Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी पहिल्या तिमाहीदरम्यान लैंगिक संबंध – गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळातील प्रणय

पहिल्या तिमाहीदरम्यान लैंगिक संबंध – गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळातील प्रणय

पहिल्या तिमाहीदरम्यान लैंगिक संबंध – गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळातील प्रणय

गर्भारपण आयुष्यभरासाठी आठवणी देऊन जाते, परंतु त्यासोबतच अनेक शंका, भीती आणि अनिश्चितता सुद्धा असते. विशेषकरून पहिल्यांदा आई होणाऱ्या स्त्रीच्या बाबतीत हे जास्त खरे असते. गर्भवती स्त्रीच्या मनात अजून एक शंका असते आणि ती म्हणजे गर्भधारणेदरम्यान ती तिचे लैंगिक आयुष्य चालू ठेवू शकते का. गर्भारपणाच्या शेवटच्या टप्प्यावर स्त्रीला थकव्यामुळे शारीरिक संबंध नकोसे वाटू शकतील, परंतु गर्भधारणेच्या प्राथमिक अवस्थेत योग्य ती काळजी घेतल्यास लैंगिक संबंध सहज ठेवता येऊ शकतात.

पहिल्या तिमाहीत लैंगिक आयुष्यात होणारे बदल 

पहिल्या तिमाहीमध्ये तुमच्या लैंगिक आयुष्यात बदल जाणवतील. तुमच्या संप्रेकांच्या पातळीत बदल होतील, रक्तप्रवाह वाढेल आणि तुमच्या भुकेमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ होईल. पहिल्या तिमाहीत तुमच्या शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ची पातळी सुद्धा वाढते. काही जण गर्भारपणाचे ९ महिने त्याचा आनंद घेतात तर काहींना अजिबात इच्छा होत नाही.

लैंगिंक संबंधांची इच्छा कमी करण्यात सहभागी असलेली काही लक्षणे

 • संप्रेरकांमध्ये बदल 
 • थकवा 
 • विचित्रपणा 
 • स्तनांची संवेदनशीलता 

काही स्त्रियांसाठी ह्या कालावधीत लैंगिक संबंध ठेवणे खूप अवघड जाते. तथापि, काही स्त्रियांना गर्भधारणेमुळे मन:स्थितीत आणि शरीरात सकारात्मक बदल जाणवतात. भरीव स्तन, गोलाकार कुल्ले आणि एकुणातच शरीरात झालेल्या बदलांमुळे आकर्षक बांधा ह्यामुळे काही स्त्रियांना त्यांच्या साथीदारासोबत एकत्र यावेसे वाटते.

पहिल्या तिमाहीमध्ये लैंगिक संबंध ठेवणे सुरक्षित आहे का?

तरुण वयाच्या मातांमध्ये हा सामान्यपणे आढळणारा प्रश्न आहे. तुमच्या गर्भाशयाचे स्नायू मजबूत असून त्यामुळे गर्भपाताची शक्यता नसते. संभोगादरम्यान पुरुषाचे जननेंद्रिय योनिमार्गापर्यंतच पोहोचते, त्यापलीकडे ते बाळापर्यंत पोहचत नाही. फक्त तुमच्या पतीचे वजन तुमच्या पोटावर येत नाहीये ना ह्या कडे लक्ष द्या.

तसेच, सर्वज्ञात गैरसमज म्हणजे लैंगिक उत्तेजना किंवा भावनोत्कटता प्रसूती वेदना सुरु होण्यास कारणीभूत नसतात.

गर्भारपणात लैंगिक संबंध ठेवण्याचे काय फायदे आहेत?

गर्भारपणादरम्यान लैंगिक संबंध ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी काही खालीलप्रमाणे 

. फिटनेस

शारीरिक संबंधादरम्यान कॅलरीज जाळल्या जातात तसेच तुम्ही गरोदर असताना तुमच्या पतीसोबत उबदार राहिल्याने तुम्ही शारीरिक दृष्ट्या फिट राहता.

. चांगली भावनोत्कटता (ऑरगॅझम)

गर्भधारणेदरम्यान स्त्रीच्या जननेंद्रियाच्या भागाकडे रक्तप्रवाह वाढलेला असतो. त्यामुळे पहिल्या तिमाहीत लैंगिक संबंध ठेवल्यास चांगली भावनोत्कटता मिळते.

. आनंद

गर्भधारणेदरम्यान शारीरिक संबंध ठेवल्यास त्याचे मानसिक फायदे सुद्धा होतात. शारीरिक संबंधांदरम्यान एन्डोरफीन नावाचे संप्रेरक तयार होते ज्यामुळे आरामदायी आणि आनंदी वाटते. तसेच त्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांचा सामना करणे सोपे जाते.

. घट्ट नाते

गर्भधारणेमुळे तुमच्या लैंगिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि तुमच्या पतीला असे अवाटू शकते की आधीसारखे लैंगिक आयुष्य आता राहणार नाही. बाळाला इजा होऊ नये म्हणून शारीरिक संबंध ठेवायला ते टाळू शकतील. परंतु वर सांगितल्याप्रमाणे, पहिल्या तिमाहीदरम्यान शारीरिक संबंध ठेवणे खूप सुरक्षित असते. त्यामुळे तुमचे नाते घट्ट होण्यासाठी गर्भधारणेदरम्यान शारीरिक संबंध ठेवायला हरकत नाही.

गर्भधारणेदरम्यान लैंगिक संबंध केव्हा टाळले पाहिजेत (पहिली तिमाही)?

 • गर्भधारणेच्या प्राथमिक कालावधीत शारीरिक संबंध ठेवणे हे सुरक्षित असते, परंतु ते नेहमीच तसे नसते.
 • जर तुम्हाला मळमळ होत असेल आणि खूप थकवा आला असेल तर शारीरिक संबंध ठेवू नका.
 • तसेच ज्या स्त्रियांना जुळी किंवा तिळी मुले होणार असतील किंवा नाळ खाली असेल तर त्यांनी शारीरिक संबंध ठेऊ नयेत.
 • जर गर्भजल पिशवी गळत  असेल आणि आवरण फाटलेले असेल तर तुमची शारीरिक संबंध ठेवणे टाळले पाहिजे.
 • गर्भारपणाच्या काळात जर गर्भाशयाचे मुख लवकर उघडले तर, शारीरिक संबंध टाळण्याचे हे सुद्धा एक कारण आहे.

पहिल्या तिमाहीमध्ये लैंगिक संबंध ठेवण्याचे घातक परिणाम 

जरी पहिल्या तिमाहीत गर्भधारणेदरम्यान शारीरिक संबंध ठेवणे हे सुरक्षित समजले जाते. तरी पहिल्या तिमाहीत शारीरिक संबंध ठेवल्यास त्याचे काही घातक परिणाम सुद्धा होतात.

 • जसजशी गर्भाची वाढ होते, तसा गर्भाशयाच्या मुखावरचा ताण वाढतो. जर तुम्हाला cervical insufficiency (अशी स्थिती जिथे गर्भाशयाचे मुख सशक्त नसते) असेल तर शारीरिक संबंधांपासून दूर राहा कारण  त्यामुळे गर्भाशयाच्या मुखावरील ताण वाढेल.
 • जर तुम्हाला  placenta previa (ह्या स्थितीत नाळेच्या काही भागामुळे गर्भाशयाचे मुख झाकले जाते ) झाले असल्याचे निदान झाले असेल आणि अशा परिस्थितीत शारीरिक संबंध ठेवले तर नाळेला हानी पोहचू शकते आणि बाळाच्या आयुष्याला खूप हानी पोहचू शकते.
 • लैंगिक संबंधांपासून पसरणाऱ्या आजारांपासून सावध रहा. तुम्ही तुमच्या पतीच्या लैंगिक आरोग्य आणि त्याबाबतचा इतिहास ह्याविषयी जागरूक असले पाहिजे.जर तुमच्या लैंगिक साथीदारास हिपॅटायटीस बी किंवा जेनायटल हर्पिस असेल तर तुमच्या शरीरातून ते बाळापर्यंत पोहचू शकते.

गर्भारपणाच्या पहिल्या तिमाहीसाठी सर्वोत्तम लैंगिक स्थिती 

गर्भारपणाच्या पहिल्या तिमाहीसाठी सर्वोत्तम लैंगिक स्थिती 

तुम्ही वरती असणे 

लैंगिक संबंधांच्या दरम्यान तुम्ही वरती असल्यास तुमच्या पोटावर दाब येत नाही. गर्भारपणाच्या सुरुवातीच्या काळात ह्या लैंगिक स्थितीमुळे तुमच्यावर किंवा तुमच्या बाळावर परिणाम होत नाही.

. बिछान्याच्या कडेला तुम्ही बसू शकता 

बिछान्याच्या कडेला तुम्ही गुडघे वाकवून बसू शकता आणि तुमचे पती तुमच्या दिशेने तोंड करून उभे राहू शकतात. ही स्थिती मिशनरी स्थिती सारखीच आहे आणि तुमच्या पतीच्या शरीराचे वजन तुमच्यावर पडण्याची काळजी तुम्हाला असणार नाही.

. सोफ्यावर बसून 

तुमचे पोट सोफ्याच्या पाठीकडे ठेवा, आणि तुमच्या पतीला मागच्या बाजूने प्रवेश करण्यास सांगा.

. स्पुनिंग 

तुमच्या मागे पती कुशीवर झोपल्याने वरचेवर खूप आत न प्रवेश करता लिंगप्रवेश होऊ शकतो.

ह्या स्थितीमध्ये बाळाच्या आणि तुमच्या सुरक्षिततेची खात्री होते.

पहिल्या तिमाहीमध्ये टाळाव्यात अशा लैंगिक स्थिती 

इथे काही लैंगिक स्थिती दिल्या आहेत त्या गर्भधारणेच्या प्राथमिक अवस्थेत टाळल्या पाहिजेत ज्यामुळे गर्भावस्थेतील गुंतागुंत टळेल.

. उभे राहण्याची स्थिती 

नवरा बायको दोघेही एकमेकांकडे तोंड करून उभे राहतात. नवरा बायकोला उचलून तिचे दोन्ही हात आणि पाय त्याच्या शरीराभोवती गुंडाळले जातात. ह्या लैंगिक स्थिती मध्ये तुमच्या पोटावर ताण येऊ शकतो त्यामुळे ही स्थिती टाळा 

. मिशनरी स्थिती 

जर तुम्ही मिशनरी स्थिती करणार असाल तर तुम्ही खाली उशी घेत आहात ना ह्याची खात्री करा, नाहीतर तुम्हाला खूप जास्त दुखू शकते.

नोंद: बरेच लोक शारीरिक संबंध सहज व्हावेत म्हणून वास असणारे स्नेहक वापरतात. गर्भधारणेच्या पहिल्या तिमाही मध्ये हे टाळणे उत्तम कारण त्यामुळे तुमच्या योनिमार्गाच्या आवरणाला इजा पोहचत नाही.

पहिल्या तिमाहीमध्ये संभोग करण्याच्या आधी लक्षात ठेवाव्यात अश्या काही गोष्टी 

गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीमध्ये लैंगिक संबंध ठेवण्याआधी काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत 

त्या म्हणजे:

. मुख संभोग: ह्या कालावधीत मुख संभोग खूप सुरक्षित असते. फक्त तुमचा साथीदार तुमच्या जननेंद्रियाच्या भागात करत ब्लो करत नाहीये ना ह्याची खात्री करा कारण त्यामुळे एम्बोलिझम (रक्तवाहिन्यांमध्ये हवेच्या बुडबुड्यामुळे अडथळा निर्माण होतो) ज्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या साथीदाराला धोका पोहचू शकतो.

. संभोगानंतर रक्तस्त्राव होणे: हे काळजीचे कारण आहे, तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधत आहात ना ह्याची खात्री करा.

३ लैंगिक संबंधांच्या वेळी आणि भावनोत्कटतेच्या वेळी पेटके येऊ शकतात, पण जर ते संभोगानंतर होत असेल तर ती धोक्याची खूण असते, त्यामुळे जोडप्याने चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा.

. सगळ्याच स्त्रियांना गर्भधारणेदरम्यान संभोग करावासा वाटत नाही कारण लैंगिक संबंधांच्या भुकेच्या पातळीत चढ उतार होत असतो. म्हणून, जोडप्याने चर्चा करून एकमेकांच्या सहमतीने निर्णय घेतला पाहिजे.

काही स्त्रियांना गर्भारपणाच्या सुरुवातीच्या काळात लैंगिक संबंध का ठेवावेसे वाटत नाहीत?

पहिल्या तिमाही मध्ये स्त्रियांच्या संप्रेरकांमध्ये खूप बदल होत असतात. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन च्या पातळीत वाढ झाल्यामुळे लैंगिक संबंधांची इच्छा कमी होते, त्यामुळे पहिल्या तिमाहीमध्ये काही स्त्रियांना संभोगाची इच्छा होत नाही. मॉर्निंग सिकनेस किंवा थकवा ही लैंगिक इच्छा कमी होण्याची आणखी काही करणे आहेत.

गर्भधारणेदरम्यान लैंगिक संबंधांचा आनंद आधीसारखाच असू शकतो. फक्त तुम्हाला शारीरिक संबंधांदरम्यान योग्य ती सावधगिरी बाळगली पाहिजे जेणेकरून तुम्ही आणि तुमचे बाळ धोक्यापासून सुरक्षित रहाल. गुंतागुंत टाळण्यासाठी तुमच्या स्त्रीरोगतज्ञांशी वेळीच संपर्क साधने महत्वाचे.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article