Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण आहार आणि पोषण गरोदरपणात सीताफळ खाणे – फायदे आणि जोखीम

गरोदरपणात सीताफळ खाणे – फायदे आणि जोखीम

गरोदरपणात सीताफळ खाणे – फायदे आणि जोखीम

सीताफळ हे शरीराला थंडावा देणारे हे फळ आहे. गरोदरपणात तुम्ही सीताफळ खाऊ शकता की नाही हा प्रश्न तुम्हाला पडलेला असल्यास हा लेख संपूर्ण वाचा.

सीताफळाचे पौष्टिक मूल्य

सीताफळाचे पौष्टिक मूल्य

प्रति 100 ग्रॅम सीताफळाचे पौष्टिक मूल्य खालीलप्रमाणे आहे:

ऊर्जा 393 kJ (94 kcal)
कर्बोदके 23.64 ग्रॅम
चरबी 0.29 ग्रॅम
प्रथिने 2.06 ग्रॅम
व्हिटॅमिन बी 1 0.11 मिग्रॅ
व्हिटॅमिन बी 6 0.2 मिग्रॅ
फोलेट 14 मायक्रोग्रॅम
कॅल्शियम 24 मिग्रॅ
मॅग्नेशियम 21 मिग्रॅ
पोटॅशियम 247 मिग्रॅ

गर्भवती स्त्रियांसाठी सीताफळाचे फायदे

गरोदर स्त्रियांनी गरोदरपणात सीताफळ खाल्ल्यास खालील फायदे मिळू शकतात.

1. मॉर्निंग सिकनेस कमी होतो

व्हिटॅमिन बी 6 मळमळ आणि मॉर्निंग सिकनेसचा त्रास कमी करते.

2. वजन वाढणे

सीताफळामध्ये कॅलरी आणि साखर जास्त असते. त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते.

3. रक्तदाबाचे नियमन

गरोदरपणात रक्तदाब कमी-जास्त होत असतो. पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण रक्तदाब नियंत्रित करते.

4. बद्धकोष्ठतेपासून आराम

आहारात तंतुमय पदार्थ असल्यास पचन चांगले होते आणि बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते, मल मऊ होते आणि आतड्याची हालचाल सुधारते. त्यामुळे अतिसारही कमी होतो. (सीताफळ अतिसार कमी करू शकत नाही)

5. तणाव कमी होण्यास मदत होते

मॅग्नेशियम स्नायूंना आराम देते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीचे नियमन करते. त्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

6. गर्भाच्या विकासाला चालना

एकूण पौष्टिक घटक गर्भाची त्वचा आणि रक्तवाहिन्यांच्या विकासात मदत करतात.

7. शरीरातून विषारी पदार्थांचे शुद्धीकरण

फळामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात आणि ते शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात, त्यामुळे मूत्रपिंड चांगल्या स्थितीत राहतात. हे अँटिऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास देखील मदत करतात.

8. दातांच्या समस्यांपासून आराम

सीताफळामध्ये असलेले तंतुमय पदार्थ दात पांढरे चमकदार ठेवतात, हिरड्या निरोगी ठेवतात आणि श्वासाची दुर्गंधी दूर करतात.

9. मुदतपूर्व प्रसूती न होण्यास मदत होते

तांबे हे खनिज गर्भवती महिलेसाठी आवश्यक आहे. गर्भवती स्त्रियांना गर्भाच्या संरक्षणासाठी त्याचा 100  मिग्रॅ डोस आवश्यक आहे. सीताफळ या

खनिजाचा एक विशिष्ट भाग पुरवतो. गर्भपात होण्याचा धोका कमी करण्यासोबतच मुदतपूर्व प्रसूतीची शक्यताही कमी होते.

गरोदरपणात सीताफळ खाण्याचे धोके

दुर्दैवी घटना टाळण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा.

 • सीताफळाच्या बियांमुळे पचन बिघडते.
 • जर तुम्हाला थंड पदार्थांची ऍलर्जी असेल तर हे फळ न खाणे चांगले.
 • सीताफळामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने गर्भावस्थेतील मधुमेह असलेल्या स्त्रियांनी ते खाऊ नये. (किंवा मध्यम प्रमाणात खावे).
 • जास्त वजन असलेल्या महिलांनी हे फळ खाणे टाळावे.

घ्यावयाची काळजी

सफरचंद खाताना तुम्ही खालील खबरदारी घेऊ शकता.

 • बिया वेगळ्या काढून फळाचा गर काढून घ्या.
 • कच्चे सीताफळ खाऊ नका. पिकलेले फळ चकचकीत हिरवे असते आणि त्यामध्ये गर भरपूर प्रमाणात असतो.
 • हे फळ खाण्यापूर्वी तुमच्या स्त्रीरोग तज्ञाचा सल्ला घ्या.

गर्भवती स्त्रियांसाठी सीताफळाची पाककृती

या चवदार फळाच्या खालील पाककृती करून पहा

1. सीताफळ रबडी

साहित्य:

 • बिया काढलेली सीताफळे – 2
 • दूध – 2-3कप
 • कंडेन्सड मिल्क – 2चमचे
 • गूळ – चवीनुसार
 • तूप – २ चमचे
 • हिरवी इलायची किंवा वेलची – २-३
 • काजू – मूठभर
 • बदाम – मूठभर

कृती:

 • सीताफळाचा गर 30 मिनिटे रेफ्रिजरेट करा.
 • एका भांड्यात दूध घालून उकळा.
 • या दुधात कंडेन्स्ड मिल्क आणि गूळ घाला.
 • मंद आचेवर 6-7 मिनिटे उकळू द्या.
 • हे मिश्रण सीताफळाच्या गरावर ओता.
 • काजू आणि बदामांनी सजवा.

2. सीताफळ स्मूदी

सीताफळ स्मूदी

साहित्य:

 • सीताफळ – १
 • दूध – १ कप
 • व्हॅनिला आइस्क्रीम (पर्यायी) – १ स्कूप
 • साखर – चवीनुसार

कृती:

 • सीताफळाचा गर काढून घ्या आणि त्यामध्ये दूध घाला.
 • तसेच, साखर आणि व्हॅनिला आइस्क्रीम घाला.
 • हे मिश्रण एकत्र करा.
 • आता ही स्मूदी एका ग्लास मध्ये काढून घ्या. आणि तिचे सेवन करून गर्भारपणाचा आनंद घ्या.

सीताफळ हे एक ‘पॉवर फ्रूट’ आहे. ह्या फळाचा आनंद तुम्ही गरोदरपणात घेऊ शकता. फक्त तुम्ही बियांचे सेवन करत नाही ना ह्याची काळजी घ्या.  दुष्परिणामांची चिंता न करता तुम्ही सीताफळाचे आश्चर्यकारक फायदे मिळवू शकता!

आणखी वाचा:

गरोदरपणात सफरचंद खाणे
गरोदरपणात किवी हे फळ खाणे

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article