Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळाची काळजी बाळाच्या शौचामधील श्लेष्मा – कारणे आणि उपचार

बाळाच्या शौचामधील श्लेष्मा – कारणे आणि उपचार

बाळाच्या शौचामधील श्लेष्मा – कारणे आणि उपचार

तुमचे बाळ एक वर्षाचे होईपर्यंत बाळाची शौचास करण्याची वारंवारिता, शौचाचा आकार आणि वास हे घटक बदलत राहतात.काही वेळा शौचामध्ये श्लेष्मा देखील असू शकतो. अनेक वेळा एखाद्या अन्नाची प्रतिक्रिया आल्यामुळे बाळाच्या शौचामध्ये श्लेष्मा आढळतो. परंतु काही वेळा आरोग्याची गंभीर समस्या असल्यास बाळाच्या शौचामध्ये श्लेष्मा असू शकतो. ते एखाद्या गंभीर आरोग्यविषयक समस्येचे सूचक असू शकते.

या लेखात, आपण शौचामधील श्लेष्मा म्हणजे काय, त्याची कारणे, उपचार ह्याविषयी अधिक माहिती घेऊन त्याबाबत चर्चा करणार आहोत. बऱ्याचदा ह्या बाबतीत काळजी करण्याची गरज नाही, परंतु त्याविषयी आपल्या डॉक्टरांना तुम्ही सांगू शकता.

शौचामध्ये आढळणारा श्लेष्मा म्हणजे नक्की काय आहे?

बाळाच्या शौचामध्ये आढळणारा श्लेष्मा म्हणजे एक जेलीसारखा पदार्थ असतो. बाळाच्या शौचामधील  श्लेष्माचा रंग, त्यामागील  कारणा नुसार  स्पष्ट पांढरा, पिवळा, हिरवा किंवा तपकिरी असू शकतो.

बाळाच्या  शौचामधील श्लेष्मा धोकादायक आहे का?

बहुतेक वेळा, बाळाच्या शौचामधील श्लेष्मा धोकादायक नसतो. परंतु काहीवेळा,बाळाच्या शौचामध्ये श्लेष्मा आढळल्यास बाळाला कुठली आरोग्यविषयक समस्या आहे का ह्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे आणि जर बाळाच्या शौचामध्ये श्लेष्मा दिसून येत असेल तर वैद्यकीय मदतीची आवश्यकता असू शकते.

बाळाच्या शौचामध्ये श्लेष्मा आढळण्याची सामान्य कारणे

बाळाच्या शौचामध्ये श्लेष्मा आढळण्याची सामान्य कारणे

 

बाळाच्या शौचामध्ये श्लेष्मा कशामुळे होतो ह्याबद्दलची काही सामान्य कारणे खाली दिलेली आहेत:

1. सामान्यस्राव

बाळाच्या पचनास मदत करण्यासाठी आतड्यांमधून श्लेष्माचा स्त्राव होत असतो. स्तनपान घेत असलेल्या बाळांच्या शौचाचा बराचसा भाग हा श्लेष्मा असतो.

2. संसर्ग

काहीवेळा, तुमच्या बाळाच्या पचनसंस्थेवर साल्मोनेला किंवा इ. कोलाय सारख्या जीवाणूंचा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे शौचामध्ये श्लेष्मा किंवा रक्त आढळून येते. इतर लक्षणांमध्ये अतिसार, उलट्या, ताप इत्यादी लक्षणांचा  समावेश होतो. तसेच बाळाचे पोट मऊ असते.

3. आईच्याआहाराचीऍलर्जी

जरी तुम्ही तुमच्या बाळाला फक्त स्तनपान देत असाल, तरीही तुम्ही खाल्लेल्या काही पदार्थांची बाळाला ऍलर्जी येऊ शकते.बाळाची पचनसंस्था अजूनही अविकसित असल्याने, तो दुग्धजन्य पदार्थ किंवा मसालेदार पदार्थ सहन करू शकत नाही. लहान मुलांमध्ये अन्नपदार्थांच्या ऍलर्जीच्या इतर लक्षणांमध्ये वायू होणे आणि उलट्या यांचा समावेश होतो.

4. इंटुससेप्शन

ही एक गंभीर समस्या आहे ज्यामुळे तुमच्या बाळाच्या शौचामध्यें श्लेष्मा येऊ शकतो. इंटुससेप्शन हा एक प्रकारचा विकार आहे.ह्यामध्ये आतड्याचा एक भाग दुसऱ्या भागात सरकतो.  परिणामी रक्त प्रवाह कमी होतो, सूज येते आणि जळजळ होते. त्यामुळे तुमचे बाळ केवळ ब्लॉक झालेल्या भागाच्या खालील भागातील श्लेष्मा बाहेर टाकण्यास सक्षम असते. सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील मुलांमध्ये हा विकार सर्वात सामान्य आहे आणि सुमारे साठ टक्के रुग्णांच्या   शौचामध्ये श्लेष्मा आढळणे हे ह्याचे लक्षण आहे. ह्या समस्येसाठी वैद्यकीय उपचार आवश्यक आहेत.

5. दातयेणे

जर तुमच्या बाळाला दात येत असेल तर, शौचामध्ये श्लेष्मा आढळणे खूप सामान्य आहे.जास्त प्रमाणात लाळ आणि दातदुखीमुळे आतड्यांचा त्रास होऊ शकतो आणि परिणामी श्लेष्मा तयार होतो.

6. सिस्टिकफायब्रोसिस

सिस्टिक फायब्रोसिसची समस्या  असलेल्या बाळाच्या शौचामध्ये देखील श्लेष्मा आढळू शकतो.हा श्लेष्मा साधारणपणे स्निग्ध असतो आणि त्याला दुर्गंधी असते. बाळाला ही समस्या असल्यास बाळाचे वजन नीट वाढत आणि बाळाची वाढ योग्यरीत्या होत नाही. अशा वेळी त्वरित वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे.

श्लेष्मा कसा दिसतो?

बाळाच्या शौचातील  श्लेष्मा खालीलप्रमाणे दिसेल:

  1. शौचावरश्लेष्मा रेषेच्या आकारात दिसतो
  2. तुम्हालाजेल सारखी सुसंगतता असलेली शौचाची ढेकूळे दिसतील.
  3. शौचजेलसारखे चमकते

याचे निदान कसे केले जाते?

बाळाच्या शौचातील श्लेष्माचे निदान डॉक्टर खालीलप्रकारे करू शकतात.

१. शारीरिक आणि दृश्य चाचणी

ओटीपोटाच्या पोकळीला स्पर्श करून कुठल्याही प्रकारची सूज आली आहे का ह्याविषयी डॉक्टर तपासणी करतील.गुदाशय उघडण्याबाबतची कोणतीही समस्या किंवा पॉलीप्स आहेत का ह्याबाबतची तपासणी केली जाईल.

2. शौचचाचणी

श्लेष्माचे प्रमाण आणि कोणत्याही रोगजनकाची उपस्थिती निश्चित करण्यासाठी डॉक्टर बाळाच्या शौचाच्या नमुन्याचे प्रयोगशाळेत विश्लेषण करण्यास सांगू शकतात.

3. एक्स-रे

आतड्यांमधील कोणत्याही अडथळ्याचे स्पष्ट चित्र मिळविण्यासाठी डॉक्टर एक्स-रे करून घेण्यास सांगू शकतात.

4. अल्ट्रासाऊंड

गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट, पॉलीप्स आणि ब्लॉकेजेस यांची तपासणी करण्यासाठी डॉक्टर ओटीपोटाचा अल्ट्रासाऊंड करू शकतात.

सर्वात सामान्य उपचार पद्धती काय आहेत?

श्लेष्मा हे गंभीर आरोग्य समस्येचे केवळ सूचक असल्याने, तुमचे बाळ ज्या समस्येशी झुंज देत आहे त्यानुसार उपचार बदलू शकतात.

1. पोटातील संसर्ग

बालरोगतज्ञ तुम्हाला तुमच्या बाळाच्या द्रवपदार्थाचे सेवन वाढवण्याचा सल्ला देतील आणि ताप नियंत्रणात आणण्यासाठी औषधे लिहून देऊ शकतात.

2. अन्नाची ऍलर्जी

जर श्लेष्मा अन्नपदार्थांच्या  ऍलर्जीमुळे होत असेल तर, तुम्हाला काही पदार्थ तुमच्या आहारातून काढून टाकावे लागतील, उदाहरणार्थ: गायीचे दूध.

3.इंटुससेप्शन

इंटुससेप्शन मध्ये आतड्याचे आच्छादन दुरुस्त करण्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक आहे. अथवा,बालरोगतज्ञ आतड्यांची स्थिती सुधारण्यासाठी बेरियम किंवा एअर एनीमा वापरण्यासाठी सांगू शकतात. आतड्यांमधला रक्तप्रवाह कमी होण्यापासून रोखण्यासाठी त्वरित उपचार करणे महत्त्वाचे आहे.

बाळाच्या शौचामधील श्लेष्माकडे  वैद्यकीय लक्ष देण्याची गरज आहे का?

वर सांगितल्याप्रमाणे, स्तनपान करणा-या बाळांच्या शौचामध्ये श्लेष्मा असणे अतिशय सामान्य आहे. आतड्यांद्वारे श्लेष्मा तयार केला जातो. त्यामुळे आतड्याची हालचाल सुलभ होते आणि लहान मुलांच्या शौचामध्ये सामान्यतः बहुतेक वेळा फक्त श्लेष्मा असतो कारण दूध इतके कार्यक्षमतेने वापरले जाते की शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी शौचाचे प्रमाण कमी असते. फॉर्म्युला घेत असलेल्या बाळांच्या शौचामध्ये देखील  श्लेष्मा आढळणे सामान्य आहे . बाळाच्या आहारात अचानक बदल झाल्यामुळे ही समस्या उद्भवते.परंतु,जर श्लेष्मा भरपूर प्रमाणात असेल आणि शौचामध्ये रक्त आणि अस्वस्थतेची इतर सामान्य लक्षणे असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. लाळआणिथंडीमुळे बाळाच्या शौचामध्ये श्लेष्मा होऊ शकतो का?

होय, लाळ आणि थंडीमुळे बाळाच्या शौचामध्ये  श्लेष्मा होऊ शकतो.

2. स्तनपानकरणा-याबाळाच्या स्टूलमध्ये श्लेष्मा कसा दिसतो?

स्तनपान करणार्‍या बाळाच्या शौचामधील श्लेष्मा हिरवट रेषेसारखा किंवा जेलीसारखा दिसतो.

बाळाच्या शौचामध्ये श्लेष्मा आढळणे  सामान्य आहे आणि ह्या बाबतीत काळजी करण्यासारखे काहीही नाही.जर बाळाला खूप अस्वस्थ वाटत असेल, शौचामध्ये रक्त दिसत असेल तसेच बाळ द्रवपदार्थ नाकारत असेल आणि बाळाला ताप सुद्धा येत असेल तर आपण जास्त उशीर न करता बालरोगतज्ञांना भेटले पाहिजे.

आणखी वाचा:

 बाळांमधील हिरवे शौच

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article