नुकतेच जन्मलेले बाळ खूप झोपते. किंबहुना, जितका वेळ ते जागे असते त्यापेक्षा कितीतरी जास्त वेळ ते झोपलेलेच असते. जन्मानंतरचे पहिले काही आठवडे बाळ दिवसाला १८ तास झोपते. तथापि, बाळ एका वेळेला ३–४ तासांपेक्षा जास्त वेळ झोपत नाही मग तो दिवस असो वा रात्र. बाळाचे हे झोपेचे रुटीन त्यांच्या आई बाबांसाठी मात्र थकवा आणणारे असते. कारण […]
२१ व्या आठवड्यात, तुमच्या बाळामध्ये काही रोमांचक बदल झालेले तुम्हाला दिसतील. आपले बाळ स्वतःचे स्वतः बसत आहे किंवा रांगण्याचा प्रयत्न करत आहे हे बघून तुम्हाला आनंद होईल. तुमचे बाळ कदाचित तुम्हाला प्रतिसाद देईल किंवा तुमच्याबद्दल प्रेम व्यक्त करेल. तुमचे बाळ तुम्ही त्याला घ्यावे म्हणून हात उंचावेल आणि तुम्ही त्याला घेतल्यानंतर तुम्हाला घट्ट मिठी मारेल हा […]
अनियोजित गर्भधारणा थांबवण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या ह्या परिणामकारक असतात. गर्भनिरोधक गोळ्या ह्या संप्रेरकांच्या गोळ्या असतात आणि त्या शरीराची ओव्युलेशन प्रक्रिया थांबवतात तसेच गर्भाशयाच्या मुखाचा श्लेष्मा घट्ट करतात. त्यामुळे शुक्रजंतू गर्भाशयापर्यंत पोहचत नाहीत आणि गर्भाशयाच्या आवारणामध्ये फलित अंड्याचे रोपण होत नाही. हा लेख तपकिरी स्त्रावाबद्दल तसेच त्यास कसा प्रतिबंध करावा आणि डॉक्टरांशी कधी संपर्क साधावा ह्याविषयी भाष्य […]
जर तुम्ही आणि तुमचे पती कुटुंबाची सुरुवात करण्याचा विचार करत असाल आणि तुम्ही गरोदर असल्याची तुम्हाला शंका असेल, तर तुम्ही आधीच घरगुती गर्भधारणा चाचणी केलेली असण्याची शक्यता आहे. चाचणी जर पॉसिटीव्ह आलेली असेल तर तुम्हाला नक्कीच आनंद झाला असेल. पण तुमचा गर्भारपणाचा हा प्रवास नुकताच सुरू झाला आहे. तुमच्या गर्भधारणेची पुष्टी करण्यासाठी तुम्हाला आता डॉक्टरांना […]