Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home टॉडलर (१-३ वर्षे) दर-महिन्याला-होणारा-बाळाचा-विकास तुमच्या १८ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमच्या १८ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमच्या १८ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमचे बाळ आता १८ महिन्यांचे झाले आहे. तुम्हाला  तुमचे बाळ दिवसभर घरात इकडे तिकडे धावताना दिसेल. लहान मूल आणि पालक दोघांसाठी हा खूप गोंधळात टाकणारा काळ आहे कारण तुमच्यासाठी तो अजूनही लहान बाळ आहे. परंतु तुमचे बाळ स्वतःला स्वतंत्र समजते आणि बऱ्याच गोष्टींचा शोध घेण्यास तयार असते. तुमच्या 18 महिन्यांच्या बाळाच्या वाढीच्या आणि विकासाच्या बाबतीत काय प्रगती होते आहे ह्याविषयी आपण ह्या लेखात चर्चा करणार आहोत.

व्हिडिओ: 18 महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास (अधिक क्रियाकलाप आणि काळजीविषयक टिप्स)

18 महिन्यांच्या लहान बाळाचा विकास

तुमच्या लक्षात आले असेल की तुमचे लहान बाळ त्याच्या वयाच्या पहिल्या वर्षाच्या तुलनेत वेगाने वाढत नाही. बाळाची वाढ मंद गतीने होत आहे. १८ महिन्यांच्या बाळाच्या वाढीचे काही टप्पे दिलेले आहेत.

1. शारीरिक विकास

तुमच्या बाळामध्ये अनेक शारीरिक बदल होत आहेत. तुमच्या 18 महिन्यांच्या बाळाचे वजन 22.4 ते 26 पौंड (मुलांचे) आणि 20.8 ते 24.5 पौंड (मुलींचे) असू शकते.

  • तुमचे बाळ धावू शकते
  • तुमचे बाळ चेंडू हातात धरून फेकू शकते
  • तुमचे बाळ तुमचा हात धरून पायऱ्या चढून खाली उतरू शकते
  • तुमचे बाळ रंग आणि क्रेयॉन्सच्या सहाय्याने लिहू शकते
  • तुमचे बाळ स्वतःचे कपडे देखील काढू शकते.
  • तुमचे बाळ त्याच्या कपमधून पाणी पिऊ शकते आणि स्वतःचे स्वतः दूध पिऊ शकते.
  • तुमचे बाळ खेळण्यासाठी खेळणी बाहेर काढू शकते.

2. सामाजिक आणि भावनिक विकास

तुमचे लहान मूल या वयात विविध भावना अनुभवत आहे. येथे काही कौशल्ये दिलेली आहेत. ही कौशल्ये  तुमच्या बाळामध्ये वयाच्या 18 महिन्यांपर्यंत विकसित होऊ शकतात.

  • तुमचे बाळ प्रेम आणि आपुलकी व्यक्त करू शकते
  • तुमचे बाळ अस्वस्थ किंवा चिंताग्रस्त असताना राग काढू शकते
  • तुमचे बाळ या वयात सर्व जाणून घेण्यास उत्सुक असते आणि त्याला त्याच्या सभोवतालच्या सर्व गोष्टींचा शोध घेण्याची इच्छा असते
  • तुमचे बाळ फक्त तुमच्याकडेच राहते आणि वेगळे होण्याची चिंता दर्शवू शकते
  • तुमचे बाळ त्याचा राग आणि नाराजी दर्शवू शकते
  • तुमचे बाळ इतरांना प्रतिसाद म्हणून हसते

3. संज्ञानात्मक आणि भाषा विकास

तुमच्या १८ महिन्यांच्या बाळामध्ये खालील संज्ञानात्मक आणि भाषा विकास कौशल्ये तुमच्या लक्षात येतील:

  • तुमचे बाळ एका शब्दाच्या सूचना समजते आणि प्रतिसाद देते
  • तुमचे बाळ 10ते 20 शब्द बोलू शकते
  • तुमचे बाळ त्याच्या शरीराचे अवयव ओळखून त्यांच्याकडे निर्देशही करू शकते
  • तुमच्या बाळाला त्याची आवडती खेळणी आठवतात
  • तुमचे बाळ तुमच्या कृतींचे अनुकरण करू शकते उदा: फोनवर बोलणे इ.
  • तुमचे बाळ समान वस्तू जुळवू शकते
  • तुमचे बाळ चित्र पुस्तकातील क्रिया किंवा वस्तू ओळखू शकते

वर्तणूक

तुमचे लहान मूल या वयात अधिक जागरूक होत आहे, आणि तो कसा मार्ग काढू शकतो हे त्याला माहीत आहे. ह्या काळात तुमच्या बाळाची इच्छाशक्ती अधिक प्रबळ असते आणि जर त्याला हवे ते मिळाले नाही  तर तो गडबड करू शकतो आणि नाराज होऊ शकतो. तुमचे लक्ष कसे वेधायचे हे देखील त्याला माहित आहे. तुम्ही अजूनही तुमच्या बाळासाठी डायपर वापरत असाल, परंतु शौचालय प्रशिक्षण सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे. मोठ्या भावंडासारखे तो पॉटी सीट वर बसून बघेल.

वर्तणूक

अन्न आणि पोषण

तुमच्या लहान बाळाची वाढ होते आहे आणि त्याप्रमाणे त्याच्या पौष्टिक गरजा बदलू लागतील. तुम्ही त्याला त्याच्या बेबी सीटवर बसवू शकता जेणेकरून बाळ कुटुंबातील इतर सदस्यांसोबत जेवण करू शकेल. जरी तुमचे बाळ स्वतःहून जास्त काही खात नसले किंवा अन्नासोबत नुसते खेळत असले तरीही, मोठे झाल्यावर स्वतःचे स्वतः कसे जेवावे हे तो शिकेल. कुटुंबातील इतर सदस्यांसोबत बसून जर तो जेवत नसेल तर दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचे जेवण संपल्यावर त्याचे कौतुक करा. अशा प्रकारे त्याला त्याने काय केले पाहिजे हे लक्षात येईल.

तुमच्या बाळाच्या आहार योजनेत तुम्ही सर्व अन्न गट समाविष्ट केल्याची खात्री करा. या वयापर्यंत, तुमच्या बाळाला दिवसातून तीन मुख्य जेवण आणि दोन ते तीन वेळा स्नॅक्स आवश्यक असते. मेंदूच्या विकासासाठी पूर्ण चरबीयुक्त दुधाचा आहारात समावेश करण्यास सांगितले जाते. जर तुमच्या बाळाला काही खाद्यपदार्थ आवडत नसतील तर त्याला जबरदस्तीने खायला देऊ नका. पण काही दिवसांनी त्या खाद्यपदार्थाची ओळख बाळाला दुसऱ्या स्वरूपात करून द्या.

जर तुमचे बाळ अजूनही बाटलीने दूध पीत असेल तर त्याला सिपिकपची सवय लावण्याची ही वेळ आहे. तसेच जर तुमचे बाळ लैक्टोज असहिष्णु असेल तर तुम्ही तुमच्या बाळाला सोया दूध देण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता. अन्नाच्या ऍलर्जींबद्दल सावधगिरी बाळगा आणि त्यामुळे तुमचे बाळ त्यावर कशी प्रतिक्रिया देते हे पाहण्यासाठी एका वेळी एक खाद्यपदार्थ बाळाला देऊन पहा.

बाळाची झोप

काही पालकांना त्यांच्या लहान मुलाला झोपायला लावणे अत्यंत कठीण वाटू शकते. ह्याचे कारण म्हणजे बाळ त्याच्या भोवतालच्या जगाचा शोध घेण्यात इतका उत्सुक असतो की झोपेला तो प्राधान्य देत नाही. तुमचे बाळ थकलेले असू शकते परंतु तरीही, झोपायला नकार देते. अशा परिस्थितीत, झोपेच्या वेळी, झोप विचलित होणाऱ्या गोष्टी दूर कराव्यात. तसेच, झोपेचे वेळापत्रक बनवा आणि त्याचे पालन करा.  वेळापत्रकाचे पालन केल्याने दररोज कोणत्या वेळी बाळाने विश्रांती घेणे आणि झोपणे अपेक्षित आहे हे त्याला समजेल. टीव्ही लावू नका, मोठ्या आवाजात संगीत लावू नका किंवा इतर भावंडांना सुद्धा बाळाच्या झोपेच्या वेळी दूर ठेवा.

बाळाची झोप

तुमच्या बाळाची झोपेची पद्धत तितकीशी वाईट नाही. तुम्ही बाळाची झोपेची पद्धत कशी समजून घेता आणि त्याची योजना करता ह्यावर बाळाची झोप अवलंबून आहे. तुमचे बाळ रात्री अंदाजे 10 ते 11 तास झोपत असेल आणि दिवसा दोन ते तीन वेळा छोटी झोप घेत असेल. तुम्ही तुमच्या बाळाच्या झोपेचे वेळापत्रक पाळा. असे केल्याने तुमच्या बाळाला वेळेवर झोपण्याची सवय लागेल.

खेळ आणि उपक्रम

या वयात तुमच्या लहान बाळाला दिवसभर खेळायचे असते. त्याला तुमच्याबरोबर, त्याच्या भावंडांशी आणि अगदी तुमच्या पाळीव प्राण्यासोबत सुद्धा खेळायचे असते. परंतु तुमचे बाळ खूप लवकर कंटाळते आणि गोंधळ घालते. तुमचे मूल आनंदी राहण्यासाठी तुम्ही त्याला कसे गुंतवून ठेवू शकता? येथे आमच्याकडे काही रोमांचक आणि मजेदार क्रियाकलाप आहेत. ते वापरून तुम्ही तुमच्या लहान मुलाला गुंतवू शकता:

  • रेषेवर राहणे: जमिनीवर डक्ट टेप किंवा रंगीत खडू वापरून एक रेषा बनवा आणि तुमच्या बाळाला त्यावर सरळ चालायला सांगा. जर तो गोंधळून गेला तर त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठीत्याच्याशी बोला. तुमच्या मुलाला स्नायूंचे नियंत्रण आणि संतुलन शिकवण्यासाठी हा खेळ चांगला आहे.
  • बादलीमध्ये चेंडू फेकणे: तुमच्या लहान मुलाची उत्तम मोटर कौशल्ये वाढवण्यासाठी आणि त्याला व्यस्त ठेवण्यासाठी हा खेळ उत्तम आहे. तुम्ही हा खेळ घरामध्ये किंवा बाहेरही खेळू शकता. एक रेष काढा आणि आपल्या बाळाला रेषेच्या मागे उभे करा. एक बादली (शक्यतो रुंद तोंडाने) तुमच्या बाळापासून अंदाजे 3फूट दूर ठेवा आणि त्याला चेंडू बादलीत टाकण्यास मदत करा.
  • चेंडू पास करणे: सर्व वयोगटातील मुलांना चेंडूने खेळायला आवडते. तुमच्या बाळाला चेंडू  खेळताना कधीही कंटाळा येत नाही. तुम्ही तुमच्या बाळासोबत जमिनीवर बसू शकता आणि चेंडू  एकमेकांना देत राहू शकता. जमिनीवर चेंडूने टप्पे पाडून किंवा वेगवेगळ्या उंचीवर चेंडू टाकून तुम्ही या गेममध्ये विविधता आणू शकता.
  • ट्रेजर बॉक्स: आपल्या लहान मुलाला त्याच्या स्मरणशक्तीवर काम करण्यास मदत करण्यासाठी ही एक अतिशय रोमांचक क्रिया आहे. तुम्ही त्याची आवडती खेळणी इतर खेळण्यांसोबत बॉक्समध्ये ठेवू शकता आणि त्याला जाऊन ते शोधण्यास सांगू शकता. हा खेळ तुमच्या बाळासाठी अत्यंत रोमांचक असेल.
  • संगीत: तुम्ही तुमच्या बाळासाठी ड्रम, झायलोफोन, रॅटल्स इत्यादीसारखी विविध वाद्ये खरेदी करू शकता आणि तुमच्या बाळासोबत ही वाद्ये वाजवू शकता. संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन या उपक्रमाचा आनंद लुटल्यास अधिक मजा येईल. तुमचे बाळ या क्रियाकलापाने संगीत, समन्वय आणि ताल याबद्दल शिकेल.

असे बरेच खेळ आणि क्रियाकलाप आहेत. ह्या खेळांची योजना तुम्ही तुमच्या लहान मुलासोबत करू शकता.

पालकांसाठी टिप्स

18 महिन्यांच्या बाळाच्या पालकांसाठी येथे काही टिप्स दिलेल्या आहेत:

  • आपल्या बाळाच्या पौष्टिक गरजांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. जर तुमचे बाळ खायला त्रास देत असेल किंवा त्याचे वजन वाढत नसेल, तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • तुमच्या बाळाला झोपण्यासाठी आरामदायी जागा तयार करा . तुमचे बाळ दिवसा खूप मेहनत करत असते आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी नव्याने सुरुवात करण्यासाठी रात्रीची शांत झोप आवश्यक असते.
  • तुमच्या बाळाला घरातून बाहेर पडताना शूज घालायला लावा.
  • तुमच्या बाळाची डॉक्टरांकडून होणारी कोणतीही नियमित तपासणी चुकवू नका आणि त्याच्या सर्व लशी वेळेवर द्या.
  • या वयात तुमच्या बाळाला शौचालयाचे प्रशिक्षण देणे खूप महत्वाचे आहे. परंतु, तुमच्या बाळाला जबरदस्ती करू नका किंवा लाजवू नका.
  • तुम्ही तुमच्या लहान मुलाला काही साधे नियम आणि शिस्त लावण्याचा प्रयत्न करा. त्याच्या सर्व मागण्यांना बळी पडू नका आणि त्याला नाही म्हणा. जर तो चिडचिड करत असेल तर त्याला शांत करण्याचा प्रयत्न करा आणि दुर्लक्ष करा.
  • तुमच्या मुलाभोवतीच्या पाळीव प्राण्यांविषयी सावधगिरी बाळगा. प्राण्यांना हाताळण्याइतके त्याचे वय नाही आणि त्यामुळे प्राण्याला किंवा स्वतःला हानी पोहचू शकते.
  • जर तुम्ही अजूनही तुमच्या बाळाला स्तनपान करत असाल आणि तुम्ही व तुमचे बाळ दोघांनाही ते सोयीस्कर असेल, तर स्तनपान थांबवण्याची गरज नाही.

पालकांसाठी टिप्स

डॉक्टरांचा सल्ला केव्हा घ्यावा?

वर नमूद केलेले टप्पे या वयातील लहान मुलांनी सामान्यतः साध्य केलेले असतात. प्रत्येक मुलाने समान वेळ आणि नमुना पाळला पाहिजे असे नाही. तुमच्या बाळाने हे टप्पे लवकर किंवा उशिरा गाठणे अगदी सामान्य आहे. परंतु काहीवेळा तुमच्या लक्षात येईल की तुमचे बाळ खूप मागे पडले आहे, जसे की:

  • तुमचे बाळ पाच शब्दांपेक्षा कमी बोलते आहे
  • तुमच्या बाळाला आधार देऊनही चालता येत नाही
  • तुमच्या बाळाला साध्या विनंत्या आणि आज्ञा समजू शकत नाहीत
  • तुमच्या बाळाला कशातही रस वाटत नाही आणि तो डोळ्यांशी संपर्क साधत नाही

तुम्हाला तुमच्या बाळामध्ये वरीलपैकी कोणतीही लक्षणे किंवा इतर कोणतीही असामान्य लक्षणे आढळल्यास तुम्ही शक्य तितक्या लवकर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा: 

१७ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास
१९ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article