Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे ‘म’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित १५० नावे

‘म’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित १५० नावे

‘म’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित १५० नावे

प्रत्येक आई वडिलांना आपल्या बाळाचे नाव अगदी लेटेस्ट आणि आधुनिक असणारे हवे असते. परंतु मॉडर्न नाव ठेवण्याच्या नादात त्यांच्या लक्षात येत नाही की शाळा, कॉलेज किंवा समाजात मुलाला नावावरून चिडवले सुद्धा जाऊ शकते. हो हे खरं आहे, मुलाचे नाव विचित्र असल्यास लोक त्याची चेष्टा करू शकतात आणि त्याचा मुलावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुमचे मूल चिडचिडे, रागीट किंवा उदास होऊन एकदम शांत होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलाचे नाव ठेवताना एक गोष्ट जरूर लक्षात घ्या कि नावावरून मुलाची कोणीही चेष्टा करता कामा नये आणि समाजात त्याची प्रतिमा चांगली राहिली पाहिजे. नाव असे असले पाहिजे ज्याचा तुमच्या मुलाला आयुष्यभर अभिमान वाटला पाहिजे, आणि तुमच्या मुलाच्या आयुष्यातील पुढची वाटचाल आत्मविश्वासासह झाली पाहिजे. ह्याव्यतिरिक्त पालक आपल्या मुलासाठी राशीनुसार आणि परंपरेला अनुसरून एक आधुनिक नाव शोधत असतात. जर तुम्ही तुमच्या मुलासाठी अक्षरावरून राशीनुसार एखादे मॉडर्न आणि सुंदर नावाच्या शोधात असाल तर हा लेख संपूर्ण वाचा.

अक्षरावरून मुलांची नावे अर्थासहित

जर तुम्हाला नावाचा अर्थ माहिती असेल तर तुम्ही तुमच्या मुलासाठी एखादे मॉडर्न छानसं नाव अगदी सहज निवडू शकता. मुलाचे चांगले नाव हे त्या नावाचा अर्थ आणि उच्चारांवर अवलंबून असते. जर तुम्ही तुमच्या मुलासाठी अक्षराने सुरुवात होणारे एखादे आधुनिक पण परंपरांशी जोडलेले एकमेवाद्वितीय नावाच्या शोधात असाल तर इथे अक्षरावरून सुरु होणाऱ्या सुंदर आणि लेटेस्ट नावांची यादी इथे दिली आहे. तुम्ही त्यामधून तुमच्या मुलासाठी एखादे छानसे नाव निवडू शकता. ती नावे कुठली आहेत, चला तर मग पाहुयात!

अक्षरावरून नाव नावाचा अर्थ धर्म
मकरंद मध, पुष्परस हिंदू
मधुर प्रिय, मंजुळ हिंदू
मनस्वीन बुद्धिमान हिंदू
मनीत इच्छित हिंदू
मनीष इच्छिलेला, बुद्धिमान हिंदू
मनू मानवांचा आद्य पुरुष हिंदू
मनोमय मनातील, काल्पनिक हिंदू
मनोरथ ईच्छा हिंदू
मनोहर रम्य हिंदू
मयूर मोर हिंदू
मयंक एका पर्वताचे नाव हिंदू
मलय दक्षिणेचा पर्वत हिंदू
महेश श्रीशंकर हिंदू
माणिक एक रत्न हिंदू
माधव कृष्ण हिंदू
मार्तंड सूर्य हिंदू
मित अल्प, संयत हिंदू
मिथुन जोडी, युग्म हिंदू
मिलिंद भुंगा हिंदू
मिहीर सूर्य, चंद्र, वायू हिंदू
मुकुल कळी हिंदू
मृगनयन हरणासारखे डोळे असलेला हिंदू
मेघ ढग हिंदू
मेघराज इंद्र, मेघांचा राजा हिंदू
मैत्रेय एका ऋषीचे नाव हिंदू
मोरया गणपती हिंदू
मोहन श्रीकृष्ण हिंदू
मोहनीश भुरळ घालणारा हिंदू
मोक्षद मोक्ष देणारा हिंदू
मौलिक मूल्यवान हिंदू
मंजुघोष मधुर आवाज हिंदू
मंगेश श्रीशंकर हिंदू
मंजुनाथ श्रीशंकर हिंदू
मंदार एका वृक्षाचे नाव हिंदू
मुकुंद श्रीकृष्ण हिंदू
मधुसूदन श्रीकृष्ण हिंदू
मंगेश श्रीशंकराचे नाव हिंदू
मल्हार राग हिंदू
मिथिलेश मिथिला नगरीचा राजा हिंदू
मानित सम्मानित हिंदू
मेघवर्ण श्रीकृष्ण हिंदू
मेहुल पाऊस हिंदू
मैत्रेय मित्र हिंदू
मनोज मनाची ऊर्जा हिंदू
मनोर प्रकाश हिंदू
मनवा मन हिंदू
मिहीर सूर्य हिंदू
मित्र सूर्य हिंदू
मोहल आकर्षक हिंदू
मोहीन आकर्षक, सुंदर हिंदू
मोनित हुशार, सर्वगुणसंपन्न हिंदू
मोदीत आनंदी हिंदू
माहील श्रीविष्णू हिंदू
माहीर निष्णात हिंदू
मगध यदुपुत्र हिंदू
महंक चंद्र, शीतल हिंदू
महंत श्रीशंकर हिंदू
मलांक राजा हिंदू
मनेश मनाचा ईश्वर हिंदू
मार्दव मृदु हिंदू
मौलिक मौल्यवान हिंदू
मौर्य राजा हिंदू
मिहान पवित्र हिंदू
मेघज मोती हिंदू
मेघन मोती, मेघांचा राजा हिंदू
मोनेश शांत हिंदू
मधुर गोड़ हिंदू
महादेव श्रीशंकर हिंदू
महांश मोठा हिंदू
मंगलम आनंद हिंदू
मनमित मनाचा साथी हिंदू
मनराज मनाचा राजा हिंदू
मनोविर मनाने खंबीर असलेला हिंदू
मार्तंड सूर्य हिंदू
मारुती हनुमानाचे एक नाव हिंदू
मयुरेश श्री गणेशाचे एक नाव हिंदू
मीरादास मीरा भक्त हिंदू
मुकुंद श्री कृष्ण हिंदू
मुरारी श्रीकृष्ण हिंदू
महाकेतू श्री शंकर हिंदू
महर्षी महान संत हिंदू
महेंद्र देवांचा अधिपती हिंदू
महेशम श्री शंकराचे एक नाव हिंदू
मनमोहन श्रीकृष्ण हिंदू
मिथेश श्रीशंकर हिंदू
मेधांश बुद्धिमान हिंदू
माधुर्य गोड हिंदू
मधुरेश गोडीने भरलेला हिंदू
मधुसूदन श्रीकृष्ण हिंदू
महिपती राजा हिंदू
महेश्वर श्रीशंकर हिंदू
मंगलेश पवित्र हिंदू
मनवेन्द्र मनाचा राजा हिंदू
मेघानंद ढगांचा राजा हिंदू
मुक्तानंद आनंद हिंदू
मुरलीधर श्रीकृष्ण हिंदू
मिहीरकिरण सूर्याची किरणे हिंदू
मणीशंकर श्रीशंकर हिंदू
मधू अमृत हिंदू
मधुप भ्रमर हिंदू
मधुल एका वृक्षाचे नाव हिंदू
मनोमय मनातील हिंदू
मनोरम सुंदर हिंदू
मलय दक्षिणेकडील पर्वत, चंदनासाठी प्रसिद्ध हिंदू
महेश्वर श्रीशंकर हिंदू
मानस ईच्छा हिंदू
मोक्ष मुक्ती हिंदू
मोहदीप आकर्षित करणारा प्रकाश हिंदू
मृदुक सौम्य हिंदू
मनन विचारशील हिंदू
मदन कामदेव हिंदू
मानवेन्द्र मानवांचा राजा हिंदू
माधुज मधाने बनलेला हिंदू
महंत महान हिंदू
मलयज चंदनाचे झाड हिंदू
मल्लिकार्जुन श्रीशंकराचे नाव हिंदू
मानल्प वेगळा हिंदू
मनांत गहन विचार हिंदू
मनोहारी सुंदर हिंदू
मानवीक हुशार आणि दयाळू हिंदू
मायूक हुशार हिंदू
मेधज प्रमुख हिंदू
मीरेश हिंदूंची देवता हिंदू
मधुबन विष्णूचे नाव, फुलांची बाग हिंदू
मघवा इंद्र हिंदू
मणि श्रेष्ठ रत्न हिंदू
मनोभीराम सुंदर मनाचा हिंदू
माणिक एक रत्न हिंदू
मुरारी श्रीकृष्ण हिंदू
मृत्युंजय अमर, शंकर हिंदू
मोती मोती हिंदू
मिथिलेश मिथिलेचा राजा हिंदू
मोहन श्रीकृष्ण हिंदू
मन हृदय हिंदू
मनोजीत लोकांची मने जिंकणारा हिंदू
मौर्य राजा हिंदू
मृगेश सिंह हिंदू
मृगांकशेखर श्रीशंकराचे एक नाव हिंदू
मिराज मातृभूमीची माती हिंदू
मिरांश समुद्राचा छोटा भाग हिंदू
मित्रेन सूर्य हिंदू
मितुल विश्वासू मित्र हिंदू
मोहजित आकर्षक हिंदू
मोक्षाल मुक्ती हिंदू
मुकेश श्रीशंकराचे नाव हिंदू
मौसम हवामान हिंदू
मृगस्य श्रीशंकर हिंदू
मारवा राग हिंदू

जर तुम्ही तुमच्या मुलाचे नाव अक्षरावरून ठेऊ इच्छित असाल आणि त्या नावाचा अर्थही तुम्हाला चांगला हवा असेल तर वरती दिलेल्या यादीमधून एका चांगल्या नावाची निवड करा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article