Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाही मध्ये कसे झोपावे?

गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाही मध्ये कसे झोपावे?

गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाही मध्ये कसे झोपावे?

दुसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीला तुम्हाला थोडे बरे वाटू लागेल. म्हणूनच दुसऱ्या तिमाहीला गरोदरपणातील हनिमून पिरिएड असे म्हणतात. गरोदरपणाची तुम्हाला आता सवय झालेली असेल. परंतु, अजूनही तुम्हाला काही समस्या असू शकतील आणि त्यापैकी एक समस्या म्हणजे झोपेची समस्या होय. काही स्त्रियांना रात्रीची झोप नीट लागते तर काहींना झोप लागणे अवघड होऊ शकते. दुसऱ्या तिमाहीमध्ये आपण झोपेच्या वेगवेगळ्या टिप्स आणि स्थितींबद्दल चर्चा करणार आहोत.

व्हिडिओ: गरोदरपणातील दुसऱ्या तिमाहीतील झोपण्याच्या सुरक्षित स्थिती

दुसऱ्या तिमाहीतील रात्रीची झोप नीट न लागण्याची कारणे

पहिल्या तिमाहीपेक्षा दुसऱ्या तिमाहीत तुम्हाला चांगली झोप येऊ शकते. परंतु, गरोदरपणाच्या दुसया तिमाहीत तुम्हाला झोपताना त्रास होऊ शकतो. गरोदरपणाच्या दुसया तिमाहीत, निद्रानाशास कारणीभूत असलेल्या त्रासांमध्ये अपचन, पायात पेटके येणे, छातीत जळजळ, रक्तसंचय, घोरणे, विचित्र स्वप्ने पडणे, स्लीप एपनिया, रेस्टलेस लेग सिंड्रोम आणि पेटके यांचा समावेश असू शकतो.

वर नमूद केलेल्या समस्यांव्यतिरिक्त, तुमची हार्मोनल पातळी स्थिर झाल्यामुळे तुम्हाला अधिक बरे वाटू लागते. तुमच्या मूत्राशयावरील दाब कमी होतो कारण तुमचे गर्भाशय ओटीपोटाच्या भागाकडून थोडे वर सरकते. रात्रीच्या वेळी त्यामुळे शौचास जाणे कमी होते. तथापि, काही स्त्रिया अजूनही रात्रीच्या वेळी अनेकदा बाथरूमला जातात.

तुम्ही गरोदरपणाच्या १६ व्या आठवड्यात प्रवेश केल्यावर तुम्हाला संध्याकाळी मळमळ सुद्धा होऊ शकते. तसेच गरोदरपणाच्या १६ ते २४ आठवड्यांनंतर तुमच्या बाळाच्या पोटातील हालचाली तुम्हाला जाणवू शकतात. संध्याकाळच्या वेळी त्याची तीव्रता वाढू शकते. बाळाच्या हालचालींमुळे झोपेत व्यत्यय येऊ शकतो. शारीरिक अस्वस्थेव्यतिरिक्त, चिंता आणि बाळाविषयीच्या काळजीमुळे सुद्धा झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो.

गरोदरपणाच्या २ ऱ्या तिमाहीमध्ये झोपण्याच्या सुरक्षित स्थिती

तुमच्या गरोदरपणाचे दिवस जसजसे पुढे सरकतात तसे तुमच्या पोटाचा आकार वाढत जातो आणि तुम्हाला तुमच्या पाठीवर झोपणे कठीण होऊ शकते. गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये झोपेची सर्वोत्तम स्थिती म्हणजे डाव्या कुशीवर झोपणे ही होय. ही स्थिती रक्ताभिसरणासाठी आणि नाळेला पोषक तत्वांचा पुरवठा करण्यासाठी आदर्श आहे. तुमच्या ओटीपोटाकडील आणि नितंबाकडील भागावर दबाव ठेवण्यासाठी, तुम्ही तुमचे गुडघे वर करून झोपू शकता. तुम्ही तुमच्या गुडघ्यांना आधार देण्यासाठी उशा वापरू शकता. परंतु, काही प्रकरणांमध्ये तुम्हाला तुमच्या झोपण्याच्या स्थितींमध्ये बदल करावा लागेल.

  • जर तुम्हाला खूप पाठदुखी होत असेल तर तुम्ही पोटाखाली उशी ठेवू शकता
  • जर तुम्हाला श्वास कमी पडत असल्यास, तर तुम्हाला बरे वाटण्यासाठी तुम्ही उशा घेऊन तुमची स्थिती समायोजित करू शकता
  • जर तुम्हाला छातीत जळजळ होत असेल तर तुमच्या शरीराचा वरचा भाग उंच करण्यासाठी उशांचा वापर करा

वर नमूद केलेल्या स्थितीमध्ये तुम्हाला झोपणे कठीण वाटू शकते, परंतु गरोदरपणाची पहिली तिमाही पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पाठीवर किंवा पोटावर झोपू नका असा सल्ला दिला जातो.

तुम्ही कुठल्या स्थितीमध्ये झोपणे टाळावे?

जेव्हा तुम्ही गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये प्रवेश करता तेव्हा तुम्ही डाव्या कुशीवर झोपणे फार महत्वाचे आहे. झोपताना कुठल्या स्थितीत झोपावे हे खाली सांगितलेले आहे.

. तुमच्या पोटावर झोपावे

तुमच्या पहिल्या तिमाहीपर्यंत तुम्ही तुमच्या पोटावर झोपू शकता. तथापि, तुम्ही तुमच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये ह्या पर्यायाचा विचार करणे चांगले नाही. तुमच्या वाढत्या पोटामुळे तुम्हाला पोटावर झोपणे अस्वस्थ वाटू शकते, परंतु ते तुमच्या बाळासाठीही सुरक्षित नाही.

. पाठीवर झोपणे

तुमचा पोटाचा आकार सतत वाढत असल्याने तुम्हाला पाठीवर झोपणे खूप अस्वस्थ वाटू शकते. ह्यामुळे श्वासोच्छवासाच्या समस्या, पाठदुखी, मूळव्याध, कमी रक्तदाब ह्या समस्या उद्भवू शकतात. वाढत्या पोटाचा भार रक्तवाहिन्या आणि आतड्यांवर पडतो त्यामुळे असे होऊ शकते. तसेच तुमचे हृदय आणि गर्भामधील रक्ताभिसरण विस्कळीत होऊ शकते.

दुसऱ्या तिमाहीमध्ये चांगली झोप येण्यासाठी काही टिप्स

तुमच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये झोपेची अस्वस्थता अनुभवणे फार सामान्य नाही. पण खाली दिलेल्या काही टिप्स वापरल्यास तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होऊ शकेल.

1. झोपण्यापूर्वी हलके जेवण

चांगली झोप येण्यासाठी झोपेच्या आधी निरोगी आणि हलके अन्न खाण्याची शिफारस केली जाते. बर्‍याचदा असे दिसून येते की जड जेवणामुळे अपचन किंवा हृदयाची जळजळ होऊ शकते त्यामुळे झोप नीट लागत नाही आणि अस्वस्थता येते. झोपण्याच्या किमान दोन ते तीन तास आधी रात्रीचे जेवण घ्यावे.

2. मसालेदार अन्न खाणे टाळा

रात्रीच्या जेवणाच्या वेळी किंवा झोपण्यापूर्वी मसालेदार अन्न खाल्ल्याने छातीत जळजळ होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे झोप येण्यास त्रास होऊ शकतो. त्याऐवजी थोडे कोमट दूध किंवा हर्बल चहा पिणे चांगले.

3. तुमच्या झोपण्याच्या वेळेचा नित्यक्रम ठरवा

तुमचा ठराविक नित्यक्रम असल्यास चांगली झोप येते. म्हणूनच, शांत झोप येण्यासाठी दररोज रात्री लवकर आणि झोपेच्या ठराविक वेळी झोपण्याचा सल्ला दिला जातो. तुमच्या झोपेच्या नियमित वेळापत्रकाचे पालन केल्याने तुम्हाला चांगली झोप येऊ शकते.

तुमच्या झोपण्याच्या वेळेचा नित्यक्रम ठरवा

4. झोपायच्या आधी रिलॅक्स व्हा

तुमच्या झोपेच्या वेळेच्या आधी, तुमचे मन आणि शरीर रिलॅक्स ठेवणे खूप महत्वाचे आहे. झोपायच्या वेळेच्या आधी कोणतेही कठीण काम करणे टाळा. आपल्या शरीराला आराम मिळण्यासाठी तसेच झोपेच्या तयारीसाठी वेळ देणे खूप महत्वाचे आहे. सुखदायक संगीत ऐकणे किंवा कोमट पाण्याने आंघोळ केल्याने सुद्धा तुम्हाला बरे वाटण्यास मदत होऊ शकते.

5. झोपायच्या आधी टेलिव्हिजन आणि मोबाईल टाळा

तुमच्या बेडरूममध्ये टीव्ही आणि फोन सारख्या इलेक्ट्रॉनिक्सशिवाय झोपण्यासाठी आरामदायक जागा तयार करा. टी. व्ही. बघणे किंवा तुमच्या फोनमध्ये ब्राउझ करणे ह्यासारख्या गोष्टी तुमच्या झोपण्याच्या वेळापत्रकात व्यत्यय आणू शकतात. टी. व्ही. बंद करा आणि झोपण्याच्या किमान एक तास आधी तुमचा फोन बघणे थांबवा.

6. स्वच्छ पलंगावर झोपा

स्वच्छ आणि नीटनेटक्या पलंगावर झोपल्याने तुम्हाला चांगले वाटतेच, पण त्यामुळे तुम्हाला चांगली झोप येण्यासही मदत होते. तुमची बेडरूम व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवा. तुमची झोपेची जागा चांगली आहे का हे पहा त्यामुळे तुम्हाला शांत आणि चांगली झोप घेता येईल.

चांगली झोप येण्यासाठी व्यायामाची कशी मदत होते?

चांगली झोप येण्यासाठी व्यायामाची कशी मदत होते?

गरोदर असो वा नसो, व्यायामाचे प्रत्येकासाठी खूप आरोग्यदायी फायदे आहेत. चांगली झोप लागणे हा सुद्धा व्यायामाचा एक फायदा आहे. व्यायाम केल्याने तुमचे शारीरिक आणि मानसिक संतुलन चांगले राहते. म्हणून, जर तुम्ही आत्तापर्यंत व्यायाम करत नसाल, तर चांगली झोप येणासाठी तुम्ही व्यायामाची सुरुवात करू शकता. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी व्यायाम करा परंतु झोपेची वेळ झालेली असताना व्यायाम करणे टाळा. गरोदरपणात जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी तुम्ही विविध प्रकारचे व्यायाम कसे करू शकता ह्याबद्दल आरोग्य व्यावसायिकांशी बोला. तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी आणि तुमच्या वाढत्या गर्भासाठी व्यायामाचे विविध प्रकार शिकून घ्या. गरोदरपणाच्या वर्गात सामील होणे ही देखील चांगली कल्पना आहे.

चांगली झोप येण्यासाठी वर नमूद केलेल्या उपायांव्यतिरिक्त, झोपेची वेळ झालेली असताना कॅफिनयुक्त पेये घेणे टाळा. कॉफी आणि चहामुळे तुम्हाला अधिक सक्रिय आणि उत्साही वाटू शकते तसेच त्यामुळे झोपताना अस्वस्थता येऊ शकते.

आणखी वाचा: गरोदरपणातील दुसऱ्या तिमाहीतील अन्न आणि पोषण

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article