Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण आहार आणि पोषण गरोदरपणात केळी खाणे

गरोदरपणात केळी खाणे

गरोदरपणात केळी खाणे

गरोदरपणाचा काळ हा स्त्रीसाठी अत्यंत रोमांचक काळ असतो. परंतु या काळात पौष्टिक अन्नपदार्थांची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे असते. तुम्ही गरोदर असताना पौष्टिक अन्नपदार्थ खाल्ल्यास तुमच्या बाळाची योग्य वाढ आणि विकास होण्यासाठी, योग्य पोषण मिळेल असे पौष्टिक पदार्थ तुम्ही खाणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश केला पाहिजे कारण ते आवश्यक पोषक तत्वांनी परिपूर्ण आणि तंतुमय पदार्थानी समृद्ध असतात. त्यामधून बाळाला त्याच्या वाढीसाठी आवश्यक असलेली खनिजे आणि जीवनसत्वे मिळतात. तुमच्या आहारात तुम्ही समावेश केला पाहिजे असे एक निरोगी चविष्ट आणि पौष्टिक फळ म्हणजे केळं. केळं हे उष्णकटिबंधीय फळ आहे. केळ्यामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे, कार्बोहायड्रेट्स आणि आहारातील फायबर असतात. गरोदरपणात केळी खाल्ल्याने तुम्हाला कसा फायदा होतो ते जाणून घ्या.

गरोदरपणात केळी खाणे चांगले आहे का?

केळी कार्बोहायड्रेट्स, आहारातील फायबर, ओमेगा -3 आणि ओमेगा -6, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बीकॉम्प्लेक्स, आणि मॅंगनीज, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, तांबे आणि सेलेनियम सारख्या खनिजांचा समृद्ध स्रोत आहेत. हे सर्व पोषक घटक गरोदरपणात गर्भाच्या निरोगी विकासास मदत करतात. केळी खाल्ल्याने गरोदरपणात उद्भवणाऱ्या काही गुंतागुंतांपासूनही आराम मिळतो. आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरू शकते.

गरोदरपणात केळी खाणे चांगले आहे का?

गरोदरपणात केळी खाण्याचे फायदे

फळे आरोग्यदायी असतात आणि विशेषतः गरोदरपणात तो आहाराचा एक भाग असावा. गरोदरपणात केळी खाण्याचे काही फायदे खाली दिले आहेत.

1. उलट्या आणि मळमळ इत्यादी त्रास कमी होतात

केळी व्हिटॅमिन बी 6 किंवा पायरीडॉक्सिनचा समृद्ध स्रोत आहे. व्हिटॅमिन बी 6 मळमळ आणि मॉर्निंग सिकनेस बरा करू शकते. म्हणूनच, विशेषतः गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत केळी खाण्याची शिफारस गर्भवती स्त्रियांना केली जाते.

2. एडीमाचा धोका कमी करण्यास मदत करते

बऱ्याच गर्भवती महिलांना त्यांच्या गरोदरपणाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत सूज किंवा पाणी धारणा इत्यादींचा अनुभव येतो. एडेमामुळे घोटे, पाय आणि इतर सांध्यांना सूज येऊ शकते. जर तुम्हाला सांधे किंवा घोट्याला सूज आलेली दिसली तर खारट पदार्थांचे सेवन टाळा आणि आहारात केळ्याचा समावेश करा, त्यामुळे सूज कमी होण्यास मदत होईल.

3. शरीरास लवकर ऊर्जा प्राप्त होते

केळ्यामध्येकार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते कारण त्यामध्ये ग्लुकोज, फ्रक्टोज आणि सुक्रोज सारख्या साध्या शर्करा असतात ज्या शरीराद्वारे त्वरित ऊर्जा वाढवण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात. गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीत, केळी खाल्ल्याने तुम्हाला जलद ऊर्जा मिळते. त्यामुळे हे फळ हातात ठेवा. केळी खाल्ल्याने तुम्हाला थकवा दूर होण्यास मदत होईल आणि तुमची ऊर्जा पातळी वाढेल.

4. बाळामध्ये जन्मजात दोष होण्याची शक्यता कमी करते

केळी हे फोलेटचा चांगला स्रोत आहे. फोलेट बाळाचा मेंदू आणि पाठीच्या कण्यांच्या विकासासाठी आवश्यक आहे. गरोदरपणात केळी खाल्ल्याने शरीरातील फोलेटची पातळी सुधारते त्यामुळे फोलेटच्या कमतरतेची शक्यता कमी होते, त्यामुळे बाळामध्ये जन्मजात दोष निर्माण होतात.

5. बाळाच्या मज्जासंस्थेच्या विकासात मदत

केळी म्हणजे पाण्यामध्ये विरघळणाऱ्या व्हिटॅमिन बी 6 चे समृद्ध स्त्रोत आहेत आणि ते बाळाच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या विकासासाठी आवश्यक असतात. अशा प्रकारे, गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत केळीचे नियमित सेवन केल्यास ते बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी देखील फायदेशीर ठरू शकते.

6. बद्धकोष्ठतेपासून सुटका होते

केळ्यामध्ये आहारातील फायबर जास्त प्रमाणात असते, आणि ते आतड्यांसंबंधी हालचालींना उत्तेजित करण्यास मदत करते. गॅस मुळे पोटदुखी झाल्यास त्यापासून आराम मिळतो. मध्यम आकाराच्या केळ्यामध्ये सुमारे 6 ग्रॅम फायबर असते. गरोदरपणात बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे आणि म्हणूनच हे सहज उपलब्ध फळ खाल्ल्याने मदत होऊ शकते. केळी खाल्ल्याने आतड्याची हालचाल सुधारते, त्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

7. रक्तदाब सामान्य राखण्यास मदत होते

केळी म्हणजे पोटॅशियमचा समृद्ध स्रोत आहे. शरीरासाठी ते एक आवश्यक खनिज आहे आणि ते शरीरातील रक्तदाब पातळी नियंत्रित करते. तुम्ही तुमच्या आहारात केळ्याचा समावेश करू शकता आणि तुमच्या रक्तदाब पातळीतील चढउतार टाळू शकता.

8. ऍसिडिटी आणि छातीत होणारी जळजळ टाळण्यास मदत करते

केळी खाल्ल्याने पोट आणि अन्ननलिकेच्या भिंतींचे गॅस्ट्रिक ऍसिडपासून संरक्षण मिळू शकते. गरोदरपणात ऍसिडिटी आणि छातीत जळजळ ही एक सामान्य समस्या आहे. ह्या काळात केळी खाल्ल्याने ऍसिडिटी आणि छातीत होणारी जळजळ दूर होते. त्यामुळे पचनास देखील मदत होऊ शकते.

9. हाडांच्या विकासात मदत होते

केळी म्हणजे कॅल्शिअमचा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे, बाळ आणि आई दोघांच्या हाडांच्या विकासासाठी केळी आवश्यक आहेत. शरीरातील स्नायूंच्या आकुंचनाच्या नियमनासाठी कॅल्शियम देखील आवश्यक आहे म्हणून या फळाचा गरोदरपणाच्या आहारात समावेश करा.

10. निरोगी त्वचा राखण्यास मदत करते

केळी हे व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. त्यास एस्कॉर्बिक ऍसिड देखील म्हणतात. शरीरात लोह शोषण्यासाठी ते आवश्यक आहे. व्हिटॅमिनसी हाडांच्या वाढीस, ऊतींची दुरुस्ती आणि निरोगी त्वचा राखण्यासाठी देखील मदत करते. व्हिटॅमिनसी एक अँटिऑक्सिडेंट देखील आहे आणि संक्रमणाशी लढण्यास मदत करते. गरोदरपणात केळी खाल्ल्याने बाळाला आणि आईला व्हिटॅमिन सीचे सर्व फायदे मिळू शकतात.

गरोदरपणात केळी खाण्याचे फायदे

गरोदरपणात केळ्याचे सेवन केल्याने काही हानिकारक परिणाम होतात का?

गरोदरपणात केळी खाणे पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यामध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यासाठी केळ्याचे अनेक फायदे आहेत. तथापि, केळ्याचे माफक प्रमाणात सेवन केले पाहिजे. केळं हे शर्करायुक्त फळ आहे आणि ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने आणि योग्य स्वच्छता न पाळल्याने दात किडण्याची शक्यता असते.

गर्भावस्थेतील मधुमेह असलेल्या महिलांनी जास्त केळी खाऊ नयेत कारण त्यामुळे साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. जर तुम्ही गरोदर असाल आणि तुम्हाला गर्भावस्थेतील मधुमेह असेल, तर केळी खाण्याबाबत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

ज्या गर्भवती स्त्रियांना केळ्याची ऍलर्जी आहे त्यांनीही केळी खाणे टाळावे. केळ्यामध्ये चिटिनेज असते. ते एक ऍलर्जीन आहे त्यामुळे लेटेक्सफ्रूट सिंड्रोम होतो. या गटामध्ये किवी आणि एवोकॅडो सारख्या इतर फळांचा समावेश आहे, त्यांचे सेवन देखील डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर केले पाहिजे.

गरोदरपणात केळी खाताना घ्यावयाची काळजी

ताज्या आणि स्वच्छ केळ्याचे सेवन करणे चांगले असते. अनेक दिवस पडलेली, जास्त पिकलेली किंवा काळी झालेली केळी खाणे टाळा. तुमच्या आहारात केळ्याचा समावेश करण्याबाबत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. विशेषत: तुम्हाला ऍलर्जी किंवा गरोदरपणातील मधुमेह असल्यास ही काळजी जरूर घ्या.

आपल्या आहारात केळ्याचा समावेश कसा करावा?

खालीलपैकी एक किंवा अधिक मार्गांनी तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या आहारात केळीचा समावेश करू शकता.

  1. केळ्याची स्मूदी –  गरोदरपणात स्मूदी किंवा केळ्याचा मिल्कशेक खाणे हा तुमच्या आहारात फळांचा समावेश करण्याचा उत्तम मार्ग आहे. चविष्ट स्मूदी बनवण्यासाठी पिकलेली केळी, काही स्ट्रॉबेरी आणि कमी चरबीयुक्त दूध मिसळा.
  2. बनाना ओटमील – दह्यात काही चिरलेली केळी, ओट्स आणि बदाम घाला आणि आनंद घ्या. नाश्ता म्हणून त्याचा आस्वाद घेता येतो. बनाना ओटमीलमध्ये फायबर, कार्बोहायड्रेट्स आणि मिनरल्सचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळते.
  3. केळी चिप्स – गरोदरपणात जेव्हा तुम्हाला काहीतरी खाण्याची इच्छा असते तेव्हा तुम्ही केळ्याचे चिप्स घेऊ शकता. परंतु, केळ्याचे चिप्स सहसा तळलेले आणि खारट असतात. कमी सोडियम मीठ वापरून आणि तळण्याऐवजी बेकिंग करून तुम्ही निरोगी, तेलमुक्त केळ्याचे चिप्स बनवू शकता.
  4. संपूर्ण फळ जर तुम्हाला काहीही बनवायचे नसेल तर फक्त संपूर्ण केळी खा. संपूर्ण फळ खाल्ल्याने तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी त्याचे जास्तीत जास्त आरोग्य फायदे मिळतील.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

. तुम्ही गरोदरपणात लाल केळी खाऊ शकता का?

गरोदरपणात लाल केळी खाणे पूर्णपणे सुरक्षित आहे. पौष्टिक सामग्रीमध्ये ते पिवळ्या केळ्यासारखेच असतात आणि स्तनपान सुधारण्यासाठी देखील त्याची मदत होते.

. मी दररोज किती केळी खाऊ शकतो?

इतर कोणत्याही गोष्टींप्रमाणे, केळ्याचे सेवन माफक प्रमाणात केले पाहिजे. तुम्ही एका दिवसात १ ते २ मध्यम आकाराची केळी खाऊ शकता. परंतु, आहारात केळ्याचा समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुम्ही किती खावे हे देखील विचारा.

केळी हा गर्भवती महिलांसाठी आवश्यक पोषक तत्वांचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. बाळासाठी आणि आई दोघांसाठीही त्याचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत. त्यामुळे केळ्याची स्मूदी किंवा संपूर्ण केळ्यांचा आनंद घ्या! परंतु, गरोदरपणात आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

आणखी वाचा:

गरोदरपणात डाळिंब खाणे सुरक्षित आहे का?
गरोदरपणात बीटरूट खाणे: आरोग्यविषयक फायदे आणि दुष्परिणाम

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article