Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य मकरसंक्रांत २०२२: तुमचे कुटुंब आणि मित्रमैत्रिणींसाठी शुभेच्छासंदेश, मेसेजेस आणि कोट्स

मकरसंक्रांत २०२२: तुमचे कुटुंब आणि मित्रमैत्रिणींसाठी शुभेच्छासंदेश, मेसेजेस आणि कोट्स

मकरसंक्रांत २०२२: तुमचे कुटुंब आणि मित्रमैत्रिणींसाठी शुभेच्छासंदेश, मेसेजेस आणि कोट्स

तिळगुळ घ्या गोड बोलाअसे एकमेकांना म्हणत नात्यांची नव्याने सुरुवात ज्या सणाच्या निमित्ताने होते तो सण म्हणजे मकर संक्रांत! कापणीच्या हंगामाच्या सुरुवातीला मकर संक्रांत दरवर्षी १४ जानेवारीला उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते. हा सण शुभ मानला जातो. ह्या दिवशी चांगल्या गोष्टी बोलल्याने आणि चांगल्या कृती केल्याने फलदायी आणि आनंदी जीवन लाभते. भारत हा कृषीप्रधान देश आहे, म्हणून सर्व शेतकरी सूर्यदेवाकडे चांगल्या पिकासाठी आणि चांगले उत्पन्न मिळावे म्हणून प्रार्थना करतात. मकरसंक्रांती पासून थंडी कमी होते. दिवस मोठा होऊ लागतो, रात्र छोटी होत जाते. त्यामुळे एक नवीन सुरुवात आणि नवी आशा निर्माण होते. तुम्ही मकरसंक्रातीला रुचकर पदार्थ आणि तिळगुळ खाता, पतंग उडवता तसेच मित्र मैत्रिणींना व नातेवाईकांना भेटून संक्रांत साजरी करता. परंतु मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा समाजात पोहोचवणे देखील तितकेच महत्वाचे आहे. इथे मकर संक्रांतीच्या काही शुभेच्छा आणि कोट्स दिलेले आहेत ते तुम्ही तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवू शकता.

मकरसंक्रांतीसाठी शुभेच्छासंदेश आणि मेसेजेस

मकरसंक्रांतीसाठी शुभेच्छासंदेश आणि मेसेजेस

या शुभ दिवशी आपल्या मित्रांना आणि कुटूंबाला तुम्ही पाठवू शकाल अशा काही मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत आहेत!

. तुमच्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद असो, तुमच्या आयुष्यात आनंदाचा आणि प्रेमाचा वर्षाव होवो. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

. तिळगुळ घ्या, गोड बोला! तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

. आकाशात उडणाऱ्या रंगीबेरंगी पतंगांप्रमाणे तुमची प्रगती होवो! ही मकर संक्रांत तुमच्या घरी आनंद आणि आशेचे किरण घेऊन येवो. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

. सूर्याची दिशा बदलताना आणि नवीन सुरुवात होताना तुमच्या घरात आनंद आणि नव्या आशेचे किरण येवोत. तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

. तुम्हाला आणि तुमच्या परिवारास, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचे संपूर्ण आयुष्य आनंदमयी होवो!

. ह्या मकर संक्रांतीने तुमची नवीन वर्षाची सुरुवात आनंददायी आणि आशिर्वादानी भरलेली असणार आहे. आनंदमयी मकरसंक्रांतीच्या तुम्हाला शुभेच्छा!

. तिळगुळाचा गोडवा, उडणाऱ्या पतंगासारखे उत्तुंग यश आणि येणारा प्रत्येक दिवस सुख आणि शांती तुमच्यासाठी घेऊन येवो हीच सदिच्छा! मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

. सूर्याचा हा नवीन प्रवास तुमच्या यशाचा मार्ग उजळून टाको. तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना मकर संक्रांतच्या हार्दिक शुभेच्छा!

. ह्या मकरसंक्रातीला आम्ही आशा करतो की तुम्ही पेरणी केलेल्या सर्व पिकांची काढणी यशस्वीरीत्या होवो.

१०. उगवत्या सूर्यासह, आम्ही आशा करतो की आपल्या आयुष्यातील चांगले क्षण आणि यश उच्च पातळीवर जाईल. आपणास आनंददायक मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

११. ह्या मकर संक्रांतीला तुमचे सर्व दुःख आणि यातना नष्ट होवोत. मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

१२. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचा हा दिवस आनंदी आणि समाधानी जावो. सूर्याचा संपूर्ण प्रकाश आणि तेज तुमच्यापर्यंत पोहोचावा हीच सदिच्छा!

१३. खूप आनंदाने आणि प्रेमाने वर्षाच्या पहिल्या उत्सवाचा आनंद घेण्याची वेळ आली आहे. तुम्हाला समृद्ध, आनंददायक आणि शुभ मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

१४. मकर संक्रांती म्हणजे सुयोग्य नियोजन आणि शुभ सुरुवात दर्शवते! नवीन संकल्प यश आणि गोडवा यांच्यासह तुम्हाला आनंददायक मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

१५. संक्रांत, सूर्यदेवतेचा हा सण अगदी दाराशी येऊन ठेपला आहे! हा सण आपल्या साठी खूप ज्ञान घेऊन येवो आणि हे संपूर्ण नवीन वर्ष आपले आयुष्य उजळून टाको! संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

१६. तुम्ही जसे नेहमीच माझे आयुष्य उजळवून टाकता, त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या निमित्ताने तुमचे जीवनसुद्धा उत्साह आणि सकारात्मकतेने भरून जावे हीच सदिच्छा! मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

१७. मकर संक्रांत एक नवीन सुरुवात घेऊन येते असे म्हणतात म्हणूनच तुम्ही स्वतःला आणि आपल्या सभोवतालच्या लोकांना आणखी एक नवीन संधी देणे विसरू नका. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

१८. ह्या शुभेच्छा संदेशासह तुमच्यासोबत हा सण साजरा करताना आपले आयुष्य समृद्ध होवो हीच सदिच्छा! मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

१९. तुम्ही कदाचित दूर असाल परंतु आशीर्वाद तुमच्या जवळ असतील. तुम्ही जवळ असाल तर दुःख तुमच्यापासून खूप दूर असेल. ह्या मकर संक्रांतीने तुमची सुरुवात आनंदमयी आणि संस्मरणीय होवो ही शुभेच्छा!

२०. ह्या मकर संक्रांतीला पतंग उडवा, मिठाई खा आणि समृद्धी व प्रेमाने नवीन सुरुवात करा. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

२१. दुःख तिळाएवढे आणि आनंद आभाळाएवढा असावा. ही मकर संक्रात तुमच्या आयुष्यात खूप आनंद घेऊन येवो ही शुभेच्छा!

२२. हृदयात गोडवा निर्माण करणारा हा सण तुमच्या आयुष्यात खूप समाधान घेऊन येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

२३. चैतन्य, उत्साह घेऊन येणाऱ्या ह्या सणाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

२४. मनातील कटुता विसरून पुन्हा नात्यात नवा गोडवा निर्माण करूया. मकरसंक्रांतीच्या खूप शुभेच्छा!

२५. नवीन सुरुवात, नवी आशा विसरू आता सगळी दुःखे आणि निराशा मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा!

मकरसंक्रांतीसाठी शुभेच्छा कोट्स

मकरसंक्रांतीसाठी शुभेच्छा कोट्स

तुमचा आणि तुमच्या कुटुंबीयांचा मकरसंक्रांतीच्या सणाचा उत्साह वाढण्यासाठी इथे काही कोट्स दिलेले आहेत.

. तुमच्या प्रगतीचा पतंग
    आभाळात उंच उंच जावो
    यश आणि समृद्धीने
    आयुष्य तुमचे उजळून जावो !
    मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

. हे नवीन वर्ष तुमच्यासाठी
    असो तिळगुळासारखे गोड
    तुम्ही असावे आनंदी आणि अन
    उघडे असावे सदा यशाचे कवाड!
    मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

. मंदिरातील घंटानाद
    आरतीचं सजलेलं ताट
    आयुष्यात तुमच्या असो आनंद
    अन सोबत परमेश्वराचा आशीर्वाद!
    मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

. आमचे तीळ आणि तुमचा गूळ
    मिठाई आमची आणि गोडवा तुमचा
    वर्षाच्या ह्या पहिल्या सणाने
    चला करूया नवीन जीवनाची सुरुवात!
    मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

. आकाशात उडणाऱ्या पतंगाला
    दोरीचा आधार
    ह्या संक्रांतीला स्वीकार करावा
    आमच्या शुभेच्छांचा उपहार!
    मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

. आयुष्याच्या उडणाऱ्या पतंगाची दोरी
    परमेश्वराशी बांधली आहे
    तुमचा प्रत्येक दिवस सुखाचा अन
    प्रत्येक क्षण शांतीपूर्ण जावो!
    मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

. परमेश्वर करो प्रत्येकाला
    आयुष्यात सुख, शांती आणि आनंद मिळो
    आकाशातील सूर्याप्रमाणे आयुष्य
    तेजोमय होवो!
    मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

. तिळगुळातील गोडव्याप्रमाणे
    तुमच्या आयुष्यात सुद्धा आनंदरूपी गोडवा असावा
    मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

. नवे वर्ष
    नवी सुरुवात
    मकर संक्रांतीच्या दिवशी
    चला उजळवूया
    प्रेमाची फुलवात!
    मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

१०. तिळगुळासारखीच गोड असावी तुमची वाणी
      असावीत तुमच्या आयुष्यात आनंदगाणी
      दुःख सारी विरून जावीत
      मकर संक्रांतीच्या ह्या सणाने येताना
      तुमच्यासाठी खूप सुखे आणावीत!
      मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

११. बंध नात्यांचा
      घट्ट करूया
      तिळगुळासारखे
      आयुष्य गोड करूया
      मकरसंक्रांतीच्या तुम्हाला खूप शुभेच्छा!

१२. तुमच्या यशाचा पतंग
      उंच उंच उडावा
      तुमच्या आयुष्यात
      तिळगुळासारखा
      गोडवा यावा
      मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा!

हा मकरसंक्रांतीचा सण आपले कुटुंबीय आणि प्रियजनांसोबत आनंदाने साजरा करा. मकर संक्रांतीच्या तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा!

आणखी वाचा:

मुलांसाठी मकर संक्रांतीच्या सणाची माहिती
मकर संक्रांतीसाठी विशेष पदार्थ आणि रेसिपी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article