Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे ‘उ’ आणि ‘ऊ’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

‘उ’ आणि ‘ऊ’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

‘उ’ आणि ‘ऊ’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

बाळाचे नाव ठेवण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा बाळाचे आई बाबा आणि इतर सगळ्यांनाच आपल्या आवडीचे नाव हवे असते. तसेच आपल्या लाडक्या लेकीचे नाव ठेवायचे म्हटल्यावर पालक अधिक भावनाशील होतात. आई आपल्या लेकीमध्ये आपली प्रतिमा बघत असते आणि तिला आपल्या परीसाठी नाव निवडायचे असते आणि बाबांसाठी तर ती जगातली सर्वात सुंदर मुलगी असते आणि त्यांनासुद्धा आपल्याच पसंतीचे, एखादे वेगळे आणि युनिक नाव असावे असे वाटत असते. तर आम्ही तुम्हाला सांगू की त्यासाठी आमची वेबसाईट नक्की बघा, आम्ही तिथे लहान बाळांच्या नावांचे संकलन केलेले आहे. इथे मुलींसाठी तसेच मुलांसाठी ट्रेंडी, छोटे, अर्थपूर्ण आणि विशेष अक्षरावरून सुरु होणारी तसेच पारंपरिक आणि धर्मावर आधारित अशा अनेक मुद्द्यांचा विचार करून नावांची यादी दिलेली आहे.

ह्या लेखामध्ये आणि अक्षरावरून मुलींची नावे दिलेली आहे. इथे तुमच्या मुलींसाठी एकदम आधुनिक आणि वेगळी अशी अर्थपूर्ण नावे तुम्हाला सापडतील. जर तुम्ही तुमच्या लेकीचे नाव राशीनुसार ठेवणार असाल तरी ह्या लेखाची तुम्हाला मदत होईल. तसेच ही नावे हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन धर्मानुसार वर्गीकृत सुद्धा केली आहेत जेणेकरून नाव शोधताना तुम्हाला त्रास होणार नाही.

आणि अक्षरावरून सुरु होणारी मुलींची नावे

आपल्या फुलासारख्या मुलीसाठी खाली दिलेल्या नावांमधून तुम्ही कुठलेही नाव निवडू शकता, कारण ही सगळी नावे युनिक आणि पारंपारिक नावांचा संयोग करून इथे दिली आहेत.

आणि अक्षरावरून सुरु होणारे नाव नावाचा अर्थ धर्म
उद्भवी सृष्टि हिंदू
उनशिका देवी दुर्गेचे एक नाव हिंदू
उदयाश्री सूर्योदय हिंदू
उदया सूर्योदय हिंदू
उच्चल अनुभूति, संवेदना, अनुभव हिंदू
उबिका वृद्धि, विकास, प्रगति हिंदू
उत्तरा उत्तर दिशा, महाभारतातील अभिमन्यूच्या पत्नीचे नाव हिंदू
उत्सुका काही जाणून घेण्याची इच्छा हिंदू
उत्पालक्षी कमळासारखे डोळे असलेली, देवी लक्ष्मी हिंदू
उत्पाला कमाल हिंदू
उत्काशना प्रभावशाली, शानदार हिंदू
उत्सा वसंत ऋतु हिंदू
उत्कलीता भव्य, शानदार हिंदू
उत्पालिनी कमळाच्या फुलांनी भरलेला तलाव हिंदू
उतलिका लाट, पाणी वेगाने पुढे येणे हिंदू
उथमी प्रामाणिक हिंदू
उत्पाला कमळाचे फुल, नदीचे नाव हिंदू
उशी इच्छा, मनोकामना हिंदू
उदबला मजबूत हिंदू
उद्गीता एक मंत्र, श्रीशंकराचे नाव हिंदू
उदरंगा सुंदर शरीर असणारी हिंदू
उदन्तिका समाधान, संतुष्टी हिंदू
उशिका देवी पार्वतीचे एक नाव हिंदू
उधयरनी साम्राज्ञी, नेहमी यशस्वी होणारी राणी हिंदू
उष्ता प्रकाश हिंदू
उष्णा सुंदर मुलगी हिंदू
उशासी प्रातःकाल, पहाटेची वेळ हिंदू
उशिजा ऊर्जावान, सुखद, इच्छुक हिंदू
उशार्वी सकाळी गायचा राग हिंदू
उर्वशी स्वर्गातील अप्सरा, सुंदर स्त्री हिंदू
उर्वी नदी, पृथ्वी, स्वर्ग आणि पृथ्वी हिंदू
उर्शिता दृढ़, मजबूत हिंदू
उर्मिला लक्ष्मणाची पत्नी, विनम्र हिंदू
उदीची समृद्धी हिंदू
उदीप्ति प्रकाशातून निर्माण झालेली हिंदू
उर्वारा आकाशीय अप्सरा, पृथ्वीचे एक नाव हिंदू
उरूषा उदार, क्षमा हिंदू
उदिता ज्याचा उदय झाला आहे असा हिंदू
उद्वाहा वंशज हिंदू
उदयति उदय होणे हिंदू
उसरी एक नदी हिंदू
उजयाति विजेता, विजयी हिंदू
उज्ज्वला चमकदार, प्रकाशमान हिंदू
उजवणी संघर्ष जिंकणारी, विजयी होणारी हिंदू
उर्मिमाला तरंगांची माला हिंदू
उपमा प्रशंसा, सर्वात चांगला हिंदू
उल्का दीपक, प्रतिभाशाली हिंदू
उमा देवी पार्वती, रोशनी, शांति हिंदू
उमरानी राण्यांची राणी हिंदू
उलुपी महाभारतात अर्जुनाच्या चार पत्नींपैकी एक हिंदू
उलूपी सुंदर चेहऱ्याची स्त्री हिंदू
उपासना पूजा, अर्चना हिंदू
उपला दागिना,एक रत्न हिंदू
उपकोषा खजिना, निधी हिंदू
उन्निका तरंग हिंदू
उंजलि आशीर्वाद, शुभकामना हिंदू
उमंगी आनंद, खुशी, प्रसन्नता हिंदू
उलिमा चतुर, बुद्धिमान हिंदू
उमिका देवी पार्वतीच्या अनेक नावांपैकी एक हिंदू
उजेशा विजय हिंदू
उन्नया रात्र हिंदू
उपदा एक भेट, उदार हिंदू
उथीशा सत्यवादी, इमानदार प्रवृत्तीची हिंदू
उद्यति पराशक्ति हिंदू
उस्रा सूर्याचा पहिला किरण, सूर्योदय हिंदू
उत्कलिका एक तरंग, उत्सुकता, एक कळी हिंदू
उत्कला उड़ीसाशी संबंधित हिंदू
उत्तरिका देणे, प्रदान करणे हिंदू
उत्पत्ति रचना, निर्माण हिंदू
उत्पन्ना उत्पन्न होणे हिंदू
उत्तानशी विश्वास, हास्य, कर्तव्य, निष्ठा हिंदू
उथमा असाधारण, विशेष हिंदू
उथामी ईमानदार, खरी, निष्कपट हिंदू
उषाना इच्छुक हिंदू
उदीती उन्नति, वृद्धि हिंदू
उद्विता कमळाच्या फुलांनी भरलेली नदी हिंदू
उज्वलिता प्रकाशमान, वीज हिंदू
उल्लसिता आनंदित, हर्षित हिंदू
उन्मादा सुंदर, अद्भुत, उत्साही हिंदू
उदारमति बुद्धिमान, कुलीन हिंदू
उद्बुद्धा जागृत, प्रबुद्ध हिंदू
उद्भुति अस्तित्व हिंदू
उदेष्नी उत्सुकता, विवेक हिंदू
उदिशा सकाळचा सूर्याचा पहिला किरण हिंदू
उग्रगंधा एक रोपटे हिंदू
उग्रतेजसा ऊर्जा, शक्ति हिंदू
उज्जीवति आशावादी, जीवनाने भरलेली हिंदू
उज्जीति विजय, जीत हिंदू
उज्वलता वैभव, दीप्तिमान, सौंदर्य हिंदू
उक्ति कथन हिंदू
उल्हासिनी उज्ज्वल, चमकदार, आनंदित हिंदू
उल्लसिता मस्त, खुश हिंदू
उमालक्ष्मी देवी पार्वतीचे आणखी एक नाव हिंदू
उमति सूर्याची मदत करणारी हिंदू
उमीका सुंदर स्त्री हिंदू
उम्लोचा अप्सरा हिंदू
उनिता एक, अखंडता हिंदू
उन्मुक्ति मुक्ति, उद्धार हिंदू
उन्नता श्रेष्ठ हिंदू
उपाधि पदवी, उपनाम हिंदू
उपधृति किरण हिंदू
उपाज्ञा आनंद, प्रसन्नता हिंदू
उपश्रुति देवदूत हिंदू
उपास्ति पूजा करणे, श्रद्धा हिंदू
उपमिति ज्ञान हिंदू
उऋषिला अति उत्कृष्ट, सर्वश्रेष्ठ हिंदू
उन्मेषा लक्ष्य, उद्देश्य हिंदू
उर्विजया गंगा नदीचे एक नाव हिंदू
उबाया सुंदर मुस्लिम
उबाब तरंग, जोरदार पाऊस मुस्लिम
उदूला उचित, न्यायसंगत मुस्लिम
उग्बाद गुलाबाचे फूल मुस्लिम
उल्फाह अंतरंगता, प्रेम मुस्लिम
उल्वियत गौरव, प्रतिष्ठा मुस्लिम
उमैमा सुंदर, चेहरा सुंदर आहे अशी मुस्लिम
उमायरा दीर्घायुषी मुस्लिम
उम्निया भेट मुस्लिम
उमराह मक्केची यात्रा मुस्लिम
उनीसा मित्रतापूर्ण मुस्लिम
उज़मा सर्वात चांगली मुस्लिम
उष्ता नेहमी आनंदी असणारी मुस्लिम
उरूसा नवरी मुस्लिम
उनैसा प्रिय मुस्लिम
उनज़ा एकमात्र मुस्लिम
उमायज़ा सुंदर, उज्जवल, चांगल्या मनाची मुस्लिम
उदयजोत वाढणारा प्रकाश शीख
उजाला प्रकाश पसरवणारी शीख
उज्जलरूप एक पवित्र आणि धैर्यशील स्त्री शीख
उत्तमलीन परम्यात्म्याच्या प्रेमात असणारी शीख
उत्तमप्रीत ईश्वर भक्ती मध्ये लीन असलेली शीख
उपकीरत महिमा, स्तुति सिख
उत्तमजोत दिव्य प्रकाश सिख
उडेला संपन्न, श्रीमंत ख्रिश्चन
उलानी प्रसन्न ख्रिश्चन
उलिसिआ निष्पक्षता, इच्छाशक्ति, चातुर्य ख्रिश्चन
उसोआ प्रेम, पांढऱ्या कबुतरासारखी सुंदर ख्रिश्चन
उस्टीन्या उचित, बरोबर ख्रिश्चन
उज़्ज़ीये देवाची शक्ती ख्रिश्चन
ऊर्ना आवरण, आच्छादन हिंदू
ऊषाकिरण सकाळच्या सूर्याची किरणे हिंदू
ऊषा सकाळ, पहाट हिंदू
ऊर्विन मैत्रीण, मित्र हिंदू
ऊर्जा श्वास, पोषण हिंदू
ऊषाश्री सुंदर सकाळ हिंदू
ऊन्या रात्र, तरंगमय हिंदू
ऊर्वा विशाल हिंदू
ऊबाह एक फूल मुस्लिम
ऊनी सोबत राहणारी ख्रिश्चन
ऊज़ूरी सौंदर्य ख्रिश्चन
ऊला समुद्रातून मिळणारे रत्न ख्रिश्चन

आता तुमच्याजवळ आणि अक्षरावरून सुरु होणाऱ्या छान नावांची अर्थासहित यादी आहे, तर आता उशीर करू नका आणि तुमच्या राजकुमारीसारख्या गोड मुलींसाठी ह्यातले कुठलेही नाव निवडा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article