Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य मकर संक्रांतीसाठी ११ विशेष पदार्थ आणि रेसिपी

मकर संक्रांतीसाठी ११ विशेष पदार्थ आणि रेसिपी

मकर संक्रांतीसाठी ११ विशेष पदार्थ आणि रेसिपी

मकर संक्रांत हा भारतात साजरा केला जाणारा लोकप्रिय सण आहे. ह्याच काळात कापणीचा हंगाम सुरु होतो. देशाच्या वेगवेगळ्या भागात हा सण वेगवेगळ्या नावांनी ओळखला जात असला तरी ह्या सणाचा उत्साह सगळीकडे सारखाच असतो. मकर संक्रांत हा हिंदूंचा एक प्राचीन सण आहे. सौरचक्रानुसार तो साजरा केला जातो. ह्या सणाच्या दिवशी सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो. सूर्याची, उत्तरेकडे (उत्तरायण) प्रवासास सुरुवात होते. मकर संक्रांतीपासून दिवस मोठा होण्यास सुरुवात होते आणि थंडी संपून वसंत ऋतूचे आगमन होते.

भारतात गोडधोड पदार्थांशिवाय कोणताही सण साजरा होत नाही. मकर संक्रांतीचा सण सुद्धा त्यास अपवाद नाही. मग वाट कसली पाहताय, हाच तर ह्या लेखातील चर्चेचा विषय आहे! ह्या लेखात, आम्ही तुमच्यासाठी खास मकरसंक्रांतीसाठी पाककृती दिलेल्या आहेत. त्या पाककृती ह्या वर्षी तुम्ही करून पहा!

मकर संक्रांतीसाठी ११ स्पेशल रेसिपी

मकर संक्रांतीचा शुभ सण हा त्या दिवशी केल्या जाणाऱ्या विशेष पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. ह्या दिवशी केल्या जाणाऱ्या चवदार आणि पारंपरिक पदार्थांची प्रत्येकजण उत्सुकतेने वाट पहात असतो. आम्हाला माहित आहे की तुम्हाला देखील अशा छान छान पाककृती करायच्या आहेत आणि त्या तुम्ही करून बघू शकता हे पदार्थ घरी करणे खूप सोपे आहे! येथे मकर संक्रांतीच्या काही पाककृती आहेत. ह्या पाककृती देशाच्या अनेक भागांमध्ये केल्या जातात.

. तिळगुळ वडी

तिळगुळ वडी

तिळगुळ वडी, गूळ आणि तीळ घालून बनवली जाते. ही मकर संक्रांतीची पारंपारिक पाककृती आहे. महाराष्ट्रातील लोक हा तिळगुळ आपल्या नातेवाईकांना आणि प्रियजनांना देतात व नमस्कार करतात. ‘तिळगुळ घ्या गोड बोलाअसे म्हणतात. ह्या संक्रांतीच्या पाककृती मध्ये जे काही घटक आहेत त्यामध्ये भरपूर पौष्टिक मूल्य आहे. हे घटक ऋतू बदलासाठी आवश्यक आहेत. ह्या मकर संक्रांतीला करून बघण्यासाठी खाली तिळाच्या वडीची रेसिपी देत आहोत.

साहित्य:

  • गूळ /४ कप
  • तीळ /४ कप
  • शेंगदाणे (भाजलेले आणि बारीक केलेले ) – /४ कप
  • तूप १ टीस्पून
  • दूध २ चमचे
  • वेलची पावडर /२ टीस्पून
  • सुके किसलेले नारळ /२ टीस्पून

कृती:

  • तीळ सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या
  • तीळ थंड होऊ द्या, त्यानंतर तिळाचा अर्धा भाग बारीक करून बारीक पावडर बनवा आणि बाजूला ठेवा
  • कढई गरम करून त्यात गूळ घालून मंद आचेवर वितळवून घ्या
  • गूळ वितळला आणि उकळी आली की गॅस बंद करा
  • वितळलेल्या गुळामध्ये तीळ, तिळाची पूड, भाजलेले शेंगदाणे, वेलची पूड, तूप आणि दूध घाला
  • मिश्रण नीट ढवळून घ्या
  • पोळपाट लाटण्याला थोडे तूप लावून घ्या
  • गुळाचे मिश्रण पोळपाटावर ठेवा आणि थापून घ्या. थापताना वडी थोडी जाडसर होईल असे थापा
  • थापलेल्या मिश्रणावर कोरडे किसलेले खोबरे आणि तीळ एकसारखे शिंपडा आणि त्यावर हलक्या हाताने लाटणे फिरवा जेणेकरून नारळ आणि तीळ वड्यांवर नीट लागतील
  • थंड होऊ द्या, नंतर चौकोनी तुकडे करा
  • खाऊन पहा आणि संक्रांतीची ही रेसिपी तुमच्या कुटुंबियांसोबतही शेअर करा

. शेंगदाणा चिक्की

शेंगदाणा चिक्की

शेंगदाण्याची चिक्की ही मकर संक्रांतीची आणखी एक आवडती रेसिपी आहे. लोहरी किंवा पोंगल साजरे करणाऱ्यांनाही ह्या पाककृतीचा आनंद घेता येतो. ही चिक्की गूळ घालून देखील बनवली जाते आणि हिवाळ्यात तुमचे शरीर उबदार ठेवण्यासाठी ही एक उत्तम गोड कृती आहे. चला पाहूया संक्रांतीची ही स्वादिष्ट रेसिपी.

साहित्य:

  • भाजलेले, भुसभुशीत शेंगदाणे १ कप
  • गूळ पावडर /२ कप
  • पाणी
  • तूप १ टीस्पून

कृती:

गुळाचा पाक

  • एक जाड बुडाचे भांडे घेऊन त्यामध्ये किसलेला गूळ घाला
  • त्यात थोडे पाणी घाला
  • गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळत राहा
  • पाणी आटेपर्यंत गुळाचा पाक शिजत राहू द्या
  • त्यानंतर, गुळाच्या पाकाची सुसंगतता तपासा एक वाटी थंड पाणी घ्या आणि त्यात गुळाच्या पाकाचा एक थेंब टाका. पाकाचा थेंब घट्ट पण चिकट असावा

शेंगदाण्याची चिक्की

  • गुळाचा पाक एकसारखा झाल्यावर त्यामध्ये शेंगदाणे घालून चांगले एकत्र करा
  • गॅस बंद करा आणि पटकन तूप लावलेल्या प्लेटवर मिश्रण ओता
  • चमच्याने मिश्रण प्लेटवर समान रीतीने पसरवा. मिश्रण सुमारे १ सेमी जाड असावे
  • मिश्रण गरम असतानाच कापण्यासाठी सुरीचा वापर करा आणि थंड होऊ द्या
  • सर्व्ह करताना, चिक्की जिथून कापली आहे तिथून त्याचे तुकडे करा. तुमची चिक्की आता खाण्यासाठी योग्य आहे

. मुरमुरा लाडू

मुरमुरा लाडू

संक्रांतीसाठी ही आणखी एक स्वादिष्ट रेसिपी आहे. ही रेसिपी केवळ स्वादिष्टच नाही तर बनवायलाही अत्यंत सोपी आहे. मुरमुरे आणि गुळाचा पाक वापरून केलेले मुरमुरा लाडू तुम्हाला काहीतरी गोड आणि कुरकुरीत खायला हवे असेल तर योग्य आहेत.

साहित्य:

  • किसलेला गूळ /४ कप
  • मुरमुरे ३ कप
  • तूप १ टीस्पून

कृती:

  • कढई गरम करून मंद आचेवर मुरमुरे २ मिनिटे कोरडे भाजून घ्या. एका भांड्यात काढून घ्या आणि बाजूला ठेवा
  • त्याच कढईत तूप मंद आचेवर गरम करून त्यात गूळ घाला. गूळ वितळेपर्यंत ढवळत राहा
  • नंतर त्यामध्ये मुरमुरे घालून हलक्या हाताने मिक्स करा
  • गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या
  • जेव्हा हे मिश्रण तुम्ही हाताळू शकाल इतपत गरम असेल तेव्हा तुमच्या हाताच्या तळव्यांना थोडे तूप लावून घ्या, मूठभर मिश्रण हातात घ्या आणि लाडू बनवा
  • सर्व लाडू सारख्याच पद्धतीने बनवा

. पतिशप्ता

पतिशप्ता

मकर संक्रांतीला बंगालमध्ये पौष संक्रांत म्हणतात. या खास प्रसंगी, तुम्हाला प्रत्येक बंगाली घरात एक स्वादिष्ट मिठाई पाहायला मिळेल. ह्या सणाच्या वेळी बंगाली लोक ही मिठाई बनवतात आणि तो स्वादिष्ट गोड पदार्थ म्हणजे पतिशप्ता. पतिशप्ता हा पदार्थ परिष्कृत पीठ, रवा आणि तांदळाच्या पीठाने बनवलेला पदार्थ आहे. रेसिपी जाणून घेण्यासाठी वाचा

साहित्य:

पिठासाठी

  • मैदा १ कप
  • रवा /२ कप
  • तांदूळ पीठ /४ कप
  • दूध २ कप
  • आवश्यकतेनुसार तेल

सारण

  • डेसिकेटेड कोकोनट ३ कप
  • गूळ १ कप
  • सुका मेवा
  • खवा
  • वेलची पावडर /२ टीस्पून

कृती:

सारण

  • मंद आचेवर एक खोल कढई गरम करा. किसलेले खोबरे कढईत २ मिनिटे कोरडे भाजून घ्या
  • त्यात गूळ घालून मिक्स करावे. वैकल्पिकरित्या, आपण साखर किंवा दूध देखील वापरू शकता
  • हे मिश्रण ढवळत रहा. गूळ वितळायला थोडा वेळ लागेल, म्हणून धीर धरा
  • खोबरे आणि गुळाचे मिश्रण तव्याला चिकटत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यात खवा घाला
  • ३ मिनिटे सतत ढवळत राहा
  • तुमच्या आवडीची वेलची आणि सुका मेवा घाला
  • ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करा आणि गॅस बंद करा
  • हे मिश्रण आता मोठ्या प्लेट मध्ये घाला आणि थंड होऊ द्या

पतिशप्ता

  • एका भांड्यात मैदा, रवा आणि तांदळाचे पीठ घ्या. चांगले एकत्र करा
  • वरील मिश्रणात हळू हळू दूध घालून मिक्स करत रहा. त्यात गुठळ्या नसाव्यात
  • मिश्रण अर्धा तास बाजूला ठेवा
  • नॉनस्टिक पॅन गरम करून त्यात थोडे तेल घाला
  • तव्यावर थोडे मिश्रण घाला आणि ते एकसारखे पसरवा. ते छोट्या डोश्यासारखे दिसायला हवे. हा डोसा फिकट सोनेरी रंगाचा झाला की, दुसरी बाजू शिजण्यासाठी पलटून घ्या
  • १ ते २ चमचे सारण तुमच्या तळहातावर घ्या. लाटलेल्या लाटीच्या मध्यभागी ठेवा आणि कडा बंद करा
  • नंतर करंजीसारखा आकार द्या
  • हा पदार्थ तुम्ही गरम किंवा थंड खाऊ शकता

. सक्कराई पोंगल

सक्कराई पोंगल

सक्कराई पोंगल किंवा गोड पोंगल हा पोंगल ह्या सणाच्या दिवशी तामिळनाडूमध्ये तयार केलेल्या अनेक लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. हा पदार्थ सहसा हरभरा, गूळ, तांदूळ आणि सुक्या मेव्यापासून बनवला जातो. त्याचे हंगामी आणि पारंपारिक महत्व आहे. विशेषत: दक्षिण भारतातील शीर्ष संक्रांती पाककृतींपैकी ही एक पाककृती आहे.

साहित्य:

  • कच्चा तांदूळ १ कप
  • मूग डाळ /४ कप
  • किसलेला गूळ १ कप
  • काजू २ चमचे
  • मनुका १ टेस्पून
  • खाण्यायोग्य कापूर एक लहान चिमूटभर
  • वेलची पावडर /४ टीस्पून
  • तूप (/२ कप)
  • आवश्यकतेनुसार पाणी

कृती:

  • डाळ खमंग भाजून घ्या. थंड होऊ द्या
  • डाळ आणि तांदूळ नीट धुवून घ्या
  • ते मिक्स करा आणि ३ शिट्ट्या होऊ द्या
  • दरम्यान, एक तवा गरम करून त्यात गूळ घ्या. थोडे पाणी घालून गूळ वितळवून घ्या
  • गूळ घट्ट व चिकट होईपर्यंत नीट ढवळून घ्या. हे मिश्रण घट्ट झाले की गॅस बंद करून हे मिश्रण बाजूला ठेवा
  • आता डाळ आणि भात शिजवा. झाकण काढून चांगले मॅश करा
  • मॅश केलेली डाळ आणि तांदूळ एका खोल कढईत घ्या, त्यामध्ये गुळाचा पाक घालून मिक्स करा. नंतर त्यात वेलची पूड घाला आणि मंद आचेवर मिश्रण उकळी येईपर्यंत शिजवा. गॅस बंद करा
  • कढई गरम करून त्यात थोडं तूप घाला. काजू सोनेरीतपकिरी रंगाचे होईपर्यंत तळा
  • तळलेले काजू, बेदाणे आणि कापूर डाळतांदूळगुळाच्या मिश्रणात घालून ढवळा
  • तुमची संक्रांती स्पेशल रेसिपी, सक्कराई पोंगल तयार आहे

. पुरण पोळी

पुरण पोळी

पुरण पोळी ही संक्रांतीची आवडती रेसिपी अनेक कुटुंबांमध्ये घरात तयार केली जाते. ही पारंपारिक मकर संक्रांती रेसिपी काही मूलभूत घटकांसह बनविली गेली आहे आणि सण साजरा करणाऱ्या प्रत्येकाला त्याचा नक्कीच आनंद होईल. ५ ते ६ छोट्या पुरण पोळ्या करण्यासाठी तुम्हाला लागणारे साहित्य खाली दिलेले आहे

साहित्य:

  • हरभरा डाळ १ कप (रात्रभर भिजवलेली )
  • गूळ /२ कप (आवश्यक असल्यास आणखी घालू शकता)
  • वेलची पावडर १ टेबलस्पून
  • जायफळ पावडर /४ चमचा
  • गव्हाचे पीठ २ ते ३ कप
  • चवीनुसार मीठ
  • तूप २ टेबलस्पून

कृती:

  • पुरण तयार करण्यासाठी एका पातेल्यात २ टेबलस्पून तूप घ्या
  • ते गरम करून त्यामध्ये भिजवलेली डाळ घाला
  • गूळ घालून ढवळत रहा
  • गूळ वितळेपर्यंत मिश्रण शिजवा
  • वेलची आणि जायफळ पावडर घालून मिक्स करा
  • मिश्रण मध्यम आचेवर ढवळत राहा
  • ते गॅसवरून खाली उतरावा आणि गरम असतानाच मॅश करा. पुरण मॅश करण्यासाठी तुम्ही पुरण यंत्र वापरू शकता
  • आता गव्हाच्या पिठात थोडे पाणी, तूप आणि चिमूटभर मीठ घाला
  • मऊ, लवचिक पीठ येईपर्यंत मळून घ्या. तुम्ही जितके जास्त पीठ मळून घ्याल तितके पिठातील ग्लूटेन सक्रिय होईल
  • हे पीठ ओल्या मऊ कापडाने १० ते १५ मिनिटे झाकून बाजूला ठेवा
  • पीठ पुन्हा २ ते ३ मिनिटे मळून घ्या
  • आता कणकेचा थोडासा भाग घेऊन त्याचा गोळा लाटून घ्या
  • लाटण्याने छोटी लाटी लाटून घ्या
  • लाटीच्या मध्यभागी पुरण ठेवा आणि एक छान नीट पुरण भरलेला गोळा तयार करा
  • हा गोळा आता लाटून घ्या. लाटताना थोडे कोरडे पीठ वापरा जेणेकरून पुरण पोळी तुमच्या हव्या त्या आकारात लाटता येईल आणि लाटताना चिकटणार नाही. पोळी लाटताना लाटणे हळुवार फिरवा
  • नंतर एक तवा गरम करून त्यावर थोडं तूप लावा
  • पुरण पोळी दोन्ही बाजूंनी मध्यम आचेवर काळजीपूर्वक भाजून घ्या
  • थोडे तूप किंवा दुधासोबत गरम असतानाच खा

. उडदाच्या डाळीची कचोरी

उडदाच्या डाळीची कचोरी

उडीद डाळ कचोरी ही एक उत्तम अशी मकर संक्रांती साठीची रेसिपी आहे. ही रेसिपी तुम्ही नाश्त्यासाठी तयार करू शकता. हे चवदार खाद्यपदार्थ सणाच्या मेनूमध्ये संतुलन राखण्यास मदत करू शकतात. तर ह्या संक्रांतीला ही रेसिपी बनवा. तिळगुळ वडीसोबत कचोरी द्यायला विसरू नका.

साहित्य:

  • मैदा १ कप
  • गव्हाचे पीठ १ कप
  • बेकिंग सोडा /४ चमचा
  • उडदाची डाळ /२ कप (पाण्यात ४ तास भिजवा)
  • तूप २ ते ३ टेबलस्पून
  • जिरे /२ टीस्पून
  • चिरलेली हिरवी मिरची १ टीस्पून
  • चिरलेले आले १ टीस्पून
  • हळद पावडर /४ चमचा
  • लाल तिखट /२ टीस्पून
  • धान्याची पावडर /२ टीस्पून
  • बडीशेप /२ टीस्पून
  • हिंग (हिंग) – एक चिमूटभर
  • चवीनुसार मीठ
  • पाणी १ ते २ कप
  • तळण्यासाठी तेल

कृती:

  • मैदा, बेकिंग सोडा आणि मीठ एकत्र मिक्स करा
  • तूप घालून पिठामध्ये चांगले एकत्र करून घ्या
  • नंतर साधारण १/२ कप पाणी घालून पीठ मळायला सुरुवात करा
  • पीठ मऊ होईपर्यंत पाणी घालत रहा
  • पीठ ओल्या मऊ कपड्याने झाकून २० ते ३० मिनिटे बाजूला ठेवा
  • सारणासाठी, भिजवलेली उडीद डाळ बारीक करून घ्या
  • कढईत थोडं तूप घ्या. त्यात जिरे, बारीक केलेले आले आणि मिरची घालून घ्या
  • नंतर त्यामध्ये कोरडे मसाले हळद, लाल मिरची पावडर, धनेपूड, बडीशेप इ. चांगले मिसळा आणि हे मिश्रण चांगले परतून घ्या
  • नंतर उडीद डाळीची पेस्ट आणि मीठ घालून मिक्स करा
  • २ ते ३ मिनिटे शिजवा आणि थंड होऊ द्या
  • नंतर उडीद डाळीच्या मिश्रणाचे छोटे समान आकाराचे गोळे बनवा
  • पिठाचे गोळे लाटून घ्या, उडीद डाळीचे सारण मध्यभागी ठेवा आणि कडा मध्यभागी एकत्र करा. आणि बंद करा
  • भरलेले गोळे हाताने किंवा लाटण्याने लाटून घ्या
  • सर्व कचोऱ्या तेलात मध्यम आचेवर तळून घ्या
  • हिरव्या चटणीसोबत ते खाण्याचा आनंद घ्या

. चना डाळ खिचडी

चना डाळ खिचडी

ही संक्रांतीसाठी एक उत्तम खिचडी रेसिपी आहे. हि रेसिपी तुम्ही ह्या वर्षी करून पाहू शकता. ह्या रेसिपी ला पंजाबी चना डाळ खिचडी किंवा भुनी खिचडी असे म्हणतात. ही भाताची रेसिपी तुमचे संक्रांतीचे जेवण पूर्ण करेल. ही संक्रांतीची खास रेसिपी तयार करण्यासाठी तुम्हाला काय आवश्यक आहे ते येथे दिलेले आहे.

साहित्य:

  • बासमती तांदूळ १ कप (१० ते १५ मिनिटे पाण्यात भिजवलेले)
  • चणा डाळ १ कप (पाण्यात १० ते १५ मिनिटे भिजत ठेवा)
  • हिरवे वाटाणे १ कप
  • मोहरी १ टीस्पून
  • जिरे १ टीस्पून
  • हळद पावडर १ टीस्पून
  • लाल मिरची पावडर १ टीस्पून
  • तूप ३ ते ४ टेबलस्पून
  • अख्ख्या लाल मिरच्या २ ते ३
  • तीळ १ टेबलस्पून
  • स्टार बडीशेप
  • दालचिनी स्टिक १ इंच
  • लवंगा २ ते ३

कृती:

  • स्टोव्हटॉपवर प्रेशर कुकर गरम करा
  • त्यात २ मोठे चमचे तूप घाला
  • त्यामध्ये बडीशेप, दालचिनीची काडी, लवंगा, मोहरी आणि जिरे घाला अर्धा मिनिट किंवा अधिक वेळ चांगले भाजून घ्या
  • चणाडाळ घालून ३ ते ४ मिनिटे भाजून घ्या
  • त्यात बासमती तांदूळ घालून तेही भाजून घ्या
  • मिरची पावडर आणि हळद घाला, मिक्स करा आणि आणखी २ मिनिटे भाजून घ्या
  • नंतर ४ कप पाणी आणि थोडे मीठ घाला. चांगले मिसळा आणि प्रेशर कुकरचे झाकण ठेवा
  • प्रेशरने दोन शिट्ट्यापर्यंत खिचडी शिजू द्या
  • दुसऱ्या पॅनमध्ये थोडे तूप, सुक्या मिरच्या आणि तीळ टाकून फोडणी तयार करा
  • खिचडीवर घाला आणि खिचडी गरम असतानाच सर्व्ह करा

. टॅमरिंड राईस

टॅमरिंड राईस

भाताच्या पाककृतींपैकी, चिंचेचा भात तुमच्या संक्रांतीच्या पाककृतींमध्ये एक चांगली भर घालेल. भारताच्या दक्षिणेकडील भागात, या डिशला पुलियोगरे, पुलिहोरा किंवा पुलियोधराई म्हणून देखील ओळखले जाते आणि जवळजवळ दररोज ह्या भाताचा आनंद घेतला जातो. ह्या मकर संक्रांतीत तुम्ही टॅमरिंड राईस कसा बनवू शकता हे जाणून घेण्यासाठी वाचा.

साहित्य:

  • तांदूळ १ कप (शक्यतो सोना मसुरी तांदूळ, २ कप पाण्यात उकळलेले)
  • चिंच ५० ग्रॅम (३ ते ४ चमचे चिंच गरम पाण्यात ३० मिनिटे भिजवल्यानंतर लगदा तयार करा)

मसाल्यासाठी

  • सुक्या लाल मिरच्या ३ ते ४
  • चना डाळ१ टीस्पून
  • उडदाची डाळ १ टीस्पून
  • कोथिंबीर २ टेबलस्पून
  • तीळ /२ टीस्पून
  • मेथी दाणे (मेथी दाणे) – /२ टीस्पून
  • काळी मिरी १ टीस्पून
  • हिंग (हिंग ) – /२ टीस्पून

फोडणीसाठी

  • तीळ तेल ३ टेबलस्पून
  • शेंगदाणे /२ कप
  • उडदाची डाळ १ टेबलस्पून
  • मोहरी १ टीस्पून
  • सुक्या लाल मिरच्या २ ते ३
  • कढीपत्ता ७ ते ८
  • हळद /२ टीस्पून
  • हिंग /४ चमचा
  • चवीनुसार मीठ
  • गूळ पावडर १ ते २ टीस्पून

कृती:

  • भांड्यात शिजवलेला भात हळूवारपणे मोकळा करा
  • त्यात १/४ चमचा हळद, मीठ आणि एक चमचा तीळ तेल घाला. चांगले एकत्र करून घ्या आणि सर्व गुठळ्या फोडा
  • तव्यावर, आणि मंद आचेवर, वर नमूद केलेले सर्व मसाले कोरडे भाजून घ्या
  • जेव्हा ते किंचित सोनेरी आणि सुगंधी होतात तेव्हा ते काढून टाका आणि प्लेटमध्ये थंड करा
  • भाजलेले मसाले बारीक वाटून घ्या
  • आता एका वेगळ्या कढईत थोडं तिळाचं तेल (सुमारे ३ टेबलस्पून) घेऊन गरम करा
  • मोहरी टाका आणि तडतडू द्या
  • त्यात उडीद डाळ आणि शेंगदाणे घालून सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या
  • नंतर, कढीपत्ता आणि कोरड्या लाल मिरच्या घाला
  • त्यामध्ये हळद, हिंग आणि चिंचेचा कोळ घाला
  • मीठ आणि गूळ पावडर घाला
  • कढईवर तेल तरंगायला लागेपर्यंत उकळू द्या
  • कोरड्या मसाल्याच्या मिश्रणात सुमारे २ ते ३ चमचे घाला आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत उकळू द्या
  • आता हे चिंचेचे मिश्रण भातावर ओता आणि चांगले एकत्र करा
  • तुमची संक्रांती स्पेशल रेसिपी, टॅमरिंड राईस तयार आहे

१०. लेमन राईस

लेमन राईस

जर तुमच्याकडे चिंच नसेल, तर तुम्ही या वर्षीच्या संक्रांतीच्या पाककृतींमध्ये लेमन राईस समाविष्ट करू शकता. तुम्ही तो कसा बनवू शकता ते येथे दिलेले आहे

साहित्य:

  • तांदूळ २ कप (किमान १५ मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा आणि शिजेपर्यंत उकळा)
  • ताजे लिंबू (लिंबाचा रस ३ ते ४ चमचे)
  • मोहरी टीस्पून
  • शेंगदाणे २ टेबलस्पून
  • काजू २ टेबलस्पून
  • चना डाळ१ टीस्पून (पाण्यात भिजवलेले)
  • उडदाची डाळ१ टीस्पून (पाण्यात भिजलेली)
  • तेल २ टेबलस्पून
  • हिरव्या मिरच्या १ ते २
  • कढीपत्ता ८ ते १० पाने
  • हिंग (हिंग) – /४ चमचा
  • आले पेस्ट १ टीस्पून

कृती:

  • प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात चमच्याने मोकळा करा. पुढील कृती करण्यापूर्वी तुम्ही तो भात खोलीच्या तापमानाला थंड करू शकता
  • भातावर थोडे तेल, मीठ आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा
  • कढईत थोडे तेल घेऊन मध्यम आचेवर गरम करा
  • चणा डाळ, उडीद डाळ, काजू हे सर्व घटक शेंगदाणे तेलात घालून ते सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या
  • नंतर, मोहरी घाला. तडतडू द्या
  • हिरवी मिरची, आले पेस्ट आणि कढीपत्ता घाला
  • हळद आणि हिंग घाला
  • ही फोडणी भातावर घालून चांगले मिक्स करून घ्या
  • ह्या चविष्ट भातासोबत पापड, दही, लोणचे आणि संक्रांतीसाठी तयार केलेले इतर पदार्थ वाढा.

११. गूळ पोळी

गूळ पोळी

महाराष्ट्रात मकर संक्रातीला हमखास केला जाणारा पदार्थ म्हणजे गूळ पोळी. चला तर मग गूळपोळीची पाककृती पाहुयात:

साहित्य:

  • १ वाटी तीळ
  • पाव वाटी खसखस
  • पाव वाटी खोबऱ्याचा किस
  • २ टेबल स्पून तेल
  • पाव वाटी बेसन
  • आर्धी वाटी दाण्याचा कूट
  • १ टी स्पून जायफळ
  • वेलची पूड
  • पाव किलो गूळ
  • १ कप कणिक
  • १ कप मैदा
  • चिमूटभर मीठ
  • थोडे तूप
  • पाणी

कृती:

  • सगळ्यात आधी तीळ कढईत चांगले खरपूस भाजून घ्या. त्यानंतर खसखस आणि खोबऱ्याचा किस वेगवेगळा करून कढईत भाजा. त्यानंतर कढईत २ टेबलस्पून तेल टाका. त्यात पाव वाटी बेसन पीठ टाका आणि ते तेलात चांगलं परतून घ्या.
  • यानंतर परतून घेतलेले बेसन पीठ, भाजलेले तीळ, खसखस, खोबऱ्याचा किस, दाण्याचा कूट, १ टीस्पून जायफळ पावडर, थोडीशी वेलची पूड हे सर्व मिश्रण मिक्सर मध्ये घालून फिरवून घ्या. यानंतर त्यामध्ये गूळ टाका आणि मिक्सरमधून बारीक करून घ्या. हे तुमचे सारण तयार झाले आहे.
  • कणिक, मैदा आणि त्यात चिमूटभर मीठ, तूप आणि पाणी टाकून पोळीसाठी कणिक मळून घ्या.
  • कणिक छान मऊसर मळून झाली की एक लहान गोळा घ्या. सारण भरण्यासाठी हातानेच त्या गोळ्याला मध्यभागी खोलगट करा. खोलगट भागात सारणाचा गोळा घालून तो सगळीकडून बंद करून घ्या.

हा गोळा पोळपाटावर ठेऊन पोळी लाटून घ्या. लाटलेली पोळी तव्यावर टाकून खरपूस भाजून घ्या. त्यावर साजूक तूप घाला आणि गरमागरम तिळगुळाची पोळी खाण्याचा आनंद घ्या.

मकर संक्रांतीच्या दिवशी करण्यासाठी ह्या काही पाककृती इथे दिलेल्या आहेत. तुम्ही त्या ह्या वर्षी करून बघू शकता. देशाच्या विविध भागात जिथे मकर संक्रात साजरी केली जाते तिथे ह्या पाककृती केल्या जातात परंतु पदार्थांची नावे भिन्न असू शकतात. दुकानातून मिठाई आणि स्नॅक्स खरेदी करणे टाळा. त्याऐवजी, घरी बनवा. मेनू साधा पण रुचकर ठेवा. शुभ प्रसंगाचा जास्तीत जास्त आनंद घेण्यासाठी संक्रांतीच्या सणाच्या दिवशी सर्व विशेष खाद्यपदार्थ तयार करा. मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा!

आणखी वाचा:

मुलांसाठी मकर संक्रांतीच्या सणाची माहिती
मकरसंक्रांत: तुमचे कुटुंब आणि मित्रमैत्रिणींसाठी शुभेच्छासंदेश, मेसेजेस आणि कोट्स

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article