Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य बाळांना होणारा पोटशूळ (कोलिक) – कारणे, लक्षणे आणि उपचार

बाळांना होणारा पोटशूळ (कोलिक) – कारणे, लक्षणे आणि उपचार

बाळांना होणारा पोटशूळ (कोलिक) – कारणे, लक्षणे  आणि उपचार

नवीन पालकांसाठी सर्वात फसवी आणि काळजी वाटावी अशी गोष्ट म्हणजे त्यांच्या बाळाचे सतत रडत रहाणे ही होय. आपल्या बाळाला अशा स्थितीत पाहणे आणि त्यामागील नेमके कारण न समजणे पालकांसाठी खूपच त्रासदायक असू शकते. जर आपले बाळ विनाकारण सतत रडत असेल तर कदाचित त्याला पोटशूळ झालेला असू शकतो. बाळांमधील पोटशूळ हा बाळासाठी तसेच पालकांसाठीही एक अत्यंत अस्वस्थ करणारा अनुभव असू शकतो. जवळजवळ 30 टक्के नवजात बालकांना पोटशूळ होतो. बाळांमधील पोटशूळ आणि आपण त्यास प्रभावीपणे कसे सामोरे जावे याबद्दल आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.

बाळांमधील पोटशूळ म्हणजे काय?

मुलांमध्ये रडणे अगदी सामान्य आहे कारण मुले आपली अस्वस्थता रडून व्यक्त करतात आणि त्यांच्या गरजा भागवण्याकडे त्यांचे पालकांचे लक्ष वेधतात. परंतु जर आपल्या लक्षात आले की आपले बाळ , कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय सारखे रडत असेल तर आपण दुर्लक्ष करू नये कारण त्याला पोटशूळ झालेला असू शकतो.

पोटशूळ म्हणजे खूप काळजी केली पाहिजे असा काही गंभीर आजार नाही. परंतु जर आपल्या मुलाचे वय सहा महिन्यांपेक्षा कमी असेल आणि आठवड्यातून तीन किंवा त्यापेक्षा जास्त दिवस, दिवसातून तीन ते चार तास ते सतत रडत असेल आणि हे रुटीन सलग तीन ते चार आठवडे असेच राहिले असेल तर बाळाला पोटशूळाचा त्रास होत असण्याची शक्यता आहे. बाळाच्या जन्मानंतर दोन ते तीन आठवडयांनी पोटशुळाच्या त्रासास सुरुवात होते आणि बाळ तीन ते चार महिन्यांचे झाल्यावर हा त्रास होणे बंद होते.

बाळांमध्ये पोटशूळ होण्याची कारणे काय आहेत?

बाळांना पोटशूळाचा त्रास होण्याचे असे काही विशेष कारण नाही, तथापि काही घटकांमुळे त्रास सुरु होतो. बाळांमध्ये पोटशूळ होण्याची कारणे खालील प्रमाणे

. गॅस्ट्रोएन्टेस्टीनल रिफ्लक्स

ह्यामध्ये बाळांच्या पोटातील आम्ल वर सरकते आणि अन्ननलिकेपाशी येते. ह्यामुळे बाळाला तीव्र वेदना होतात.

. अपरिपक्व पचनसंस्था

नवजात बाळाची पचनसंस्था अजूनही विकसित होत असते आणि बाळाला काहीही भरवले तरीसुद्धा ते लगेच आतड्यांपर्यंत पोहोचते आणि त्याचे संपूर्णतः विघटन होत नाही. त्यामुळे वायूची निर्मिती होते आणि त्यामुळे बाळाला वेदना आणि पोटशूळ होतो.

.असहिष्णुता (इंटॉलरन्स) किंवा ऍलर्जी

काही बाळांना काही पदार्थांची ऍलर्जी असते. काहीवेळा बाळांना लॅकटोज इंटॉलरन्स असतो आणि त्यामुळे बाळाला स्तनपानाच्या दुधाची ऍलर्जी असू शकते. म्हणून बाळाला स्तनपान दिल्यावर पोटशूळ होऊ शकतो.

. संवेदनशील बाळे

जर बाळ संवेदनशील असेल तर शारीरिक ताण घालवण्यासाठी रडणे हा त्यांच्यासाठी उपाय असतो. म्हणून ज्या बाळांना वेगळ्या आवाजामुळे ताण येतो अशा बाळांमध्ये पोटशूळ जास्त प्रमाणात आढळतो.

. हवा आत घेणे

स्तनपानादरम्यान बाळे हवा आत घेतात. त्यामुळे बाळांना अस्वस्थ वाटते आणि त्याची परिणीती पोटशूळ होण्यात होते

६ आईचा आहार आणि जीवनशैली

काही तज्ञांच्या मते गरोदरपणात आईचा आहार आणि जीवनशैली ह्यामुळे बाळाला पोटशूळ होऊ शकतो. उदा: ज्या स्त्रिया गर्भारपणात किंवा बाळाला स्तनपान करताना धूम्रपान करतात अशा स्त्रियांच्या बाळांना पोटशूळ होण्याची शक्यता जास्त असते.

. निरोगी जिवाणूंचे असंतुलन

असेही निदर्शनास आले आहे की ज्या बाळांना पोटशूळ होतो त्यांच्या आतड्यातील जिवाणू हे पोटशूळ न होणाऱ्या बाळांच्या आतड्यातील जिवाणूंपेक्षा वेगळे असतात. म्हणून, ज्या बाळांना पोटशूळाचा त्रास होतो अशा बाळांमध्ये चांगल्या जिवाणूंचे असंतुलन आढळते.

जरी बाळाच्या रडण्याचा संबंध बाळाला पोटशूळ झाला असावा असा लावला जातो, तरीसुद्धा बऱ्याच वेळा त्याचा अर्थ बाळाला पोटशूळ झाला असेलच असे नाही. त्यास कारणीभूत इतरही घटक असू शकतात जसे की हर्निया, पोटामध्ये संसर्ग किंवा इतर काही आजार ज्यामुळे बाळ खूप रडू लागते. पालकांसाठी महत्वाचे म्हणजे पोटशूळाची चिन्हे आणि लक्षणे ओळखणे होय.

पोटशूळाची चिन्हे आणि लक्षणे

बाळाला पोटशूळ झाला आहे का हे जाणून घेण्यासाठी पोटशूळाची खालील चिन्हे आणि लक्षणे जाणून घ्या.

. बाळाचा रडण्याचा पॅटर्न थोडा वेगळा असतो

बाळाचे नेहेमीचे रडणे आणि पोटशूळ झाल्यावरचे रडणे ह्यामधील लक्षणीय फरक तुम्हाला जाणवेल. पोटशूळ झाल्यावर बाळ खूप जोरात रडते.

. एका विशिष्ट वेळेला बाळाची रडण्यास सुरुवात होते

तुमच्या लक्षात येईल कि जर बाळाला पोटशूळ झाला असेल तर बाळ दररोज एका विशिष्ट वेळेला रडू लागते. निरीक्षणाद्वारे असे लक्षात येते की बाळाला पोटशूळ साधारणपणे दुपारनंतर होतो आणि जसजशी संध्याकाळ होते तसे हा त्रास वाढू लागतो. तुम्ही बाळाला शांत करण्यासाठी बाळाला दूध पाजण्याचा प्रयत्न करता किंवा हातावर घेऊन झुलवता परंतु त्याचा काहीही उपयोग होत नाही, आणि तुमच्या लक्षात येते की बाळा पोटशूळाचा त्रास सुरु झालेला आहे.

. स्थिती बदला

बाळाला जर पोटशूळ झालेला असेल तर अशी बाळे पाठीची कमान करतात आणि मुठी घट्ट आवळतात तसेच रडताना पाय दुमडून घेतात. बाळाच्या शारीरिक हालचाली आणि स्थिती वरून बाळाला पोटशूळ झालेला आहे किंवा कसे हे लक्षात येईल.

. शारीरिक लक्षणे

बाळाचे पोट कडक होणे, सतत ढेकर येणे किंवा चेहरा पांढरा पडणे ह्या शारीरिक लक्षणांवर वर तुम्ही लक्ष ठेऊ शकता. ज्या बाळांना पोटशूळ झालेला असतो अशी बाळे खूप हवा आत घेतात आणि नेहमीपेक्षा जास्त ढेकर काढतात

वर दिलेली पोटशूळाची लक्षणे आणि चिन्हे तुमच्या बाळामध्ये आढळ्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा. पोटशूळ झाल्यास काही प्रकरणांमध्ये वैद्यकीय सल्ल्याची गरज भासते.

मोठ्या मुलांना पोटशूळ झाल्यास वैद्यकीय उपचार

सर्वसामान्यपणे पोटशूळ झाल्यास वैद्यकीय मदतीची गरज भासत नाही परंतु ज्या कारणामुळे पोटशूळ होतो ते कारण शोधून त्यावर योग्य ते उपाय केले पाहिजेत. तुमचे डॉक्टर तुम्हाला खालील उपाय करण्यास सांगू शकतात

. प्रोबियॉटिक्स

प्रोबायोटिक्स किंवा चांगले जिवाणू हे तुमच्या बाळाच्या आतड्यांसाठी चांगले असतात कारण त्यामुळे बाळाचे आतडे निरोगी राहते. तुमचे डॉक्टर प्रोबियॉटिक्सचा एखादा जादाचा डोस लिहून देऊ शकतील ज्यामुळे जर तुमच्या बाळाला पोटात अस्वस्थता जाणवत असेल तर ती कमी होईल. हा डोस तुम्ही फॉर्मुला दूध किंवा स्तनपानाच्या दुधातून देऊ शकता.

. पोटातील वायूसाठी औषधें किंवा ड्रॉप्स

पोटशूळ कमी होण्यासाठी तुमचे डॉक्टर त्यासाठी काही ड्रॉप्स किंवा औषधे लिहून देऊ शकतात त्यामुळे तुमच्या बाळाचा पोटशूळाचा कमी होण्यास मदत होईल.

. फॉर्मुला बदलण्यास सांगितले जाऊ शकते

लॅकटोज इंटॉलरन्स किंवा ऍलर्जी मुळे बाळाला पोटशूळ झालेला असेल तर डॉक्टर बाळासाठी वेगळी फॉर्मुला पावडर लिहून देऊ शकतात. हा फॉर्मुला पचनास सोपा असतो आणि तुमच्या बाळाच्या पोटासाठी सुद्धा हलका असतो.

औषधांच्या दुकानात पोटशूळासाठी उपलब्ध असणारी कुठलीही औषधे देणे टाळा

पोटशूळ झालेल्या बाळांसाठी घरगुती उपाय

बाळांमधील पोटशूळ कमी करण्यासाठी घरगुती किंवा नैसर्गिक उपायांचा फायदा होतो. पोटशूळ झालेल्या बाळांसाठी खाली काही नैसर्गिक उपचार दिले आहे ते तुमच्या बाळाला शांत करण्यासाठी तुम्ही करून बघू शकता.

. बडीशेप

१ कप गरम पाणयात बडीशेप घालून केलेला काढा बाळाला दिवसातून दोन किंवा तीन वेळा द्या. पोटातील वायू बाहेर सरकवण्यासाठी आणि पोटदुखी कमी करण्यासाठी बडीशेप खूप परिणामकारक आहे.

. तुळस

बाळाला पचनाच्या समस्यांपासून मुक्त करण्यासाठी तुळस फार उपयोगी ठरते. काही मिनिटांसाठी गरम पाण्यात तुळशीची काही पण बुडवून ठेवा. ह्या काढ्याचे एक किंवा दोन चमचे बाळाला द्या. त्यामुळे बाळास पोटशुळापासून आराम मिळेल

. हिंग

बाळाचा पोटशूळाचा त्रास कमी करण्यासाठी हिंग जादूईरित्या काम करते. तुम्ही थोडे हिंग घेऊन त्यात थोडे पाणी घालून त्याची पेस्ट तयार करू शकता. तुम्ही हे पेस्ट दिवसातून दोन ते तीन वेळा बाळाच्या पोटावर लावू शकता

. प्रत्येकवेळेला बाळाला पाजल्यावर ढेकर काढा

बाळाला पाजल्यावर प्रत्येक वेळेला ढेकर काढणे जरुरी आहे. बाळे दूध पित असताना बरीचशी हवा आत घेतात. ही हवा पोटात अडकते आणि त्यामुळे पोटात तीव्र वेदना होतात. हे टाळण्यासाठी, बाळाला पाजल्यानंतर प्रत्येक वेळी बाळाला उभे धारा आणि पाठीवर व पोटावर हळूच थोपटा.

. गुडघे वाकवण्याचा हलका व्यायाम

गुडघे वाकवणे किंवा पुढे दाबणे हा पोटशूळ झालेल्या बाळांसाठी सोपा व्यायामप्रकार आहे. ह्यामुळे वायूची समस्या आणि पोटशूळाचा त्रास कमी होतो. ह्यासाठी बाळाला पाठीवर झोपावं आणि तुम्ही बाळाचे पाय हातात घेऊन गुडघ्यात पुढे पोटाकडे वाकवू शकता. हा व्यायाम तुम्ही दिवसातून चार ते पाच वेळा करू शकता

. बॉडी मसाज

पोटशुळामुळे होण्याऱ्या वेदनेचा सामना करण्यासाठी बाळांना मसाज करणे खूप परिणामकारक ठरू शकते. मसाजमुळे पचनास मदत होते आणि वायू तयार होत नाही. ऑलिव्ह, बदाम किंवा बाळासाठीचे कुठलेही मसाज ऑइल तुम्ही थोडे कोमट करून घेऊ शकता आणि त्याने बाळाला वर्तुळाकार स्ट्रोक्स देऊन मसाज करू शकता.

.गरम पाण्याच्या पट्ट्या

पोटशुळापासून आराम मिळण्यासाठी गरम पाण्याच्या पट्ट्या ठेवणे खूप फायदेशीर आहे. तुम्ही मऊ कापड घेऊन ते गरम पाण्यात बुडवू शकता. जास्तीचे पाणी पिळून काढून त्या कापडाने बाळाच्या पोटावर गोलाकार फिरवा. ही प्रक्रिया दिवसातून दोन वेळा करा

. कोमट पाण्याने अंघोळ

बाळाला कोमट पाण्याने अंघोळ घातल्यास बाळास पोटशुळापासून आराम मिळतो. कोमट पाण्याने अंघोळ घातल्यास बाळाचे शरीर रिलॅक्स होते आणि बाळाला चांगली झोप लागते. बाळाचा बाथटब कोमट पाण्याने भरून घ्या आणि बाळाला त्यात बसावा. बाळाच्या पोटावर आता हळूहळू मसाज करा. पोटात अडकलेला वायू बाहेर पडण्यास ह्यामुळे मदत होईल.

. पुदिना तेल

पुदिना तेलामध्ये शांत करण्याचे गुणधर्म आहेत. पुदीना तेलाचे काही थेंब मसाज ऑइल मध्ये टाका आणि तुमच्या बाळाच्या पोटावर गोलाकार मसाज द्या. तुम्ही हे दिवसातून दोन वेळा करू शकता त्यामुळे बाळाचा त्रास कमी होण्यास मदत होईल.

१०. जिरे

पोटशूळाचा त्रास कमी होण्यासाठी जिरे सर्वात चांगला नैसर्गिक उपाय आहे. तुम्ही गरम पाण्यात एक टेबलस्पून जिरे भिजत घालू शकता. आणि हे पाणी दिवसातून तीन ते चार वेळा बाळाला देऊ शकता.

जरी वर सांगितलेले घरगुती उपाय परिणामकारक असले तरी ते तुमच्या बाळासाठी करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे महत्वाचे आहे.

पोटशूळ झालेल्या बाळास शांत कसे कराल?

पोटशूळ ही बाळासाठी अत्यंत वेदनादायी स्थिती असते आणि पालकांसाठी सुद्धा ती परिस्थिती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या थकवणारी असते. तुमच्या बाळाला शांत करण्यासाठी खाली काही उपाय दिले आहेत.

. तुमच्या बाळासाठी गाणे म्हणा

बाळासाठी गाणे म्हटल्याने बाळाला शांत करण्यास मदत होते. बाळाला त्याच्या आईबाबांचा आवाज खूप सुखदायक वाटतो आणि त्यामुळे बाळाच्या वेदना हलक्या होण्यास मदत होते.

. वेगवेगळ्या प्रकारे बाळाला झुलवत रहा

तुमच्या बाळाचे पोट तुमच्या पायावर ठेवून हळूहळू बाळाला झुलवत रहा. ह्या हालचाली बाळासाठी खूप सुखकर असतात. परंतु प्रत्येक बाळ हे वेगळे असते, म्हणून तुमच्या बाळासाठी झोका देण्याची कुठली स्थिती सर्वात आरामदायक आहे ते तपासून पहा.

. तुमच्या बाळाचे लक्ष दुसरीकडे वेधून घ्या.

वेदना विसरण्यासाठी लक्ष दुसरीकडे वेधून घेणे हा सर्वात चांगला उपाय आहे. बाळाला कार मध्ये किंवा बाबागाडीत बाहेर फिरवून आणणे एक चांगली कल्पना आहे.

. संगीत लावा

शांत संगीत लावल्यास त्याने बाळाला बरे वाटते. बाळाला मधुर संगीत आवडते आणि त्यामुळे बाळाचे लक्ष दुसरीकडे वेधले जाते.

. बाळाला उभे धरा

बाळाला उभे धरल्यास पचनप्रक्रिया सुलभ होण्यास मदत होते आणि अन्न वर येण्यास प्रतिबंध होतो.

. तुमचा आहार आणि जीवनशैली मध्ये बदल करा

तुमच्या आहारात आणि जीवनशैलीत बदल केल्यास बाळाची पोटशुळापासून सुटका होण्यास मदत होते. ज्या स्तनपान करणाऱ्या स्त्रिया धूम्रपान करतात किंवा बाळाला अस्वस्थता येईल असा आहार घेतात त्यांच्यासाठी हा उपाय खूप परिणामकारक आहे.

. अंघोळ

गरम पाण्याने अंघोळ केल्यास पोटशुळापासून आराम मिळतो

. चोखणी देणे

बाळाला चोखणी देणे हा एक चांगला उपाय आहे त्यामुळे बाळ शांत होते. काहीवेळा स्तनपान किंवा फॉर्मुला दुधाने बाळाची चोखण्याची इच्छा भागात नाही आणि त्यामुळे बाळ चिडचिड करते. आणि जर पोटशूळ झाला असेल तर ही चिडचिड आणखी वाढते. म्हणून बाळाला शांत करण्यासाठी तुम्ही पॅसिफायर म्हणजेच चोखणी देऊ शकता. पोटशूळ झाल्यामुळे बाळाची वाढ आणि विकासाच्या दृष्टीने कुठलीही भीती नसते परंतु ता टप्पा खूप अवघड असतो. तुम्ही बाळाला शांत करण्यासाठी वर सांगितलेले उपाय करून बघू शकता कारण त्यामुळे त्यांना अवघड परिस्थितीतून पार पडणे सोपे जाईल.

तुमच्या डॉक्टरांचा सल्ला केव्हा घ्याल?

पोटशूळ होणे हे काही खूप काळजी करण्यासारखे नाही, परंतु खालील लक्षणे दिसल्यास तुम्ही तात्काळ वैद्यकीय मदत घेतली पाहिजे

  • जर तुमच्या बाळाला जुलाब होत असतील आणि त्यामध्ये रक्ताचे अंश असतील तर
  • जर तुमच्या बाळाला १०० डिग्री फॅरेनहाईट किंवा त्यापेक्षा जास्त ताप असेल तर
  • जर तुमचे बाळ नीट दूध घेत नसेल किंवा बाळाचे वजन वाढत नसेल तर
  • जर तुमच्या बाळाला वारंवार उलट्या होत असतील तर
  • जर तुमचे बाळ सतत झोपत असेल किंवा चिडचिड करत असेल तर
  • जर तुम्हाला तुमचे बाळ सतत आजारी पडत आहे असे वाटत असेल किंवा बाळाला कुठलीही इजा झाली असेल तर

वरील पैकी कुठल्याही परिस्थितीत, तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी लवकरात लवकर संपर्क साधला पाहिजे ज्यामुळे पुढील गुंतागुंत टाळण्यास मदत होईल.

पोटशूळ झालेली बाळे हाताळणे हे खूप अवघड असते. पालक म्हणून तुम्ही शांत राहणे जरुरी आहे. जर तुम्हाला बाळाला सांभाळून खूप थकल्यासारखे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून किंवा मित्रमैत्रिणींकडून मदत घ्या. निराश होऊन बाळाला खूप जोरात हलवू नका किंवा मारू नका. अशा कृतींमुळे बाळाला इजा होऊ शकते किंवा त्या प्राणघातक ठरू शकतात. आपल्याला ही परिस्थिती हाताळताना अडचण येत असल्यास, त्याबद्दल आपल्या डॉक्टरांशी चर्चा करा.

आणखी वाचा:

बाळांना उष्णतेमुळे उठणारे पुरळ – कारणे, उपचार आणि घरगुती उपाय
डायपर रॅश – ओळख, कारणे आणि उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article