Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ आरोग्य बाळाचे शौच: काय सामान्य आहे आणि काय नाही

बाळाचे शौच: काय सामान्य आहे आणि काय नाही

बाळाचे शौच: काय सामान्य आहे आणि काय नाही

जर तुम्ही नव्याने पालक झाला असाल तर नवीन पालक म्हणून तुम्हाला सर्वात न आवडणारी गोष्ट म्हणजे बाळाचा डायपर बदलणे! परंतु, बाळ झाल्यानंतरचा तो अविभाज्य भाग आहे.

बाळाने पहिल्यांदा शी केल्यावर तुम्हाला बाळाच्या शौचाच्या बाबतीत काय नॉर्मल आहे आणि काय नाही हा प्रश्न पडू शकेल. तुमच्या बाळाच्या शरीरातून काय बाहेर पडते आहे, ह्या विषयी केव्हा चिंता केली पाहिजे हे जाणून घेण्यासाठी हा विषय तपशीलवार माहिती करून घेऊयात.

बाळ किती वेळा शौचास करते?

बाळाचा जन्म झाल्यावर बाळाचे शौचास करण्याचे प्रमाण बदलत राहते. खालील तक्त्याद्वारे नवजात शिशु दिवसातून किती वेळा शी करते हे आपल्याला समजू शकेल.

बाळाचे वय कमीत कमी किती वेळा शौचास करते बाळाच्या शौचाचा पोत आणि रंग
१ दिवस काळा डांबरासारखा
२ दिवस काळा डांबरासारखा
३ दिवस हिरवट
४ दिवस पिवळसर किंवा हिरवा
५ दिवस पातळ, पिवळसर
६ दिवस पातळ, पिवळसर
६ आठवड्यांपेक्षा जास्त वय ७ते १० दिवसांमध्ये एकदा किंवा दररोज ३ ते ५ वेळा किंवा त्यापेक्षा जास्त पातळ, पिवळसर

 

बाळ किती वेळा शी करू शकते हे अनेक घटकांवर अवलंबून असते. उदा: बाळाचे वय आणि आहार इत्यादी. ज्या बाळांना स्तनपान दिले जाते अशी बाळे, बाटलीने दूध घेणाऱ्या बाळांपेक्षा जास्त वेळा शी करतात. बाळाच्या पोटात काय जाते आहे आणि त्यामध्ये कुठल्या घटकांचा समावेश आहे ह्यावर बाळाचे शौच कसे आहे हे अवलंबून असते.

बाळ खूप लहान असते तेव्हा, प्रत्येक वेळेला पाजल्यावर बाळ शी करते. म्हणजेच दिवसातून सहा ते दहा वेळा बाळाला शौचास होते. तथापि, बाळ एक महिन्याचे झाल्यावर ते कमी वेळा शी करते. तुमचे बाळ काही वेळा दिवसातून चार वेळा शी करू शकते किंवा सलग अनेक दिवस शी करत नाही. हे स्तनपान घेणाऱ्या आणि बाटलीने दूध घेणाऱ्या बाळांसाठी लागू आहे.

बाळाच्या शौचाविषयी तुम्हाला माहित असाव्यात अशा काही गोष्टी

आधी सांगितल्याप्रमाणे, बाळाच्या शौचाच्या रंगापासून ते शौचाचा पोत किंवा बाळ किती वेळा शी करते हे त्याचा आहार, वय आणि इतर घटकांवर अवलंबून असते. शौचाचा वेगवेगळा रंग आणि पोत ह्यामुळे नव्यानेच पालक झालेल्या मंडळीना बाळाचे पचन नीट होत आहे ना अशी चिंता वाटणे साहजिक आहे. खाली दिलेल्या परिस्थतीपेक्षा काही वेगळे नसेल तर बाळाची शी नॉर्मल आहे असे तुम्ही समजू शकता. आणखी माहिती करून घेण्यासाठी वाचा.

. बाळाच्या शौचाचा पोत

बाळाची पहिली शी रंगाने डांबरासारखी आणि चिकट असते. त्यास मेकॅनिअम असे म्हणतात. बाळाने स्तनपान आणि फॉर्मुला दूध पचवण्यास एकदा सुरुवात केली की बाळाच्या शौचाचे रूपांतर चिकट द्रवपदार्थापसून, हलक्या रंगाच्या आणि कमी चिकट शौचामध्ये होते. बाळाने जन्मानंतरचा काही दिवसांचा टप्पा पार केल्यावर शौचाचा पोत मऊ, मलईदार असेल तर ते नॉर्मल समजले जाते. बाळाला जर तुम्ही स्तनपान देत असाल तर शी पातळ असली तरी ते नॉर्मल असते. आईने काय खाल्ले आहे त्यानुसार शी चा रंग सुद्धा बदलतो. बाळाने घनपदार्थ घेण्यास सुरुवात केल्यावर, काय अन्नपदार्थ खाल्ले आहेत त्यानुसार शी बदलते. बाळाच्या शी मध्ये न पचलेल्या अन्नपदार्थांचे तुकडे सुद्धा काही वेळा असतील तर ते नॉर्मल आहे.

. बाळाच्या शौचाचा वास

स्तनपान घेणाऱ्या बाळांच्या बाबतीत, आईने काय खाल्ले आहे ह्यावर बाळाच्या शी चा वास अवलंबून असतो. जेव्हा तुम्ही तीव्र वास असलेले अन्नपदार्थ खाता तेव्हा तुमच्या बाळाच्या शी ला सुद्धा तसाच वास येतो.

. बाळाच्या शौचाची वेळ

सुरुवातीच्या दिवसांमध्ये, बाळ केव्हा शी करेल हे तुम्हाला समजत नाही. बाळाचे शी करणे सुरूच राहते. तथापि, जसजशी बाळाची पचनसंस्था विकसित होते, तसे बाळाच्या शरीराचा शौचाविषयी एक पॅटर्न तयार होतो. बाळाचा शी करण्याचा नियमितपणा किंवा शी च्या वेळा ह्यांचा अंदाज लावता येऊ लागतो. काही बाळे पाजल्यानंतर लगेच शी करतात, तर काही बाळांना विशिष्ट वेळेलाच शौचास होते. काही दिवसांनंतर, तुम्हाला त्याची वारंवारिता लक्षात येते आणि तुम्ही बाळाच्या शी करण्याच्या वेळेचा अंदाज लावू शकता.

बाळाच्या शौचाची वेळ

आता नवीन पालक म्हणून, तुमच्या मनात येणाऱ्या काही प्रश्नांकडे वळूयात.

जर तुम्ही स्तनपान करीत असाल तर तुमच्या बाळाचे शौच कसे असेल?

स्तनपान करीत असलेली बाळे सामान्यपणे हिरवी किंवा पिवळी शी करतात. आईच्या आहाराच्या सवयीननुसार बाळाच्या शी चा रंग बदलतो. बाळाची शी पातळ आणि जुलाब झाल्यासारखी असते कारण स्तनपानात खूप द्रवपदार्थ असतात.

बाळ स्तनपान घेत असेल तर काही वेळा शौचास फेसाळ झालेली तुम्हाला दिसेल. म्हणजेच बाळाला सुरुवातीचे घट्ट दूध पुरेसे मिळत नाही आणि फक्त नंतरचे पातळ दूध मिळते. बाळाला आवश्यक असणारे पुरेसे पोषण मिळावे म्हणून बाळाला प्रत्येक स्तनावर पुरेसा वेळ पाजले जाते का हे तपासून पहा.

बाळ स्वतःहून स्तनपान जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत बाळाला स्तनपान देत राहिले पाहिजे काहीवेळा फक्त स्तनपान देणे शक्य होत नाही. जर तुम्ही बाळाला फॉर्मुला दूध देत असाल तर खालील गोष्टी अपेक्षित आहेत.

जर बाळाला फॉर्मुला दूध देत असाल तर बाळाचे शौच कसे असेल?

स्तनपान घेणाऱ्या बाळांच्या तुलनेत फॉर्मुला दूध पिणाऱ्या बाळांना घट्ट शी होते. ह्या बाळांची शी चिकट असते आणि स्तनपान घेणाऱ्या बाळांना हिरवी किंवा पिवळी शी होते. फॉर्मुला दूध घेणाऱ्या बाळांना तपकिरी/काळसर रंगाची शी होते. तसेच त्याला तीव्र वास सुद्धा येतो.

बाळाचे स्तनपान कमी करून बाटलीने दूध देण्यास सुरुवात केल्यावर बाळाच्या शौचामध्ये काय बदल होतो?

जर तुम्ही स्तनपान ते बाटलीचे दूध हा बदल करत असाल तर शौचाची वारंवारिता, पोत आणि वासामध्ये लक्षणीय बदल होतात. रंग गडद होतो आणि वास खूप तीव्र असतो.

बाळ जर फॉर्मुला दूध घेत असेल तर बाळाला घट्ट आणि चिकट शी होते आणि स्तनपान घेणाऱ्या बाळापेक्षा फॉर्मुला दूध घेणाऱ्या बाळांना कमी वेळा शौचास होते.

घनपदार्थांची सुरुवात केल्यावर बाळाचे शौच

बाळाने घनपदार्थ घेण्यास सुरुवात केल्यानंतर बाळाच्या पचनामध्ये खूप बदल होतात. बाळाच्या आहारात वेगवेगळ्या अन्नपदार्थांचा समावेश केल्यानंतर बाळाच्या शौचामध्ये सुद्धा बदल होतो.

स्तनपान किंवा फॉर्मुला दूध घेणाऱ्या बाळांपेक्षा घनपदार्थ खाणाऱ्या बाळांना घट्ट आणि गडद रंगाची शी होते. पीनट बटर सारखा त्याचा पोत असतो. बाळाने जे अन्नपदार्थ खाल्ले आहेत त्यानुसार बाळाच्या शी चा रंग बदलतो. म्हणून, जर बीट खाल्ल्यानंतर बाळाला लाल रंगाची शी झाली किंवा मटार खाल्ल्यावर हिरव्या रंगाची झाली तर त्याचा ताण घेऊ नका.

तुमच्या बाळाची पचनसंस्था अजूनही विकसित होत आहे, त्यामुळे पचन न झालेल्या अन्नपदार्थांचे तुकडे सुद्धा बाळाच्या शी मध्ये आढळतील. अर्धवट पचलेले अन्नपदार्थ शौचामध्ये कधीतरी आढळणे हे नॉर्मल आहे. तथापि, जर असे नेहमी होत असेल किंवा बाळाच्या शी मध्ये खूप जास्त प्रमाणात न पचलेले अन्नपदार्थ आढळत असतील तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.

कुठल्या प्रकारचे बाळाचे शौच हे नॉर्मल असते?

बाळाला नवनवीन अन्नपदार्थांची ओळख करून देताना तसेच बाळाची कमी कालावधीत झपाट्याने वाढ होत असताना, बाळाचे शौच नॉर्मल होत आहे की नाही हे ओळखणे पालकांसाठी अवघड असते. परंतु जरी बाळाला नेहमीपेक्षा वेगळी शी झाली तरी काळजीचे काही कारण नाही. बाळाच्या शौचात रक्त आढळणे किंवा ते खूप चिकट असणे इत्यादी कारणाशिवाय इतर वेळेला काळजीचे काही कारण नसते. कुठले बदल होऊ शकतात आणि त्याबाबत तुम्ही काय करू शकता हे पाहुयात.

कुठल्या प्रकारचे बाळाचे शौच हे नॉर्मल असते?

. बद्धकोष्ठता

बाळाला घट्ट शी होणे हे असामान्य नाही. तुमच्या बाळाला घट्ट दगडासारखी शी होऊ शकते आणि बाळाला शी करताना खूप त्रास आणि वेदना होऊ शकतात जर असे होत असेल, तर आपल्या बाळाला बद्धकोष्ठता झाली असण्याची शक्यता आहे. बद्धकोष्ठता कधीतरी होणे हे नॉर्मल आहे. परंतु, जर नेहमीच अशी समस्या येत असेल तर त्याचे निदान करणे जरुरीचे आहे. बाळाच्या आहारातील कुठल्यातरी घटकामुळे असे होत असावे आणि त्यासाठी उपचारांची गरज असते. जर बाळाच्या बद्धकोष्ठतेविषयी तुम्हाला आणखी मार्गदर्शनाची आवश्यकता भासल्यास बालरोगतज्ञांशी संपर्क साधा.

. जुलाब

ज्या बाळांना स्तनपान दिले जाते त्यांना पातळ शी होते आणि ते काळजीचे कारण नसते. तथापि, जर शी खूप जास्त पातळ होत असेल आणि डायपरच्या बाहेर येत असेल तर तुमच्या बाळाला संसर्ग किंवा ऍलर्जी झाली असण्याची शक्यता असते. अशा प्रकारचे जुलाब होणे धोकादायक असते आणि त्यामुळे बाळाच्या शरीरातील पाणी कमी होऊ शकते आणि त्यामुळे पोषणमूल्ये कमी होऊ शकतात. जर असे दिवसातून खूप वेळा झाले आणि ते एक दिवसापेक्षा जास्त वेळ होत राहिले तर डॉक्टरांशी संपर्क साधा. जर बाळाला जुलाब होत असताना त्यातून रक्त सुद्धा पडत असेल तर तुम्ही वैद्यकीय उपचारांना उशीर न करता ते वेळेत घेतले पाहिजेत.

. बाळांचे हिरव्या रंगाचे शौच

जर तुम्ही हिरव्या रंगाचे पदार्थ खाल्ले असतील आणि बाळाला स्तनपान दिले असेल तर किंवा बाळाने काही हिरव्या रंगाचे पदार्थ खाल्ले असतील (जेव्हा बाळ घन पदार्थ घेत असतील) बाळाला हिरव्या रंगाचे शौच होऊ शकते. तथापि, जर बाळाला गडद हिरव्या रंगाची शी होत असेल तर त्याचा अर्थ बाळाला पुरेसे घट्ट दूध स्तनपानातून मिळत नाही असा होतो. त्यामुळे स्तनपानाचे रुटीन सुधारल्यास समस्या सुटू शकते.

४. बाळाचे काळ्या रंगाचे शौच

जर बाळाला लोहाची पूरक औषधे देत असाल तर काळ्या रंगाची शी होणे नॉर्मल असते. जर तुम्ही बाळाला लोह पूरक औषधे देत नसताना असे झाले तर मात्र ते काळजीचे कारण असू शकते. तुमच्या स्तनाग्रांना पडलेल्या चिरांमधून येणारे रक्त तुमचे बाळ गिळत असेल असा त्याचा साधा अर्थ असू शकतो किंवा आतड्याच्या वरच्या भागात संसर्ग झालेला असू शकतो.

बाळाचे काळ्या रंगाचे शौच

. बाळाच्या शौचामध्ये रक्त आढळणे

बाळाच्या शौचामध्ये रक्त कधीतरी एखादवेळी आढळू शकते किंवा ते पचन संस्थेच्या संसर्गामुळे असू शकते अथवा दुधामधील ऍलर्जीमुळे सुद्धा असे होते. काही वेळा, बाळाने बीट किंवा टोमॅटो ज्यूस घेतला असल्यास सुद्धा ते रक्तासारखे वाटू शकते. रक्तमिश्रित शौचामध्ये गडद किंवा फिके रक्ताचे अंश आढळू शकतात. रक्ताच्या रंगावरून समस्येचा अंदाज येतो. त्यामुळे जर तुम्हाला बाळाच्या शौचात रक्त आढळले तर ताबडतोब तपासणी करा.

. फिकट रंगाचे बाळाचे शौच

जर यकृताचे कार्य ठीक चालत नसेल तर शौच फिकट रंगाचे असते कारण बाईल पिगमेंट मुळे त्यास रंग येत असतो. जर असे सतत होत राहिले तर वैद्यकीय सल्ला घ्या.

. पांढरे/ ग्रे रंगाचे बाळाचे शौच

बाळाला पांढरट खडूसारखी शी झाल्यास ते असामान्य असते आणि त्यासाठी तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज असते. यकृत किंवा पित्ताशयाची समस्या असल्यास असे होण्याची शक्यता असते आणि त्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असते त्यामुळे जर तुम्हाला बाळाचे शौच पांढऱ्या रंगाचे आढळले तर बालरोगतज्ञांना भेट देण्यास उशीर करू नका.

तर आता तुम्हाला बाळाचे कुठले शौच नॉर्मल आणि कुठले नाही हे लक्षात आले असेल. बाळाच्या शी चा रंग, पोत, वास तसेच शी किती वेळा होते हे सगळे घटक बाळाला काय खायला घातले जाते ह्यावर अवलंबून असतात. बाळाच्या पचनावर जवळून लक्ष ठेवा आणि जर काही असामान्य आढळले तर तात्काळ वैद्यकीय मदत घ्या.

आणखी वाचा:

बाळांमधील हिरवे शौच
बाळांमधील अतिसारावर (जुलाब) १५ घरगुती उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article