Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना प्रजननक्षमता बर्थ कंट्रोल (गर्भनिरोधक) पॅचविषयक माहिती आणि वापर

बर्थ कंट्रोल (गर्भनिरोधक) पॅचविषयक माहिती आणि वापर

बर्थ कंट्रोल (गर्भनिरोधक) पॅचविषयक माहिती आणि वापर

जन्म नियंत्रण पद्धतींमध्ये परिणामकता आणि सहजता वाढवण्यासाठी खूप प्रगती झाली आहे. गर्भनिरोधक पॅच ही आणखी एक जन्म नियंत्रण पद्धती आहे ज्यामुळे नको असलेली गर्भधारणा रोखली जाऊ शकते.

गर्भनिरोधक पॅच म्हणजे काय?

गर्भनिरोधक पॅच (किंवा ऑर्थो एव्हरा किंवा एव्हरा पॅच) हा पॅच तुमच्या शरीरावर लावून गर्भधारणेस प्रतिबंध करण्यास मदत होऊ शकते.

तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये बदल झाला असल्याने ऑर्थो एव्हरा बर्थ कॉन्ट्रोल पॅच हा सुलेन पॅच नावाने विस्थापित केलेला आहे.

लक्षात ठेवा, संतती नियमनासाठी व्हजायनल पॅच आणि गर्भनिरोधक गोळ्या उपलब्ध आहेत. जर तुम्ही परिणामकारक संतती नियमनाचा पर्याय शोधात असाल तर तुमच्या डॉक्टरांशी बोला, म्हणजे ते तुम्हाला तुमच्यासाठी योग्य असलेला जन्म नियंत्रण पॅच सुचवतील.

पॅचचे कार्य कसे होते?

गर्भनिरोधक पॅच कसे काम करतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तर इथे आहे. इतर संतती नियमनाच्या पद्धतींप्रमाणेच पॅच मधून संप्रेरके सोडली जातात (इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन) आणि गर्भधारणेला प्रतिबंध घातला जातो. ही संप्रेरके त्वचेमधून शोषली जातात. पॅचमुळे ओव्यूलेशन थांबवले जाते आणि योनीमार्गातील स्त्राव घट्ट केला जातो. हा स्त्राव घट्ट झाल्यामुळे शुक्रजंतू स्त्रीबीजापर्यंत पोहचत नाहीत.

जेव्हा तुम्ही पॅच वापरत असता तेव्हा तुम्हाला काहीही बदल दिसणार नाहीत किंवा त्याचे कार्य सुरु आहे हे समजणार सुद्धा नाही. परंतु, हा पॅच सतत इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टिन ही संप्रेरके रक्तात सोडण्याचे काम करत असतो. त्याचे काम परिणामाकरित्या चालण्यासाठी तुम्हाला तीन आठवड्यापर्यंत प्रत्येक आठवड्याला हा पॅच बदलावा लागेल. पॅच व्यतिरिक्त असलेल्या चौथ्या आठवड्यानंतर पॅचचे पुढचे चक्र सुरु ठेवणे लक्षात ठेवा.

गर्भनिरोधक पॅच कसा वापरावा?

गर्भनिरोधक पॅच वापरण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या शरीरावर हा पॅच लावला पाहिजे. शरीराच्या स्वच्छ आणि कोरड्या केलेल्या भागावर म्हणजेच खांदा, पोट किंवा पाठीवर हा पॅच लावावा.

लावताना पॅचच्या आतील भागातील अर्धे प्लास्टिक काढून घ्या आणि पॅचच्या चिकट भागाला स्पर्श करणे टाळा. तुम्ही निवडलेल्या शरीराच्या भागावर चिकट पॅच लावला पाहिजे आणि नंतर आतील आवरण काढून टाकले पाहिजे. ह्याद्वारे संतती नियमन पॅच तुमचा तुम्ही कसा लावला पाहिजे हे थोडक्यात सांगितले आहे.

लक्षात ठेवा पॅच लावण्यासाठी तुम्ही जो भाग निवडला आहे तो स्वच्छ आणि कोरडा असला पाहिजे. जर त्वचेला काही त्रास होत असेल तर पॅच लावला लाऊ नये.

मी तो कधी वापरू शकते?

पॅच आठवड्यातून एकदा असे तीन आठवडे वापरला पाहिजे. तो चौथ्या आठवड्यात काढून टाकला पाहिजे, त्या कालावधीत तुम्हाला मासिक पाळी येईल. सात दिवस पॅच न लावता गेले की तुम्ही नवीन पॅच लावू शकता.

पॅच न लावलेल्या आठवड्याच्या शेवटी नवीन पॅच लावणे महत्वाचे आहे, नाहीतर गर्भारपणाचा धोका वाढतो. तुम्हाला तरीही नवीन पॅच लावल्यावर रक्तस्त्राव किंवा हलके डाग होऊ शकतात आणि ते सामान्य आहे. जर तुम्हाला पाळी चुकवायची असेल तर तुम्ही चारही आठवडे पॅच लावू शकता आणि नवीन महिन्यात नवीन पॅचची सुरुवात करू शकता.

तुम्ही महिन्याच्या कुठल्याही दिवसापासून पॅच वापरण्यास सुरुवात करू शकता. परंतु, त्याची परिणामाकत तुम्ही पॅच वापरण्यास केव्हा सुरुवात करणार आहात ह्यावर अवलंबून असते म्हणून सुरुवातीला तुम्ही इतर जन्म नियंत्रण पद्धती वापरू शकता. जर तुम्ही तुमच्या मासिक पाळी चक्राच्या पहिले ५ दिवस पॅच वापरण्यास सुरुवात केली तर त्याचे काम लागलीच सुरु होते आणि तुम्हाला त्यासोबत दुसऱ्या जन्म नियंत्रण पद्धतीची गरज भासणार नाही. तुम्ही कुठल्याही दिवसापासून पॅच वापरण्यास सुरुवात करू शकता.

प्रत्येक आठवड्यात एकाच विशिष्ट दिवशी पॅच वापरण्यास सुरुवात करू शकता. पॅच नीट जागेवर आहे ना हे तुम्ही तपासून पाहू शकता.

गर्भनिरोधक पॅच किती परिणामकारक आहे?

जर तीन आठवड्यांसाठी योग्य पद्धतीने पॅच वापरल्यास तो गर्भधारणा रोखण्यास ९९% परिणामकारक होऊ शकतो. ह्या जन्म नियंत्रक पॅचची परिणामकता पॅच किती योग्य पद्धतीने लावला आहे ह्यावर अवलंबून असते, तसेच किती योग्य पद्धतीने संप्रेरके शरीरात सोडली जातात ह्यावर सुद्धा परिणामकता अवलंबून असते.

 • पालकत्वाच्या संख्याशास्त्रानुसार जर सांगितल्याप्रमाणे योग्य पद्धतीने पॅच लावल्यास १०० पैकी १ पेक्षा कमी स्त्रियांना गर्भधारणा होण्याची शक्यता असते.
 • जर सांगितल्याप्रमाणे पॅच लावला नाही तर १०० पैकी ९ स्त्रियांना गर्भधारणा होऊ शकते.

ज्या स्त्रियांचे वजन जास्त आहे तसेच ज्या स्त्रिया इतर औषधे किंवा पूरक औषधे घेत आहेत त्यांच्यासाठी ही जन्म नियंत्रण पद्धती कमी परिणामकारक आहे. ह्या घटकांचा पॅच वर परिणाम होणार का ह्याबाबत जाणून घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. ह्या पॅचमुळे तुमचे लैंगिक संबंधांमधून पसरणाऱ्या आजारांपासून संरक्षण होत नाही त्यामुळे अशा संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी कंडोमचा वापर करणे आवश्यक आहे.

गर्भनिरोधक पॅचचे दुष्परिणाम काय असू शकतात?

ऑर्थो एव्हरा हा जन्म नियंत्रण पॅच आहे आणि ह्यामध्ये ओव्यूलेशनला प्रतिबंध करणारी स्त्री संप्रेरके असतात. ह्या जन्म नियंत्रण पॅचचे काही दुष्परिणाम असतात:

 • मळमळ
 • योनीमार्गातून रक्तस्त्राव
 • उलट्या
 • डोकेदुखी
 • पॅच लावलेल्या जागेवर चुरचुरणे
 • चक्कर येणे
 • स्तनांचा आकार वाढून त्यांना सूज येऊन ते हळुवार होऊ शकतात
 • स्तनाग्रांमधून स्त्राव येणे
 • योनीमार्गास खाज सुटणे
 • योनीमार्गातील स्रावात वाढ होणे
 • पाळी चुकणे किंवा अनियमित पाळी
 • मुरमे
 • खूप पोट दुखणे
 • पोट फुगणे
 • तोंडाची त्वचा काळवंडणे
 • डोक्यावरील केस गळणे
 • वजन किंवा भुकेमध्ये बदल
 • लैंगिक इच्छा कमी होणे

लक्षात ठेवा की हे दुष्परिणाम खूप दुर्मिळ आहेत आणि सगळ्याच स्त्रियांना ते जाणवत नाहीत. तुम्हाला काही गंभीर दुष्परिणाम जाणवले तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

 • स्तनांमध्ये गाठी
 • मनःस्थितीत बदल
 • पोटात तीव्र वेदना
 • गडद रंगाची लघवी होणे
 • पिवळसर डोळे किंवा त्वचा

कुठल्या स्त्रियांनी पॅच वापरणे टाळले पाहिजे?

जरी बऱ्याच स्त्रिया पॅच वापरू शकतात, तरी ह्या गर्भनिरोधक साधनाचे धोके सुद्धा आहेत. हे धोके दुर्मिळ आहेत आणि बऱ्याचवेळा इतर वैद्यकीय स्थितीमुळे किंवा तुम्ही घेत असलेल्या औषधांमुळे होतात.

स्त्रियांनी हा पॅच वापरू नये जर:

 1. तुम्हाला उच्चरक्तदाब, मधुमेह, वजन जास्त किंवा कोलेस्टेरॉल जास्त असेल तर
 2. जर तुम्ही धूम्रपान करीत असाल तर (रक्ताच्या गाठी होण्याचा आणि पक्षाघाताचा धोका वाढतो)
 3. जर तुमचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त असेल तर ऑर्थो एव्हरा वापरू नका
 4. जर तुम्ही गर्भवती असाल तर तुम्ही जन्म नियंत्रण पॅच वापरू नका
 5. जर सलग दोन वेळा तुमची पाळी चुकली असेल तर
 6. जर तुम्हाला नुकतेच बाळ झाले असेल तर (जन्म नियंत्रण पॅच वापरण्याआधी ४ आठवडे वाट पाहणे चांगले)
 7. योनीमार्गातून असामान्य रक्तस्त्राव होत असेल आणि तुम्ही डॉक्टरांची भेट घेतली नसेल तर
 8. स्ट्रोक किंवा हार्ट ऍटॅकचा इतिहास असेल तर
 9. तुम्हाला हृदयाचे आजार असतील उदा: अनकंट्रोल्ड वाल्व्ह डिसऑर्डर किंवा ऱ्हिदम डिसऑर्डर
 10. तुम्हाला रक्ताच्या गाठी होण्याचा आनुवंशिक आजार असेल तर
 11. तुम्हाला डोळे किंवा किडनीचा आजार असेल तर
 12. तुम्हाला संप्रेरकांशी संबंधित कर्करोग असेल तर
 13. गंभीर अर्धशिशी

फायद्यांची तुलना

आजच्या काळात खूप गर्भनिरोधक साधने उपलब्ध असतात. परंतु, तुमच्यासाठी योग्य पर्याय शोधताना तुम्ही खालील गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत

 • तुमच्याकडे कमी देखभाल करावा लागणारा किंवा खूप काळ चालेल असा पर्याय आहे का?
 • संतती नियमनाच्या पर्यायासोबत आरोग्याला काही धोके आहेत का?

जन्म नियंत्रण पॅचचे फायदे

 • पॅच देखभाल करण्यास अगदी सुलभ , सोयीस्कर, सुरक्षित आणि परवडणारा आहे
 • पॅचमध्ये गर्भनिरोधक गोळ्यांसारखेच इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टिन सारखे असलेल्या हार्मोन्स असतात. फरक इतकाच आहे की आठवड्यातून एकदा पॅच लावणे आवश्यक आहे आणि गोळी दररोज घ्यावी लागते
 • जन्म नियंत्रण पॅच आपल्या शरीरात हार्मोन्सचा एक स्थिर डोस देईल, तो जन्म नियंत्रण गोळी प्रमाणेच कार्य करतो.
 • शरीरात हार्मोन्सचा स्थिर प्रवाह सतत असल्यास संप्रेरक पातळीत चढउतार होत नाही
 • गर्भनिरोधक पॅच हे स्त्रियांसाठी एक विश्वासार्ह गर्भनिरोधक आहे

गर्भनिरोधक पॅचचे तोटे

 • पॅच तुमच्या शरीरावर चिकटवलेला असल्याने, तो पडण्याची शक्यता असते. तुम्ही तोच पॅच किंवा नवीन पॅच लगेच वापरू शकता.
 • पॅचचे काही दुष्परिणाम सुद्धा असतात (जरी दुर्मिळ असले तरी). जरी गोळीपेक्षा पॅचमध्ये संप्रेरकांचा जास्त डोस असला तरी धोका ६०% जास्त असतो. परंतु, असे गंभीर स्वरूपाचे दुष्परिणाम होण्याची शक्यता कमी असते.
 • प्रोजेस्टिनमुळे रक्ताच्या गुठळ्यांचा आणि हृद्य रोगाचा धोका नेहमीपेक्षा जास्त वाढतो. संरक्षणाद्वारे असे दिसून आले आहे की हा धोका ६०% जास्त असतो. परंतु, असे गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता कमी असते.
 • गर्भनिरोधक पॅच मुळे त्वचेला खाज सुटते.

गर्भनिरोधक पॅचमुळे लैंगिक संबंधांमधून पसरणाऱ्या आजारांपासून (एसटीडी) संरक्षण मिळते का?

गर्भनिरोधक पॅचमुळे तुम्हाला लैंगिक संबंधांपासून पसरणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळत नाही. कुठल्याही जोडप्याने लैंगिक संबंध ठेवण्याआधी पॅच सोबत कॉन्डोम (पुरुष किंवा स्त्री) सुद्धा वापरले पाहिजेत ज्यामुळे लैंगिक संबंधांपासून पसरणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळू शकेल. कॉन्डोम वापरण्याची सर्वात चांगली बाजू म्हणजे त्यामुळे गर्भधारणेला प्रतिबंध होतो आणि अशाप्रकारे संतती नियमनाच्या दोन पद्धती वापरल्या जातात.

जर मी गर्भवती होण्याचे ठरवले तर ? मी काय केले पाहिजे?

जर तुम्ही गर्भवती होण्याचे ठरवले तर तुम्ही गर्भनिरोधक पॅच वापरण्याचे थांबवले पाहिजे. पॅच काढल्याबरोबर काही आठवड्यांमध्येच प्रजननक्षमता पूर्ववत होते. काही वेळा काही महिने सुद्धा लागू शकतात.

गर्भनिरोधक पॅच वापरणे बंद केल्यावर तुम्ही कॉन्डोम वापरण्यास सुरुवात करू शकता. गर्भधारणेसाठी प्रयत्न करण्याआधी तुम्ही एक मासिक पाळी चक्र वाट पहिली पाहिजे.

प्रयत्नांना सुरुवात करण्याआधी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

प्रयत्न सुरु करण्याआधी तुम्ही दररोज फॉलिक ऍसिडचा डोस (४०० मिग्रॅ), कमीत कमी एक महिना आधी घेणे आवश्यक आहे.

पॅच बदलण्याचे विसरल्यास काय?

जर हा पॅच योग्य प्रकारे वापरला तर ही गर्भनिरोधक पद्धती खूप परिणामकारक आहे. परंतु जर योग्य रित्या तो वापरला नाही तर त्याची परिणामकता कमी होऊ शकते.

जर तुम्ही पॅच लावण्याचे विसरलात तर खाली काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत (तुमच्या मासिक पाळी चक्राच्या कुठल्या चक्रात तुम्ही आहात ह्यावर अवलंबून असते)

 • १ ला आठवडा, पहिला पॅच: तुम्ही ठरवलेल्या दिवशी जर पॅच लावण्यास विसरलात तर जेव्हा लक्षात येईल तेव्हा शक्य तितक्या लवकर नवीन पॅच लावण्यास विसरू नका. ज्या दिवशी पॅच लावाल त्याच दिवशी पुढच्या आठवड्यात तो काढला पाहिजे. गर्भधारणा टाळण्यासाठी, सोबत दुसरी एखादी गर्भनिरोधक पद्धती वापरा.
 • २रा किंवा ३ रा आठवडा, दुसरा किंवा तिसरा पॅच२ऱ्या किंवा ३ऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला दोन पॅच बदलण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी असतो. जर पॅच दोन दिवस जास्त तसाच राहिला तर तो काढून तुम्ही नवीन पॅच लावू शकता. जर तुम्ही दोन पेक्षा जास्त दिवस पॅच बदलण्यास विसरला असाल तर गर्भनिरोधक पद्धती अयशस्वी होण्याचा धोका जास्त असतो. जर त्या कालावधीत तुम्ही लैंगिक संबंध ठेवले तर तुम्ही आपत्कालीन गर्भनिरोधक वापरू शकता किंवा ७ दिवसांसाठी पॅच सोबत आणखी एखादे गर्भनिरोधक वापरू शकता.
 • तिसरा पॅच काढून टाकण्यास विसरलात तर जर तुम्ही चौथ्या आठवड्याच्या सुरुवातीला पॅच काढून टाकण्याचे विसरलात तर काळजी करू नका. तुमच्या लक्षात आल्याबरोबर तो काढून टाका आणि नवीन चक्रास (चक्र १) सुरुवात करू शकता.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

गर्भनिरोधक पॅच विषयी नेहमी विचारले जाणारे प्रश्न

. स्तनपानादरम्यान मी पॅच वापरू शकते का?

तुम्ही जर स्तनपान करीत असाल आणि जर पहिले सहा आठवडे सगळे व्यवस्थित पार पडले तर गर्भनिरोधक पॅच वापरणे ठीक आहे. परंतु, जर दुधाची निर्मिती हवी इतकी झाली नाही किंवा बाळाला पाजताना काही समस्या निर्माण झाल्या तर तुम्ही पॅच वापरणे टाळले पाहिजे कारण त्यामुळे दुधाची निर्मिती कमी होईल.

. जर पॅच पडून गेला तर काय?

जर गर्भनिरोधक पॅच पडून गेला किंवा सैल झाला तर तुम्ही तो काढून टाकला पाहिजे किंवा त्याजागी नवीन पॅच लावला पाहिजे, जर पॅच काढून २४ तासांपेक्षा जास्त काळ लोटला असेल तर तुम्हाला ह्या काळात संरक्षण मिळणार नाही आणि तुम्ही नवीन पॅच लावल्यानंतर पुढील ७ दिवसांसाठी पर्यायी गर्भनिरोधक साधन वापरले पाहिजे असे केल्याने गर्भधारणेचा धोका टळेल.

. पॅच नसतानाच्या काळात जर मला मासिक पाळी आली नाही तर काय?

साधारणपणे, पॅच काढल्यानंतर स्त्रीला २ ते ३ दिवसात मासिक पाळी येते. काहींना अगदी कमी रक्तस्त्राव होतो.

काही स्त्रियाना पाळी येत नाही. जर तुम्ही पॅच सोबत दिलेल्या सूचनांप्रमाणे त्याचा वापर करीत असाल आणि तुमची पाळी चुकली तर घाबरून जाण्याचे कारण नाही. तुम्ही वेळापत्रकाप्रमाणे नवीन पॅच लावू शकता.

परंतु, जर तुमची लागोपाठ दोन वेळा पाळी चुकली किंवा योग्य रित्या पॅच वापरला नाही आणि पाळी चुकली तर तुम्हाला गर्भधारणा झाली असण्याची शक्यता आहे. नवीन पॅच लावण्याआधी तुम्ही डॉक्टरांना फोन केला पाहिजे आणि मधल्या काळात पर्यायी गर्भनिरोधक वापरला पाहिजे.

. आधीच्याच जागी पुन्हा पॅच लावू शकता का?

प्रत्येक आठवड्याला तुम्ही पॅच लावण्याची जागा बदलू शकता. त्यामुळे पॅच वेगवेगळ्या जागी लावता येऊ शकतो.

. कधी कधी पॅच वापरणे थांबवणे सुरक्षित आहे का?

जोपर्यंत तुम्हाला पॅचमुळे कुठलीही समस्या येत नाही तर बाकी कुठलेही वैद्यकीय कारण नाही ज्यामुळे तुम्ही पॅच वापरणे बंद केले पाहिजे. जर तुम्ही दुसऱ्या विश्वसनीय गर्भनिरोधक पद्धतीची निवड केली तर तुम्ही पॅच वापरणे बंद करू शकता.

. काही औषधांमुळे पॅचची परिणामाकता कमी होते का?

हो, अशी काही औषधे आणि पूरक गोळ्या आहेत ज्यामुळे गर्भनिरोधक पॅचची परिणामकता कमी होते. त्यापैकी काही प्रतिजैविके म्हणजे रिफाम्पीन, रिफाम्पीसीन अँड रिफामेट आणि इतर काही फिट्स वरची औषधे. तसेच, संप्रेरके असलेल्या गर्भधारक साधनांमुळे इतर औषधांचे सामर्थ्य कमी होते. तुम्ही तुमच्या डॉक्टरांना पॅच विषयी माहिती दिली पाहिजे.

जे डॉक्टर तुम्हाला पॅच लावण्यास सांगतात त्यांना तुम्ही घेत असलेल्या औषधांविषयी आणि पूरक औषधांविषयी माहिती द्या. बऱ्याचदा, नेहमीच्या औषधांमुळे , प्रतिजैविकांसहित, पॅचवर परिणाम होत नाही. परंतु, जर गर्भनिरोधक पॅचच्या कार्यात अडथळा आणणारी औषधे तुम्हाला घ्यावी लागली तर तुम्ही गर्भनिरोधक पर्यायाचा विचार करू शकता.

. हा पॅच पाण्यात वापरू शकतो का?

हो तुम्ही वापरू शकता. हे पॅच साधारणपणे वॉटरप्रूफ असतात आणि त्यांची कार्यक्षमता पाण्यामुळे कमी होत नाही . पोहताना,अंघोळ करताना त्याची परिणामकता कमी होणार नाही.

निष्कर्ष:

योग्य प्रकारे वापरल्यास आणि योग्य काळजी आणि समर्पण असल्यास गर्भनिरोधक पॅच परिणामकारक असतात. संतती नियमनाचा पर्याय हा निवडताना तसेच चांगल्या परिणामांसाठी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधणे चांगले

आणखी वाचा: संतती नियमनासाठी शुक्रजंतूनाशक

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article