Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास ५१ आठवड्यांचे बाळ – विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी

५१ आठवड्यांचे बाळ – विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी

५१ आठवड्यांचे बाळ – विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी

तुमच्यासाठी आणि तुमच्या ५१ आठवड्यांच्या बाळासाठी हे वर्ष किती पटकन गेले! तुमचे बाळ आता शिशू वस्थेत आहे. गेल्या वर्षी साधारणपणे ह्या कालावधीची कल्पना न केलेली बरी. तुम्ही गर्भवती होतात. तुम्ही काही आनंदाचे क्षण सुद्धा अनुभवले, परंतु जेव्हा तुमचे बाळ झोपत नसे किंवा काही खात नसे तेव्हा तुम्ही चिंतेने भारलेला काळ सुद्धा अनुभवलेला आहे. आणि जेव्हा बाळ रडत असे तेव्हा त्याचे रडणे थांबवणे म्हणजे एक चमत्कारच असायचा. ह्या सर्व गोष्टींना सामोरे जाऊन तुम्ही ह्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहात. आता तुमचे बाळ इकडे तिकडे फिरू लागले आहे आणि त्यासोबतच नवीन आव्हाने सामोरी आलेली आहेत. पूर्वी तुम्ही एका जागी बसून तुमच्या नवजात बाळाला स्तनपान देत होतात. आता दिवसभर तुम्ही तुमच्या बाळाच्या मागे धावताय असे वाटते! आता बाळ रांगत आणि चालत असल्याने बाळाचे स्नायू विकसित होताना दिसतील.

५१ आठवड्यांच्या बाळाचा विकास

५१ आठवड्यांनंतर, तुमचे बाळ आता चांगले उभे राहू लागले असेल तसेच बाळाने चालायला सुद्धा सुरुवात केलेली असेल. काही बाळे ह्या वयात पायऱ्या चढू शकतात. एकदा बाळाने समतोल साधण्याच्या कलेमध्ये प्राविण्य मिळवले की, बाळ न डगमगता उभे राहू शकते आणि वस्तू उचलण्यासाठी खाली वाकू शकते. जर बाळ आतापर्यंत चालत नसेल तर काळजी करू नका, बाळ लवकरच चालायला सुरुवात करेल! तुमचे बाळ ५१ आठवड्यांचे झाल्यावर, त्याला विशिष्ट अन्नपदार्थ आवडू लागतील. एखाद्या दिवशी तो रात्रीच्या जेवणात फक्त तीन चार मटार खाईल आणि दुसऱ्या दिवशी फक्त केळी आणि बिस्किटे खाईल. पण तुम्हाला कितीही काळजी वाटत असली तरीही बाळाला तुम्हाला हवे तसे खायला भाग पडू नका. काही बाळे एखाद्या दिवशी काही खात नाहीत तर दुसऱ्या दिवशी त्याची भरपाई करतात. जर तुमच्या बाळाने एखाद्या दिवशी फक्त फळे खाल्ली तर दुसऱ्या दिवशी बाळाच्या जेवणात जास्त भाज्या आणि प्रथिनांचा समावेश करा. तसेच, ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाचे वजन कमी होत असावे कारण बाळ इकडे तिकडे धावत असल्याने सर्व ऊर्जा खर्च होते. हे पूर्णपणे सामान्य आहे म्हणून बाळाला पौष्टिक जेवण देत रहा आणि बाळाला त्याच्या गतीने वाढू द्या.

एकावन्न आठवड्याच्या बाळाचे विकासात्मक टप्पे

५१ आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे काही टप्पे खाली दिलेले आहेत त्यावर लक्ष ठेवा.

  • तुमच्या बाळाला आवाजाबद्दल खूप उत्सुकता असेल आणि ते संगीतावर नाचायला सुरुवात करेल
  • तुमचं बाळ आता आजूबाजूला फिरू शकते.
  • तुमचे बाळ तुमचे अनुकरण करू लागेल.
  • तुमच्या बाळाला पाणी, चेंडू, मोर, आई, बाबा, डॉगी, गेले, तिथे, आणि ते काय हे शब्द समजू शकतील.
  • तुमचे बाळ अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त होण्यास सुरुवात करेल. उदाहरणार्थ, बाळ स्वतःला, इतर लहान मुलांना मारून किंवा भिंतीवर डोके आपटून स्वतःची निराशा व्यक्त करेल.
  • तुमचे बाळ साध्या रिंग्ज, स्टॅकिंग ब्लॉक्स आणि शेप सॉर्टरसारख्या खेळण्यांचा आनंद घेऊ शकेल.
  • तुमचे बाळ एक खेळ म्हणून घरातील कंटेनर रिकामे करून भरेल.
  • तुमच्या बाळाचे वजन कमी होऊन उंची वाढू लागेल.
  • तुमचे बाळ बोटे वापरण्यास सक्षम असेल आणि भिंतींवर किंवा कागदावर क्रेयॉनने लिहू शकेल

आणखी वाचा: तुमचे १२ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

बाळाचा आहार

बाळ सुमारे १२ महिन्यांचे झाल्यावर त्याची दुधाची बाटली आणि फॉर्मुला सुटेल. परंतु, झोपण्याच्या वेळेला मात्र बाळाची दुधाची बाटली सोडवणे कठीण होईल कारण झोपताना बाटलीतून दूध पिण्यामुळे बाळाला बरे वाटते. बाळाची ही सवय कशी सोडवाल? बाटलीमध्ये काय आहे हा मुद्दा नाही, तुम्ही फॉर्म्युलावरून गाईच्या दुधावर सहजपणे स्विच करू शकता. परंतु झोपताना दररोज बाळाला दुधाची बाटली लागत असेल तर ते चिंतेचे कारण आहे कारण त्यामुळे दात किडू शकतात. त्यामुळे बाटली चोखताना बाळाला झोपू देऊ नका. बाळ झोपल्यावर बाटली काढून घ्या. तुमच्या बाळाच्या तोंडात दूध उरलेले असल्यास त्यामुळे बाळाचे दात किडू शकतात. त्यामुळे तुम्ही बाळाचे तोंड पाण्याने धुवू शकता. तसेच, बाळाची बाटलीची सवय मोडून बाळाला कपची सवय लावावी. परंतु तसे न झाल्यास बाटलीमध्ये दुधासोबत पाण्याचे प्रमाण वाढवत जा. आणि शेवटी फक्त बाळाला झोपताना बाटलीतून पाणी द्या. तुमच्या लहान बाळाने बाटलीतून फक्त पाणी प्यावे आणि दूध व फळे अन्न म्हणून घ्यावीत हे ध्येय आहे. तुमचे बाळ दोन वर्षांचे होईपर्यंत बाळाला फुल क्रीम दूध द्या.

बाळाची झोप

ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाला पुन्हा झोपेच्या त्रासाला सामोरे जावे लागेल कारण तो जास्त सक्रिय होऊन फिरत असेल. बर्‍याचदा बाळ रात्री त्याच्या पलंगावर उभे राहते आणि पलंगाच्या कडांना धरून चालू लागते किंवा तुम्ही जर बाळासोबत बेड शेअर करीत असाल तर बाळ पलंगाच्या कडांचा किंवा तुमच्या शरीराचा आधार म्हणून वापर करेल. तुम्ही बाळाला कितीही घट्ट बांधलेत तरीही बाळ रांगते, आणि कसेतरी उभे राहते. बाळाला पुन्हा झोपवण्यासाठी तुम्हाला नेहमीच्या आरामदायी तंत्रांचा म्हणजेच थोपटणे, बाळाला झुलवणे किंवा हळुवार गाणी म्हणणे ह्या तंत्रांचा अवलंब करावा लागेल. एकदा तुमच्या बाळाने दिवसा चालण्यास सुरुवात केली की त्याची रात्री उभे राहण्याची इच्छा कमी होईल आणि त्याचे झोपेचे नवीन रुटीन सुरु होईल. बाळाला दात येताना वेदना होतील कारण आता बाळाला दाढा येण्यास सुरुवात झालेली असेल.

५१ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्याविषयी काही टिप्स

५१ आठवड्यांच्या बाळाची काळजी कशी घ्यावी ह्याविषयी खाली काही उपाय दिलेले आहेत:

  • झोपेच्या वेळेपर्यंत, तुमच्या बाळासाठी शांत संगीत लावून किंवा प्रकाश कमी ठेवून आराम करा जेणेकरून बाळाला लवकर झोप येईल.
  • ह्या वयातील बाळांना चावण्याची, मारण्याची किंवा इतर लहान मुलांना ओढण्याची प्रवृत्ती असते. बाळाला चिडवू नका, परंतु त्याला सॉरी म्हणण्यास प्रोत्साहित करा. तुम्ही म्हणू शकता की, ‘तुम्ही त्याला मारल्यामुळे बाळ रडत आहे ते पहा. तू तिला मिठी का मारत नाहीस?’ जोपर्यंत बाळाला त्याचे महत्त्व कळत नाही तोपर्यंत ह्या गोष्टीचा सराव करत रहा.
  • तुमच्या बाळाला खोलीत घेऊन, खोलीचे तापमान १६२० अंश सेंटीग्रेड दरम्यान ठेवा.
  • बाळाचा शब्दसंग्रह विकसित करण्यात मदत करण्यासाठी आपल्या लहान मुलासाठी दिवसभर वाचा आणि बोला. बाळाशी बोबडे बोलणे टाळा आणि जसे तुम्ही एखाद्या प्रौढ व्यक्तीशी बोलता तसे त्याच्याशी हळूवारपणे बोला.
  • बाळाला घरातील वेगवेगळ्या खोल्या मोकळेपणाने एक्सप्लोर करू द्या आणि वेळोवेळी बाळावर लक्ष असू द्या. बाळाला तसे करू देण्यापूर्वी तुमचे घर बेबी प्रूफ करा.

चाचण्या आणि लसीकरण

तुमचे बाळ एक वर्षाचे झाल्यावर तुमचे डॉक्टर तपासणीचे वेळापत्रक करतील.

. चाचण्या

तुमचे डॉक्टर तुमच्या बाळाच्या वाढीच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी तुमच्या बाळाची उंची, वजन आणि डोक्याचा घेर मोजतील. तुमच्या बाळाचे बोलणे, झोपेची दिनचर्या आणि झोपेच्या सवयी, मानसिक आणि शारीरिक विकासाचे मूल्यमापन करण्यासाठी बाळ रांगते आहे की चालते आहे याबद्दल देखील डॉक्टर प्रश्न विचारतील.

. लसीकरण

तुमच्या बाळाला हिपॅटायटीस बी, डीटीएपी, पोलिओ, हिब, हिपॅटायटीस ए आणि एमएमआर आणि चिकनपॉक्स लसीचे पहिला डोस यासारख्या लसीकरणाची आवश्यकता असेल.

खेळ आणि उपक्रम

तुम्ही ५१ आठवड्यांच्या बाळासोबत खालील खेळ किंवा क्रियाकलाप खेळू शकता.

  • लहान मुलांना संगीत आवडते म्हणून बाळाला घरातील एखाद्या वस्तूपासून बनवलेले वाद्य देण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, बीन्सने भरलेला रिकामा प्लॅस्टिक कंटेनर जेव्हा तुमचे बाळ हलवते तेव्हा तो आवाज करू शकतो. हा आवाज बाळाला आवडेल.
  • तुम्ही रात्रीचे जेवण बनवताना बाळाला व्यस्त ठेवण्याचा एक मार्ग म्हणजे बाळाला भांड्यांसोबत खेळू देणे. बाळ वेगवेगळे आवाज वापरून पाहू शकते आणि हातांनी कौशल्य विकसित करण्यात मदत करू शकते.
  • जेव्हा तुम्ही बाहेर फिरता तेव्हा तुमच्या बाळाला सर्वकाही दाखवा. उदाहरणार्थ, तुम्ही गायीकडे बोट दाखवून तुमच्या बाळाला सांगू शकता, “ती गाय आहे. ती म्हणते मू. तू मूहू म्हणू शकतोस का?”असे केल्याने तुमच्या बाळाच्या ज्ञानात आणि शब्दसंग्रहात मदत होईल.
  • तुमच्या बाळाला स्टॅकिंग ब्लॉक्सचा खेळ खेळण्यास सांगा किंवा त्याला वस्तूंची क्रमवारी लावू द्या किंवा नळीमधून रिंग टाकू द्या. हे खेळ खेळल्याने बाळाची मोटर कौशल्ये आणि पॅटर्नची संकल्पना विकसित होण्यास मदत होईल.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

तुम्ही तुमच्या ५१आठवड्याच्या बाळाच्या विकासासाठी खालील बाबतीत डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता

  • जर तुमचे बाळ रात्री खूप वेळा रडत उठत असेल, तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण बाळाला कान किंवा दातांच्या संसर्गामुळे वेदना होऊ शकते.
  • जर तुमचे बाळ डोळे वारंवार चोळत असेल, त्याला वस्तू पाहण्यात अडचण येत असेल किंवा दिसायला त्रास होत असेल, तर त्याला दृष्टीची समस्या असू शकते.
  • जेव्हा तुम्हाला तुमच्या बाळामध्ये शिश्याच्या विषबाधाची लक्षणे दिसतात जसे की वारंवार उलट्या होणे वगैरे, तेव्हा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

जर तुमचे बाळ १२ महिन्यांचे झाल्यावर सुद्धा चालत नसेल तर काळजी करू नका. काही बाळांना पहिले पाऊल उचलण्यासाठी दोन वर्षांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. ह्या कालावधीत, बाळाला प्रयोग करण्यासाठी भरपूर सुरक्षित जागा द्या.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article