Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी सी-सेक्शन प्रसूतीनंतरची मालिश: तुम्हाला माहिती असले पाहिजे असे सर्व काही

सी-सेक्शन प्रसूतीनंतरची मालिश: तुम्हाला माहिती असले पाहिजे असे सर्व काही

सी-सेक्शन प्रसूतीनंतरची मालिश: तुम्हाला माहिती असले पाहिजे असे सर्व काही

तुम्ही नुकतेच तुमच्या बाळाचे ह्या जगात स्वागत केलेले आहे. आई होणे खूप आव्हानात्मक आहे हे सुद्धा तुम्हाला समजले असेल. तुमचा सगळा वेळ तुम्हाला तुमच्या लहान बाळाला द्यावा लागतो तसेच बाळाकडे सतत लक्ष ठेवावे लागते. त्यामुळे तुमच्याकडे स्वतःची काळजी घेण्यासाठी फारसा वेळ नसतो – आम्ही तुम्हाला हा वेळ स्वतःसाठी कसा काढायचा हे सांगू शकतो, अगदी खरंच! जर तुम्ही आत्ता तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला भविष्यात पश्चाताप होऊ शकतो.

प्रसूतीनंतर, तुम्हाला वेदना जाणवणे साहजिक आहे. विशेषत: जर तुमची सी-सेक्शन प्रसूती झाली असेल तर तुम्हाला वेदना जास्त होऊ शकतात. परंतु ह्या वेदनांपासून आराम मिळण्यासाठी आणि पूर्णपणे बरे होण्यासाठी, तुम्ही प्रसूतीपश्चात मालिश करून घेऊ शकता. प्रसवोत्तर मसाज तुमच्या तणावग्रस्त स्नायूंना आराम मिळण्यासाठी तसेच वेदना कमी करण्यासाठी आणि तुम्हाला भावनिक व शारीरिकरित्या बरे करण्यासाठी मदत करू शकतात. परंतु सी-सेक्शन प्रसूतीनंतर स्त्रीला मसाज करावा का? चला तर मग जाणून घेऊयात!

प्रसवोत्तर मालिश म्हणजे काय?

प्रसूतीनंतरची मालिश म्हणजे बाळाच्या आईला बाळाच्या जन्मानंतर संपूर्ण शरीराला मसाज केला दिला जातो. प्रसूतीनंतरची मालिश व्यावसायिक मालिश करणार्‍या व्यक्तीद्वारे केली जाते. ही व्यक्ती ह्या क्षेत्रातील तज्ञ असतो. तुम्ही तुमच्या घरी मालिश करणाऱ्या व्यक्तीला बोलावू शकता आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मालिश करून घेऊ शकता. प्रसूतीनंतरची मालिश विशेषतः सी-सेक्शन प्रसूती झालेल्या नवीन आईसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. सी-सेक्शनच्या प्रसूतीच्या जखमा बऱ्या होण्यास बराच वेळ लागतो.  जर तुमची सी-सेक्शन प्रसूती झाली असेल, तर जखमेच्या आसपास तुम्हाला वेदना जाणवू शकतात. तुम्ही पूर्णपणे बरे होण्यासाठी मालिश करून घेण्याचा पर्याय निवडू शकता, परंतु मालिश करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सी-सेक्शन प्रसूती झाल्यास स्त्रियांनी पोटाची मालिश करण्यापूर्वी सुमारे सहा आठवडे प्रतीक्षा करावी.

प्रसवोत्तर मालिशचे फायदे

प्रसवोत्तर मालिश केल्यास स्त्रीच्या शरीरास आराम मिळतो. सी-सेक्शन प्रसूतीनंतर, डाग बरे होण्यास थोडा वेळ लागेल. प्रसूतीनंतर काही आठवड्यांनंतर स्त्री प्रसूतीनंतरच्या मालिशचा पर्याय निवडू शकते. प्रसूतीनंतर मालिश केल्याने  वेदना कमी होण्यास मदत होईल आणि त्या भागात रक्ताभिसरण सुधारेल. मालिश केल्याने स्त्रीला दीर्घकालीन समस्यांचा सामना करावा लागणार नाही. प्रसवोत्तर मालिश करण्याचे खालील फायदे आहेत:

  1. प्रसवोत्तर मालिश, स्नायूंना रक्त प्रवाह आणि ऑक्सिजन वाढविण्यास मदत करते, त्यांना शांत करते आणि त्वरीत बरे होण्यास मदत करते.
  2. मालिश केल्याने शरीरातील अतिरिक्त द्रव आणि कचरा काढून टाकला जातो आणि सूज कमी होते.
  3. नव्यानेच आई झालेल्या स्त्रीला मालिश केल्याने आराम मिळतो. मालिश केल्याने मेंदूद्वारे एंडॉर्फिन, हे फील-गुड हार्मोन सोडण्यास मदत होते, त्यामुळे एखाद्या व्यक्तीला बरे वाटण्यास मदत होते. ह्या संप्रेरकांमुळे तुम्हाला चांगली झोप लागण्यास सुद्धा मदत होऊ शकते.
  4. मालिशमुळे नवीन आईची मनःस्थिती सुधारण्यास आणि तणावाची पातळी कमी होण्यास मदत होते, त्यामुळे तिला नैराश्य येत नाही.
  5. प्रसूतीनंतर मालिश केल्याने जलद पुनर्प्राप्ती होऊ शकते.परंतु, जर एखाद्या स्त्रीची सी-सेक्शन प्रसूती झाली असेल, तर तिने तिच्या सी-सेक्शनच्या जखमा बरे होईपर्यंत मालिश करण्यासाठी वाट बघावी.

सिझेरियन प्रसूतीनंतर मालिश करण्याआधी तुम्ही किती वेळ थांबावे?

आधी सांगितल्याप्रमाणे, डॉक्टर सी-सेक्शन नंतर पूर्ण शरीराची मालिश करण्यापूर्वी किमान दोन आठवडे प्रतीक्षा करण्याची शिफारस करतात. प्रसूतीनंतर तुम्ही खूप असुरक्षित आणि अशक्त असता त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर तुम्हाला संसर्ग होऊ नये म्हणून ही काळजी घेणे आवश्यक असते. तुम्ही तुमच्या बाळाला स्तनपान सुद्धा करत असल्याने आणि तुमच्या बाळाची प्रतिकारशक्ती कमी असते, त्यामुळे तुम्ही दोन आठवडे किंवा त्याहून अधिक काळ थांबा आणि पूर्ण शरीर मालिश करण्यापूर्वी पूर्णपणे बरे व्हा. सी-सेक्शन नंतर तुम्ही डोके, पाय, पाय आणि पाठीचा मसाज घेऊ शकता परंतु किमान ६-७ आठवडे पोटाची मालिश टाळा.

सी-सेक्शन नंतर प्रसवोत्तर मालिशसाठी तुम्ही कोणते तेल वापरू शकता?

तुम्ही हर्बल तेल वापरणे टाळले पाहिजे आणि नवीन आईसाठी सुरक्षित असलेल्या तेलांबाबत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. साधारणपणे, मोहरीचे तेल, तिळाचे तेल आणि नारळाचे तेल सुरक्षित मानले जाते, परंतु डॉक्टरांकडून ह्याची माहिती घेणे सर्वोत्तम आहे. तुमची मालिश करणारी स्त्री तिच्यासोबत एक खास मिश्रण आणू शकते. गर्भवती महिलांसाठी, विशेषत: सी-सेक्शन नंतर पोटाच्या मालिशसाठी हे मिश्रण आदर्श आहे. तेलाच्या वासावर तुमचे बाळ कसे प्रतिक्रिया देते याची नोंद घ्या. जर बाळाला हे तेल आवडत नसेल किंवा त्याच्यावर एलर्जीची प्रतिक्रिया निर्माण झाली असेल, तर विशेषत: रोजच्या मसाजसाठीचे तेल बदला कारण बाळाला स्तनपान करताना बाळाशी त्याचा संपर्क येतो.

सी-सेक्शन नंतर प्रसवोत्तर मालिशसाठी तुम्ही कोणते तेल वापरू शकता?

शरीरावरील सी-सेक्शनच्या डागांना मालिश करणे का आवश्यक आहे?

जेव्हा तुमचा सी-सेक्शनचा डाग बरा होईल, तेव्हा जखमेच्या जागेवरील उती वाटेल तश्या वाढू शकतात. कारण बाळाचा जन्म नैसर्गिक प्रसूतीने झालेला नसतो. आणि त्यामुळे तुमच्या शरीराच्या अंतर्गत कामात व्यत्यय येऊ शकतो आणि मूत्राशय सारख्या इतर अवयवांच्या संपर्कात येऊन त्याच्या सामान्य कार्यावर परिणाम होऊ शकतो. सी सेक्शन नंतर शरीराची बरे होण्याची प्रक्रिया हळू आणि वेदनादायक असू शकते, त्यामुळे तुमचा पुनर्प्राप्ती कालावधी वाढेल आणि बसणे देखील वेदनादायक होईल. सी-सेक्शन नंतर बॉडी मसाज केल्याने उतींची ही वाढ अधिक एकसमान होईल आणि त्या भागामध्ये रक्त प्रवाह सुधारेल, जखम लवकर बरी होण्यास मदत होईल. हा मसाज करण्यासाठी अनुभवी लोकांनाच परवानगी दिली जाते. कारण शरीराच्या अश्या नाजूक भागांना कसे हाताळायचे हे त्यांना जास्त ठाऊक असू शकते.

सी-सेक्शन नंतर तुम्ही मालिश न केल्यास काय होईल?

सी-सेक्शन प्रसूतीनंतर पोटाला मसाज न केल्याने दीर्घकालीन समस्या उद्भवू शकतात. तुमचा डाग कालांतराने बरा होऊ शकतो आणि ठीक दिसू शकतो, परंतु तुमच्या शरीराला शस्त्रक्रिया झालेला भाग बरा करण्यासाठी मदतीची आवश्यकता असते. मूत्राशय किंवा अगदी गर्भाशयासारख्या इतर अवयवांवर ऊती जमा होऊ शकतात आणि परिणामी काही वेळा वंध्यत्वा सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. ह्याचा  परिणाम म्हणून तुम्हाला ओटीपोटाचा आणि पाठदुखीचाही त्रास होऊ शकतो. तथापि, प्रसूतीनंतर मसाज केल्याने तुमचे शरीर शांत होऊ शकते आणि बरे होण्यास मदत होते.

तुमच्या जखमा बऱ्या झाल्यानंतर तुम्ही किती वेळा प्रसवोत्तर मालिश करावी?

बरे होण्याच्या प्रक्रियेस गती देण्यासाठी आणि प्रभावित भागात त्वचेच्या वाढीस उत्तेजन देण्यासाठी दिवसातून एकदा मालिश करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, मालिश करणारी व्यक्ती त्या क्षेत्रात तज्ञ असली पाहिजे. विशेषतः पोटाकडील भागाकडे (खूप कमी दाब देऊन) हलक्या हाताने मसाज करणे आवश्यक आहे.

सिझेरियन प्रसूतीनंतर प्रसवोत्तर मालिश घेताना तुम्ही घ्यावयाची खबरदारी

सी-सेक्शन नंतर तुम्ही तुमच्या शरीरावर जे काही करता ते काळजीपूर्वक केले पाहिजे. सी-सेक्शन प्रसूतीनंतर  मसाज करून घेताना तुम्हाला काही खबरदारी घेणे आवश्यक आहे

  1. प्रसूतीनंतर लगेच मालिश करू नका. दोन आठवडे किंवा त्याहून अधिक काळ प्रतीक्षा करा, तरीही तुम्ही पोटाचा मालिश करण्यापूर्वी किती वेळ प्रतीक्षा करावी हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  2. तुमची मालिश करणार्‍याला प्रसूतीनंतरचा मसाज करण्याचे, विशेषत: सी-सेक्शन नंतर पोटाची मालिश करण्याचे विशेष प्रशिक्षण दिले आहे ह्याची खात्री करा.
  3. तुमची मालिश करणाऱ्या व्यक्तीला डाग आणि आजूबाजूच्या भागाजवळ सौम्यपणे मसाज करण्यास सांगा आणि मालिश करताना जास्त दाब न देण्याचीही सूचना करा
  4. मालिशसाठी वापरल्या जाणार्‍या तेलावर तुमच्या शरीराची प्रतिक्रिया लक्षात घ्या आणि काही चूक लक्षात येताच ते तेल बदला

सिझेरियन प्रसूतीनंतर प्रसवोत्तर मालिश घेताना तुम्ही घ्यावयाची खबरदारी

प्रसवोत्तर मालिश करणे कधी टाळावे?

तुम्हाला काही वैद्यकीय समस्या असतील किंवा तुमच्या डॉक्टरांनी सी सेक्शन न करण्याचा सल्ला दिला असेल तर सी सेक्शन नंतर पोटाला मसाज करणे टाळा. तुम्हाला त्वचेचा संसर्ग, एक्झामा किंवा कोणतेही पुरळ किंवा ऍलर्जी असेल तेव्हा तुम्ही मसाज न करण्याची काळजी घेतली पाहिजे कारण त्यामुळे ही समस्या आणखी वाढू शकते. जर तुमचे शरीर नाजूक झालेले असेल आणि तुम्हाला खूप वेदना होत असतील, तर तुम्ही मालिश करण्यापूर्वी थोडा वेळ जाऊ द्या. ज्या व्यक्तीला मालिश कसे करावे ह्याची माहिती असेल अशी व्यक्ती शोधा.

तुमच्या शरीराचे ऐका म्हणजे तुम्ही लवकर बऱ्या व्हाल. तुम्हाला शारीरिक ताण आलेला असेल तर तुम्ही मालिश करण्याचा उपाय करू शकता. एक लक्षात घ्या की तुम्ही नुकत्याच आई झालेल्या आहात म्हणून तुम्हाला तुमच्या शरीराला सावरण्यासाठी आणि तुमच्या लहान मुलाची चांगली काळजी घेण्यासाठी काही गोष्टींची गरज असते आणि मालिश करून घेणे हा त्यापैकीच एक उपाय आहे.

आणखी वाचा:
RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article