In this Article
तुमच्या बाळाचे नाव ठेवणे हा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा प्रसंग आहे आणि नामकरण समारंभाचा हाच हेतू आहे. बाळाच्या बारश्याचे आयोजन करणे कठीण वाटू शकते. परंतु बाळाचे बारसे करण्यासाठी मोठा समारंभच केला पाहिजे असे नाही. हिंदू धर्मात, नामकरण समारंभाचा दिवस हा आपल्या बाळाचे नाव ठेवण्यासाठी एक शुभ दिवस आहे. पारंपारिकपणे, बाळाचे बारसे बाळाच्या जन्मानंतर लगेच केले जाते परंतु नेहेमीच असे होते असे नाही. काही पालक त्यांच्या बाळाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वी नामकरण समारंभ करण्याचे ठरवतात. तर काही जण नामकरण सोहळ्यासाठी विशिष्ट महिने निवडतात. कोणत्याही प्रकारे, जर तुम्ही या खास दिवसाला आणखी मोठा कसा बनवायचा याबद्दल कल्पना शोधत असाल, तर आम्ही ह्या लेखामध्ये तुमच्यासाठी सर्व माहिती दिलेली आहे.
एका परिपूर्ण नामकरण (बारसे) सोहळ्याचे आयोजन करण्यासाठी काही टिप्स
बाळाचे बारसे किंवा नामकरण विधी तुम्हाला हवा तसा होण्यासाठी खाली काही टिप्स दिलेल्या आहेत:
१. तुमची आमंत्रण यादी तयार करा
काही वेळा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला बोलावाचे नसते. म्हणूनच निमंत्रण यादी तयार केली जाते. जर तुम्ही एखाद्याला बारश्याला बोलावू इच्छित नसाल, तर त्यासाठी आधी नामकरण समारंभाला कुणाला बोलवायचे ह्याची यादी तयार करा.
२. प्रत्येकाला तुमच्या बाळाला घेऊ देऊ नका
माणसे ओळखण्यासाठी तुमचे बाळ खूप लहान आहे आणि या जगात नवीन आहे. तुमच्या बाळाला प्रत्येकाने जवळ येवून घेतल्यास त्याला दुखापत होऊ शकते किंवा बाळ रडू शकते
३. तुमच्या बाळाला थोडे एकटे राहू द्या
तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी खाजगी खोलीची व्यवस्था करा. कारण एका दिवसात इतके चेहरे पाहून भारावून गेल्यावर बाळाला खाऊ घालण्यासाठी, कपडे बदलण्यासाठी आणि बाळाला थोडा वेळ देण्यासाठी तुम्हाला वेगळ्या खोलीची गरज भासेल.
४. आवश्यक गोष्टी तयार करा
बाळाच्या फॉर्म्युल्यापासून, पाणी, डायपर, फीडिंग बाटल्या, कपडे बदलणे आणि अश्या बऱ्याच गोष्टी तयार ठेवा. नामकरणाचा विधी जेव्हा असतो तो दिवस मोठा दिवस असतो. समारंभाच्या दिवशी मूलभूत गोष्टींसाठी तुम्हाला इकडे तिकडे फिरावे लागू नये हा हेतू असतो.
५. बाळाची झोपेची वेळ नेमकी तेव्हाच नाही ना हे पहा
तुमचे बाळ डुलकी घेत नाही किंवा झोपत नाही अशा वेळी तुम्ही तुमचा नामकरण समारंभ आयोजित करू शकता आणि ती एक महत्वाची पायरी आहे.
६. बजेट सेट करा
हे कदाचित फॅन्सी टीपसारखे वाटणार नाही परंतु ते महत्त्वाचे आहे. तुमच्याकडे पैसे असल्याशिवाय उधळपट्टी करू नका. बजेट सेट करा आणि काहीही असले तरी ते बजेट पाळा. तुम्हाला आनंददायी समारंभ करायचा आहे. हा समारंभ करताना पैशांचा ताण येऊ नये.
तुमच्या बाळाचा नामकरण सोहळा साजरा करण्यासाठी आकर्षक कल्पना
तुमच्या बाळाचा नामकरण समारंभ विशेष आणि आनंदी आठवणींनी परिपूर्ण होण्यासाठी येथे काही टिप्स दिलेल्या आहेत:
१. संगीत सुरु करा
एखाद्या प्रसंगासाठी संगीत थीम, मूड आणि वातावरण सेट करते. जुन्या दिवसांमध्ये, तुम्ही काही पारंपारिक ट्यून वाजवल्या असतील परंतु काळानुरुप पालक अधिक आधुनिक आणि ट्रेंडी होत आहेत. आर अँड बी सोल संगीत वापरून पहा किंवा तुम्हाला क्लासिक आवडत असल्यास, जॅझ आणि ब्लूज लावा.
२. पर्यावरणाचा विचार करा
हा एक विशेष दिवस असल्याने, स्थळ आणि खाद्यपदार्थ इको–फ्रेंडली सेट करण्यासाठी वेळ का काढू नये? पुनर्वापर करता येण्याजोगे आणि बायोडिग्रेडेबल कंटेनर आणि प्लेट्स वापरा. काही रोपे कुंडीत लावा. प्रसंगी आराम करण्यासाठी या ठिकाणी हिरवळ किंवा हिरवा कोपरा आहे का ते पाहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल आणि त्यासाठी ‘गोइंग ग्रीन‘ हा निश्चितच एक मार्ग आहे.
३. कार्यक्रमासाठी आयोजक नियुक्त करा
हे अपारंपारिक सल्ल्यासारखे वाटेल परंतु कार्यक्रमासाठी आयोजक नियुक्त केल्याने दिवस खूप चांगला जाईल. कार्यक्रमाचे आयोजक किंवा पार्टी नियोजक स्थळ निश्चित करण्याची काळजी घेतात, वाढदिवसाच्या टोप्या, खाद्यपदार्थ आणि त्या दिवसासाठीचे इतर साहित्य योग्य ठिकाणी असल्याची खात्री करून घेतात आणि मुळात तुमच्या समारंभाच्या समस्यांची काळजी घेतात. तसेच, अन्नपदार्थ येण्यास उशीर होणे, चुकीचे पाहुणे किंवा अनपेक्षित परिस्थिती निर्माण होणे यासारख्या अनपेक्षित गोष्टी होऊ शकतात. ह्या अनपेक्षित गोष्टी हाताळण्यात ते तज्ञ असतात आणि तुम्हाला नवीन दृष्टिकोन देतात.
४. तुमच्या आठवणी फोटो काढून जतन करा
ज्याप्रमाणे तुम्ही लग्नात फोटोग्राफर बोलावता ते नामकरण समारंभासाठी सुद्धा लागू आहे. व्यावसायिक छायाचित्रकारांचे पोर्टफोलिओ पहा आणि तुम्हाला काय आवडते ते पहा. नामकरण समारंभाच्या छायाचित्रणातील तज्ञ छायाचित्रकार शोधण्याचा प्रयत्न करा. कारण अशा प्रकारे, तुम्हाला अद्वितीय शॉट्स मिळतील. परिस्थितीशी जुळवून घेणारा व्यावसायिक फोटोग्राफर पाहू नका.
५. छान मेनू ठेवा
नामकरण समारंभात तुम्ही पारंपरिक मेन्यू ठेवला पाहिजे असे नाही. आपल्याकडे बरेच पर्याय आहेत. टॅपिओका पुडिंगपासून ते फिश आणि चिप्स, बिर्याणी, पिझ्झा आणि अरेबियन पाककृती इत्यादी. तसेच तुम्ही तुमचा मेनू फ्यूजन व्हरायटी करून बनवू शकता. पुन्हा, एक इव्हेंट मॅनेजर तुम्हाला तुमच्या बजेटच्या आधारे मेनू कसा सेट करायचा किंवा तयार करायचा याबद्दल चांगल्या कल्पना देईल.
६. वेगवेगळ्या रंगाचे फुगे वापरा
आम्ही फुग्यांचे खूप मोठे चाहते आहोत कारण ते कार्यक्रमाला (किंवा कोणत्याही समारंभाला) रंगीबेरंगी रुप देतात. तार आणि रिबन वापरा आणि त्याचे विविध प्रकार आहेत ह्याची खात्री करा. सोप्या भाषेत सांगायचे तर हे फुगे तुमचा नामकरण दिवस अधिक भव्य आणि आनंदी बनवतील.
७. आपल्या अतिथींना फुले द्या
तुम्ही आमंत्रित केलेल्या लोकांनी तुमच्यासोबत येऊन आनंद साजरा करण्यासाठी मौल्यवान वेळ काढला आहे. जेव्हा ते आत येतील तेव्हा त्यांना काही फुले द्या. त्यांना हा दिवस नक्कीच आयुष्यभर लक्षात राहील.
८. कपडे
तुमच्या बाळावर सगळ्याचे लक्ष केंद्रित होईल कारण बाळ उत्सवमूर्ती आहे. सैल आणि स्नग–फिटिंग कपडे घालून त्याला आरामदायक वाटत असल्याची खात्री करा. बाळाला जास्त दागिने आणि हार घालू नका कारण त्यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो.
तुम्हाला समारंभ खूप छान करायचा असेल तर बॅकड्रॉपचा विचार करा. समारंभासाठी आलेल्या पाहुण्यांना संगीत आणि घटकांची केलेली मांडणी ह्यामुळे छान वाटेल. ह्या छोट्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे समारंभात उत्साह निर्माण होतो. पुन्हा, इव्हेंट मॅनेजरशी बोला, तुमच्या कुटुंबियांशी आणि मित्रांशी चर्चा करा आणि समारंभासाठी तयार होण्यास सुरुवात करा.