Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणातील टिनिटसची (कानात आवाज येणे) समस्या

गरोदरपणातील टिनिटसची (कानात आवाज येणे) समस्या

गरोदरपणातील टिनिटसची (कानात आवाज येणे) समस्या

हो! तुम्ही आई होणार आहात. गरोदर असताना आपल्या बाळाचा आवाज कसा असेल असा विचार तुम्ही कदाचित करत असाल. तुम्ही तुमच्या बाळाचा पहिला रडण्याचा आवाज ऐकण्यासाठी उत्सुक असाल. पण, दुसरीकडे, तुम्हाला तुमच्या कानात विचित्र आवाज येऊ शकतात, ह्या समस्येला वैद्यकीय भाषेत टिनिटस म्हणतात. गरोदरपणात तुम्हाला विविध वैद्यकीय समस्यांचा सामना करावा लागू शकतो आणि ही समस्या त्यापैकीच एक आहे.

गरोदरपणात जर तुम्हाला कानात आवाज ऐकू येत असेल आणि हा आवाज येणे सामान्य आहे किंवा नाही ह्याबद्दल तुम्ही विचार करीत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. गरोदरपणात कानात आवाज येणे म्हणजेच टिनिटस बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा. त्याची कारणे आणि उपलब्ध विविध उपायांबद्दल देखील जाणून घ्या.

टिनिटस म्हणजे काय?

टिनिटसचे वर्णन कानात येणारे विविध आवाज असे केले जाऊ शकते. हा आवाज शिट्टी वाजल्यासारखा किंवा कानावर टिकटिक केल्यासारखा येऊ शकतो. ही स्थिती तात्पुरती, तीव्र किंवा कायम असू शकते.

टिनिटस म्हणजे काय?

गर्भवती स्त्रियांना टिनिटसची समस्या असणे सामान्य आहे का?

टिनिटस प्रामुख्याने वृद्ध लोकांमध्ये म्हणजेच ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये आढळतो. तसेच, महिलांपेक्षा पुरुषांमध्ये ही समस्या जास्त दिसून येते. परंतु, प्रोजेस्टेरॉन वाढल्यामुळे तुम्हाला गरोदरपणात

तुमच्या कानात वाजण्याचा अनुभव येऊ शकतो, आणि ते अगदी सामान्य आहे. म्हणून, जर तुम्हाला कानात एखादा विचित्र आवाज ऐकू आला, तर तुम्ही भांबावून जाऊ नका. तुम्हाला कदाचित टिनिटसचा त्रास होत असेल. पहिल्या तिमाहीत कानात टिनिटस किंवा आवाज येणे खूप सामान्य आहे. आणि ही समस्या गरोदरपणात शेवटपर्यंत टिकू शकते.

गरोदरपणातील टिनिटसची कारण

गरोदरपणात तुम्हाला कानात वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू येतात. काही स्त्रियांना हृदयाच्या ठोक्यासारख्या आवाज देखील ऐकू येऊ शकतो (याला पल्साटाइल टिनिटस प्रेग्नेंसी साउंड्स असे देखील म्हणतात). गरोदरपणात स्त्रियांना अनुभवास येऊ शकतात अश्या काही आरोग्यविषयक समस्या देखील आहेत. त्यामुळे टिनिटस होऊ शकतो:

  1. जर तुम्हाला तुमच्या यापूर्वीच्या गर्भारपणात टिनिटस झाला असेल, तर नंतरच्या गरोदरपणात सुद्धा तो होण्याची दाट शक्यता आहे
  2. गरोदरपणात लोहाच्या कमतरतेमुळे देखील टिनिटस होऊ शकतो
  3. गरोदरपणात खूप ताण घेतल्याने तुम्हाला टिनिटसचा त्रास होण्याचा धोका जास्त असतो
  4. गरदोरपणात उच्च रक्तदाबामुळे तुम्हाला टिनिटस होण्याचा धोका जास्त असतो
  5. गरोदरपणात प्रोजेस्टेरॉनचे उत्पादन वाढल्याने टिनिटस देखील होऊ शकतो
  6. मायग्रेनचा त्रास असलेल्या स्त्रियांना गरोदरपणात टिनीटस होऊ शकतो
  7. काही वेळा, दातांच्या समस्यांमुळे कानात आवाज ऐकू येऊ शकतात. चाव्याच्या समस्येची काही सामान्य लक्षणे म्हणजे जबडा कडक होणे, जबड्यात मंद वेदना आणि डोकेदुखी. आणि, कधीकधी, ही सर्व लक्षणे टिनिटस झाल्यास असतात
  8. काही वेळा मानेला झालेल्या दुखापतीमुळे कानात आवाज येऊ शकतात

गरोदरपणातील टिनिटसची कारण

गरोदरपणात टिनिटसपासून बरे होण्यासाठी किती वेळ लागतो?

गरोदरपणात निर्माण झालेली ही समस्या मर्यादित कालावधी साठी असते आणि तुम्ही तुमच्या बाळाच्या जन्मानंतर काही दिवसातच ह्या समस्येतून बरे होऊ शकता. ही समस्या फक्त तात्पुरत्या कालावधीसाठी असते, तसे न झाल्यास, आपण ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी.

गरोदरपणात टिनिटसवर उपचार

वर नमूद केलेल्या कारणांमुळे गरोदरपणात टिनिटस होतो. म्हणून, ह्या समस्येवर कोणताही प्रभावी उपचार नाही, कारण बहुतेक वेळा तो गरोदरपणाचा एक भाग असतो. त्यामुळे, जर कानात मेण जमा झाल्यामुळे, दातांच्या समस्या आणि मानेला झालेल्या दुखापतींमुळे कानातून आवाज येत असेल, तर तुम्ही तात्काळ उपचार घेऊ शकता आणि स्थितीत सुधारणा होत आहे का ते तपासून पाहू शकता. इतर कारणां मुळे निर्माण झालेल्या टिनिटसचे परिणाम कमी करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या टिप्सपैकी एक वापरू शकता.

गरोदरपणात टिनिटस व्यवस्थापित करण्यासाठी खाली काही टिप्स देत आहोत:-

गरोदरपणात कानात आवाज येणे हे विविध कारणांमुळे होऊ शकते. येथे काही टिप्स दिलेल्या आहेत. ह्या टिप्सद्वारे गरोदरपणात टिनिटस व्यवस्थापित होण्यास मदत होऊ शकते.

. तुमची तणाव पातळी व्यवस्थापित करा

तुम्ही गरोदरपणात थकवा, निद्रानाश, अस्वस्थता इत्यादीसारख्या विविध समस्यांशी लढू शकता, त्यामुळे गरोदरपणात तणाव आणि चिंता निर्माण होऊ शकते. इतर गुंतागुंत निर्माण करण्याव्यतिरिक्त, तणावामुळे टिनिटस देखील होऊ शकतो. म्हणूनच, गरोदरपणात आपल्या तणावाची पातळी व्यवस्थापित करणे खूप महत्वाचे आहे.

. ध्यान

तणाव कमी करण्याचा आणि नवचैतन्य अनुभवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे ध्यानाचा सराव करणे. अनेक ध्यान तंत्र वापरून पहा आणि ह्या समस्यवर उपाय म्हणून ज्या तंत्राची मदत होईल ते तंत्र वापरून पहा.

. मोठ्या आवाजापासून दूर राहा

मोठा आवाज टिनिटसची लक्षणे वाढवू शकतो आणि त्यामुळे अधिक अस्वस्थता निर्माण होऊ शकते. गरोदरपणात सर्व प्रकारचा मोठा आवाज टाळण्याचा प्रयत्न करा.

. व्यायाम

गरोदरपणात व्यायामाचे महत्त्व कमी करता येत नाही. तुम्ही व्यायाम करता तेव्हा त्याचा तुमच्या शरीरावर आणि मनावर सकारात्मक परिणाम होतो. रक्ताभिसरण वाढल्यामुळे टिनिटसच्या लक्षणांना सामोरे जाण्यास मदत होते. कठोर व्यायाम टाळा, कारण त्यामुळे समस्या वाढू शकतात. योगासने, विशेषत: प्राणायाम केल्याने कानातून आवाज येण्याची समस्या टाळण्यास मदत होते.

. संतुलित आहार घ्या

संतुलित आहार घ्या

तुमचा फिटनेस राखण्यासाठी आणि उत्साही राहण्यासाठी गरोदरपणात निरोगी आणि संतुलित आहार घ्या. तसेच, मिठाचे सेवन मर्यादित करा कारण त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. त्यामुळे कानातून आवाज येऊ शकतात.

. व्हाईट नॉइज म्युझिक किंवा म्युझिक थेरपी

तुमच्या कानातून येणारा आवाज कमी करण्यासाठी तुम्ही व्हाईट नॉइज थेरपी किंवा म्युझिक थेरपी वापरून पाहू शकता. आरामदायी संगीत ऐकल्याने तुम्हाला बरे वाटते आणि तसेच त्यामुळे झोप लागण्यास मदत होऊ शकते

. कानातून आवाज येण्याची समस्या वाढवणाऱ्या अन्नपदार्थांपासून दूर रहा

काही खाद्यपदार्थ, जसे की साखरयुक्त पदार्थ, कॅफिनयुक्त पेये, एमएसजी असलेले पदार्थ, इत्यादी, टिनिटसची लक्षणे आणखी वाढवू शकतात. या सर्व ट्रिगर्सपासून तुम्ही दूर राहिले पाहिजे.

. पूरक

काही वेळा, तुमचे डॉक्टर पूरक औषधे, विशेषत: झिंक सप्लिमेंट्स लिहून देऊ शकतात. ही पूरक औषधे टिनिटसचे परिणाम कमी करण्यासाठी मदत करू शकतात. सहसा, तुमच्या जन्मपूर्व पूरक आहारांमध्ये पौष्टिक घटक असतात. परंतु, टिनिटससाठी कोणताही पूरक आहार घेण्यापूर्वी आपल्या स्त्रीरोगतज्ञ आणि ईएनटी तज्ञाशी संपर्क साधणे चांगले.

ह्या लेखात नमूद केलेल्या टिप्स टिनिटसचे परिणाम किंवा लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात किंवा काही वेळा ह्या टिप्सचा तुम्हाला फायदा सुद्धा होणार नाही. त्यामुळे, यापैकी कोणताही पर्याय निवडण्यापूर्वी तुम्ही वैद्यकीय मदत घ्यावी असा सल्ला दिला जातो. आपण एखाद्या विशेषज्ञ/डॉक्टरला कधी भेटणे आवश्यक आहे यावर देखील एक नजर टाकूया.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

तुमची लक्षणे कमी होत नाहीत नसल्यास तुम्ही वैद्यकीय मदत घ्यावी. तुम्हाला त्यासाठी कान, नाक, घसा तज्ञांकडे जाण्याचा सल्ला दिला जाईल. ते अधिक व्यापक तपासणी करतील आणि तुम्हाला सर्वोत्तम उपचार मिळतील. जर तुम्हाला पूर्वी टिनिटसचा त्रास झाला असेल किंवा तुमच्या मागील गरोदरपणात ही स्थिती उद्भवली असेल, तर तुम्हाला ती माहिती तुमच्या डॉक्टरांना सांगा जेणेकरून तुम्हाला प्रभावी उपचार मिळण्यास त्यामुळे मदत होईल.

गरोदरपणात टिनिटसचे प्रभावीपणे व्यवस्थापन केले जाऊ शकते. ह्या समस्येची लक्षणे दिसू लागताच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

स्रोत:

आणखी वाचा:

गरोदरपणात सूज येणे
गरोदरपणातील अतिउष्णता (हायपरथर्मिया) – कारणे, धोके आणि उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article