Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) गणेशोत्सव 2023: छोटे आणि दीर्घ मराठी निबंध

गणेशोत्सव 2023: छोटे आणि दीर्घ मराठी निबंध

गणेशोत्सव 2023: छोटे आणि दीर्घ मराठी निबंध

गणपती बाप्पा लहान मुलांचा अत्यंत लाडका आहे आणि त्याच्या आगमनाची सगळेजण आतुरतेने वाट बघत असतात. महाराष्ट्रात हा सण अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात 10 दिवस साजरा केला जातो. ह्या उत्सवाची समाप्ती अनंतचतुर्दशीला होते. ह्या गणेशोत्साविषयीचे काही छोटे आणि दीर्घ निबंध ह्या लेखामध्ये दिलेले आहेत. चला तर मग ह्या उत्सवाविषयी निबंधाच्या माध्यमातून अधिक जाणून घेऊयात!

गणेशोस्तवाविषयी 10 ओळींचा निबंध

1. गणेश चतुर्थी हा सण भाद्रपद महिन्यात साजरा केला जातो.

2. हा सण हिंदुधर्मीयांचा असून ह्या दिवशी सर्व कुटुंबीय आनंदाने एकत्र येतात.

3. घरांमध्ये गणपतीची सुंदर आरास करून गोडधोड पदार्थ केले जातात. तसेच सार्वजनिक गणपतींपुढे सुद्धा आरास केली जाते.

4. गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत घरोघरी गणपतीचे स्वागत केले जाते.

5. गणपतीला हार घातला जातो आणि लाल फुले, दुर्वा वाहिल्या जातात. 21 मोदकांचा नेवैद्य दाखवला जातो.

6. गणपती बसल्यानंतर पाच दिवसांनी गौराईचे आगमन होते.

7. गणेश उत्सवात विविध स्पर्धांचे तसेच मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

8. दिवस दररोज सकाळ-संध्याकाळ गणपतीची आरती करून नैवेद्य दाखवला जातो.

9. अनंत चतुर्थीला आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन होते.

10. गणपतीचे विसर्जन केल्यानंतर वाटली डाळ प्रसाद म्हणून दिली जाते.

गणेशोस्तवाविषयी लघु निबंध

भारतामध्ये, विशेषतः महाराष्ट्रातील लोकांचा गणेशोत्सव हा अत्यंत आवडता सण आहे. लहान मुलांपासून, मोठ्या माणसांपर्यंत ह्या सणाची सर्व लोक आतुरतेने वाट बघत असतात. गणेशचतुर्थीच्या दिवशी घरोघरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केली जाते. गणपतीच्या सजावटीचा विशेष उत्साह असतो. ह्या दिवशी गणपतीला आवडणाऱ्या मोदकांचा नेवैद्य दाखवला जातो. श्रीगणेशाच्या दर्शनाच्या निमित्ताने सगळे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी घरी येतात. त्यामुळे त्यांच्या भेटीगाठी होतात. गणपतीची आरती आणि अथर्वशीर्ष पठाणाने सगळे वातावरण भक्तिमय आणि प्रसन्न होते. आरतीनंतर दररोज वेगवेगळा प्रसाद श्रींच्या पुढे ठेवला जातो.

सार्वजनिक गणेशोत्सव सुद्धा उत्साहात साजरा केला जातो. चौकाचौकात श्रीगणेशाची स्थापना करून, वेगवेगळे देखावे केले जातात. गणेश चतुर्थीपासून ते अनंतचतुर्दशीपर्यंत वातावरणात उत्साह असतो. वेगवेगळे समाजप्रबोधनपर देखावेसुद्धा बघायला मिळतात. हा सण महाराष्ट्रात जास्त उत्साहात साजरा केला जातो आणि देखावे बघण्यासाठी लोक तिथे दुरून येतात. महाराष्ट्रात गणेशोत्सव एक महत्त्वाचा उत्सव आहे. भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीच्या दिवशी ह्या सणास सुरुवात होते आणि अनंत चतुर्दशीपर्यंत दहा दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. .

गणपती ही विघ्न नाहीशी करणारी हिंदूंची देवता आहे. म्हणून कोणतेही शुभकार्य करण्याच्या आधी गणपतीची पूजा केली जाते. महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. प्रत्येक चौकात किंवा गल्लीत ठिकठिकाणी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. विविध देखाव्यांनी सजावट केली जाते. गणपतीपुढे करमणुकीचे कार्यक्रम सादर केले जातात. स्पर्धा घेतल्या जातात.

“गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” अशा घोषणा देत गणपती बाप्पाचे विसर्जन करताना सगळ्यांच्या भावना अनावर होतात.

गणेशोस्तवाविषयी दीर्घ निबंध

गणेश चतुर्थी हा हिंदूंचा एक मोठा सण आहे. बुद्धीची देवता श्री गणेशाचा जन्म गणेश चतुर्थीच्या दिवशी झाला. प्रामुख्याने महाराष्ट्रात ह्या उत्सवाचे विशेष आकर्षण असते. घरोघरी सजावट करून श्रीगणेशाची स्थापना केली जाते. सार्वजनिक गणेशोत्सव सुद्धा अगदी उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवासाठी उत्साहात खरेदी केली जाते. एक आठवडा आधीच बाजारपेठा फुललेल्या असतात. सजावटीसाठी लागणारे सामान, पूजेचे साहित्य, गोड धोड करण्यासाठी लागणारे सामान इत्यादींची खरेदी करण्यासाठी झुंबड उडते.

गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशांचा जन्म झाला होता. श्री गणेशयांच्या जन्मदिवसाला दरवर्षी गणेश चतुर्थीच्या रूपात साजरे केले जाते. श्री गणेश हे श्री शंकर आणि श्री पार्वती ह्यांचे पुत्र आहेत. प्राचीन कथेनुसार एकदा भगवान शंकरांनी रागात श्री गणेशाचे डोके धडावेगळे केले. परंतु यानंतर एका हत्तीचे डोके त्यांच्या धडाला बसवण्यात आले. आणि अशा पद्धतीने भगवान गणेश यांनी पुन्हा एकदा त्यांचे जीवन प्राप्त केले. तेव्हापासून या दिवसाला गणेश चतुर्थी च्या रूपात साजरे केले जाते. घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी गणपतीची आरती केली जाते. रोज वेगळा प्रसाद असतो. काही ठिकाणी दिड दिवस तर काहींच्या कडे पाच, सात आणि दहा दिवसांसाठी गणपती बसवले जातात.

गणेश चतुर्थीचा दिवस संपूर्ण देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरा केला जातो, परंतु याचे मुख्य आकर्षण महाराष्ट्रात असते.. या दिवशी लोक आपापल्या घरात भगवान गणेशांची लहान प्रतिमा व मूर्ती स्थापित करतात. गल्ली बोळात व गावागावात श्री गणेश यांची मोठं मोठी मूर्ती बसवली जाते. गणेशोत्सवाच्या काही दिवसां आधीच बाजारांमध्ये तयारी सुरू होते. वेगवेगळ्या माती पासून बनवण्यात आलेली भगवान गणेशाची मूर्ती खरेदी केली जाते. यासोबतच पूजेचे सामान, फुले व मूर्तीच्या सजावटीसाठी वेगवेगळ्या सजावटीच्या वस्तू खरेदी केल्या जातात. गणेश चतुर्थी नंतर सर्व लोक पुढील दहा दिवस आपल्या घरात आणि मंदिरात भगवान गणेशांची पूजा करतात. यासोबतच श्री गणेशा यांचे आवडते मोदक देखील बनवले जाते. मोदक चा प्रसाद गणपतीला दाखवून सर्व भाविकांना दिला जातो. श्रीगणेश ही बुद्धीची देवता असल्याने, त्यांची भक्ती, पूजा केल्याने बुद्धीचे वरदान मिळते. कोणतेही नवीन चांगले काम सुरु करताना आपण श्री गणेशाची पूजा करतो. १० दिवसांच्या ह्या गणेशोत्सवाची सांगता अनंतचतुर्दशीने होते. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”, “एक, दोन, तीन,चार गणपतीचा जयजयकार” अशा गजराने बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जातो.

गणेशोत्साविषयीचे हे निबंध तुमच्या मुलासाठी नक्कीच माहितीपूर्ण ठरतील. तुम्हाला सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!

आणखी वाचा:

 गणेश चतुर्थी शुभेच्छासंदेश आणि मेसेजेस
गणेश चतुर्थी तुमच्या घराची सजावट कशी कराल?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article