Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड

गरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड

गरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड

गरोदरपणाच्या १४व्या आठवड्यात आईने दुसऱ्या तिमाहीमध्ये प्रवेश केलेला असतो. गरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यापर्यंत सहसा मॉर्निंग सिकनेस, थकवा आणि इतर नको असलेली लक्षणे अदृश्य होतात आणि पोट दिसू लागते. गर्भाशयात आतापर्यंत बाळ पूर्णपणे तयार झालेले आहे, त्याची लांबी सुमारे ८.५ सेमी आणि वजन सुमारे ४२ ग्रॅम आहे. नियमित तपासणीचा एक भाग म्हणून, तुमचे बाळ निरोगी असल्याची आणि त्याचा विकास सामान्यपणे होत असल्याची खात्री करण्यासाठी तुमचे स्त्रीरोगतज्ज्ञ गरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यांत अल्ट्रासाऊंडची शिफारस करतील.

ह्या लेखात, आम्ही गरोदरपणातील १४ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड ची गरज ह्यावर चर्चा करू आणि जर तुम्ही १४ आठवड्यांच्या गरोदर असाल तर तुम्‍हाला असलेल्‍या संबंधित प्रश्‍नांचे निराकरण करण्‍याचा प्रयत्‍न करू.

गरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंडची गरज का आहे?

सर्व गर्भवती महिलांना त्यांचे बाळ गर्भात कसे वाढत आहे हे पाहण्याची इच्छा असते. आणि, बाळाची योग्य वाढ सुनिश्चित करण्यासाठी, स्त्रीरोगतज्ञ वेळोवेळी अल्ट्रासाऊंडची शिफारस करतात. गरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड का आवश्यक आहे ते येथे आहे.

 • बाळाची हालचाल पाहण्यासाठी: १४ व्या आठवड्यात, तुम्ही बाळ हात पाय हलवताना पाहू शकाल तसेच बाळ अंगठा चोखताना सुद्धा तुम्हाला दिसू शकेल
 • हृदयाच्या गतीचे निरीक्षण करण्यासाठी: १४ व्या आठवड्यांत, हृदय सामान्यपणे कार्य करीत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी रेडिओलॉजिस्ट बाळाच्या हृदय गतीचे निरीक्षण करेल. डॉपलर अल्ट्रासाऊंड केले असल्यास तुम्ही बाळाच्या हृदयाचे ठोके देखील ऐकू शकता. नाळेतून बाळाच्या शरीराच्या इतर भागांमध्ये वाहणाऱ्या रक्ताचे प्रमाण मोजले जाते
 • हाडांचा विकास तपासण्यासाठी: गरोदरपणाच्या १४व्या आठवड्यांत, तुमच्या बाळाची हाडे ओसीफिकेशन नावाच्या प्रक्रियेत कडक होऊ लागतात. दुसया तिमाहीत अल्ट्रासाऊंड मध्ये तुम्हाला हाडे पांढरी आणि चमकदार दिसतील. हाडांची वाढ सामान्य आहे याची खात्री करण्यासाठी रेडिओलॉजिस्ट तपासणी करतील
 • जन्म दोष तपासण्यासाठी: अल्ट्रासाऊंड तंत्रज्ञ जन्मजात दोष आणि जन्मजात विकृतींची चिन्हे देखील तपासतील
 • गर्भजल पातळीचे निरीक्षण करण्यासाठी: तुमच्या बाळाच्या निरोगी विकासासाठी गर्भाशयात गर्भजलाची पुरेशी पातळी आहे ह्याची खात्री करण्यासाठी गरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड केला जातो
 • एकाधिक गर्भधारणेची पुष्टी करण्यासाठी: तुम्हाला जुळे किंवा तिळे होणार असेल तर त्याची सुद्धा ह्या टप्प्यावर खात्री केली जाते

गरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंडची तयारी कशी करावी?

गरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यांनंतर, तंत्रज्ञ पोटाचा अल्ट्रासाऊंड करतील. त्यासाठी तुमचे मूत्राशय भरलेले असणे आवश्यक आहे कारण त्यामुळे रेडिओलॉजिस्टला बाळाची स्पष्ट प्रतिमा मिळविण्यात मदत होईल. तुमच्या अल्ट्रासाऊंडच्या सुमारे ३० ते ४० मिनिटे आधी काही ग्लास पाणी प्या, जेणेकरून तुमचे मूत्राशय भरले जाईल. तुम्ही तुमच्या बाळाच्या आरोग्याविषयी आणि विकासाबद्दल तंत्रज्ञांना तुम्हाला असलेले प्रश्न काढून ठेवू शकता.

अल्ट्रासाऊंडला किती वेळ लागतो?

गरोदरपणातील १४ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंडला सुमारे २० ते ३० मिनिटे लागतील. जर तुम्हाला जुळे किंवा तिळे होणार असेल किंवा अंतर्गत अवयव आणि हातपाय दिसतील अशा स्थिती मध्ये बाळ नसेल तर अल्ट्रासाऊंड स्कॅन साठी वेळ लागू शकतो.

अल्ट्रासाऊंडला किती वेळ लागतो?

अल्ट्रासाऊंड कसे केले जाते?

गरोदरपणातील इतर कुठल्याही अल्ट्रासाऊंड प्रमाणेच, तुम्हाला पोट उघडे ठेवून टेबलवर झोपावे लागेल. रेडिओलॉजिस्ट तुमच्या पोटावर थोडी पाणीदार जेल टाकेल आणि मॉनिटरवर तुमच्या बाळाच्या प्रतिमा मिळविण्यासाठी अल्ट्रासाऊंड ट्रान्सड्यूसर वापरेल. काही वेळेला, ट्रान्सव्हजायनल स्कॅन केले जाऊ शकते. ह्या प्रकारच्या स्कॅनमध्ये गर्भाच्या स्पष्ट प्रतिमा मिळविण्यासाठी योनीमध्ये एक प्रोब घातले जाते. स्कॅन करण्याची ही प्रक्रिया वेदनादायक नाही आणि ह्या स्कॅनद्वारे सर्वात विश्वासार्ह प्रतिमा मिळते.

अल्ट्रासाऊंडवर काय पाहिले जाऊ शकते?

१४ आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंडमध्ये बाळाचा आकार लिंबू किंवा पीच एवढा असतो. अल्ट्रासाऊंड मध्ये तुम्हाला काय दिसू शकेल ह्याची यादी खाली दिलेली आहे

 • बाळाची हाडे घट्ट होऊ लागतात, त्यामुळे स्कॅन करताना ती मोठी आणि स्पष्ट दिसतात
 • बाळ त्याचे हात पाय खूप हलवते आणि तुम्ही बाळाला अंगठा चोखताना देखील पाहू शकता
 • तुम्ही बाळाच्या हृदयाचे ठोके पाहू आणि ऐकू शकता
 • तुम्ही बाळाची, बोटे, नखे आणि केस स्पष्टपणे पाहू शकता
 • जननेंद्रियाचा आतापर्यंत चांगला विकास झाला आहे. परंतु, रेडिओलॉजिस्टला भारतात बाळाचे लिंग उघड करण्याची परवानगी नाही
 • जरी तुम्ही ते अल्ट्रासाऊंड स्कॅनवर पाहू शकत नसलात तरी सुद्धा बाळाचे स्वतःचे असे बोटांचे ठसे आहेत
 • बाळाच्या चेहऱ्यावर हावभाव आहेत आणि तुम्ही बाळाला हसताना किंवा वाकुल्या दाखवताना पाहू शकता
 • त्वचा यापुढे पारदर्शक दिसणार नाही आणि लॅनुगोने झाकलेली आहे. लॅनुगो म्हणजे बाळाच्या शरीरावरील बारीक केसांची लव आहे. लॅनुगो गर्भाच्या शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यास मदत करते
 • बाळाला आता भुवया, केस योग्य प्रमाणात आहेत. हे सर्व अल्ट्रासाऊंडमध्ये दिसू शकतात.
 • बाळाच्या मानेमध्ये वाढ झालेली आहे, त्यामुळे हनुवटी छातीपासून वर उचलली जात आहे.
 • कान आणि डोळे जन्माच्या वेळी जिथे असावेत तिथे जवळजवळ असतात. डोळे अजूनही घट्ट बंद आहेत आणि गर्भारपणाच्या २८ व्या आठवड्यापर्यंत ते उघडत नाहीत.

गर्भधारणेच्या १४व्या आठवड्यात काही विकृती आढळल्यास काय?

गरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंड दरम्यान, काही विकृती आढळल्यास, डॉक्टर तुम्हाला पुढील चाचण्या करून घेण्याचा सल्ला देतील. बाळाला हृदयविकार असल्याचा संशय आल्यास स्त्रीरोगतज्ञ गर्भाच्या इकोकार्डियोग्राफी सारख्या चाचण्यांची शिफारस करू शकतात. अनुवांशिक विकार शोधण्यासाठी डॉक्टर अम्निओसेन्टेसिस, रक्त तपासणी किंवा कोरिओनिक विली सॅम्पलिंगची शिफारस देखील करू शकतात. चाचण्यांच्या निकालामध्ये काहीही असामान्य आढळल्यास डॉक्टर पुढील प्रक्रियेसाठी सल्ला देतील.

पहिल्या त्रैमासिकात न्युकल ट्रान्सलुसेंसी स्कॅन (एनटीएस) न झालेल्या मातांसाठी, ते करून घेण्याची ही शेवटची संधी आहे कारण १४ आठवड्यांनंतर मानेची त्वचा पारदर्शक रहात नाही. गरोदरपणाच्या १४ आठवड्यांपर्यंत, गर्भपाताचा धोका कमी होतो आणि बाळाची वाढ आणि विकास स्थिर गतीने होऊ लागतो. म्हणून,बाळ निरोगी असून त्याची वाढ चांगल्या रीतीने होत असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी गरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यातील स्कॅनची मदत होते.

मागील आठवडा: गरोदरपणाच्या १३ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन
पुढील आठवडा: गरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article