Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण जुळी आणि एकाधिक मुले जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ३४ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ३४ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण –  ३४ वा आठवडा

तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या ३४ व्या आठवड्यात प्रवेश केला आहे आणि तुम्ही लवकरच तुमच्या जुळ्या किंवा तिळ्या बाळांची ह्या जगात येण्याची अपेक्षा करीत आहात. आपल्या बाळांना पाहण्याचा विचार तुम्हाला खूप चिंताग्रस्त करत असेल, परंतु घाबरू नका. काही खोल श्वास घ्या आणि शांत व्हा. गरोदरपणाच्या प्रत्येक टप्प्यावर बदल होतील. यातील काही बदल अंदाजे असतील तर काही आश्चर्यकारक असतील. तुम्ही जर जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या ३४ व्या आठवड्यात असाल तर ह्या लेखात आम्ही तुम्हाला माहिती असाव्यात अशा काही बाबींची चर्चा करणार आहोत. अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

गरोदरपणाच्या ३४ व्या आठवड्यात जुळ्या / एकाधिक बाळांची वाढ

अल्ट्रासाऊंड प्रतिमांच्या मदतीने तुमच्या गर्भाशयात असलेल्या बाळांच्या वाढीचा अंदाज लावला जाईल. तुमचे डॉक्टर बाळांच्या विकासाची तपासणी करतील आणि काही जन्मदोषांची चिन्हे आढळल्यास त्याची सुद्धा पाहणी करतील. अकाली प्रसूतीची शक्यता ३४ आठवड्यांपर्यंत जास्त आहे. म्हणूनच, आपल्या बाळांचे वजन योग्य प्रमाणात वाढत आहे आणि बाळे सामान्यपणे विकसित होत आहेत हे सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे.

तसेच, डॉक्टर्स तुमच्या पोटातील बाळांच्या स्थितीवर लक्ष ठेवतील. बाळाची स्थिती योग्य असेल तर सामान्य प्रसूती होऊ शकते परंतु जर स्थिती योग्य नसेल तर डॉक्टर्स तुम्हाला सी सेक्शन करण्यास सुचवू शकतात.

३४ व्या आठवड्यांत, मुलांच्या संवेदनांमध्ये लक्षणीय सुधारणा होईल. जरी त्यांना दिसत नसले तरी ते अधिक चांगल्या प्रकारे ऐकू शकतात. म्हणून, तुम्ही त्यांच्याशी बोलणे, त्यांच्यासाठी गाणे म्हणणे किंवा त्यांच्यासाठी वाचन करणे सुनिश्चित करा. कधी कधी तुम्हाला प्रतिसाद देण्यासाठी किंवा तुमच्याशी संवाद साधण्यासाठी बाळे पाय मारतील.

तथापि, पाय मारण्याची वारंवारिता कमी होऊ शकते किंवा या आठवड्यात त्यांची तीव्रता कमी होऊ शकते. हे बहुधा बाळाच्या वाढत्या आकारामुळे आणि गर्भाशयात असलेल्या जागेच्या मर्यादामुळे होते. बाळाचे पाय मारणे कमी होऊ शकते परंतु ते पूर्णपणे बंद होऊ देऊ नका. पोटावर हळुवार चोळून काही माता बाळाच्या हालचालींना उत्तेजन देऊ शकतात.

३४ व्या आठवड्यात बाळाचा आकार केवढा असतो?

एखाद्या छान पिकलेल्या लाल भोपळ्याएवढी जुळी किंवा तिळी बाळे तुमच्या गर्भाशयात असतील. त्यांच्या चरबीचे प्रमाण वाढतच राहते आणि त्यामुळे त्यांच्या वजनात वाढ दिसून येते. आतापर्यंत बहुतेक बाळांचे वजन सुमारे २ किलोग्रॅम असते, त्यामुळे त्यांचे वजन पेलणे कठीण होते. त्यांची लांबी अंदाजे ४३४५ सेंटीमीटर असते म्हणून त्यांना गर्भाशयात जागा पुरत नाही.

३४ व्या आठवड्यात बाळाचा आकार केवढा असतो?

गरोदरपणाच्या ३४ व्या आठवड्यातील बदल

जेव्हा तुमच्या गर्भाशयात लहान बाळे वाढतात आणि विकसित होतात तेव्हा तुमच्यामध्ये आणखी काही शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. चला कोणते ते पाहुयात.

  • जेव्हा तुम्ही गरोदरपणाचे ३४ आठवडे पूर्ण करता तेव्हा तुमच्यामध्ये काही जुनी आणि काही नवीन लक्षणे दिसतील. गरोदरपणाच्या ३४ व्या आठवड्यांनंतर, कदाचित तुमची दृष्टी अस्पष्ट होऊ शकेल. अगदी स्पष्टपणे, या लक्षणांमागे कोणतेही निर्णायक तर्क नाही, परंतु असे होत असल्याचे बर्‍याच स्त्रियांनी नमूद केले आहे. गरोदरपणानंतरचे काही महिने ही परिस्थिती अधिक तीव्र असते. आपले संप्रेरक सर्वत्र पसरलेले आहेत आणि विविध मज्जातंतू बधिर होत असल्याने हे लक्षण उद्भवण्याची शक्यता असते.
  • गरोदरपणाच्या सुरुवातीच्या अवस्थेपासून, तुमचे पाय तुमचे आणि तुमच्या जुळ्या बाळांचे सर्व वाढणारे वजन पेलत असतात. सूज आल्यामुळे चालणे तसेच संतुलन राखणे कठीण होईल. तुम्हाला तुमच्या पायांमध्ये आणि पावलांमध्ये वेदना जाणवू शकतात.
  • गरोदरपणाचा काळ जसजसा पुढे सरकेल तसे तुम्हाला जास्त थकवा जाणवू लागेल. तुमच्या शरीरात झालेल्या असंख्य बदलांमुळे मुख्यतः असे होते. आपल्या बाळांची काळजी घेण्याच्या विचारांमुळे तुम्हाला ताणतणाव जाणवू शकतो. तथापि बाळांच्या जन्मानंतर तुमची ऊर्जा पुन्हा पूर्ववत होईल.

गरोदरपणाच्या ३४ व्या आठवड्यातील बदल

  • असंख्य सूचना असूनही, अनेक वेळा तुम्हाला योग्य आहार घेता येणार नाही. बाळांच्या वाढत्या वजनामुळे तुमच्या आतड्यांवरील दबाव वाढतो आणि त्यामुळे बद्धकोष्ठता आणि रक्तस्त्राव पुन्हा उद्भवू शकतो. ह्या लक्षणांचा सामना करण्यासाठी तुम्ही द्रवपदार्थांचे आणि तंतुमय पदार्थांचे सेवन वाढवणे आवश्यक आहे.
  • गरोदरपणाच्या ३४ व्या आठवड्यात बहुतेक स्त्रियांना जीवनाचा नवीन श्वास घेतल्यासारखे वाटू शकते. गरोदरपणाच्या ३४ व्या आठवड्यात,तुमची जुळी किंवा तिळी बाळे ओटीपोटाच्या दिशेने खाली येऊ शकतात. ज्या क्षणी बाळे आपले डोके जन्मकालव्याच्या दिशेने सरकवतात त्या क्षणी गर्भाशयाचा वरचा भाग आकाराने कमी होतो. ह्यामुळे त्वरित फुफ्फुसे आणि डायाफ्रामसाठी जागा तयार होते. ते त्यांच्या सामान्य स्थितीत येतात आणि त्यामुळे तुमचा श्वासोच्छ्वास सुधारू शकतो आणि बर्‍याच जणींसाठी हा एक स्वागतार्ह बदल असू शकेल.
  • तुम्ही तुमच्या प्रसूतीच्या निर्धारित तारखेच्या जवळ असताना तुम्हाला कदाचित ब्रेक्सटन हिक्स कळा म्हणजे सराव कळा येऊ शकतात आणि ते ३४ व्या आठवड्यात सामान्य लक्षण आहे. ह्या कळा अचानक केव्हाही येऊ शकतात आणि त्यामुळे तुमच्यासाठी ते घाबरण्याचे कारण ठरू शकते.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण ३४ वा आठवडा पोटाचा आकार

गरोदरपणाच्या ३४ व्या आठवड्यात तुमच्या जुळ्या किंवा एकाधिक बाळांचे वजन वाढले आहे हे अगदी स्पष्ट होईल, तुमच्या नाभीच्या खालचा पोटाचा भाग गोलाकार आणि वाढलेला दिसेल. तुमची बाळे गर्भाशयात हालचाल करतात आणि ३४ व्या आठवड्यात त्यांचा आकार वाढलेला असतो त्यामुळे तुम्हाला वारंवार ऍसिडिटी होऊ शकते.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण ३४ वा आठवडा अल्ट्रासाऊंड

बाळांचे आरोग्य तपासण्यासाठी आणि सुरक्षित प्रसुती सुनिश्चित करण्यासाठी अल्ट्रासाऊंड आयोजित केला जातो. अल्ट्रासाऊंड प्रतिमांच्या मदतीने, तुमचे स्त्रीरोगतज्ज्ञ जन्माच्या प्रक्रियेसंदर्भात अनेक निर्णय घेतील. तुमच्या जुळ्या किंवा एकाधिक बाळांचे बारकाईने निरीक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या विकासाची पुष्टी करण्यासाठी प्रगत अल्ट्रासाऊंड्ससह असंख्य चाचण्या घेण्यात येतील.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण ३४ वा आठवडा काय खावे?

तुमची आहाराची योजना जी चालू आहे तशीच चालू राहिली पाहिजे. तंतुमय पदार्थ आणि उच्च प्रोटीन आहार यावर चांगले लक्ष केंद्रित केले पाहिजे. जर तुमची वजन वाढ निरोगी पातळीपेक्षा जास्त असेल तर आपले वजन लवकर नियंत्रित करण्यात मदत करण्यासाठी आपले डॉक्टर किंवा आहारतज्ञ तुमच्या आहारात विशिष्ट बदल करू शकतात. तुमच्या बाळांच्या पौष्टिक गरजा लक्षात घेत असताना असे करणे आवश्यक आहे.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण - ३४ वा आठवडा - काय खावे?

गरोदरपणाच्या ३४ व्या आठवड्यातील काळजीविषयक टिप्स

तुमचा गरोदरपणाचा काळ आता लवकरच संपणार आहे, पुढील काळ सोपा जावा म्हणून इथे काही टिप्स देत आहोत.

हे करा

  • बाळाच्या स्टेम सेल जतन करण्यासाठी नोंदणी करुन पहा.
  • काही अप्रिय परिणाम उद्भवल्यास तुमची प्रसूती हाताळण्यासाठी आकस्मिक योजना तयार करा.
  • तुम्ही वाचलेली नसल्यास जुळ्या किंवा एकाधिक बाळांविषयी पुस्तके वाचा.
  • तणाव टाळा आणि ध्यान करा.

काय टाळल?

  • जेवणासोबत कॉफी किंवा चहा पिणे टाळा कारण ते लोह शोषणात व्यत्यय आणतात.
  • तुम्हाला फिरणे किंवा हालचाल करणे अवघड होईल असे कपडे घालू नका.

गरोदरपणाच्या ३४ व्या आठवड्यात तुम्हाला खरेदी करणे आवश्यक असलेल्या गोष्टी

गरोदरपणाच्या ३४ व्या आठवड्यापर्यंत, आवश्यक असलेल्या बर्‍याच गोष्टी तुम्ही आधीच खरेदी केल्या असतील. काही राहून गेलेल्या गोष्टी खालील प्रमाणे असू शकतात.

  • एक छान प्रसूती गाऊन.
  • आपले पहिले दूध ठेवण्यासाठी ब्रेस्ट पंप.
  • नर्सिंग ब्रा.
  • डायपर तुमच्या जुळ्या किंवा एकाधिक बाळांसाठी खूप जास्त प्रमाणात
  • बाळाच्या कपड्यांचा संच.
  • बेबी टिश्यू आपल्याला यापैकी बर्‍याच गोष्टींची आवश्यकता आहे.

प्रत्येक आईवडिलांचा वेगळा अनुभव असला तरी, गरोदरपणाच्या ३४ व्या आठवड्यात प्रत्येकजण बाळांचा विकास आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करतो. चांगले खा, पुरेशी विश्रांती घ्या आणि आपल्या लहान बाळांच्या आगमनासाठी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article