Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळाच्या झोपेविषयी तुमच्या बाळाला किती झोप आवश्यक असते? (नवजात बाळ पासून १२ महिन्यांच्या बाळापर्यंत)

तुमच्या बाळाला किती झोप आवश्यक असते? (नवजात बाळ पासून १२ महिन्यांच्या बाळापर्यंत)

तुमच्या बाळाला किती झोप आवश्यक असते? (नवजात बाळ पासून १२ महिन्यांच्या बाळापर्यंत)

बाळाच्या जन्मानंतर, त्यांच्यासाठी सुरुवातीचे काही महिने झोप खूप महत्वाची असते. जन्मानंतरच्या पहिल्या तीन महिन्यांत बाळ जवळपास ७०% वेळ झोपण्यात घालवते. सर्व बाळे वेगळी असतात. त्यांची झोपण्याची पद्धतही एकसारखी नसते. अशा प्रकारे, नवजात बाळे किती वेळ झोपतात ह्या प्रश्नाचे कोणतेही निश्चित उत्तर नाही. तुमच्या बाळाच्या झोपण्याच्या पद्धतीचे निरीक्षण करणे, त्यांना समजून घेणे आणि नंतर बाळाला पुरेशी झोप मिळत आहे का ते पाहणे महत्त्वाचे आहे.

व्हिडिओ: लहान बाळांना किती झोपेची गरज असते? (तुमच्या लहान बाळाला झोपवण्यासाठी काही टिप्स देखील ह्या व्हिडीओमध्ये आहेत)

बाळाला खरोखर किती तासांची झोप आवश्यक असते?

बहुतेक बाळे जन्मानंतरच्या पहिल्या काही आठवड्यांमध्ये दिवसभर झोपतात आणि फक्त जेव्हा त्यांना भूक लागते तेव्हा थोड्या काळासाठीच उठतात. बाळांच्या झोपण्याच्या आणि खाण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. रात्रीच्या वेळी सुद्धा तुम्हाला बाळाची काळजी घ्यावी लागेल.

खाली एक तक्ता दिलेला आहे. ह्या तक्त्यामध्ये बाळाच्या जन्मानंतरचे पहिले बारा महिने बाळ सरासरी किती तास झोपते ते दिलेले आहे.

बाळाचे वय दिवसा झोपण्याचे तास (तास) रात्री झोपण्याचे तास (तास) एकूण झोपेचे तास (तास)
नवजात ८ ते ९ १६ ते १७ पर्यंत
एक महिना ६ ते ७ ८ ते ९ १४ ते १६
तीन महिने ४ ते ५ १० ते ११ १४ ते १६
सहा महिने ११ १४
नऊ महिने २ ते ३ ११ १३ ते १४
बारा महिने २ ते ३ ११ १३ ते १४

सुरुवातीच्या तीन महिन्यांत, बाळ भूक लागल्यावर वारंवार उठेल. सलग तीन तासांपेक्षा जास्त वेळ बाळ झोपू शकणार नाही. परंतु हे रुटीन हळूहळू बदलेल. जसजशी बाळाची वाढ होईल तसतसा ह्यामध्ये बदल होईल. बाळ जेव्हा तीन महिन्यांचे होईल तेव्हा तुम्हाला त्याच्या झोपेचा नमुना लक्षात येईल आणि त्यानुसार तुम्ही बाळाचे रुटीन ठरवू शकाल. त्यामुळे तुमच्या बाळाला रात्रीची जास्त वेळ झोप लागेल.

बाळाच्या झोपेसाठी काही टिप्स

बाळाला झोपवण्यासाठी इथे काही टिप्स दिलेल्या आहेत त्यांची तुम्हाला मदत होऊ शकेल.

. ० ते २ महिन्यांच्या बाळासाठी झोप

सुरुवातीच्या महिन्यांत, बाळ हातापायांची वळवळ करते. मध्येच हसते आणि चोखण्याचा आवाज करते. असे वेगवेगळ्या रिफ्लक्समुळे होते आणि त्यावर नियंत्रण करता येत नाही. नवजात छोट्या बाळांना स्वतःला कसे शांत करावे हे माहित नसते. पालकांनाच ते त्यांच्यासाठी करावे लागेल. पॅसिफायर वापरणे, बाळाला झुलवणे, मिठी मारणे आणि स्तनपान हे काही मार्ग आहेत. ह्या मार्गांद्वारे तुम्ही बाळाला झोपवू शकता.

. २ ते ४ महिन्यांच्या बाळांची झोप

ह्या कालावधीत बाळांच्या झोपेचे रुटीन लागते. बाळाला सकाळी भरपूर सूर्यप्रकाश द्या आणि त्याला दिवसा खेळू द्या. अंघोळ करणे, कथा सांगणे किंवा बाळाला झोपण्यापूर्वी खाऊ घालणे ह्यासारखे प्रीबेडटाइम रूटीन सुरू करा. ह्यामुळे बाळाची दिनचर्या नीट सुरळीत सुरु होऊन झोपेची वेळ झालेली त्यांना समजेल.

. ४ ते ६ महिन्यांच्या बाळासाठी झोप

ह्या कालावधीत बाळ रात्रीचे दूध पिण्यासाठी उठणार नाही आणि रात्रभर सलग झोपू लागेल. जरी बाळांना मध्येच जाग आली तरी ह्या टप्प्यावर, बहुतेक बाळे रात्री जागी होणार नाहीत. जरी बाळे उठली तरी स्वतःचे स्वतः झोपून जातील. बाळाला जवळ घेऊन थोपटल्याने मदत होऊ शकते.

४ ते ६ महिन्यांच्या बाळासाठी झोप

. ६ ते १२ महिन्यांच्या बाळाची झोप

जसजशी लहान बाळे आजूबाजूंच्या लोकांना ओळखू लागतात आणि त्यांना थोडे समजायला लागते, तसतसे त्यांना वेगळे होण्याची चिंता निर्माण होते. तुम्ही बाळाच्या जवळ नसल्यास बाळाला ते कळेल आणि त्यामुळे रात्री ते रडू लागेल. बाळाला थोडे शांत केल्यावर आणि तुम्ही आजूबाजूला आहात हे समजल्यानंतर तो पुन्हा झोपी जाईल.

सर्व बाळांच्या झोपण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात आणि नवजात बाळे किती तास झोपतात?’ या प्रश्नाचे कोणतेही निश्चित असे उत्तर नाही कारण त्याचे उत्तर प्रत्येक बाळासाठी वेगळे असेल. परंतु लहान बाळे सहसा किती तास झोपतात हे जाणून घेणे आणि त्यांच्या झोपण्याच्या पद्धतींचे निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला बाळाच्या झोपण्याच्या पद्धतीमध्ये काही असामान्यता पाहिल्यास तुम्ही त्यावर उपाय केले पाहिजेत.

आणखी वाचा:

बाळाला रात्री कसे झोपवावे?
बाळांसाठी झोपताना उशी वापरावी का?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article