मराठी
English
हिन्दी
বাংলা
Firstcry Parenting
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे ‘व’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

‘व’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

‘व’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

पालक झाल्यावर बाळासाठी नाव शोधणे हे खूप मोठे काम असते. परंतु नाव शोधताना तितकीच मजा सुद्धा येते, कारण तुम्ही तुमच्या बाळामध्ये स्वतःला बघत असता आणि म्हणून बाळाचे नाव तुमचे विचार आणि भावना ह्यांना अनुसरून ठेवले पाहिजे. जर तुम्ही पहिल्यांदाच पालक झाला असाल तर बाळाच्या नावाविषयी तुम्हाला खूप सल्ले मिळतात, जसे की तुमच्या नावाशी मिळते जुळते बाळाचे नाव ठेवा, राशीनुसार बाळाचे नाव ठेवा, बाळाचे नाव अर्थपूर्ण असू द्या आणि असे बरेच. तसेच काही लोकांनी एखाद्या विशिष्ट अक्षरावरून नाव ठेवल्यास बाळाच्या व्यक्तिमत्वावर त्याच्या बराच प्रभाव पडतो किंवा अमुक एक अक्षर आज काल बरेच ट्रेंड मध्ये असेही तुम्हाला सांगितले असेल.

हे सगळं ध्यानात घेऊन आम्ही तुमच्यासाठी हे आर्टिकल तयार केले आहे ह्यामध्ये मुलींसाठी अक्षरावरून सुरु होणारी नावे संकलित केलेली आहेत. असे म्हटले जाते की ज्यांचे नाव पासून सुरु होते ते लोक खूप स्ट्रॉंग आणि दृढनिश्चयी असतात. तसेच ते नेहमी खूप सतर्क असतात. जर तुम्ही तुमच्या लाडक्या परीसारख्या मुलीचे नाव आधुनिक काळानुसार ठेऊ इच्छित असाल तर तिच्यासाठी अक्षरावरून सुरु होणारी नावे इथे दिलेली आहेत.

अक्षरावरून सुरु होणारी मुलींची नावे

खालील लिस्टमध्ये मुलींसाठी अक्षरावरून सुरु होणारी १५० नावे आहेत आणि ही सगळी नावे हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन धर्मानुसार वर्गीकृत केलेली आहेत.

अक्षरावरून नावनावाचा अर्थधर्म
वर्णिकासोन्यासारखीहिंदू
वान्यावनदेवताहिंदू
वंशिकाबासरीहिंदू
वाणीआवाज, भाषणहिंदू
वारुणिपाऊसहिंदू
वृषालीयश, महाभारतात कर्णाची पत्नीहिंदू
वरदादेवी लक्ष्मीहिंदू
वर्षिकापाऊस, देवीहिंदू
विधिज्ञाभाग्यदेवताहिंदू
वनिष्कावंश चालवणारी, भाग्यवानहिंदू
वेदापवित्रहिंदू
विदिशाएक नदीहिंदू
वेदांगीवेदांचा एक भागहिंदू
वर्चस्वाशक्तिशाली, तेजस्वीहिंदू
विधात्रीसरस्वतीहिंदू
वृद्धिप्रगति, विकासहिंदू
विधिभाग्यदेवताहिंदू
वृंदातुळस, पवित्रहिंदू
वैदेहीसीतेचे एक नावहिंदू
वेणुबासरी, शुभहिंदू
विक्षाज्ञान, नजरहिंदू
वैष्णवीश्रीविष्णु भक्तहिंदू
वेदिकाज्ञान, वेदांशी संबंधित, एक नदीहिंदू
विशिष्टासगळे समजण्याची शक्ती असलेलीहिंदू
वैशालीमहान, राजकुमारी, भारतातील एक प्राचीन शहरहिंदू
विपश्यनायोग साधनाहिंदू
विश्वापृथ्वी, ब्रह्मांडहिंदू
वीवाअभिवादन, अभिनंदनहिंदू
वामिकादेवी दुर्गेचे एक नावहिंदू
वेदांतीवेदांचे ज्ञान असलेलीहिंदू
वरेण्यासर्वप्राप्ती करण्यास सक्षम असलेलीहिंदू
वेदांशीवेदांचा एक अंशहिंदू
वेदश्रीवेद जाणणारी, सरस्वतीहिंदू
वीराशूर वीरहिंदू
वियारावीरताहिंदू
वागीश्वरीदेवी सरस्वतीहिंदू
विभूतिमहान व्यक्तित्वहिंदू
विदितादेवी,सगळ्यांना माहिती असलेलीहिंदू
विनिशाज्ञान, प्रेम, विनम्रताहिंदू
विनयासंयमित, सभ्यहिंदू
विश्वजापूर्ण ब्रह्मांडाशी संबंधितहिंदू
विशीविशेषहिंदू
वृत्तिप्रकृति, व्यव्हारहिंदू
वृद्धिकामोठी मुलगीहिंदू
वल्लरीफुलांचा गुच्छ, सीतेचे एक नावहिंदू
वाराहीवराह वाहन असलेली देवताहिंदू
वागिनीचांगली वक्ताहिंदू
वर्तिकादीपकहिंदू
विशालाक्षीमोठ्या डोळ्यांची, देवी पार्वतीचे एक नावहिंदू
विशाखा२७ नक्षत्रांपैकी एकहिंदू
वरुदापृथ्वीहिंदू
विनीविनम्रहिंदू
वृष्टिपाऊसहिंदू
वयाऊर्जा, शक्ति, पवित्रहिंदू
वारादेवी पार्वतीचे एक नावहिंदू
वार्याखजिना, मौल्यवानहिंदू
वर्षापाऊसहिंदू
विशालाविस्तृतहिंदू
वागईएक सुंदर फूलहिंदू
वाणिकासीतेचे नावहिंदू
वामासुंदर स्त्रीहिंदू
वारिधिभाषणहिंदू
वारिजाकमळहिंदू
वचनाघोषणा, व्रतहिंदू
वाचीअमृतासारखी वाणी असलेलीहिंदू
वंदिताधन्यवाद, प्रशंसाहिंदू
वंशिताकर्तबगारहिंदू
वणिकाध्वनिहिंदू
वत्सलामुलगी, प्रेमहिंदू
वेदांतिकावेदांचे ज्ञान असलेलीहिंदू
वागीशादेवी सरस्वतीचे एक नावहिंदू
वैभवीश्रीमंत, ऐश्वर्यसंपन्नहिंदू
वैदर्भीश्रीकृष्णची पत्नी रुक्मिणीचे एक नावहिंदू
वृषागायहिंदू
वृषितासमृद्धि, सफलताहिंदू
व्यास्तिसफलता, व्यक्तित्वहिंदू
व्योमिनीदिव्य, पवित्रहिंदू
व्युस्तीसुंदरता, कृपाहिंदू
वनश्रीदेवी सरस्वतीचे एक नावहिंदू
वनिनिमृदुभाषीहिंदू
वपुषासुंदर, अप्सराहिंदू
वमितादेवी पार्वतीहिंदू
वरदानीएका रागाचे नावहिंदू
वररुनावीदेवी लक्ष्मीहिंदू
वरालिकाशक्तीची देवता, देवी दुर्गाहिंदू
वरुणावीदेवी लक्ष्मीहिंदू
वर्धनीएक रागहिंदू
वशिताआपल्या गुणांनी मोहिनी घालणारीहिंदू
वसंताजाचमेलीचे फुलहिंदू
वसतिकासकाळचा प्रकाशहिंदू
वसुतासमृद्धहिंदू
वसुंधरापृथ्वीहिंदू
वसुश्रीपरमात्म्याची कृपाहिंदू
वामाक्षीवामाक्षीहिंदू
वाटिकाउपवनहिंदू
वाचीअमृतासारखी वाणीहिंदू
वैधूर्याएका नदीचे नावहिंदू
वैधृतियोग्य पद्धतीने समायोजित झालेलीहिंदू
वैदूर्यएक अनमोल रत्नहिंदू
वायगादेवी पार्वतीहिंदू
वैणवीसोनेहिंदू
वैशाखीशुभ, वैशाख पौर्णिमाहिंदू
वैशूदेवी लक्ष्मीहिंदू
वैश्वीश्री विष्णू उपासकहिंदू
वैवस्वतीसूर्याशी संबंधितहिंदू
वज्रकलाहीराहिंदू
वक्षीदिव्याची ज्योतीहिंदू
वालयीनटखट मुलगीहिंदू
वालिनीताराहिंदू
वल्लिका हीराहिंदू
विदाआयुष्यात स्पष्टता असलेलीमुस्लिम
वीयाधन, संपत्तिमुस्लिम
वाबिसाचमकदार, उज्जवलमुस्लिम
वसमासौंदर्य, सुसंस्कृतमुस्लिम
वसीमासुंदर, आकर्षकमुस्लिम
वालिआउत्तराधिकारीमुस्लिम
वासियाअतिशय गुणीमुस्लिम
वाजिहाप्रख्यात, विशिष्टमुस्लिम
वाबिबादान देणारीमुस्लिम
वफीकायशस्वीमुस्लिम
वजीप्रसन्नमुस्लिम
वाजियाराग, लयमुस्लिम
वानियादेवाकडून मिळालेली, मोतीमुस्लिम
वरीनाअनमोल, यूनिकमुस्लिम
वरीज़ाआनंद, भाग्य, अंतर्ज्ञानमुस्लिम
वयलावेळशीख
विचारलीनप्रतिबिंब में अवशोषितशीख
विहारीशुद्ध, पवित्र, ईमानदारशीख
वीरिंदरशूर, ईश्वरीय व्यक्तीशीख
वचनप्रीतवचनाला जगणाराशीख
विस्मदचमत्कारिकशीख
वाहेनूरदेवाचा प्रकाशशीख
विसेखउत्कृष्ट, श्रेष्ठशीख
विसाहविश्वासशीख
वेरोनिकाखरी प्रतिमाख्रिश्चन
वेलेंटीनामजबूत, ताकदवानख्रिश्चन
विआंकापांढरा, उज्जवलख्रिश्चन
वलोराशूर स्त्रीख्रिश्चन
वलेरियासशक्त लड़कीख्रिश्चन
वेल्डाताकद, शासनख्रिश्चन
विनोनासर्वात मोठी मुलगीख्रिश्चन
व्हिटनीव्हाईट आयलंड वर राहणारीख्रिश्चन
विवियनसचेत, अस्तित्वमय, परिपूर्णख्रिश्चन
वायोलासंगीत वाद्याची लय, फुलांशी संबंधितख्रिश्चन
वायलेटलिली किंवा गुलाबख्रिश्चन
वैनेटाफुलपाखरू, सोन्यासारखीख्रिश्चन
विल्माशूर, रक्षकख्रिश्चन
वोनीजिंकणारी, शूरख्रिश्चन
विल्मादृढ़ निश्चयीख्रिश्चन

आम्हाला आशा आहे की अक्षरावरून सुरु होणारी सगळी नावे तुम्हाला आवडतील. आजकाल असे आढळून आले आहे की पालक सर्वात जास्त अक्षरावरून आपल्या मुलींसाठी नाव शोधात असतात. तर तुम्हाला इतकी सगळी पासून सुरु होणारी नावे मिळाली आहेत. पटकन त्यामधील एक नाव निवडा.


RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article