Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण दुसऱ्या गरोदरपणात काय अपेक्षित आहे?

दुसऱ्या गरोदरपणात काय अपेक्षित आहे?

दुसऱ्या गरोदरपणात काय अपेक्षित आहे?

जर तुम्हाला पहिल्या गरोदरपणात काहीच त्रास झालेला नसेल आणि तुम्ही दुसऱ्यांदा गरोदर असाल तर तुम्ही निवांत असाल. परंतु प्रत्येक गर्भारपण वेगळे असते हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.  प्रत्येक गरोदर स्त्रीला वेगळ्या अडचणी येतात, तसेच मिळणारा आनंद सुद्धा वेगळा असतो.

दुसऱ्या गरोदरपणाची सुरुवातीची चिन्हे आणि लक्षणे

दुस-या गरोदरपणाची बहुतेक चिन्हे आणि लक्षणे तुमच्या पहिल्या गरोदरपणातील लक्षणांसारखीच असतील. या काळात लक्षणे अधिक किंवा कमी तीव्र होतील. ह्याविषयी कोणताही कठोर नियम नाही. काही स्त्रियांमध्ये, पहिल्या गरोदरपणातील काही लक्षणे आणि गुंतागुंत पुन्हा दिसू शकतात.

तुमचे दुसरे गर्भारपण पहिल्यापेक्षा कसे वेगळे असेल?

खाली काही मुद्दे दिलेले आहेत त्याद्वारे दुसरे गर्भारपण पहिल्यापेक्षा वेगळे असू शकते:

1.या वेळी तुमचे पोट लवकर दिसू लागेल

तुमच्या दुसऱ्या गरोदरपणात, पहिल्या गरोदरपणाच्या तुलनेत पोट लवकर दिसू लागेल. ह्याचे कारण म्हणजे पहिल्या गरोदरपणात तुमचे पोटाचे स्नायू कमकुवत झालेले असतात. म्हणून, पोट दिसायला वेळ लागणार नाही.

2. मॉर्निंग सिकनेस आणि थकवा

बहुतेक स्त्रिया त्यांच्या पहिल्या गरोदरपणापेक्षा दुसऱ्या गरोदरपणात जास्त थकल्यासारख्या वाटू शकतात. ह्याचे कारण म्हणजे, दुसऱ्या गरोदरपणात स्त्रिया नीट आराम करू शकत नाहीत.  त्या आधीच एका मुलाची काळजी घेत असतात.

उलट्या होणे किंवा चक्कर येणे तसेच मळमळ होणे ही सर्व लक्षणे गरोदरपणाची सामान्य लक्षणे असतात, परंतु मॉर्निंग सिकनेसचा त्रास हा सगळ्यांसाठीच सारखा नसतो.

3. वेदना

पाठदुखीसोबतच ओटीपोटाकडील भागातील सांध्यांमध्ये वेदना होण्याचे प्रमाण दुसऱ्या गरोदरपणात अधिक दिसून येते. काही स्त्रियांना वैरिकास व्हेन्स किंवा मुळव्याधाचा त्रास देखील होऊ शकतो. प्रामुख्याने रक्तवाहिन्या आणि स्नायू कमकुवत झाल्यामुळे हा त्रास होतो.

4. वजन वाढणे

दुसऱ्या गरोदरपणात तुमची वजन वाढण्याची प्रक्रिया पहिल्या गरोदरपणापेक्षा वेगळी असते. तुमच्या दुस-या गरोदरपणात, शरीरात आधीच बरेच बदल झालेले असतात.  तुमचे वजन झपाट्याने वाढते आणि ते कमी करणे देखील अवघड असते.

5. मूड स्विंग्स

तुमचे पहिले गर्भारपण असो अथवा दुसरे, ताण आणि गरोदरपणातील संप्रेरकांमुळे तुम्हाला मूड सविंग्जचा त्रास होण्याची शक्यता असते. मनस्थितीत होणारे बदल हे प्रत्येक स्त्रीसाठी वेगवेगळे असू शकतात. हे बदल स्त्रियांना वेगवेगळ्या प्रकारे प्रभावित करतात. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात तुम्हाला मूड स्विंगचा अनुभव येतो. हे मूड स्विंग्स नंतर थांबतात आणि प्रसूतीची तारीख जवळ आल्यावर पुन्हा दिसतात. मूड मध्ये अचानक होणारे हे बदल आनंद, अपेक्षा, आर्थिक काळजी इत्यादींशी संबंधित असू शकतात.

6. गर्भधारणा चाचण्या

दुसऱ्या वेळेला तुम्हाला तुमच्या गर्भधारणेची पुष्टी करण्यासाठी कदाचित गर्भधारणा चाचणीची गरज भासणार नाही, कारण तुम्ही चिन्हे आणि लक्षणे आधीच ओळखली असतील आणि गर्भारपणाची लक्षणे लवकर दिसायला लागतील.

7. सराव कळा

अनुभवी आईला तिच्या पहिल्या गरोदरपणाच्या तुलनेत, दुसऱ्या गर्भारपणात काही आठवडे आधीच बाळाने पाय मारण्याचा अनुभव येऊ शकतो, कारण आई आता त्या संवेदनांशी परिचित असते. सराव कळांचा देखील अनुभव आधीच येऊ शकतो.

8. पोस्टपार्टम डिप्रेशन

जर तुम्ही पोस्टपार्टम डिप्रेशन मधून जात असाल, तर दुसऱ्या गरोदरपणात देखील तुम्हाला नैराश्याचा धोका जास्त असू शकतो. ज्या स्त्रियांना त्यांच्या पहिल्या गरोदरपणात पोस्टपर्टम डिप्रेशन आलेले असते अश्या स्त्रिया नैराश्याला बळी पडण्याची शक्यता जास्त असते.

9. प्रसूती

दुस-या गरोदरपणात प्रसूतीचा कालावधी कमी असतो कारण तुमच्या शरीरात एकदा ही प्रक्रिया झालेली असते. तुमच्या गर्भाशयाचे मुख नाजूक झालेले असते आणि त्यामुळे ते लवकर उघडते. ज्या स्त्रियांना आधी बाळ झाले आहे त्यांच्यासाठी, प्रसूतीचा कालावधी सरासरी पाच तास असतो आणि बारा तासांपेक्षा जास्त नसतो.

10. कळा देणे

दुसऱ्या गरोदरपणात पहिल्या वेळेच्या तुलनेत कळा देण्याचा कालावधी दोन तासांपेक्षा कमी असण्याची शक्यता असते.

गरोदरपणाच्या इतर लक्षणांबद्दल काय?

दुस-या गरोदरपणाची काही लक्षणे खाली दिलेली आहेत

1. बाळाच्या सुरुवातीच्या हालचाली

साधारणपणे, 18 आणि 20 व्या आठवड्यादरम्यान बाळाच्या हालचाली जाणवतात. परंतु, दुसऱ्या गरोदरपणात, तुम्हाला त्या हालचाली लवकर जाणवत आहेत असा अनुभव येईल.

2. स्तन नाजूक होतील

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक म्हणजे स्तन हळुवार आणि नाजूक होतात. ते स्पर्शास संवेदनशील होतील आणि कधीकधी स्तनांमध्ये वेदना होतील. स्तनाग्रांच्या भोवतीचा भाग (अरिओला)देखील गडद होईल.

3. बाळ ओटीपोटाच्या खालच्या भागात सरकते

पहिल्या गरोदरपणात पोटाचे स्नायू ताणले जातात आणि त्यामुळे ते पूर्वीपेक्षा जास्त कमकुवत होतात. परिणामी, हे स्नायू पूर्वीप्रमाणे बाळाला आधार देऊ शकत नाहीत. याच कारणामुळे दुस-या गरोदरपणात बाळ ओटीपोटात खाली सरकते.

4. वेगवेगळ्या चिंता

गर्भावस्थेतील मधुमेहासारख्या समस्यांची दुसऱ्या गरोदरपणात पुनरावृत्ती होण्याची शक्यता जास्त असते.

आरोग्यविषयक गुंतागुंत होऊ शकते का?

दुसऱ्या गरोदरपणात गुंतागुंत निर्माण होऊ शकते किंवा नाही सुद्धा. परंतु, सावधगिरी बाळगणे आणि आपल्या डॉक्टरांना भेटणे केव्हाही चांगले.

प्लेसेंटल किंवा प्रसूतीदरम्यान रक्तस्त्राव होणे यासारख्या गुंतागुंतीची शक्यता प्रत्येक गर्भधारणेसोबत वाढतच जाते. ह्या समस्या दुसऱ्या गरोदरपणात येतात हे कोणत्याही प्रकारे सांख्यिकीयदृष्ट्या सिद्ध झालेले नाही, परंतु ज्या स्त्रीला एकाधिक गर्भधारणा झाली आहे त्या स्त्रियांमध्ये ही परिस्थिती उद्भवण्याची शक्यता जास्त आहे.

योग्य काळजी न घेतल्यास प्रसूतीनंतरचा रक्तस्त्राव जीवघेणा ठरू शकतो. म्हणूनच, जर तुम्हाला असामान्य प्रमाणात रक्तस्त्राव होत असेल किंवा कोणत्याही लक्षणांबद्दल अस्वस्थता किंवा भीती वाटत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सिझेरियन नंतर दुसरी गर्भधारणा

ज्या स्त्रियांची पहिली प्रसूती सी सेक्शनद्वारे झालेली आहे, त्यांनी सामान्य प्रसूतीसाठी प्रयत्न करण्याऐवजी सी-सेक्शनद्वारे दुसरी प्रसूती करणे अधिक सुरक्षित आहे.

परंतु, दोन गरोदरपणांमध्ये योग्य अंतर महत्वाचे आहे. डॉक्टरांचा सल्ला घेऊन दोन गरोदरपणांमध्ये योग्य अंतर राखणे महत्वाचे आहे. सी-सेक्शननंतर वैद्यकीयदृष्ट्या दोन गर्भारपणांमध्ये शिफारस केलेले अंतर किमान तीन वर्षांचे असते. कारण ह्या काळात तुमचे शरीर बरे होत असते.

दुसऱ्यांदा गरोदर असताना तुमच्या मोठ्या मुलाशी कसे वागावे?

जर तुम्हाला दुसऱ्यांदा बाळ होणार असेल, तर तुमच्या मोठ्या मुलावर याचा कसा परिणाम होईल आणि तुमच्या दोन्ही बाळांची काळजी तुम्ही कशी घेऊ शकाल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

सुरुवातीला, तुम्हाला बाळ होणार आहे असे तुमच्या मोठ्या मुलाला सांगा आणि त्याला प्रक्रियेत सामील करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मोठ्या मुलाला तुमच्या पोटावर हात फिरवायला सांगून पोटातील बाळाशी बोलण्यासाठी किंवा गाणे म्हणण्यासाठी प्रोत्साहित करा. तुम्ही तुमच्या मोठ्या मुलाला डॉक्टरांच्या भेटींमध्ये घेऊन जा आणि त्याला बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू द्या. तुमच्याकडे बाळ येणार आहे ह्याचा वारंवार उल्लेख करत रहा, परंतु त्याच्या मनात मत्सर निर्माण होईल इतका जास्त बाळाचा उल्लेख करू नका.

दुसऱ्यांदा गरोदर असताना तुमच्या मोठ्या मुलाशी कसे वागावे

येथे काही इतर मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या पहिल्या मुलाला भावंडासाठी तयार करू शकता:

 1. नवीन बाळाचे चित्र असलेली स्टोरीबुक पहा आणि तुमच्या मुलाला त्याच्याशी ओळख करून द्या. ‘भाऊ’, ‘बहीण’ असे शब्द बोला आणि तुमच्या मुलालाही ते म्हणायला सांगा.
 2. तू मला खूप प्रिय आहेस असे सतत तुमच्या मोठ्या मुलाला सांगा. त्याच्या गरजांकडे लक्ष द्या आणि त्याचे सतत कौतुक करा.
 3. बाळासोबत तो काय काय खेळ खेळू शकतो ह्याचे आनंदी चित्र,तुमच्या पहिल्या मुलासाठी रंगवा. ते दोघे काय करतील याविषयी योजना बनवा.  नवीन ‘पार्टनर-इन-क्राईम’मध्ये त्याला काय करायचे आहे याविषयी तुमच्या मुलाचे म्हणणे ऐकून घ्या.
 4. तो गोंधळून जाऊ नये म्हणून हळूहळू त्याला हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी तयार करा.

तुमच्या दुसऱ्या गरोदरपणात तुम्ही स्तनपान थांबवावे का?

तुम्ही गरोदर असताना स्तनपान सुरू ठेवू शकता. प्रसूतीनंतर, तुम्ही दोन्ही बाळांना स्तनपान करू शकता. जर तुम्ही आणि बाळ निरोगी असाल तर स्तनपान करणे चांगले आहे.

दुसऱ्या वेळेला तुमची प्रसूतीनंतरची पुनर्प्राप्ती कशी वेगळी असेल?

 • तुमच्या दुसऱ्या प्रसूतीमध्येतुम्हाला नक्की काय अपेक्षित आहे आणि बदलांना कसे सामोरे जावे हे कळेल.
 • दुस-या गरोदरपणात कदाचित प्रसूती लवकर होईल.
 • तुमच्या पहिल्या प्रसूतीमध्ये घडलेल्या सर्व गोष्टी दुसऱ्या प्रसूतीमध्ये घडतीलच असे नाही.
 • प्रसूतीची प्रक्रिया नेमकी कशी होते आणि कशी संपते हे तुम्हाला कळेल.

तुम्ही तुमच्या दुसऱ्या बाळाची तयारी कशी करू शकता?

 • तुमच्या मोठ्या बाळाची काळजी घेण्यासाठी कोणीतरी सोबत असुद्या.
 • आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट आणून ठेवा.
 • बऱ्याच काळापासून साठवलेल्या वस्तू धुवून ठेवा.
 • तुमच्या मोठ्या बाळासाठी बॅग पॅक करा.
 • डायपर बॅग स्वच्छ करा आणि डायपर आणून ठेवा

दुसऱ्या गरोदरपणात गरोदरपणाचा कालावधी खूप लवकर पुढे सरकला असे बऱ्याच स्त्रिया सांगतात. जर तुम्ही दुस-यांदा गरोदर असाल, तर जास्त काळजी करू नका- तुम्हाला कळण्यापूर्वी तुमचे गोंडस बाळ तुमच्या हातात असेल!

आणखी वाचा:

गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाही मध्ये कसे झोपावे?
गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत करता येतील असे सुरक्षित व्यायामप्रकार

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article