Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे टप्पे गरोदरपणाची तिसरी तिमाही: लक्षणे, शरीरात होणारे बदल आणि आहार

गरोदरपणाची तिसरी तिमाही: लक्षणे, शरीरात होणारे बदल आणि आहार

गरोदरपणाची तिसरी तिमाही: लक्षणे, शरीरात होणारे बदल आणि आहार

जेव्हा एखादी स्त्री गरोदर राहते तेव्हा तिच्यासाठी ती जगातील सर्वात सुंदर भावना असते. चेहऱ्यावर तेज आणि आनंद असतो. पोटाचा आकार वाढू लागतो. स्त्री जेव्हा गरोदरपणाच्या तिसर्‍या तिमाहीत म्हणजेच गरोदरपणाच्या २८ व्या आठवड्यात प्रवेश करते तेव्हा तिला खूप आनंद होतो. परंतु त्याच वेळी चिंता सुद्धा वाटू शकते. पण काळजी करण्याची गरज नाही कारण हा मार्गदर्शक लेख तुमच्या सर्व शंका आणि चिंता दूर करण्यात मदत करेल.

तिसरी तिमाही म्हणजे काय?

गरोदरपणाचे संपूर्ण नऊ महिने, म्हणजे सुमारे ४० आठवडे सहसा तीन तिमाह्यांमध्ये विभागले जातात. तिसर्‍या तिमाहीमध्ये गरोदरपणाच्या २८ व्या ते ४० व्या आठवड्याचा समावेश होतो. सोप्या शब्दात सांगायचे तर, हे गरोदरपणाचे शेवटचे तीन महिने असतात आणि त्यामुळे ते सर्वात निर्णायक असतात.

गरोदरपणाची तिसरी तिमाही स्त्रीसाठी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या आव्हानात्मक असू शकते. कारण बाळाच्या वाढीचा हा अंतिम टप्पा असतो. सर्वसाधारणपणे, बाळाचा विकास ३७ व्या आठवड्याअखेर संपलेला असतो आणि त्यानंतर, तुम्ही कधीही आई होऊ शकता. ह्या कालावधीत तुम्ही काय करू शकता आणि काय अपेक्षित आहे हे जाणून घेणे खरोखर आवश्यक आहे.

तिसऱ्या तिमाहीतील गरोदरपणाची लक्षणे

गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये जास्तीत जास्त काळजी आणि खबरदारी घेणे आवश्यक आहे. स्त्रीला वेदना जाणवू शकतात आणि शरीराच्या काही भागात सूज देखील येऊ शकते. तिला चिंता वाटू लागते.

परंतु गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये प्रवेश करताना खालील लक्षणांकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे.

 • गर्भाची हालचाल वाढते आणि बाळाचे आतून पाय मारण्यास सुरुवात होते
 • ब्रॅक्सटनहिक्स काँट्रॅक्टशन म्हणजेच सराव कळा काही वेळेला जाणवू लागतात. ह्या कळा वेदनादायी नसतात
 • वारंवार लघवीमुळे तुम्हाला बाथरूमला जावे लागेल
 • आधीच्या दोन तिमाहयांसारखी ह्या तिमाहीमध्ये सुद्धा छातीत जळजळ होणे किंवा ऍसिडिटी ही लक्षणे जाणवतील
 • घोटे, सांधे किंवा बोटाना सूज येणे हे तुमच्या शरीरात वेगाने होणारे दुष्परिणाम आहेत
 • स्तन कोमल किंवा संवेदनशील होतात तसेच स्तनांमधून दुधासारखा द्रवपदार्थ येतो
 • चिंता किंवा हार्मोनल बदलांमुळे निद्रानाशाचा विकार होतो. तसेच वाढत्या पोटामुळे अस्वस्थता येते
 • मूळव्याध, म्हणजे गुदाजवळील किंवा गुदाशयाच्या खालच्या भागाला सूज येते

तिसऱ्या तिमाहीतील गरोदरपणाची लक्षणे

गर्भाचा विकास

तिसरी तिमाही सुरु होताना, तुमचे बाळ आधीच मोठे झालेले असेल. तिसऱ्या तिमाहीत गर्भाचे वजन वाढते. गरोदरपणाच्या २८ व्या आठवड्यात गर्भ सुमारे अडीच पौंड आणि सोळा इंच लांब आणि ४० व्या आठवड्यात सुमारे सहा ते नऊ पौंड आणि एकोणीस ते बावीस इंच लांब असू शकतो.

हा बदल तुम्हाला गोंधळात टाकू शकतो, परंतु संपूर्ण गरोदरपणात बाळाची वाढ अशा प्रकारे होते. तिसऱ्या तिमाहीत गर्भाच्या विकासाचे टप्पे जाणून घेण्यासाठी वाचा.

 • हाडे: जेव्हा तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या ३२ व्या आठवड्यात प्रवेश करता तेव्हा तुमच्या बाळाची हाडे पूर्ण विकसित होऊ शकतात. गर्भाच्या कूर्चेचे पूर्णपणे हाडांमध्ये रूपांतर होते. निरोगी हाडांसाठी आवश्यक असलेले कॅल्शियम तुम्हाला तुमच्या कॅल्शियमयुक्त आहारातून मिळते.
 • केस, त्वचा आणि नखे: गरोदरपणाचा ३२ वा आठवडा जेव्हा सुरु होतो, तेव्हा बाळाची त्वचा देखील पूर्णपणे विकसित होऊ लागते. बाळाच्या केसांची वाढ होऊ लागते आणि नखे तयार होतात.
 • पचनसंस्था: जेव्हा तुमच्या गरोदरपणाचे शेवटचे आठवडे सुरु होतात, तेव्हा मेकोनियम किंवा बाळाचे पहिले मलतयार होते. त्यामध्ये रक्त पेशी, व्हर्निक्स आणि लॅनुगो यांचा समावेश होतो. पूर्णतः तयार झालेल्या बाळाच्या आतड्यांमध्ये मेकोनियम दिसणे सुरू होईल.
 • संवेदना: बाळाच्या २९ व्या किंवा ३० व्या आठवड्यात बाळाची स्पर्शाची संवेदनशीलता विकसित होऊ शकते. ३१व्या आठवड्यापर्यंत, तुमचे बाळ प्रकाश, चव, ऐकणे आणि वास ह्या संवेदनांना प्रतिसाद देऊ लागते.
 • मेंदूचा विकास: तिसऱ्या तिमाहीत सुद्धा मेंदूची लक्षणीय वाढ होते. कारण गर्भ स्वप्न पाहू शकतो किंवा स्वतःच्या शरीराचे तापमान नियंत्रित करू शकतो.
 • अवयव: गरोदरपणाच्या ३७ व्या आठवड्यात, बाळाचे अवयव देखील पूर्णपणे विकसित होतात.
 • डोक्याची स्थिती: गरोदरपणाच्या ३६ व्या आठवड्यापर्यंत, गर्भाचे डोके खालच्या दिशेने असले पाहिजे. आणि, जर अल्ट्रासाऊंडनंतर, बाळाचे डोके खालच्या दिशेने नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले, तर बाळाची स्थिती बदलण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करू शकतात किंवा तुम्हाला सिझेरियन शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.

गर्भाचा विकास

शरीरातील बदल

तिसऱ्या तिमाहीमध्ये तुमच्या पोटाचा आकार वाढू लागतो त्यासोबतच शरीरात इतर अनेक बदल घडू लागतात. शरीरात होणारे बदल खालीलप्रमाणे

 • पोटदुखी: पोटाच्या खालच्या भागाला आधार देणारे गोल अस्थिबंधन इतके ताणले जातात की तुम्हाला तीक्ष्ण आणि असह्य पोटदुखी जाणवू शकते. वाढत्या बाळाला सामावून घेण्यासाठी हे स्ट्रेचिंग होते. ह्या वेदना कमी करण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही. तुम्ही फक्त धीर धरून ह्या वेदना सहन करू शकता.
 • थकवा: गरोदरपणाच्या तिसर्‍या तिमाहीत, बाळाच्या वाढत्या वजनासोबत तुम्हाला तुमच्या वजनाचा भार देखील पेलावा लागतो आणि ते कठीण होऊ शकते. परिणामी तुम्हाला वेळोवेळी थकवा जाणवू शकेल. ह्या अस्वस्थतेमुळे तुम्हाला झोपेतही अडचणी जाणवू शकतात. परंतु तुम्ही नीट विचार करून त्याबाबतचे नियोजन करू शकता. चांगला आहार घ्या. सतत हालचाल करत रहा. मर्यादेत रहा आणि तुमच्या झोपेचे नीट नियोजन करा.
 • सराव कळा (ब्रॅक्सटनहिक्स कॉन्ट्रॅक्शन्स): खऱ्या कळा सुरु होईपर्यंत हा शारीरिक बदल होतो. ह्या सराव कळा तुम्हाला वारंवार जाणवू शकतात. प्रसूतीची वेळ आलेली आहे असे तुम्हाला वाटू शकते.
 • स्ट्रेच मार्क्स: बाळाच्या वाढत्या आकाराला सामावून घेण्यासाठी तुमचे शरीर, स्ट्रेच मार्क्स दिसू लागण्याइतपत ताणले जाते. हे स्ट्रेच मार्क्स असणे म्हणजे ते तुमच्या बाळाच्या सामान्य वाढीचे लक्षण आहे. स्ट्रेच मार्क्स कमी होण्यासाठी तुम्ही त्यावर हळुवारपणे मॉइश्चरायझर लावू शकता.
 • पाठदुखी: जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराचे आणि बाळाचे वजन पेलत असता तेव्हा तुमची पाठ आधार देते. ह्याचा परिणाम म्हणून तीव्र पाठदुखी होऊ शकते. गरोदरपणातील “रिलॅक्सिन” नावाच्या संप्रेरकांमुळे देखील तुम्हाला पाठदुखी होऊ शकते. तुमचे सांधे मोकळे होऊ लागतात आणि पोटाच्या वाढलेल्या आकारामुळे तुमच्या शरीराच्या गुरुत्वाकर्षणाचे केंद्र पुढच्या दिशेने खेचले जाऊ शकते.
 • वारंवार बाथरूमला जाणे: तिसऱ्या तिमाहीमध्ये, एखादी शिंक आली तरी देखील तुम्हाला पॅन्ट मध्ये लघवी होऊ शकते. ओटीपोटावरील अतिरिक्त भारामुळे लघवीवर नियंत्रण ठेवता येत नाही.
 • दुधाळ स्तन: तुमच्या स्तनातून दुधासारखा स्त्राव होऊ लागते आणि तुम्ही लवकरच आई होणार असल्याचे ते लक्षण आहे.

वजनातील वाढ

तिसऱ्या तिमाहीच्या महत्वाच्या काळात वजनाची वाढ वेगाने होते. ह्या काळात तुमच्या बाळाचे वजन जास्तीत जास्त वेगाने वाढते. संशोधनानुसार, साधारणपणे २७ व्या आठवड्यात बाळाचे वजन सुमारे २ पौंड असते आणि ३२ व्या आठवड्यात ३ ते ४ पौंड असते. गरोदरपणाच्या शेवटी किंवा ४० व्या आठवड्यापर्यंत, बाळाचे वजन ६ ते १० पौंडांपर्यंत बदलू शकते.

बाळाच्या वाढलेल्या वजनासोबतच तुमच्या शरीराचे वजन वाढण्यासाठी इतरही काही घटक कारणीभूत असतात आणि ते पुढीलप्रमाणे: शरीरातील द्रवपदार्थ, गर्भजल, गर्भाशयाचा वाढलेला आकार आणि रक्ताचे वाढलेले प्रमाण इत्यादी. ह्याच कारणांमुळे पहिल्या दोन तिमाह्यांमध्ये डॉक्टर तंदुरुस्त राहण्याचा सल्ला डॉक्टर देतात जेणेकरुन तिसऱ्या तिमाहीमध्ये संपूर्ण शरीराचे वजन सहन करणे सोपे होईल. सक्रिय राहून हालचाल करत राहणे हाच ह्यावरील उपाय आहे.

तुम्ही करून बघू शकता असे व्यायामप्रकार

४० आठवड्यांच्या काळात ज्या स्त्रिया व्यायाम करतात त्यांचे आरोग्य चांगले राहते, वजन नियंत्रित राहते आणि मूड चांगला राहतो. कमी ते मध्यम तीव्रतेच्या व्यायामाची शिफारस डॉक्टर नेहमीच करतात. परंतु ते करताना सुरक्षितता लक्षात घेतली पाहिजे. गर्भावस्थेच्या तिसया तिमाहीत सुरू ठेवता येणारे व्यायाम खालीलप्रमाणे आहेत:

 • चालणे आणि हलके जॉगिंग: अनादी काळापासून गर्भवती महिलांसाठी चालणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे. फक्त तुमचे स्पोर्ट्स शूज घाला आणि फुटपाथवरून चालणे सुरू करा. वेगाने चालू नका कारण त्यामुळे तुम्हाला थकवा येऊ शकतो. तुम्हाला गरोदरपणात कुठलीही समस्या नसल्यास तुम्ही हळू जॉगिंग देखील करू शकता.
 • पोहणे: जर तुमच्याकडे पोहण्यासाठी स्विमिंग पूल असेल तर त्याचा वापर का करू नये? तुम्ही तलावात पोहू शकता किंवा अगदी सोपे असे पाण्यातील व्यायाम सुद्धा करू शकता. ह्यापैकी एक व्यायाम म्हणजे पोहणे आहे त्यामुळे पोटदुखीपासून आराम मिळू शकतो. पाणी शरीराला अनेक प्रकारे सुखदायक ठरू शकते, परंतु आपल्या शरीरावर ताण येईल असा व्यायाम करू नये.
 • योग: हा एक उत्तम व्यायाम आहे. योगामुळे तुम्हाला तंदुरुस्त राहण्यास, तणावापासून मुक्त होण्यास आणि तुमचा मूड प्रसन्न ठेवण्यास मदत होते. योगा तुम्हाला कमी वेदनादायक पद्धतीने प्रसूती वेदना सहन करण्यास तयार करतो. दररोज सुमारे २० मिनिटे ध्यान आणि योगासने करण्यास प्राधान्य देणे पुरेसे आहे. परंतु दिवसातून दोनदा त्याची पुनरावृत्ती करणे अत्यंत फायदेशीर ठरेल.
 • बॉडी वेट वर्क आऊट: तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीत स्क्वॅट्स, वॉल पुशअप किंवा प्लँक्स देखील वापरून पाहू शकता. हे व्यायाम तुमची तग धरण्याची क्षमता आणि तुमच्या प्रसूती कालावधीत तुम्हाला आवश्यक असलेली ताकद वाढवण्यास मदत करू शकतात. गरोदरपणाच्या शेवटच्या तीन महिन्यांत क्रंच किंवा कोणत्याही प्रकारचे पोटाचे व्यायाम टाळा.

तुमच्यासाठी आणि बाळासाठी सर्वोत्तम सल्ला तुमचे डॉक्टर देऊ शकतात. स्त्रीरोगतज्ञांनी परवानगी दिल्यानंतरच व्यायाम करावेत.

चाचण्या आणि स्कॅन

तिसरी तिमाही म्हणजे गरोदरपणातील शेवटचे तीन महिने, ह्या कालावधीत अत्यंत काळजी घेण्याची आणि लक्ष देण्याची गरज असते. त्यासाठी सांगितलेल्या चाचण्या करून घेणे आणि डॉक्टरांना वेळोवेळी भेट देणे आवश्यक असते. खाली काही चाचण्या आणि स्कॅन्स आहेत जे तुम्हाला करून घेणे आवश्यक आहेत.

 • अल्ट्रासाऊंड स्कॅन: तिसऱ्या तिमाहीचा अल्ट्रासाऊंड मागील दोन तिमाह्यांमध्ये केलेल्या अल्ट्रासाऊंडसारखाच असेल. ही चाचणी बाळाच्या डोक्याची स्थिती आणि वाढीची प्रगती जाणून घेण्यास मदत करेल.
 • इलेक्‍ट्रॉनिक फेटल हार्ट रेट मॉनिटरिंग: बाळाचे हृदय योग्यरित्या कार्य करत आहे की नाही हे पाहण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते.
 • ग्रुप बी स्ट्रेप्टोकोकस स्क्रीनिंग: ग्रुप बी स्ट्रेप बॅक्टेरिया सामान्यतः आतडी, योनी, घसा किंवा गुदाशयात आढळतात. हे प्रौढांसाठी धोकादायक नाही परंतु वाढत्या बाळाला ह्यामुळे संसर्ग होऊ शकतो. अशाप्रकारे गर्भाच्या निरोगी आरोग्याची खात्री करण्यासाठी डॉक्टर या जीवाणूची तीव्रता तपासतात.
 • एस टी आय चाचण्या: क्लॅमिडीया, एचआयव्ही, गोनोरिया आणि सिफिलीस असे लैंगिक संबंधांमधून पसरणारे संसर्ग देखील तपासू शकता कारण त्याचा बाळाला देखील संसर्ग होऊ शकतो

तिसऱ्या तिमाही मधील आहार

संपूर्ण गरोदरपणात निरोगी आहार राखणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. पौष्टिक आहार घेतल्याने तुम्हाला निरोगी राहण्यास आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये प्रवेश करण्यास मदत होईल. तुम्हाला तुम्ही काय खावे आणि काय खाऊ नये हे माहित असले पाहिजे, कारण ते तुमच्या बाळाच्या आरोग्याशी संबंधित आहे आणि तुम्ही तडजोड करू शकत नाही.

खाण्यासाठी पदार्थ

 • फायबर आणि प्रथिने मुबलक असल्याने मसूर डाळीला प्राधान्य दिले पाहिजे.
 • पेरू, सफरचंद, संत्री, किवी किंवा अगदी खरबूज या फळांचा नियमित आहारात समावेश केला जाऊ शकतो कारण ह्या फळांपासून ऊर्जा आणि आवश्यक जीवनसत्त्वे मिळतात.
 • सुका मेवा जसे की अक्रोड, बदाम, मनुका किंवा अगदी हेझलनट्स देखील खावेत कारण त्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि फायबर असतात.
 • एवोकॅडोचा आहारात समावेश केला पाहिजे कारण त्यात फायबर, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते.
 • गरोदरपणात अंड्यांमधून आवश्यक चरबी मिळते, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे फक्त पूर्णपणे शिजवलेली अंडी खावीत.
 • गर्भवती स्त्रियांना साधे दही खाण्यास सांगितले जाते कारण ते पोषक असते आणि आणि दही हा निरोगी चरबीचा समृद्ध स्रोत आहे.

टाळले पाहिजेत असे पदार्थ

 • पाश्चराइज्ड दूध आणि त्यापासून बनवलेले कोणतेही उत्पादन टाळा कारण ते रोग होण्यास कारणीभूत असलेल्या सूक्ष्मजंतूंनी भरलेले असू शकतात.
 • कच्चे मासे, चिकन किंवा मांस खाणे टाळा.
 • प्रक्रिया केलेले अन्न आणि जंक फूड हे पूर्णपणे टाळा.
 • अननस, पपई किंवा अगदी द्राक्षे टाळा.
 • कोणत्याही कॅफिन उत्पादनांचे सेवन करू नका.
 • जास्त खारट पदार्थ टाळा कारण त्यामुळे पाणी टिकून राहते. त्यामुळे पाय आणि बोटे सुजतात.
 • जर तुम्हाला स्वच्छतेबद्दल माहिती नसेल तर स्ट्रीट फूड किंवा अन्नपदार्थ टाळा.

शेवटच्या तिमाहीतील कामांची यादी

गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीतील काळजी महत्वाची आहे आणि तिसर्‍या तिमाहीत आरोग्य चांगले राहण्यासाठी खालील गोष्टी करणे महत्वाचे आहे,

 • नियमित आहार योजनेचे पालन करून आपले वजन नियंत्रणात ठेवा आणि सांगितलेले व्यायाम करा.
 • तुमचे आणि तुमच्या बाळाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तुम्हाला सांगितलेल्या चाचण्या आणि डॉक्टरांच्या भेटीचे वेळापत्रक तयार करा.
 • तुमच्या बाळासाठी कपडे, स्ट्रोलर्स, डायपर, पावडर, साबण, मॉइश्चरायझर आणि यासारख्या वस्तू खरेदी करा.
 • प्रसूती वेदना व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक टिप्स साठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 • तुमची हॉस्पिटल बॅग ब्लँकेट, बाटल्या आणि बाळाच्या आवश्यक गोष्टींसह तयार ठेवा.

तिसऱ्या तिमाहीत घ्यावयाची खबरदारी

तुमच्या गरोदरपणाच्या तिसर्‍या तिमाहीमध्ये घ्यायची महत्त्वाची खबरदारी महिन्यानुसार विभागली गेली आहे जेणेकरून तुम्ही सहजपणे फॉलोअप करू शकता.

गरोदरपणाचा ७ वा महिना

 • गरोदरपणाच्या ७ व्या महिन्यात, तुमच्या पोटावर आणि पाठीवर ताण पडेल असा कोणत्याही प्रकारचा जड भार उचलणे टाळा.
 • पायऱ्या चढताना किंवा उतरताना रेलिंगचा आधार घेण्यास प्राधान्य द्या आणि लिफ्ट असल्यास शक्यतो पायऱ्या उतरणे टाळा.
 • झोपताना डाव्या बाजूला झुकण्यास प्राधान्य द्या कारण यामुळे रक्त प्रवाह वाढण्यास आणि चांगली झोप लागण्यास मदत होईल.
 • जास्त खाणे टाळा कारण त्यामुळे छातीत जळजळ होते किंवा वजन वाढू शकते.

गरोदरपणाचा ८ वा महिना

 • जास्त श्रम करणे टाळा आणि तुमचे शरीर चांगले हायड्रेटेड ठेवा.
 • जेव्हाही तुम्हाला सराव कळांचा (ब्रेक्सटन हिक्स कॉन्ट्रॅक्शन्स) अनुभव येऊ लागतो तेव्हा तुमच्या पाठीवर झोपा.
 • तुमच्या आरोग्याची नोंद ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी तुमच्या डॉक्टरांना भेट द्या.
 • व्यायाम सोडू नका परंतु डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच तो सुरु ठेवा.
 • लांब प्रवासाला जाणे टाळा. विमान प्रवास टाळा.
 • धुळीच्या वातावरणात बाहेर जाणे टाळा कारण यामुळे तुम्हाला जीवाणूंचा धोका होऊ शकतो ज्यामुळे तुम्हाला आणि गर्भाला समस्या निर्माण होऊ शकतात.
 • निरोगी आहार घ्या परंतु आधी सांगितल्याप्रमाणे, जास्त खाऊ नका.

गरोदरपणाचा ९ वा महिना

 • फिरायला जा आणि सकारात्मक रहा.
 • गरोदरपणाच्या नवव्या महिन्यात प्रवास अजिबात करू नका.
 • जन्म प्रक्रियेवर निर्णय घ्या आणि शेवटच्या क्षणी चिंता किंवा घाई टाळण्यासाठी सर्व व्यवस्था आधीच करा.
 • बाळाच्या विकासाच्या अंतिम टप्प्यांचा मागोवा ठेवण्यासाठी दर आठवड्याला तपासणीसाठी जा.
 • भरपूर ताजी फळे आणि नैसर्गिक ज्यूस घ्या. निरोगी आहार घ्या.
 • ह्या काळात एकटे राहू नका आणि नेहमी कुणालातरी सोबत ठेवा.

ह्या लक्षणांकडे लक्ष देऊन सावध रहा

कधीकधी गुंतागुंत किंवा इतर अज्ञात कारणांमुळे, तुम्हाला गरोदरपणात जोखीम निर्माण होऊ शकते. कोणत्या टप्प्यावर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना भेटण्याची गरज आहे हे पाहण्यासाठी खालील लक्षणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे:

 • तिसऱ्या तिमाहीत गरोदरपणात पांढरा स्त्राव होणे सामान्य आहे. परंतु स्त्राव खूप होतो आहे आणि तुमचा अंतर्वस्त्र कमी कालावधीत ओली होत आहेत असे तुमच्या लक्षात आले तर, तुमच्या डॉक्टरांना भेट द्या.
 • कोणत्याही प्रकारचा रक्तस्त्राव होत असल्यास ताबडतोब आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 • जर तुमचा चेहरा लाल झाला असेल किंवा तुम्हाला श्वास घेण्यास त्रास जाणवत असेल आणि कळा जाणवत असतील तर प्रसूतीची वेळ झाली आहे असे समजावे.
 • जर तुम्हाला गरोदरपणात, विशेषतः तिसऱ्या तिमाहीत तीव्र पोटदुखीचा अनुभव येत असेल, तर त्वरित वैद्यकीय मदत घ्या.
 • चक्कर येणे, मळमळ किंवा उलट्या होणे ह्या लक्षणांकडे लक्ष द्या
 • मागील काही आठवड्यांमध्ये सूज वाढणे किंवा वजन वेगाने वाढणे ही लक्षणे दिसत असतील तर ते प्रीक्लेम्पसियाचे लक्षण असू शकते.

तिसऱ्या तिमाहीतील अस्वस्थतेला सामोरे जाण्यासाठी काही टिप्स

तिसऱ्या तिमाहीमध्ये वजन वाढल्यामुळे किंवा हार्मोनल बदलांमुळे अस्वस्थता येऊ शकते. तिसर्‍या तिमाहीतील अस्वस्थतेचा सामना करण्यास मदत करण्यासाठी येथे काही टिप्स दिलेल्या आहेत:

 • अधिक सहनशील व्हा आणि संयम दाखवा. घाबरून जाणे आणि वेदनांबद्दल तक्रार केल्याने काही उपयोग होत नाही. गरोदरपणात अस्वस्थता येणारच अश्या सकारात्मक भावनांनी तुमच्या मनाला दिलासा दिल्याने खूप मदत होईल.
 • झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिऊ नका कारण यामुळे तुम्ही बाथरूममध्ये जाण्याचे प्रमाण वाढू शकते.
 • गरोदर महिलांसाठी विशेष समुपदेशन वर्गांना उपस्थित रहा. ह्या वर्गांमध्ये तुम्हाला व्यायामांसह अस्वस्थतेचा सामना करण्यास शिकवले जाईल.
 • आपल्या प्रियजनांना नेहमी जवळ असुद्या कारण ह्या अस्वस्थतेमुळे नकारात्मक विचार येऊ शकतात किंवा लक्ष देण्याची गरज भासेल अशी गुंतागुंत निर्माण होऊ शकते.
 • चांगल्या स्थितीत बसा आणि पाठीला आधार देण्यासाठी खुर्चीचा वापर करा कारण त्यामुळे पाठदुखीपासून आराम मिळू शकतो.

तिसऱ्या तिमाहीचा कालावधी संवेदनशील असतो. ह्या मार्गदर्शकपर लेखामध्ये गरोदरपणाच्या २८ ते ४० व्या आठवड्यासाठी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे अशी सर्व माहिती दिलेली आहे. एकाच वेळी उत्साही आणि चिंताग्रस्त वाटत आहे का? काळजी करू नका, जेव्हा नवीन आनंद एका सुंदर बाळाच्या रूपात तुमच्या जीवनात प्रवेश करेल तेव्हा सर्वकाही ठीक होईल.

आणखी वाचा:

गर्भधारणेची तिसरी तिमाही – गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यातील प्रणयाचा आनंद
गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये तुम्ही कुठल्या गोष्टी कराव्यात आणि टाळाव्यात?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article