Firstcry Parenting
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे मुलींसाठी हिंदू देवता दुर्गेची (पार्वती) सर्वोत्तम ६५ नावे

मुलींसाठी हिंदू देवता दुर्गेची (पार्वती) सर्वोत्तम ६५ नावे

मुलींसाठी हिंदू देवता दुर्गेची (पार्वती) सर्वोत्तम ६५ नावे

देवी दुर्गा हे सकारात्मक उर्जेचे शुद्ध रूप म्हणून ओळखले जाते. संस्कृतमध्ये दुर्गेचा अर्थ अजेयअसा आहे. एकीकडे ती उर्जास्थान आहे तर दुसरीकडे ती सर्व गोष्टींचा नाश करणारी आहे. दुर्गा ही देवता भगवान शिवाची पत्नी पार्वती देवीचा अवतार आहे. हिंदू घरात पार्वती देवीची पूजा केली जाते. देवी दुर्गेची नावे मुलींसाठी ठेवणे शुभ मानले जाते.

देवी दुर्गेची प्रेरणा घेऊन तयार केलेली देवीची नावे

देशभरातील पालक आपल्याकडे असलेल्या सुंदर गुणांसाठी आपल्या मुलींचे नाव देवी दुर्गा ठेवतात. जर तुम्ही दुर्गा देवीचे भक्त असाल तर तुम्ही आपल्या लहान मुलीचे नाव देवी दुर्गेचे ठेवणे स्वाभाविक आहे. हिंदू पुराणकथांमध्ये दुर्गा देवीची १००८ नावे आहेत. आम्ही या लेखात आपल्याला देवी दुर्गेच्या नावांचा एक संग्रह देत आहोत. मुलींसाठीची देवी दुर्गेची काही नावे पाहू या.

नावनावाचा अर्थ
आद्याप्रथम, पृथ्वी
आर्यादेवी पार्वतीचे परोपकारी स्वरूप
ऐशानीशक्तीचे प्रतीक, दुर्गा देवीचे एक नाव
अनिकादेवीचे दुसरे नाव तिची कृपा, तेज आणि सुंदर चेहरा प्रकट करते
बरुनीदेवी दुर्गाचे स्त्रीचित्रण आहे
भार्गवीहे देवी दुर्गेचे अत्यंत सुंदर आणि मोहक प्रतीक आहे
भवानीदेवी पार्वती, श्री शिवाची पत्नी
भव्याजो देवी पार्वतीप्रमाणेच सुंदर आणि पुण्यवान आहे
चंद्रिकाचंद्र
चिटीदेवाची भेट, प्रेम, फुलपाखरू, लहान
चित्तरुपदेवी पार्वतीसारख्या विचारस्थितीत असणारी
दक्षियानीदेवी दुर्गा पराक्रमी राजा दक्षची कन्या होती म्हणून तिला दक्षियानी देखील म्हणतात.
देविशींदेव प्रमुख, देवी
ईशापार्वती देवी स्वरूप
गौरीदेवी दुर्गेप्रमाणे गोरी
गायत्रीदेवी पार्वतीचे दुसरे नाव आहे आणि हे भारतभर लोकप्रिय आहे
हिमानीहिमालयातील हिमनदी. पार्वती देवीचे देखील हे नाव आहे
ईशाप्रत्येकाचे रक्षण करणारी
इशीइशी म्हणजे देवी दुर्गा
जयादेवी दुर्गेचे दुसरे नाव म्हणजे विजय
जयललिताविजयी होण्यासाठी जन्मलेली, देवी दुर्गेचे दुसरे नाव
कामकायशुभेच्छा देणारी, इच्छा पुरवणारी
कैशोरीदेवी पार्वती
कालकादेवी दुर्गेचे समानार्थी नाव आहे
कलावतीदेवी पार्वतीप्रमाणेच कलात्मक
कन्यकासर्वात लहान आणि अविवाहित
करणिकाफाडणारी
कात्यायनीलाल रंगाचे कपडे घातलेली
कौशिकीदेवी दुर्गेचे समानार्थी नाव, रेशमी वस्त्र नेसलेली असाही अर्थ होतो
किरातीभगवान शिव यांचे दुसरे नाव किरतेश्वर आहे देवी दुर्गेला बहुतेकदा किरतेश्वरची पत्नी किराती असे संबोधले जाते
क्रियाकामगिरी, धार्मिक किंवा शुद्ध क्रिया
कुजापृथ्वीची कन्या
महागौरीदेवी दुर्गेच्या सर्वोच्च गुणाचा संदर्भ देते.
महामायाहिंदू संस्कृतीत धार्मिक शब्दावलीनुसार आपले अस्तित्व एक भ्रम मानले जाते. हे नाव भ्रम संदर्भित करते आणि देवी दुर्गेचे वर्णन करण्यासाठी वापरले जाते
महाश्वेताहे दुर्गा देवीची शक्ती दर्शवते
निरंजनाहे नाव देवी दुर्गेचे प्रतीक आहे. ह्याचा अर्थ नदी आणि पौर्णिमेची रात्र देखील आहे
नित्याअनंत आणि स्थिर आहे
प्रगल्भाएक अद्वितीय नाव ज्याचा अर्थ संस्कृतमध्ये शक्ती आणि सामर्थ्याची देवी आहे दुर्गा
पुरलाहे नाव देवी दुर्गेचे आहे आणि तिच्या शौर्य व निष्ठेचे प्रतिबिंब आहे. ह्याचा अर्थ सर्व किल्ल्यांचा संरक्षक देखील आहे
रत्नाप्रियादागदागिने आवडणारी
रीमाही देवी दुर्गेचे तिच्या शक्ती अवतारात प्रतिनिधित्व करते. ह्याचा अर्थ पांढरा मृग आहे.
साध्वीसद्गुण, नम्र, सोपी, निष्ठावंत
संस्कारीचांगली नीतिशास्त्र आणि नैतिक मूल्ये
संतातीशुभेच्छा देणारी
सरबानीनाव बंगाली घरांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि देवी दुर्गा यांचे दुसरे नाव आहे.
सरितादेवी दुर्गेचा आणखी एक प्रतिशब्द आहे आणि ते देखील नदीचे प्रतीक आहे
सर्वानीदेवी दुर्गा ही स्त्रीत्वची प्रतीक आहे आणि तिची उपस्थिती कृपा व शांती आणते. हे देवी दुर्गेचे आणखी एक नाव आहे आणि याचा अर्थ सार्वत्रिक आहे.
सात्विकीदेवी दुर्गा म्हणजे शुद्धता आणि प्रामाणिकपणा. सात्विकी शुद्धतेचे प्रतीक आहे.
सत्यसत्य, वास्तविक, संस्कृत
शाम्भवीहे देखील देवी पार्वतीच्या रूपात शंभूच्या पत्नीचे नाव आहे
शरिकापार्टनर, सहभागी
शिवानीपार्वती देवी
शिलापर्वतावर राहणारी
स्तुतीदेवी दुर्गाची स्तुती
सुंदरीसुंदर
तन्वीदेवी दुर्गेचे दुसरे नाव, ह्याचा अर्थ सुंदर आहे
तारिणीती मुक्त करणारी , तारणारी
तोशानीहे नाव देवी दुर्गेचे गौरव रूपात आहे.
त्रितीसंस्कृतमध्ये ह्या नावाचा अर्थ देवी दुर्गेप्रमाणे कुशल, वेगवान आणि चपळ आहे
त्रिनेत्रहिंदू पौराणिक कथांनुसार, देवी दुर्गा तीन डोळ्यांचा किंवा त्रिनेत्र आहे.
त्वरिताहे देवी दुर्गेचे एक अद्वितीय नाव आहे आणि तिच्या सामर्थ्याने उभे आहे.
उमादेवी दुर्गेचे आणखी एक अद्वितीय नाव
वरुणिकापावसाची देवता
यतीहे आणखी एक अद्वितीय नाव आहे जे देवी दुर्गेचे समानार्थी आहे

देवी दुर्गा म्हणजे स्त्री शक्ती. ह्या लेखात आम्ही देवी दुर्गेची वेगवेगळी नावे दिलेली आहेत. त्यापैकी काही कदाचित पारंपारिक असतील तर काही अगदी वेगळी आणि एकमेकाद्वितीय असतील. आम्हाला आशा आहे की आपणास या लेखामधून आपल्या प्रिय मुलींसाठी आवडते नाव सापडले असेल.

आणखी वाचा:


तुमच्या बाळासाठी श्री गणेशाची ७५ नावे
एकमेवाद्वितीय अशी भारतीय मुलींची अर्थासहित १५० नावे

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article