आपण सगळ्यांनी शरीरात वायू झाल्यामुळे वेदनेचा अनुभव घेतला आहे – त्यामुळे खूप अस्वस्थता येते आणि ते नकोसे वाटते. बाळांसाठी तर वायूमुळे होणाऱ्या वेदना खूपच अस्वस्थ करणाऱ्या असतात. सर्व बाळांना वायूमुळे वेदना होतात आणि बाळे दिवस वायू बाहेर सोडतात आणि बाळांच्या बाबतीत हे सर्वसामान्यपणे आढळते. जर तुमच्या लहान बाळाला वायुमुळे वेदना होत असतील, तर बाळाला ते […]
नवजात बाळाप्रमाणेच गर्भाशयातील गर्भ बराच काळ झोपलेला असतो. नवजात बाळामध्ये आणि पोटातील गर्भामध्ये असलेल्या अनेक साम्यांपैकी हे एक साम्य आहे. ३२ आठवड्यांच्या गर्भाला आता आवाज ऐकू येऊ लागतो, विचार करण्याची क्षमता येते, स्मरणशक्ती असते आणि तसेच पोटात फिरण्यास सक्षम होण्यासाठी तो पुरेसा विकसित झालेला असतो. पोटातील बाळ जवळपास ९० ते ९५ % वेळ झोपण्यात घालवतात. […]
तुमचे बाळ आता अकरा महिन्यांचे आहे. ४८ आठवड्यांपूर्वी ते अगदी छोटंसं बाळ होतं ह्याची कल्पना करणे देखील अशक्य आहे. तो आता आत्मविश्वासाने सगळीकडे फिरत असेल, आधारासाठी फर्निचरला धरून चालेल आणि लवकरच तो स्वतंत्रपणे चालू लागेल (जर त्याने अजून चालण्यास सुरुवात केलेली नसेल तर). त्याचा मेंदू देखील वेगाने विकसित होत आहे, जटिल प्रक्रिया समजून घेत आहे. […]
गरोदरपणात स्त्रीमध्ये शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल होत असतात. जर तुम्ही गरोदर असाल, तर शरीरात होणाऱ्या आणखी एका बदलाविषयी तुम्हाला काळजी वाटू शकते आणि तो म्हणजे तुमच्या हृदयाच्या गतीमध्ये होणारा बदल किंवा हृदयाच्या गतीमध्ये होणारी वाढ. हृदयात धडधड झाल्यास सहसा कुठला त्रास होत नाही. हृदय व रक्तवाहिन्यांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे हृदयाची धडधड होते. परंतु जर हा बदल अचानक […]