Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे गर्भधारणा: ११वा आठवडा

गर्भधारणा: ११वा आठवडा

गर्भधारणा: ११वा आठवडा

आतापर्यंत तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या शरीरात अनेक बदल झालेले आहेत. तुमच्या बाळाचा विकास भ्रूणावस्थेतून गर्भामध्ये झाला आहे, आणि माणसाच्या शरीरात सुरु असणारी सगळी कार्ये आता बाळाच्या शरीरात सुरळीत सुरु झालेली आहेत. तुमच्याही शरीरात अनेक बदल झाले आहेत, उदा: गोलाकार आणि दुखरे स्तन, किंबहुना संपूर्ण शरीराची गोलाकार संरचना झाली असून  एका नवीन जीवाला सामावून घेण्यासाठी गर्भाशय सुद्धा तयार झाले आहे. आता गर्भारपणाच्या पुढच्या म्हणजेच ११ व्या आठवड्यात तुमच्या गर्भारपणात नवीन रोमांचक शक्यता काय आहेत हे पाहूया.

गर्भधारणेच्या ११व्या आठवड्यातील तुमचे बाळ

गर्भारपणाच्या ९व्या आणि १०व्या आठवड्याइतकाच ११वा आठवडा महत्वाचा आहे, कारण बाळ आता कार्यात्मक मनुष्याप्रमाणे दिसते. बाळाच्या चेहऱ्याची हाडे तयार झालेली असतात. परंतु त्वचा पारदर्शक असते. तुमच्या बाळानेथोडी वळवळ करण्यास सुरुवात केलेली असते पण इतक्यात तुमच्या ते लक्षात येणार नाही.

तुम्हाला आता बाळाच्या हातापायाची २० बोटे मोजता येतील आणि तसेच बाळाचे हात आणि पाय विकसित झालेले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे बाळ गिळण्याची क्रिया शिकलेले आहे आणि ते गर्भाशयातील द्रवाने वेढले गेले आहे. केसांची मुळे, जीभ आणि नाक सुद्धा दिसू लागले आहेत.

बाळाचा आकार केवढा असतो?

बाळ आता लिंबू किंवा अंजिराइतकं मोठं दिसत आहे. गर्भारपणाच्या ११ व्या आठवड्यात बाळाचा आकार १-२ इंच असतो. ११व्या आठवड्यात बाळाचे वजन ७-८ ग्रॅम्स असते. सर्वात मजेदार म्हणजे बाळाचे डोके तयार होते, आणि डोके आणि बाळाचे शरीर ह्याचे गुणोत्तर १:१ असते.

शरीरात होणारे बदल

गर्भारपण आयुष्य बदलते, शरीरांमधील बदलांमुळे तुमचे शरीर पूर्वीसारखे होणार नाही. शरीरातील हे बदल टाळता न येण्यासारखे असतात, गर्भारपणाच्या ११ व्या आठवड्यात तुमच्या शरीरात काय बदल होतात ते पाहुयात:

जरी हे सांगणे कठीण असले तरी १०व्या आठवड्यापेक्षा आता तुमचे पोट जास्त गोलाकार दिसेल.ज्या स्त्रियांना गोलाई आवडते त्यांना त्यांच्या गर्भारपणातील ह्या शारीरिक बदलांमुळे आनंद होईल.काही भाग्यवान स्त्रिया गर्भारपणात तेजस्वी दिसू लागतील आणि काहींना संप्रेरकांमधील बदलांमुळे रॅश किंवा फोड येतील. तुमचे वजन आता नक्कीच वाढलेले असेल.

११व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

११व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

जरी तुमचे पोट दिसत असेल किंवा नसेल, जरी तुमच्या शरीरात काही बदल होत असतील किंवा नसतील, गर्भारपणाच्या ११ व्या आठवड्यात तुम्हाला खालील लक्षणे अनुभवण्यास मिळतील.

  • पायांना पेटके येणे: गर्भारपणाच्या ११ व्या आठवड्यातील हा महत्वाचा बदल आहे. जर तुम्ही तुमचा दिनक्रम पार पडत असाल तर पायाला पेटके येणे हे दिवसा आढळेल. तरीही सुद्धा झोपेत पण कधी कधी तुम्हाला वेदनादायी आणि घट्ट झालेल्या पायांच्या स्नायूमुळे वेदना होऊ शकतात.
  • गडद काळी रेघ (Linea Nigra): हे सुद्धा लक्षण गर्भारपणाच्या ११ व्या आठवड्यात दिसू लागते. तुमच्या पोटावर बेंबीपासून खालच्या दिशेने एक गडद काळी रेघ तुम्हाला दिसेल. पण हे सामान्य आहे आणि ही रेघ कायम राहत नाही. संप्रेरकांमधील बदलामुळे ही काळी रेघ दिसते.

वर दिलेल्या ह्या नवीन बदलांबरोबरच, काही जुनी आणि गेल्या काही आठवड्यात दिसणारी गर्भारपणाची लक्षणे सुद्धा दिसणार आहेत,

  • थकवा: तुमच्या बाळाची जशीजशी वाढ होत आहे तसे तुम्हाला थकवा वाटेल आणि आराम करावासा वाटेल.
  • गॅस होणे आणि पोट फुगणे: मागच्या २ आठवड्यात प्रोजेस्टेरॉनच्या वाढलेल्या पातळीमुळे तुमच्या पोटाने तुम्हाला थोडा त्रास दिला असेल, आणि त्यामुळे तुमची पचनक्रिया सुद्धा मंदावली असेल.
  • मॉर्निंग सिकनेस आणि मळमळ: काही भाग्यवान स्त्रियांमध्ये मॉर्निंग सिकनेस बराच कमी झाला असेल परंतु काही जणींना मात्र हा त्रास पहिली तिमाही संपेपर्यंत सुरु राहतो.
  • योनिमार्गातील स्त्राव: तुमची संभोग क्रिया जरी ह्यामुळे सुधारणार असली तरी, घडीचा (pantiliners) चा वापर करा कारण जसजसे हे दिवस पालटतील तसे हा स्त्राव वाढणार आहे.
  • मनःस्थितीतील बदल: ट्राफिक सिग्नल पेक्षा वेगाने तुमच्या मनःस्थितीत बदल होतील त्यामुळे तुम्ही गर्दी आणि लोकांपासून थोडे दूर राहा कारण ताणामुळे ते अजून वाढतील.

गर्भधारणेच्या ११व्या आठवड्यात पोटाचा आकार

बऱ्याच स्त्रियांना गॅस झाल्यामुळे पोट फुगले आहे किंवा जड झाले आहे असे वाटेल, परंतु तुमचे पोट आतापर्यंत थोडे दिसू लागले असेल. ज्या स्त्रिया पहिल्यांदा आई होणार आहेत त्यांचे पोट कदाचित दिसणार नाही ज्या स्त्रियांची ही पहिली वेळ नाही, त्यांच्या पोटावरून गरोदर आहेत हे कळेल.अर्थात, हे विरुद्धही असू शकते  वजन जास्त असलेल्या स्त्रियांमध्ये काहीही फरक दिसणार नाही. बारीक स्त्रियांमध्ये थोडे पोट दिसेल, विशेषकरून जर तुमचे वजन वाढले असेल तर.

गर्भधारणेच्या ११व्या आठवड्यातील सोनोग्राफी

११ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड वरून तुम्हाला बाळाची पोटात छान वाढ होत आहे हे कळेल. बाळाची हालचाल सुंदर आणि सहज असेल. तुमच्या बाळाची आधीची पारदर्शक त्वचा आता अपारदर्शक होणार आहे. परंतु ११ व्या आठवड्यात त्वचा पारदर्शकच राहणार आहे.

आहार कसा असावा?

आहार कसा असावा?

गर्भारपणाच्या ११ व्या आठवड्यात काय खावे हा मोठा घटक विचारात घेण्याजोगा आहे. तुम्ही ह्या काळात काय खाल्ले पाहिजे हे माहित करून घेण्यासाठी पुढे वाचा

  • कॅल्शिअमयुक्त आहार: तुमच्या बाळाची हाडे विकसित होत आहेत, त्यामुळे कॅल्शिअम तुमच्या शरीरासाठी जरुरी आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तुमच्या खाद्यपदार्थांच्या यादीवर सर्वात महत्वाचे आहेत.
  • प्रथिने: मासे आणि लाल मांस घेण्याचा सल्ला दिला जातो. प्रथिने हाडे आणि शरीर विकासास मदत करतात.
  • डाळी: डाळींमध्ये पचायला सुलभ असलेली प्रथिने आणि खूप वेगवेगळी व्हिटॅमिन्स असतात.
  • बिया आणि तीळ: जीवनसत्वे आणि पोषक तेलांचे हे स्रोत आहेत.
  • बदाम आणि काजू: सुकामेवा हे प्रथिने आणि व्हिटॅमिन ह्यांचा उत्तम स्रोत आहे त्यामुळे त्यांचा आहारात समावेश करा.
  • पालक: पालक हे सुपरफूड असून, लोहाने समृद्ध आहे.
  • दही: कॅल्शिअम चा दही हा उत्तम स्रोत आहे, दही हे प्रोबियॉटिक असल्याने चांगले जिवाणू राखून ठेवते.
  • फळे आणि हिरव्या पालेभाज्या: व्हिटॅमिन्स आणि खनिजे ह्यांनी हिरव्या भाज्या आणि फळे समृद्ध असतात आणि त्यामुळे सर्वांगीण वाढीस मदत होते.

 

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स

गर्भधारणा आव्हानात्मक आणि अगदी स्पष्ट पण असू शकते. तरीसुद्धा, स्वतःला आणि आपल्या बाळाला सुरक्षित आणि निरोगी ठेवणे ह्या बाबींचा विचार केला पाहिजे.

हे करा

  • भरपूर पाणी प्या, सजलीत राहा त्यामुळे पायाला पेटके येणे कमी होईल.
  • छोटी सुट्टी घ्या आणि फिरायला जा आणि आरामात रहा.
  • आनंदी रहा, पालकत्वाची पुस्तके वाचून स्वतःला पालक या भूमिकेसाठी तयार करा.
  • तुमच्या डॉक्टरांचा फोन नंबर लवकर सापडेल असा ठेवा म्हणजे तुम्हाला त्यांच्याशी त्वरित संपर्क साधता येईल.

हे करू नका

  • तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही औषध घेऊ नका, त्यामुळे तुमच्या बाळाच्या आरोग्यावर परिणाम होईल
  • लघवीला लागल्यास त्वरित जा. कारण वारंवार लघवी होणे हा गर्भारपणाच्या ११ व्या आठवड्याचा भाग आहे.
  • खूप जास्त प्रमाणात जंक फूड खाऊ नका कारण तुमची पचनक्रिया प्रोजेस्टेरॉनमुळे मंदावलेली असते.

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

तुम्ही गरोदर आहात ह्याचा अर्थ तुम्ही स्टयलिश राहायचं नाही असं नाही, चांगल्या ताणल्या जाऊ शकतील अशा ब्रा आणा. तुम्ही स्तनपान करताना वापरतात त्या नर्सिंग ब्रा सुद्धा आणून ठेऊ शकता, म्हणजे जेव्हा लागतील तेव्हा पटकन वापरता येतील. पालकत्वावर पुस्तके घेऊन या म्हणजे तुमच्याकडे त्याबद्दलच्या माहितीचा स्रोत असेल. मॅटर्निटी कपडे आणि पँट्स आणून ठेवा, शक्यतोवर कॉटन मधल्या असाव्यात. तुमच्या डॉक्टरांनी लिहून दिलेली व्हिटॅमिन्स आणि पूरक औषधे आणून ठेवा. आरामदायी बूट घ्या त्यामुळे पायाचे पेटके आणि सूज कमी होईल. दातांची काळजी घ्या आणि त्यासाठी लागणारी उत्पादने आणून ठेवा, त्यामुळे दाताचे प्रश्न उद्भवणार नाहीत.

जेव्हा तुमचे पोट दिसत नाही तेव्हा तुमच्या शरीरात खूप बदल होत असतात कारण तुमच्या शरीरात संप्रेरके तयार होत असतात. आरोग्यपूर्ण आहार आणि सैल सुती कपडे वापरल्याने तुम्हाला खूप आरामदायक वाटणार आहे.

मागील आठवडा: गर्भधारणा: १०वा आठवडा

पुढील आठवडा: गर्भधारणा: १२वा आठवडा

संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article