Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळाची नखे सुरक्षितपणे कशी कापावीत?

बाळाची नखे सुरक्षितपणे कशी कापावीत?

बाळाची नखे सुरक्षितपणे कशी कापावीत?

जेव्हा बाळाच्या आरोग्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांचा विचार केला जातो, तेव्हा पालकांनी घ्यावयाची सर्वात चांगली खबरदारी म्हणजे बाळाची स्वच्छता. चांगली स्वच्छता राखल्यास तुम्ही रोगास कारणीभूत जंतूपासून मुक्त होऊ शकता आणि बाळाला निरोगी ठेवू शकता. बाळाची काळजी घेताना सर्वात दुर्लक्षित भाग म्हणजे हात आणि पायाच्या बोटांची नखे कापणे हा होय. धूळ, प्रदूषण आणि हानिकारक जिवाणू नखांच्या खाली गोळा होतात आणि जेव्हा बाळ हात किंवा पाय तोंडात घालतात किंवा जेव्हा बाळाला अंगठा चोखण्याची सवय लागते तेव्हा ते सहजपणे शरीरात प्रवेश करतात. तुमच्या बाळाची नखे कापल्याने हे टाळता येते.

नवजात बाळाच्या नखांबद्दल माहिती

बाळाची नखे मऊ आणि कोमल असतात, आणि ती अत्यंत लवचिक आणि जलद वाढतात. बाळाची नखे निष्काळजीपणे कापता कामा नये कारण त्यासोबत त्वचा सुद्धा कापली जाऊ शकते.

नखांमध्ये अडकलेले हानिकारक जीवाणू संक्रमण आणि आजारांना कारणीभूत ठरू शकतात म्हणून तुम्ही स्क्रॅच मार्क्सवर लक्ष ठेवणे चांगले.

तुम्ही तुमच्या बाळाची नखे ​​किती वेळा ट्रिम केली पाहिजेत आणि त्यांचा आकार कसा असावा?

बाळाची नखे कापताना ती किती कापावीत आणि त्यांचा आकार कसा असावा हे समजणे आवश्यक आहे. बोटाच्या आकारानुसार नखे कापणे चांगले. बाळाची नखे खूप वेगाने वाढतात आणि दर आठवड्याला ती कापण्याची आवश्यकता भासू शकते. तथापि, नवजात बाळाच्या पायाच्या बोटांची नखे वाढण्यास जास्त वेळ लागू शकतो. आणि त्यामुळे पायाची नखे महिन्यातून एकदा कापली तरी चालू शकते.

आपल्या बाळाच्या बोटांना दुखापत न करता नखे ​​कशी कापता येतील?

आपल्या बाळाची नखे कापण्याआधी बाळाला इजा न करता ते कसे करावे हे समजून घेणे महत्वाचे आहे. म्हणजेच त्यासाठी आवश्यक असलेली साधने आणि नखे कापण्याचे तंत्र समजणे महत्वाचे आहे.

बाळाची नखे कापण्यासाठी तुम्हाला कुठल्या गोष्टींची आवशक्यता आहे?

  • बाळांसाठीची नखे कापण्याची कात्री
  • बाळांसाठीचे नेल क्लिपर
  • एक डिस्पोजेबल कचरा पिशवी
  • नेल फाईल्स
  • हातमोजे
  • मोजे
  • अँटीबायोटिक क्रीम

लक्षात ठेवल्या पाहिजेत अशा टिप्स

आपल्या बाळाची नखे कापताना लक्षात घेण्यासारख्या गोष्टी:

  • चांगला प्रकाश येत असलेली जागा निवडा तसेच बाळ शांत असेल अशी वेळ निवडा. खरं तर, बाळ झोपले असेल तर उत्तम होईल.
  • पायाची बोटे सामान्यत: आतल्या बाजून वळतात. हे सामान्य आहे आणि नवजात बाळाच्या नखांच्या लवचिकतेमुळे असे होते. जसजशी बाळाची वाढ होते तशी ही नखे घट्ट आणि आकारबद्ध होतात.
  • बाळाच्या नखांसाठीची विशेष कात्री वापरण्याची शिफारस केली जाते कारण त्यामुळे आपल्या बाळाची त्वचा कापली जाणार नाही याची खात्रीहोईल अशा पद्धतीने ते डिझाइन केलेले आहेत.
  • नखे कापणे सोपे जावे म्हणून बाळाची हातापायांची बोटे कोमट पाण्यात बुडवून घ्या.
  • तुमच्या बाळाची नखे तुम्ही तोंडाने कुरतडून काढू नका कारण तुमच्या तोंडातील जिवाणूंमुळे तुमच्या बाळास आजार उद्भवू शकतात.
  • बाळ झोपेत असल्याने नखे कापल्याने बाळ प्रतिकार कमी करते आणि नखे चांगली कापली जातात.
  • बाळाची नखे इमरी बोर्डवर काप कारण यामुळे नखांचा आकार चांगला असल्याचे सुनिश्चित होते आणि नखांच्या पृष्ठभागाखाली लपलेले कोणतेही सुप्त जीवाणू काढून टाकले जाऊ शकतात.

बाळाची नखे ​​कापण्यासाठी इतर पर्याय

जर बाळाची नखे कापणे आव्हानात्मक असेल किंवा जर ती तुम्ही दुसर्‍या पद्धतीने कापण्याचे ठरविले तर येथे काही इतर पर्याय आहेतः

  • नखे कानशीने घासून कमी करा जर नखे लहान असतील तर तुम्ही संपूर्ण नख कानशीने घासून कमी करण्याचा प्रयत्न करू शकता परंतु ही एक गहन प्रक्रिया असू शकते.
  • डॉक्टरांना विचारा आपल्या बाळाची नखे कंपन्यांच्या पर्यायांविषयी नेहमीच वैद्यकीय तज्ञाशी, उदाहरणार्थ बालरोगतज्ज्ञांशी चर्चा केली जाऊ शकते.

तुमच्याकडून चुकून नखांसोबत बाळाची बोटांची त्वचा कापली गेल्यास काय करावे?

नवजात बाळाची नखे कापताना अगदी सावध पालकांकडून देखील चुकून त्वचेचा कोपरा कापला जाऊ शकतो. असे झाल्यास घाबरू नका.

  • थंड किंवा सामान्य तापमानाच्या पाण्याने जखम स्वच्छ करा.
  • स्वच्छ आणि निर्जंतुक कापड किंवा कापूस अथवा रेशमाच्या तलम पारदर्शक कापडाने जखम पुसा.
  • रक्तस्त्राव थांबेपर्यंत हळू हळू दाबा (हे काही मिनिटांत थांबले पाहिजे).
  • बाळाला कोणताही संसर्ग टाळण्यासाठी बालरोगतज्ञांनी दिलेल्या अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरिअल क्रीम वापरा.

आपल्या नवजात बाळास तयार करण्याची सुरुवात त्याची नखे ​​कापण्यापासून होते. ते स्वच्छ आणि सुरक्षित पद्धतीने कसे करावे हे शिकणे महत्वाचे आहे. यासंदर्भात तुम्हाला काळजी वाटत असल्यास आपल्या डॉक्टरांशी चर्चा करा. बाळाची नखे कापण्याचे एक वेळापत्रक करून घ्या. सुरुवातीच्या काळात बाळाची नखे कापण्यासाठी तुम्ही कुटुंबातील मोठ्या सदस्यांची मदत घेणे चांगले.

आणखी वाचा: बाळांसाठी गाईचे दूध

 

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article