Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना योजना आणि तयारी १५ सोप्या आणि विश्वसनीय घरगुती गर्भधारणा चाचण्या

१५ सोप्या आणि विश्वसनीय घरगुती गर्भधारणा चाचण्या

१५ सोप्या आणि विश्वसनीय घरगुती गर्भधारणा चाचण्या

गर्भधारणा झाली आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी आधुनिक किटचा शोध लागण्यापूर्वी  घरगुती पद्धती शेकडो वर्षांपासून वापरात आहेत. मध्ययुगीन काळात राहणाऱ्या लोकांना बाजारात मिळणाऱ्या गरोदर चाचणी किट मिळत नव्हत्या आणि त्यांना आदिम पद्धतींवर अवलंबून राहावे लागत असे.

ह्यापैकी अनेक नैसर्गिक गर्भधारण्या चाचण्या आजही उपयुक्त आहेत कारण त्या करून पाहण्याची पद्धत खूप सोपी आहे. घरातच उपलब्ध असलेल्या खूप गोष्टी वापरून गर्भधारणा चाचणी करता येते.

नैसर्गिक गरोदर चाचण्यांचे फायदे

ह्या नैसर्गिक गर्भधारणा चाचण्यांचे काही स्पष्ट आणि अस्पष्ट फायदे आहेत. नैसर्गिक गर्भधारणा चाचण्यांचे फायदे खालीलप्रमाणे:

 • नैसर्गिक गर्भधारणा चाचणी ही अनियोजित गर्भधारणेची शक्यता वाटत असेल तर उपयोगी पडते कारण ती पटकन करून पाहता येते.
 • दुकानात जाऊन गर्भधारणेची चाचणीची मागणी करताना ओशाळल्यासारखे होते ते घरी करता येणाऱ्या गर्भधारणा चाचणीने टाळले जाते.
 •  जर गर्भधारणा झाली असेल तर ती बातमी गुप्त ठेवता येते.
 • घरातच उपलब्ध असलेल्या गोष्टी वापरून ह्या चाचण्या करून बघता येतात.
 • बाजारात मिळणाऱ्या गरोदर चाचणीपेक्षा ह्या नैसर्गिक गर्भधारणा चाचण्या स्वस्त पडतात.
 • चाचणीच्या अंतिम तारखेविषयी चिंता करण्याची गरज पडत नाही.

घरच्या घरी गर्भधारणा चाचणी कशी करावी?

दवाखान्यात जाऊन डॉक्टरांची भेट घेणे हा गर्भधारणा झाली आहे किंवा नाही हे तपासून पाहण्याचा सर्वात विश्वसनीय मार्ग आहे. जर हा पर्याय तुमच्या कार्यक्रमपत्रिकेत नसेल तर गर्भधारणा चाचणी करून बघण्याचे खूप मार्ग आहेत.

ह्यापैकी बऱ्याचशा चाचण्या तुमच्या लघवीची तपासणी करून करता येतात. तुम्ही सकाळी उठल्यावर पहिल्या लघवीचा नमुना काढून ठेवा कारण त्यामुळे तुम्हाला चाचणीचा अचूक परिणाम मिळण्याची खूप जास्त शक्यता असते. लघवीचा नमुना काढून ठेवण्याआधी तुमचे मूत्राशय पूर्ण भरेल इतके भरपूर पाणी प्या.

नमुन्याचे प्रमाण भरपूर ठेवा कारण काही वेळा चाचणी पुनःपुन्हा करून बघावी लागते आणि तसेच त्यामुळे तुम्हाला एका पेक्षा जास्त चाचण्या सुद्धा करून बघता येऊ शकतील.

तुम्ही घरी करू शकाल अशा १५ उत्तम गर्भधारणा चाचण्या

खाली १५ नैसर्गिक गर्भधारणा चाचण्या दिल्या आहेत त्या घरात उपलब्ध असलेल्या गोष्टींपासून खूप सोप्या पद्धतीने करून बघता येतील.

१. साखरेचा वापर करून गर्भधारणा चाचणी

खूप प्राचीन काळापासून गर्भधारणा चाचणीसाठी साखरेचा वापर होत आला आहे आणि ही माणसाकडून सर्वात सर्रास केली जाणारी गर्भधारणा चाचणी आहे.

तुम्हाला लागणारे साहित्य:

 • स्वच्छ वाटी
 • एक टेबलस्पून साखर
 • सकाळच्या पहिल्या लघवीचा नमुना

कृती:

वाटीमध्ये १ टेबलस्पून साखर घ्या त्यामध्ये १ टेबलस्पून लघवीचा नमुना घाला, थोडा वेळ वाट पहा.

सकारात्मक लक्षण:

गर्भधारणा झालेल्या स्त्रीच्या लघवीमध्ये HCG (Human chorionic gonadotropin) नावाचे संप्रेरक असते. हे संप्रेरक साखर विरघळण्यास प्रतिबंध करते आणि तुम्हाला लक्षात येईल की साखर सहजगत्या विरघळणार नाही आणि त्या साखरेच्या गुठळ्या होतील. हे गर्भधारणा झाली असल्याचे स्पष्ट लक्षण आहे.

नकारात्मक लक्षण:

जर साखर लघवीमध्ये लगेच विरघळी तर लघवीमध्ये HCG नाही असा त्याचा अर्थ होतो म्हणून गर्भधारणा झाली नाही.

सावधानता:

ही चाचणी निरुपद्रवी आहे आणि त्यासाठी काहीही सुरक्षिततेचे उपाय लागत नाहीत तसेच काही विशेष काळजी घ्यावी लागत नाही.

२. टूथपेस्ट गर्भधारणा चाचणी

नैसर्गिक गर्भधारणा चाचणीसाठी टूथपेस्ट हे थोडे आधुनिक साधन आहे. फक्त पांढरी टूथपेस्ट ह्या चाचणीमध्ये वापरली जाते कारण रंगीत टूथपेस्ट मधील घटक चाचणीच्या परिणामांमध्ये अडथळा आणू शकतात.

तुम्हाला लागणारे साहित्य:

 • स्वच्छ वाटी
 • २ टेबलस्पून टूथपेस्ट
 • सकाळच्या पहिल्या लघवीचा नमुना

कृती:

एका वाटीत २ टेबलस्पून टूथपेस्ट घ्या त्यामध्ये एक टेबलस्पून लघवीचा नमुना घाला, थोडा वेळ वाट बघा आणि निरीक्षण करा.

सकारात्मक लक्षण:

जर गर्भधारणा झाली असेल तर टूथपेस्ट आणि लघवीची प्रक्रिया झाल्यास टूथपेस्टचा रंग बदलतो किंवा फिकट सुद्धा होऊ शकतो. टूथपेस्टचा रंग बदलून निळसर होतो.

नकारात्मक लक्षण:

जर गर्भधारणा झालेली नसेल तर टूथपेस्टची प्रक्रिया होणार नाही.

सावधानता:

जरी ही चाचणी उपयोगी असली आणि सहजगत्या घरी करता येऊ शकत असली  तरी ह्या चाचणीच्या काही त्रुटी आहेत. एक म्हणजे टूथपेस्ट मध्ये लघवीचा नमुना किती प्रमाणात घालायचा हे निश्चित सांगितलेले नाही आणि दुसरं म्हणजे प्रक्रियेला लागणार वेळ बदलतो.

३. साबणाची गर्भधारणा चाचणी

ही खूपच सुलभ चाचणी आणि कुणालाही करता येऊ शकते. कुठल्याही कंपनीचा, कुठल्याही रंगाचा, कुठल्याही वासाचा साबण ह्या चाचणीसाठी लागणार आहे. फक्त साबण हातात बसेल एवढा असला पाहिजे एवढीच अट आहे.

तुम्हाला लागणारे साहित्य:

 • एक स्वच्छ वाटी
 • साबणाची वडी
 • सकाळच्या लघवीचा नमुना

कृती: 

वाटीमध्ये साबण ठेवा, साबणावर २ टेबलस्पून लघवीच्या नमुन्याचे घाला आणि निरीक्षण करा

सकारात्मक लक्षण:

जर साबणाचा रंग फिकट झाला आणि काही बुडबुडे दिसले तर गर्भधारणा झाल्याची शक्यता असते.

नकारात्मक लक्षण:

जर गर्भधारणा झाली नाही तर साबण आणि लघवीच्या नमुन्यामध्ये काहीही प्रक्रिया होत नाही.

सावधानता:

काही नाही.

४. मोहरीची पावडर वापरून गर्भधारणा चाचणी

जेव्हा पाळी चुकते तेव्हा तुम्हाला गर्भधारणा झाली असल्याची शंका येते तेव्हा तुम्ही मोहरीच्या पावडरीची चाचणी करून बघा. मोहरीच्या पावडरीने मासिक पाळी प्रेरित होते.

तुम्हाला लागणारे साहित्य:

 • गरम पाण्याचा टब
 • १/२-३/४ कप मोहरीची पूड

कृती:

गरम पाण्याच्या बादलीत मोहरीची पूड घाला आणि बाथ टब मध्ये २०-२५ मिनिटे पडून राहा. अंघोळ करून झाल्यावर २-३ दिवस वाट पहा.

सकारात्मक लक्षण:

मोहरीमुळे मासिक पाळी प्रेरित होते, वरील प्रकारे तुम्ही अंघोळ केल्यावर २-३ दिवसांमध्ये तुमची पाळी सुरु व्हायला पाहिजे. जर तुमची पाळी सुरु झाली नाही तर तुम्हाला गर्भधारणा झाली असण्याची शक्यता आहे.

नकारात्मक लक्षण:

जर ह्या चाचणीनंतर ३ दिवसात मासिक पाळी सुरु झाली तर पाळीला उशीर होण्याचे गर्भधारणेव्यतिरिक्त अन्य काही कारण असू शकते.

सावधानता:

काही नाही

५. शाम्पूची गर्भधारणा चाचणी

ही चाचणी सुद्धा टूथपेस्ट किंवा साबणाच्या गर्भधारणा चाचणी इतकीच सुलभ आहे. ह्या चाचणीचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे ह्या चाचणीसाठी कुठलंही विशेष साधन लागत नाही आणि चाचणीचा निकाल लगेच कळतो.

तुम्हाला लागणारे साहित्य:

 • एक स्वच्छ वाटी
 • शाम्पूचे २ थेम्ब
 • पाणी
 • सकाळच्या पहिल्या लघवीचा नमुना

कृती:

एका स्वच्छ वाटीमध्ये शाम्पूचे २ थेम्ब घाला आणि त्यामध्ये थोडे पाणी घालून साबणाचे पाणी तयार करा. हलकेच ढवळा जेणेकरून फेस होणार नाही. आता लघवीच्या नमुन्याचे काही थेम्ब घाला आणि निरीक्षण करा.

सकारात्मक लक्षण:

जर शाम्पू मध्ये बुडबुडे आले तर तुमची गर्भधारणा झाली असल्याची शक्यता आहे.

नकारात्मक लक्षण:

जर काहीही प्रक्रिया झाली नाही तर गर्भधारणा झाली नाही असे तुम्ही समजू शकता.

सावधानता:

शाम्पू आणि पाणी फेस न होता मिक्स करणे म्हणजे ते युक्तीचे काम असते कारण फेस झाल्यास चाचणीच्या परिणामध्ये अडथळा येऊ शकतो.

६. डेटॉल प्गर्भधारणा चाचणी

छोट्या जखमा किंवा खरचटले तर डेटॉल हे जंतुनाशक घरी वापरता येऊ शकेल. हे उत्पादन तुम्ही नैसर्गिक गर्भधारणा चाचणी करण्यासाठी वापरू शकता, बघुयात कसे ते

तुम्हाला लागणारे साहित्य:

 • एक स्वच्छ ग्लास
 • एक टेबलस्पून डेटॉल
 • सकाळच्या पहिल्या लघवीचा नमुना

कृती:

एका ग्लासमध्ये एक टेबलस्पून डेटॉल घाला. त्यामध्ये लघवीच्या नमुन्याचे ३ टेबलस्पून घाला. आता बसून घ्या आणि ५-७ मिनिटे निरीक्षण करा.

सकारात्मक लक्षण:

जर डेटॉलपासून लघवीचा थर वेगळा झाला तर त्याचा अर्थ गर्भधारणा झाली आहे असा होतो.

नकारात्मक लक्षण:

जर लघवी आणि डेटॉलचे थर वेगवेगळे झाले नाहीत तर गर्भधारणा झालेली नसते.

सावधानता:

काही नाही

७. मिठाची गर्भधारणा चाचणी

मीठ हा घटक प्रत्येक घरात आढळतो आणि नैसर्गिक गर्भधारणेसाठी हा पदार्थ खूप परिणामकारक असतो. ह्या चाचणीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ही सर्वात विश्वसार्ह आणि स्वस्त चाचणी आहे.

तुम्हाला लागणारे साहित्य:

 • स्वच्छ ग्लास
 • चिमूटभर मीठ
 • सकाळच्या लघवीचा नमुना

कृती:

एका ग्लासात लघवीचा नमुना घ्या, त्यामध्ये एक किंवा दोन चिमूट मीठ घाला आणि कमीत कमी ३ मिनिटांसाठी निरीक्षण करा.

सकारात्मक लक्षण:

मिठाची लाघवीसोबत प्रक्रिया होते आणि पांढऱ्या गुठळ्या तयार होतात आणि हे नक्कीच गर्भधारणेचे लक्षण असते.

नकारात्मक लक्षण:

जर काहीच प्रक्रिया झाली नाही तर गर्भधारणा झाली नाही असे समजावे.

सावधानता:

काही नाही

८. व्हिनेगर गर्भधारणा चाचणी

व्हिनेगर हा आम्लाचा एक प्रकार आहे जो पातळ केला गेला आहे आणि तो चीनी पाककृतींचा मुख्य भाग आहे. व्हिनेगर हे नैसर्गिक गर्भधारणा चाचणीसाठी वापरले जाते. ह्या चाचणीसाठी व्हिनेगर हे वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध आहे. तथापि साधे पांढरे व्हिनेगर, ज्याची किंमत कमी असते हे कुठल्याही किराणा सामानाच्या दुकानात उपलब्ध असते.

तुम्हाला लागणारे साहित्य:

 • एक स्वच्छ ग्लास
 • व्हाईट व्हिनेगर
 • सकाळच्या पहिल्या लघवीचा नमुना

कृती:

थोडे व्हिनेगर ग्लासमध्ये ओता आणि लघवीचा नमुना व्हिनेगर मध्ये घाला. मिक्स करा आणि परिणामांचे निरीक्षण करा.

सकारात्मक लक्षण:

व्हिनेगरच्या रंगामध्ये कुठलाही बदल झाल्यास ते गर्भधारणा झाली असल्याचे लक्षण आहे.

नकारात्मक लक्षण:

जर कुठलाही दृश्य बदल झाला नाही तर ते गर्भधारणा झाली नसल्याचे निर्देशक आहे.

सावधानता:

लघवीचा नमुना व्हिनेगर मध्ये ओतताना फेस होऊ नये म्हणून हळूच ओता, बुडबुडे आणि फेसामुळे चाचणीच्या अचूकतेवर परिणाम होतो.

९. पाइन सोल गर्भधारणा चाचणी

पाइन सोल हे घरातले प्रतिजैवक आहे. पाईन सोल हे सुई सारख्या पानांनी बनलेले असते आणि पाईन वृक्षाच्या इतर भागापासून बनलेले असते आणि ते गोल्डन ब्राऊन रंगाचे असते. पाइन सोल गर्भधारणा चाचणी ही खूप अचूक मानली जाते आणि खूप प्रसिद्ध असते.

तुम्हाला लागणारे साहित्य:

 • एक स्वच्छ ग्लास
 • पाइन सोल
 • सकाळच्या लघवीचा नमुना

कृती:

पाइन सोल ग्लास मध्ये ओता आणि त्यामध्ये थोडा लघवीचा नमुना घाला आणि निरीक्षण करा.

सकारात्मक लक्षण:

जर गर्भधारणा झालेली असेल तर पाइन सोल चा रंग बदलून निळसर हिरवा होईल.

नकारात्मक लक्षण:

जर रंगामध्ये काहीच फरक झाला नाही तर त्याचा अर्थ तुम्ही गर्भवती नाही असा होतो.

सावधानता

सुवासिक पाईन सोल सुद्धा उपलब्ध असते, ह्या चाचणीसाठी साधे कुठलाही वास नसलेले गोल्डन तपकिरी रंगाचे पाइन सोल वापरा.

१०. गहू आणि जव गर्भधारणा चाचणी

डिस्टेफ गोस्पेल्स, हे फ्रान्समधील १५ व्या शतकातील गर्भधारणा चाचणीच्या पाककृतींचे संकलन आहे. त्यानुसार गहू आणि जव गर्भार स्त्रीच्या लघवीमध्ये पाण्यापेक्षा तीनपट जास्त वेगाने अंकुरतात.

तुम्हाला लागणारे साहित्य:

 • एक काचेची वाटी
 • गहू आणि जव
 • सकाळच्या पहिल्या लघवीचा नमुना

कृती:

वाटीमध्ये काही गहू आणि जव ठेवा, त्यामध्ये लघवीचा नमुना घाला आणि २ दिवस वाट बघा.

सकारात्मक लक्षण:

जर गव्हाला आणि जवाच्या बियाना अंकुर फुटले तर तुम्ही गरोदर आहात.

नकारत्मक लक्षण

जर अंकुर फुटले नाहीत तर गर्भधारणा झालेली नसते.

सावधनता:

काही नाही

११. सिंहापर्णीच्या पानांची (Dandelion Leaves) गर्भधारणा चाचणी

सिंहापर्णीचे रोप आपल्या घराच्या बागेत सुद्धा वाढते आणि थोड्याश्या प्रयत्नांनंतर ते लगेच सापडते. सिंहापर्णीची पाने वापरून केलेली गर्भधारणा चाचणी सर्वात अचूक समजली जाते आणि अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे.

तुम्हाला लागणारे साहित्य:

 • प्लास्टिक शीट
 • सिंहपर्णीची पाने
 • सकाळच्या लघवीचा नमुना

कृती:

सिंहापर्णीची पाने प्लॅस्टिकच्या शीट वर सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा. आता लघवीचा नमुना पानांवर टाका जेणेकरून पाने संपूर्णपणे भिजतील. १० मिनिटे निरीक्षण करा आणि आणि लक्ष न देता ते तसेच सोडू नका.

सकारात्मक लक्षण:

जर सिंहापर्णीची पाने तपकिरी रंगाची झाली किंवा त्यावर फोड आले तर ते गर्भारपणाचे लक्षण आहे.

नकारात्मक लक्षण:

जर पानांमध्ये काहीच बदल झाला नाही तर गर्भधारणा झालेली नसते.

सावधानता:

चाचणीसाठी ताजी आणि नुकतीच तोडलेली पाने घ्या कारण आधी पाने तोडून ठेवलेली असली तर चाचणीचे निकाल अचूक येत नाहीत.

१२. ब्लिचिंग पावडर गर्भधारणा चाचणी

ब्लिचिंग पावडर बाथरूम स्वच्छ करण्यासाठी वापरले जाते तसेच ते गर्भधारणा चाचणी साठी सुद्धा परिणामकारक आहे. ब्लिचिंग पावडर चा महत्वाचा फायदा म्हणजे चाचणीचा निकाल आपल्याला लगेच कळतो.

तुम्हाला लागणारे साहित्य:

 • स्वच्छ ग्लास
 • ब्लिचिंग पावडर
 • सकाळच्या पहिल्या लघवीचा नमुना

कृती:

ग्लास मध्ये ब्लिचिंग पावडर टाका आणि त्यामध्ये लघवीचा नमुना घाला आणि निरीक्षण करा.

सकारात्मक चिन्ह:

जर लगेच प्रक्रिया होऊन बुडबुडे आणि फेस आला तर गर्भधारणा झाली असल्याचे निर्देशित होते.

नकारात्मक चिन्ह:

जर बुडबुडे आले नाहीत आणि ते मिश्रण  तसेच स्थिर राहिले तर गर्भधारणा झाली नाही असे समजावे.

सावधानता:

ब्लिचिंग पावडर आणि लघवीच्या नमुन्यातील रासायनिक प्रक्रियेमुळे तयार झालेल्या वाफा विषारी असतात त्यामुळे त्या श्वासाद्वारे आत घेतल्या जाऊ नयेत म्हणून थोडे दूर अंतरावर उभे राहा.

१३. बेकिंग सोडा गर्भधारणा चाचणी

बेकिंग सोडा किंवा सोडियम बाय कार्बोनेट हा बेकिंग साठी वापरला जाणारा महत्वाचा घटक आहे. ब्रेड तयार करण्यासाठी विशेषतः ह्याचा वापर होतो. बेकिंग सोडा बेकिंग साठी तर उत्तम आहेच परंतु घरी गर्भधारणा चाचणी करण्यासाठी सुद्धा तो वापरला जातो.

तुम्हाला लागणारे साहित्य:

 • स्वच्छ काचेची वाटी
 • बेकिंग सोडा
 • सकाळच्या पहिल्या लघवीचा नमुना

कृती: 

थोडा बेकिंग सोडा वाटीमध्ये घ्या आणि त्यावर लघवीचा नमुना घाला आणि निरीक्षण करा.

सकारात्मक लक्षण:

जर गर्भधारणा खूप बुडबुडे येऊन रासायनिक प्रक्रिया झालेली दिसते.

नकारात्मक लक्षण:

जर गर्भधारणा झालेली नसेल तर अगदी मोजके बुडबुडे दिसतात.

सावधानता:

ही चाचणी तशी सुरक्षित आहे आणि बेकिंग सोडा व लघवीचा नमुना ह्यामधील प्रक्रियेनंतर हानिकारक वाफांची निर्मिती होत नाही.

१४. लघवीचा नमुना साठवून ठेवण्याची गर्भधारणा चाचणी

गर्भधारणा चाचणी करण्यासाठी लागणाऱ्या घटकांची एक मोठी यादी आहे. परंतु फक्त मूत्र वापरून सुद्धा गर्भधारणा चाचणी करता येते. इतिहासात ‘urine in the jar’ ही चाचणी सर्रास वापरली जायची.

तुम्हाला लागणारे साहित्य:

 • स्वच्छ काचेचा ग्लास
 • सकाळच्या लघवीचा पहिला नमुना

कृती:

सकाळच्या पहिल्या लघवीचा नमुना काचेच्या बाटलीत घ्या आणि दिवसभर ते तसेच राहू द्या.

सकारत्मक लक्षण:

जर तुम्हाला २४ तासानंतर लघवीच्या नमुन्यावर पातळ थर दिसला तर गर्भधारणा झाली असल्याची खूप जास्त शक्यता आहे.

नकारात्मक लक्षण:

जर असा कुठलाच थर आढळला नाही तर गर्भधारणा झालेली नसते.

सावधानता:

ही चाचणी संपूर्णतः सुरक्षित आहे आणि त्यासाठी कुठल्याच सूचना पाळण्याची गरज नाही.

१५. टुना आणि व्हिनेगर गर्भधारणा चाचणी

ही चाचणी सर्वात अचूक समजली जाते. टुना आणि व्हिनेगर गर्भधारणा चाचणी सर्वात अचूक परिणाम देण्याची शक्यता खूप जास्त असते.

तुम्हाला लागणारे साहित्य:

 • स्वच्छ काचेचे भांडे
 • व्हाईट व्हिनेगर
 • कॅन केलेले टुना
 • सकाळच्या पहिल्या लघवीचा नमुना

कृती:

कॅन केलेल्या टुनाचा ज्यूस एका काचेच्या भांड्यात काढून घ्या आणि त्यामध्ये समप्रमाणात व्हिनेगर घाला, मिक्स करा आणि सामान्य तापमानाला एक दिवस तसेच ठेवा. दुसऱ्या दिवशी त्यामध्ये लघवीचा नमुना घाला.

सकारात्मक चिन्ह:

जर हे मिश्रण गडद हिरव्या रंगाचे झाले तर गर्भधारणा झाली आहे.

नकारात्मक चिन्ह:

पिवळा रंग झाल्यास गर्भधारणा झालेली नाही.

सावधानता:

काही नाही

घरगुती गर्भधारणा चाचणीची अचूकता वाढवण्यासाठी काही टिप्स

सर्वसाधारणपणे घरगुती गर्भधारणा चाचणी लघवीमध्ये HCG ची पातळी जाणून घेण्याचा चांगला मार्ग आहे. ह्या चाचण्यांची अचूकता वाढवण्यासाठी, काही साध्या कृती आणि सूचना मनात ठेवल्या पाहिजेत.

 • चाचणीसाठी वापरले जाणाऱ्या वाट्या, कप, बरण्या आणि इतर भांडी ही स्वच्छ आणि निर्जंतुक केलेली असावीत.
 • लघवीचा नमुना हा सकाळी उठल्या उठल्या झालेल्या लघवीचा असावा, कारण त्यामध्ये HCG ह्या संप्रेरकाची मात्र खूप जास्त असते आणि चाचणीच्या अचूकतेसाठी ते महत्वाचे असेल.
 • खरंतर गर्भधारणा चाचणी तुम्ही सकाळी उठल्या उठल्या केली पाहिजे.
 • लघवीचा नमुना गोळा करताना त्याचे प्रमाण जास्त असावे कारण कधी कधी चाचणी पुन्हा करून बघावी लागते.
 • परिणामांच्या खात्री साठी चाचणी ३ वेळा करून पहिली पाहिजे.
 • काही चाचण्यांच्या प्रक्रियेसाठी वेळ लागू शकतो त्यामुळे घाई करू नका, प्रक्रिया होण्यासाठी वेळ द्या.

ह्या चाचण्या १००% अचूक असतात का?

ह्या प्रश्नाचे साधं उत्तर आहे ‘नाही’! ह्या घरगुती  चाचण्या कधीही १००% अचूक नसतात. जरी ह्या चाचण्या बाजारात मिळणाऱ्या गर्भधारणा चाचणी किट सारख्याच असल्या तरी  ह्याचे परिणाम हे अचूक नसण्याची अनेक कारणे आहेत.

ह्या चाचण्यांसाठी कुठल्याही स्पष्ट मार्गदर्शक सूचना नाहीत हे एक कारण आहे. ह्या चाचण्यांसाठी लागणारे घटक किती प्रमाणात लघवीच्या नमुन्यात घ्यायचे ते स्पष्ट नाही. तसेच प्रक्रियेमध्ये लागणाऱ्या घटकांचे प्रमाण आणि गुणवत्ता ह्यामुळे आवश्यक प्रक्रियेला उशीर लागतो.

घरगुती  गर्भधारणा चाचणी करून त्याचा निकाल काहीही असला तर तुमच्या डॉक्टरांची भेट घ्या.

घरगुती  गर्भधारणा चाचण्या बाजारात मिळणाऱ्या चाचण्या येण्याधीपासून अनेक वर्षांपासून वापरल्या जातात. गुप्तता राखण्यासाठी आणि ओशाळण्याजोगी परिस्थिती टाळण्यासाठी ह्या चाचण्या उपयोगी आहेत. ह्या चाचण्या कधीच १००% अचूक नसतात. नैसर्गिक गर्भधारणा चाचण्या घरी केल्या जातात आणि अनियोजित गर्भधारणेबरोबर येणारी चिंता हाताळण्यासाठी ह्याचा उपयोग होऊ शकतो. ह्या चाचण्या करून बघण्याची सोपी पद्दत आणि लगेच उपलब्ध असणारे घटक ह्यामुळे ह्या चाचण्या म्हणजे एक सोयीचा पर्याय आहे.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article