

बाळाने  विकासाच्या  टप्प्यांमध्ये यश संपादन कार्यासाठी आणि त्यांनी अजून टप्पे पार करण्यासाठी काही सोपे तंत्र

  • आता बाळाच्या साहसाची सुरुवात झालेली असल्याने, बाळाला रांगण्यासाठी आणि त्यांचे स्नायू मजबूत होण्यासाठी जागा तयार करा. त्यामध्ये कुठले अडथळे येत असतील किंवा त्यामुळे काही धोके असतील तर ते बाजूला करा.
  • बाळासाठी वॉकर घेऊन या तसेच बाळाचे वजन पेलू शकेल अशी ढकलगाडी आणा त्यामुळे बाळाला उभे राहून पावले टाकण्यास प्रोत्साहन मिळेल.
  • तुमच्या बाळाशी सतत बोलत राहा त्यामुळे बाळाला शब्द कळण्यास मदत होईल आणि बाळ भाषा पटकन शिकेल. बाळाला खेळात आणि क्रियांमध्ये मग्न ठेवा  त्यामुळे त्यांची उत्सुकता वाढेल. एकदा ग्रुप जॉईन करा त्यामुळे सामाजिक संवाद वाढेल.
  • मऊ फिंगर फूड बाळाला द्या आणि ते उचलून खाण्यास त्यांना प्रोत्साहन द्या. फिंगर फूड खाल्ल्याने बाळ एक वर्षाचे झाल्यावर त्याचे स्तनपान सुटण्यास मदत होते.

ह्या टप्प्यावर निरोगी बाळ हे विकासाचे टप्पे पोषक आहार आणि कौशल्याना पोषक वातावरण तयार केल्यास पार पाडते. त्यांना क्रिया शोधून त्या शिकण्यासाठी  प्रोत्साहन आणि प्रेम ही किल्ली आहे. तुम्हाला जर वाटलं की काहीतरी चुकतंय तुमच्या आतून वाटणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांकडे जा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article