Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण आहार आणि पोषण गरोदरपणात मशरूम खाणे – सुरक्षित आहे की असुरक्षित?

गरोदरपणात मशरूम खाणे – सुरक्षित आहे की असुरक्षित?

गरोदरपणात मशरूम खाणे – सुरक्षित आहे की असुरक्षित?

गरोदरपणात योग्य आहार घेणे आवश्यक आहे. परंतु काहीवेळा ते कठीण होऊ शकते कारण अनेक होणाऱ्या मातांना आहाराविषयी पारंपरिक सल्ले दिले जातात. मशरूम हा असाच एक अन्नपदार्थ आहे ज्याविषयी बऱ्याच स्त्रिया साशंक असतात. गरोदरपणात मशरूम खाणे योग्य आहे असे काहींचे म्हणणे आहे तर काही जण म्हणतात की गरोदरपणात मशरूम खाल्ल्यास बाळाच्या आईला धोका निर्माण होऊ शकतो. तर ह्यामध्ये किती तथ्य आहे ते पाहूयात.

गरोदरपणात मशरूम खाणे सुरक्षित आणि आरोग्यदायी आहे का?

थोडक्यात मशरूम म्हणजे खाण्यायोग्य बुरशी होय. मशरूम हे प्रथिने आणि तंतुमय पदार्थांचे स्रोत आहेत. तसेच त्यामध्ये कॅलरी सुद्धा कमी प्रमाणात असतात. शंभर ग्रॅम व्हाईट बटन मशरूम अंदाजे बावीस कॅलरीज देऊ शकतात. त्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजद्रव्ये मोठ्या प्रमाणात असतात. म्हणून त्यामध्ये पोषकतत्वे भरपूर प्रमाणात असतात. परंतु ज्यांना मशरूमची ऍलर्जी आहे अश्या व्यक्तींनी मशरूम सेवन केल्यास जीवघेणा दुष्परिणाम होऊ शकतो.

मळमळ, उलट्या आणि अतिसार यासारख्या पोटाच्या समस्यांना देखील मशरूम कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे, जर तुम्हाला मशरूम खाण्याची इच्छा असेल, तर जास्त सावध राहण्याची गरज आहे कारण गरोदरपणात त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला मशरूम  खाल्ल्यानंतर शारीरिक समस्या येत नसतील, तर तुम्ही त्यांचा आस्वाद घेणे सुरू ठेवू शकता आणि आरोग्य विषयक फायदे मिळवू शकता. परंतु मशरूम योग्य प्रमाणात खाणे गरजेचे आहे.

तर, गरोदरपणात कोणते मशरूम सुरक्षित आहेत? चला शोधूया

गरोदरपणात खाण्यास सुरक्षित असलेले मशरूम

जर तुम्ही गरोदर होण्याआधी मशरूमचे सेवन करीत असाल आणि गरोदरपणात कोणतेही दुष्परिणाम अनुभवले नसतील, तर तुम्ही त्याच प्रकारचे मशरूम खाणे गरजेचे आहे. सामान्यतः, ऑयस्टर, क्रेमिनी आणि बटन यांसारखे सामान्यतः उपलब्ध असलेले मशरूम खाण्यासाठी सुरक्षित असतात. ह्या प्रकारच्या मशरूम मुळे कोणताही धोका निर्माण होत नाही. शिताके मशरूम, औषधी सप्लिमेंट्समधील मशरूम, तसेच गोठलेले आणि प्रक्रिया केलेली मशरूम उत्पादने, गरोदरपणात वापरणे सुरक्षित आहे. फक्त त्यांची समाप्ती तारीख पडताळून पाहणे गरजेचे आहे.

कोणत्याही प्रकारची कीड नसलेले ताजे आणि स्वच्छ मशरूम तुम्ही खरेदी केले पाहिजेत. तसेच, कच्चे मशरूम खाऊ नका, ते नीट धुऊन नंतर चांगले शिजवा. हे मशरूम हानिकारक बुरशी आणि जंतूंना तुमच्या पचनसंस्थेवर हल्ला करण्यापासून रोखण्यास मदत करतील. परंतु, मशरूम खाल्ल्याने तुमच्यासाठी समस्या उद्भवू शकतात, असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते खाणे बंद करा किंवा ते चांगले शिजवून कमी प्रमाणात खा. खाल्ल्यानंतर, तुमचे शरीर कसे प्रतिसाद देते हे पाहण्यासाठी थोडी वाट पहा. जर तुम्हाला एलर्जीची प्रतिक्रिया जाणवत असेल, तर ताबडतोब औषधोपचाराकडे लक्ष द्या आणि भविष्यात मशरूम खाणे टाळा.

गरोदरपणात खाण्यास सुरक्षित असलेले मशरूम

मशरूमच्या काही जाती खाण्यासाठी सुरक्षित आहेत हे तुम्हाला माहिती आहे. परंतु काही औषधी मशरूम देखील आहेत आणि ते मानवी शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत औषधी मशरूम काय आहेत ते पाहू या.

औषधी मशरूम काय आहेत?

खाण्यासाठी सुरक्षित असणाऱ्या मशरूममध्ये रोगप्रतिकारक आणि कर्करोगविरोधी गुणधर्म असल्याचे सिद्ध झाले असले आहे. काही औषधी मशरूम मजबूत अँटिऑक्सिडंट्स आहेत आणि त्यांच्यात उच्च रक्तदाबविरोधी, यकृत-संरक्षण आणि कोलेस्ट्रॉल-कमी करण्याची क्षमता देखील आहे. बर्‍याच फार्मास्युटिकल कंपन्या औषधी मशरूमला बायोमेडिकल गुणधर्मांचा एक महत्त्वाचा स्त्रोत मानतात, ह्याचा गर्भवती महिलांना देखील फायदा होऊ शकतो. गरोदर स्त्रियांनी मशरूम खाण्याआधी त्यांच्या डॉक्टरांचा आणि आहारतज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. औषधी मशरूमची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे: शिताके, टर्की टेल, मैताके आणि रेशी मशरूम

औषधी मशरूम काय आहेत?

आधी सांगितल्याप्रमाणे, काही प्रकारचे मशरूम गरोदर स्त्रियांसाठी असुरक्षित आहेत. गरोदरपणात मशरूम खाण्यास असुरक्षित का आहेत हे जाणून घेऊयात.

गरोदरपणात सेवन करण्यासाठी असुरक्षित मशरूम

बहुतेक प्रकारचे मशरूम खाण्यासाठी असुरक्षित असतात, परंतु काही प्रकारचे मशरूम तुम्ही टाळणे आवश्यक आहे. खालील प्रकारचे मशरूम तुम्ही दूर ठेवले पाहिजेत.

१. कच्चे मशरूम

मशरूमच्या पेशींच्या भित्तिका कडक असतात त्यामुळे ते कच्चे खाल्ल्यास अपचन होण्याची शक्यता असते. मशरूम मधील पोषक तत्वे मिळण्यासाठी, मशरूम खाण्यापूर्वी पूर्णपणे शिजवून घेतले पाहिजेत. काही मशरूममध्ये कार्सिनोजेनिक विषारी घटक असतात. चांगले शिजवल्याने ते काढून टाकले जाऊ शकतात. त्यामुळे गरोदरपणात मशरूम खाण्यापूर्वी नीट शिजवून खाणे आवश्यक आहे.

कच्चे मशरूम

२. मॅजिक मशरूम

मॅजिक मशरूम आणि जंगली मशरूम समस्या निर्माण करू शकतात. मॅजिक मशरूममध्ये सायलोसायबिन नावाचा पदार्थ असतो. त्यामुळे भ्रम, स्नायूंचा कमकुवतपणा, तंद्री लागणे, मळमळ आणि उलट्या होणे. इत्यादी दुष्परिणाम जाणवतात. ऍटॅक्सिया होण्यास देखील ते कारणीभूत ठरतात – ह्या वैद्यकीय समस्येमध्ये ६ तासांपर्यंत स्नायूंच्या हालचालींच्या स्वैच्छिक समन्वयाचा अभाव आढळतो. असुरक्षित/विषारी मशरूम खाल्ल्याने मृत्यू देखील होऊ शकतो. म्हणून, गरोदरपणात वाईल्ड आणि मॅजिक  मशरूम टाळणे चांगले असते.

मॅजिक मशरूम

गरोदरपणात विविध प्रकारचे मशरूम नियमित खाणाऱ्या भाग्यवान लोकांपैकी तुम्ही असाल, तर तुम्हाला त्याचे पौष्टिक मूल्य तसेच आरोग्यविषयक फायदे जाणून घ्यायचे असतील. अधिक जाणून घेण्यासाठी वाचा.

मशरूमचे पौष्टिक मूल्य

मशरूममध्ये गरोदरपणात आवश्यक असणारे पोषक घटक असतात. 100 ग्रॅम ताज्या बटन मशरूममध्ये आढळणारे पोषक तत्व खालीलप्रमाणे-

  • ऊर्जा – 27.49 कॅलरीज
  • प्रथिने – 3.68 ग्रॅम
  • कार्बोहायड्रेट – 1.98
  • कॅल्शियम – 18.38 मिग्रॅ
  • लोह .२९ मिग्रॅ
  • मॅग्नेशियम – 18.3 मिग्रॅ
  • फॉस्फरस – 87.11 मिग्रॅ
  • पोटॅशियम – 318 मिग्रॅ
  • सोडियम – 7.72 मिग्रॅ
  • झिंक – 0.17 मिग्रॅ
  • तांबे – 0.09 एमसीजी
  • व्हिटॅमिन डी – 0.2 मिग्रॅ
  • फोलेट – 8.28 mcg DFE
  • नियासिन – 0.68 मिग्रॅ

स्रोत IFCT 2017, ICMR

गरोदरपणात मशरूमचे फायदे

मशरूमविषयी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते पदार्थांना चवदार बनवतात तसेच चरबी, कॅलरी किंवा कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अगदी कमी असते. त्यांच्या मध्ये पौष्टिक घटक समृद्ध प्रमाणात असतात. मशरूम मध्ये गरोदरपणात आवश्यक असलेल्या  महत्त्वपूर्ण पदार्थांचे प्रमाण जास्त असते. त्यापैकी काही खाली दिले आहेत.

१. व्हिटॅमिन बी पोषक तत्वांचा चांगला स्रोत

मशरूम हे रिबोफ्लेविन (B2), थायामिन (B1), नियासिन (B3) आणि पँटोथेनिक ऍसिड (B5) सारख्या अनेक जटिल जीवनसत्व बी घटकांचे नैसर्गिक स्त्रोत आहेत. या घटकांचे आई आणि बाळासाठी अनेक फायदे आहेत. मज्जातंतूंचा विकास, निरोगी त्वचा, चांगली दृष्टी तसेच मजबूत हाडे आणि स्नायूंच्या विकासासाठी रिबोफ्लेविन आवश्यक आहे. नियासिन कोलेस्टेरॉलची पातळी राखण्यास मदत करते. आई आणि गर्भ दोघांच्या हृदय आणि रक्ताभिसरण प्रणालीच्या आरोग्यासाठी मशरूम चांगले आहेत. थायमिन बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी जबाबदार आहे. थायमिनमुळे तुमची उर्जा देखील वाढते. गरोदरपणात सामान्यपणे आढळणारी समस्या म्हणजे थकवा. मशरूममुळे ती समस्या दूर होण्यास मदत होते. गरोदरपणात ही एक सामान्य समस्या असू शकते. पँटोथेनिक ऍसिड तुमच्या शरीरात अन्न चयापचय करण्यास मदत करून पाचन विकारांना प्रतिबंधित करते.

२. स्नायूंची ताकद वाढवण्यास आणि पचन सुलभ करण्यास मदत करते

मशरूम हा प्रथिनांचा एक महत्त्वाचा शाकाहारी स्रोत आहे. प्रथिने प्लेसेंटाच्या विकासासाठी आणि गर्भाच्या प्रणालीसाठी आवश्यक असतात. मशरूममध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असते आणि ते नियमित हालचालींना प्रोत्साहन देते. न विरघळणारे तंतुमय पदार्थ योग्य पचनासाठी महत्त्वपूर्ण आहेत.  विरघळणारे फायबर रक्तातील साखरेचे शोषण नियंत्रित करतात तसेच रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी देखील राखण्यास मदत करतात.

३. अँटिऑक्सिडंट्स आणि ट्रेस एलिमेंट्स

मशरूममध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि गरोदरपणात  तुम्हाला निरोगी आणि रोगमुक्त ठेवण्यास मदत करतात. मशरूममध्ये पोटॅशियम आणि झिंक देखील असतात आणि ते तुमच्या बाळाची योग्य वाढ आणि विकासासाठी आवश्यक असतात.

ह्या सर्व फायद्यांमुळे तुम्हाला मशरूम विकत घेण्यास आणि त्यांच्या वेगवेगळ्या पाककृती करण्याचा मोह होऊ शकतो. परंतु, त्यापूर्वी, तुम्हाला मशरूम खाताना कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. अधिक जाणून घेण्यासाठी वाचा.

मशरूम खाताना घ्यावयाची काळजी

तुमच्या शरीराला मशरूमचा कोणताही त्रास होत नाही आणि ते तुमच्यासाठी सुरक्षित आहे हे तुमच्या लक्षात आले की तुम्ही त्याचे सेवन करू शकता आणि जास्तीत जास्त आरोग्य फायदे मिळवू शकता.परंतु तुम्ही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. त्यासाठी काही टिप्स खाली दिलेल्या आहेत-

  • ताजे मशरूम विकत घेतले पाहिजेत
  • ते कच्चे खाऊ नका
  • डाग असलेले किंवा खराब झालेले मशरूम नसावेत
  • ते चांगले धुऊन शिजवावेत
  • शक्य तितके, प्रक्रिया केलेले मशरूम टाळा. परंतु जर तुम्हाला आवश्यक असेल तर मशरूम कमी प्रमाणात खा. त्यांच्या कालबाह्य तारखेच्या आत खा.
  • जर तुम्हाला मशरूम खाण्याबद्दल शंका असेल तर थोडेसे खाऊन वाट पहा. जर काही साइड इफेक्ट्स होत आहेत असे लक्षात आले तर खाऊ नका. जर एलर्जीची लक्षणे गंभीर असतील किंवा चिंताजनक दिसत असतील, तर ताबडतोब आपल्या डॉक्टरांना फोन करा किंवा त्यांची भेट घ्या.
  • औषधी मशरूम खाताना, सावधगिरी बाळगा आणि आपल्या आरोग्याचे निरीक्षण करा. अशा प्रकारे, कोणतीही ऍलर्जी किंवा साइड इफेक्ट असतील तर त्यावर उपचार केले जाऊ शकतात.
  • वेगवेगळे साहसी पदार्थ खाऊन प्रयोग करण्यासाठी गरोदरपणाचा काळ ही काही सर्वोत्तम वेळ नाही. गरोदरपणात वाईल्ड आणि मॅजिक मशरूम खाणे टाळा.

गरोदर स्त्रियांना मशरूम मधून अनेक पोषक तत्वे मिळतात. ह्या लेखात दिलेल्या सावधगिरीविषयक टिप्स आणि माहिती लक्षात ठेवून गरोदरपणात मशरूम खाण्याचा आनंद घ्या. तुमच्या आहारावर गरोदरपणात वेगवेगळे प्रयोग न करण्याचा प्रयत्न करा, तुमच्या शरीराला पूर्वीपेक्षा जास्त पोषक तत्वांची गरज असते. वाईल्ड मशरूम खाऊ नका. तुमची सध्याची आरोग्य स्थिती लक्षात घ्या. मशरूमच्या सेवनाबाबत तुम्हाला चिंता असल्यास, तुमच्या गरोदरपणाच्या आहारात मशरूमचा समावेश करण्यापूर्वी तुम्ही वैद्यकीय सल्ला घ्यावा.

स्रोत:

आणखी वाचा:

गरोदरपणात वांगी खाणे सुरक्षित आहे का?
गरोदरपणात भेंडी (ओकरा) खाणे चांगले आहे का?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article