Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास तुमचे ४० आठवड्यांचे बाळ: विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी

तुमचे ४० आठवड्यांचे बाळ: विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी

तुमचे ४० आठवड्यांचे बाळ: विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी

तुमचे बाळ प्रत्येक आठवड्याला एक नवीन कौशल्य शिकते, त्यामुळे तुम्हाला त्याचा अभिमान वाटतो. तो रांगायला लागलेला असावा (किंवा कदाचित नसेलही). बाळ आता इकडे तिकडे हालचाल करत असेल आणि शारीरिक विकासाशी संबंधित नवीन टप्पे गाठत असेल. तुमचे घर बेबी प्रूफ करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. ४० व्या आठवड्यात, तुमच्या बाळाचा भाषेचा विकास देखील जलद गतीने होईल, म्हणून तुम्ही त्याला बोलायला लावण्यासाठी आणि त्याचा शब्दसंग्रह सुरुवातीपासूनच वाढण्यासाठी संभाषणात गुंतवून ठेवावे. ह्या आठवड्यात बाळाचा खूप विकास होईल. तुमच्या ४० आठवड्यांच्या बाळाच्या विकासाचा येथे मागोवा घ्या. तो साध्य करू शकणारे विविध टप्पे जाणून घ्या आणि या काळात तुम्ही त्याची काळजी कशी घ्यावी ते शोधा.

तुमच्या ४० आठवड्यांच्या बाळाचा विकास

४० व्या आठवड्यात, तुम्हाला तुमच्या बाळाच्या व्यक्तिमत्त्वात विकास झालेला दिसून येईल. बाळाचा सामाजिक सहभाग वाढेल आणि तो प्रत्येकाकडे हसून बघेल आणि लाजेल. जेव्हा नवीन लोक त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतील तेव्हा तो चेहरा लपवेल. लहान बाळे १० महिन्यांची झाल्यावर त्यांच्या आयुष्यात नवीन कोणाला तरी स्वीकारण्यापूर्वी ती परिस्थितीचे आकलन करू लागतात. त्यामुळे बाळाला जलद आणि तीव्र मूड स्विंग देखील होऊ शकतात. बाळ तुमचे लक्ष वेधण्यासाठी हावभाव करू लागेल आणि तुम्ही घर सोडत असल्याचे सूचित करता तेव्हा ते तुम्हाला टाटा देखील करू शकतात. हे असे वय आहे जेव्हा तुमचे बाळ एकटे उभे राहण्यास सक्षम असेल.

आणखी वाचा: तुमच्या ९ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमच्या ४० आठवड्याच्या बाळाचे विकासात्मक टप्पे

खाली काही टप्पे आहेत. हे टप्पे तुमच्या बाळाने साध्य केलेले असू शकतात

 • तुमचे बाळ तुम्ही त्याच्या दिशेने टाकलेला चेंडू पुन्हा तुमच्या कडे टाकेल.
 • तुमचे बाळ थोड्या काळासाठी एकटे उभे राहू शकेल.
 • तुमच्या बाळाला मामाकिंवा पप्पासहजपणे म्हणता येईल.
 • तुमचे बाळ मामाकिंवा पप्पाव्यतिरिक्त आणखी एक किंवा दोन शब्द बोलेल.
 • तुमचे बाळ त्याची तर्जनी आणि अंगठ्याच्या साहाय्याने लहान वस्तू उचलण्यास सक्षम असेल.
 • तुमचे बाळ एका कपमधून स्वतःचे स्वतः पाणी पिऊ लागेल.
 • तुमचे बाळ तुम्ही त्याला दिलेल्या कोणत्याही प्रतिक्रियेला प्रतिसाद देऊ लागेल, तसेच दोन्ही हात पसरवून ते मला द्यायासारखे हातवारे करू लागेल.
 • तुमचे बाळ एकटे उभे राहण्यास सक्षम असेल.
 • उभे राहिलेले असताना पुन्हा कसे बसायचे हे तुमचे बाळ शिकू लागेल. उठण्यासाठी आणि खाली बसण्यासाठी स्क्वॅटिंग हालचाली कशा करायच्या ह्यावर त्याचा मेंदू हळू हळू काम करू लागेल.

आणखी वाचा: ९ महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

तुमचे बाळ एकटे उभे राहण्यास सक्षम असेल.

बाळाला आहार देणे

४० आठवड्यांच्या बाळांसाठी पाण्याच्या बाटल्या हे एक अतिशय मोठे आकर्षण बनते. ह्याची दोन कारणे आहेत एक म्हणजे त्या बाटलीतले पाणी आणि दुसरे म्हणजे बाटली घरंगळत पुढे सरकते तेव्हा बाळांना खूप कुतूहल वाटते. तुमचे बाळ तुम्हाला पाणी पिताना पाहील आणि तुमचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करेल. जर तुमचे बाळ इतर बाळांसोबत वेळ घालवत असेल तर तुम्हाला त्याच्या हातातून सीपी कप परत घ्यावे लागतील. तुमच्या बाळाला कपमधून पिण्यास शिकवण्यासाठी ४० आठवड्यांचे वय चांगले आहे. बाळाला त्याचे बरेचसे हायड्रेशन स्तनपानातून मिळते. बाळाचे स्तनपान सोडवण्यासाठी आणि त्याला सिपिकपची सवय लावण्यासाठी त्याच्या पाण्याच्या बाटलीच्या आवडीचा उपयोग करून घेतला पाहिजे. तुमच्या बाळाने कप मधून पाणी किंवा दूध पिणे चांगले. खूप जास्त प्रमाणात साखर असलेला ज्यूस बाळाला दिल्यास दातांच्या समस्या आणि लठ्ठपणा वाढू शकतो त्यामुळे तुमच्या बाळाला, स्तनपान सुटल्यानंतर सुद्धा, कपमधून फक्त पाणी दूध पिण्याची सवय लावा. तुमच्या बाळाला प्रत्येक जेवणासोबत एक कप पाणी पिण्यास प्रोत्साहित करा, तसेच पाणी तहान शमवू शकते हे त्याला कळू द्या. दिवसभर तुमच्या बाळासोबत एक सिप्पी कप ठेवा जेणेकरून तो पाहिजे तेव्हा पाणी पिऊ शकेल.

आणखी वाचा: ९ महिन्याच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे विविध पर्याय

बाळाची झोप

तुमच्या ४० आठवड्याच्या बाळाला ह्या टप्प्यावर अनेक वेगवेगळ्या आणि एकाच वेळी घडणाऱ्या घडामोडींमुळे झोपेचा त्रास जाणवेल. त्याला वरचे चार दात येऊ लागतील आणि त्यामुळे त्याला अस्वस्थता येईल. बाळाचा मानसिक विकास होत असतो, तसेच बाळ आता इकडे तिकडे फिरू शकते. दात येण्यामुळे होणारी वेदना त्याच्या झोपेमध्ये व्यत्यय आणण्यासाठी आणि त्याला रात्री जागे ठेवण्यासाठी पुरेशी असेल. तो रात्री नीट झोपू शकत नसल्यामुळे, दिवसा चिडचिड करतो आणि तुम्हाला चिकटून राहतो. हिरड्यांचे सूज आल्यामुळे घट्ट अन्न खाल्ल्याने किंवा स्तन चोखल्याने दुखापत होऊ शकते त्यामुळे बाळ चिडचिड करू शकते. दात पूर्णपणे बाहेर आल्यानंतरच त्याला आराम मिळेल. तुमच्या बाळाची अस्वस्थता कमी होऊन झोप लागेपर्यंत तुम्ही बाळाला जवळ घेऊन बस. बरीचशी बाळे ह्या टप्प्यावर आईला चिकटून राहतात आणि दुसऱ्या कोणाकडे जाण्यास नकार देतात. त्यामुळे धीर धरा आणि दात येण्याच्या या वेदनादायक अवस्थेतून तुमच्या बाळाला मदत करण्यासाठी तुम्ही जे काही करू शकता ते करा.

बाळांसाठी पाण्याच्या बाटल्या

तुमच्या ४० आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी टिपा

तुमच्या ४० आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्याचे काही मार्ग येथे आहेत:

 • ह्या वयात बाळ वेगळे होण्याच्या चिंतेचा सामना करत असते. बाळाचे लक्ष नसताना तुम्ही त्याच्या पासून दूर जाऊ नका. तुम्ही बाहेर जात असताना त्याला बघुद्या, त्याचा निरोप घ्या आणि तुम्ही परत याल हे त्याला सांगा. म्हणजे तुम्ही परत येणार आहात हे त्याला समजेल.
 • तुम्ही तुमच्या बाळाला दुसऱ्या व्यक्तीकडे सोडल्यास, त्या व्यक्तीकडे पुरेसे खेळ आणि क्रियाकलाप आहेत याची खात्री करा जेणेकरून तुम्ही दूर असताना तुमचे बाळ दुःखी होणार नाही.
 • जर तुमचे बाळ कशाकडे तरी पहात असेल तर तुम्ही देखील तिकडे पहा,बाळाला ते दाखवून त्याचे वर्णन करा. तुम्ही उत्तर द्याल हे त्याला समजल्यावर एखादी गोष्टी बघून हे काय आहेहे विचारण्याची त्याला सवय लागेल.
 • बाळ ४० आठवड्यांचे झाल्यावर, बाळ क्रिब मध्ये उठून बसेल. तुमच्या बाळाला हळूवारपणे खाली झोपवा, त्याच्या पाठीवर थोपटा आणि त्याला पुन्हा झोपवा.
 • दात येताना येणाऱ्या अस्वस्थतेमुळे किंवा जास्तीच्या उर्जेमुळे तुमच्या बाळाला रात्री चांगली झोप लागली नसेल, तर दुसऱ्या दिवशी त्याला दिवसा झोपायला लावा.
 • तुमच्या बाळाला चालण्यासाठी भरपूर जागा देऊन त्यांना शारीरिक क्षमता आजमावण्यास प्रोत्साहित करा. त्यामुळे बाळाच्या पायाचे स्नायू विकसित होतील.
 • लहान बाळे जेव्हा चालण्याचा प्रयत्न करतात तेव्हा बाळ पडण्याची किंवा चालताना अडखळण्याची शक्यता असते म्हणून नेहमी बँडेज, गॉझ, चिमटे आणि मलम असलेली प्रथमोपचार किट सोबत ठेवा.
 • जर तुमचे बाळ सक्रिय असेल, तर त्याला प्लेपेन किंवा क्रिब ह्यासारख्या सुरक्षित ठिकाणी ठेवा जेणेकरून तो स्वत: ला इजा करणार नाही. त्याला नेहमी उचलून घेणे टाळा.

लहान बाळे जेव्हा चालण्याचा प्रयत्न करतात

चाचण्या आणि लसीकरण

तुमचे बाळ ४० आठवड्याचे झाल्यावर शारीरिक तपासणी केली जाईल. बाळाच्या वैयक्तिक गरजांवर आधारित तपासणी डॉक्टरांकडून केली जाईल.

. चाचण्या

अशक्तपणा टाळण्यासाठी तुमच्या बाळाच्या रक्तातील लोह, हिमोग्लोबिन आणि शिसे यांची पातळी निश्चित करण्यासाठी डॉक्टर रक्त तपासणी करू शकतात.

. लसीकरण

जर तुमच्या बाळाला नियमितपणे लसींचे डोस दिले जात असतील तर डॉक्टर तुमच्या बाळाला गोवर लस आणि तोंडावाटे पोलिओच्या लसीचे थेंब देतील.

खेळ आणि उपक्रम

येथे काही खेळ आहेत. हे खेळ तुम्ही तुमच्या ४०आठवड्याच्या बाळासोबत खेळू शकता:

. पीकबू

हा खेळ तुमच्या बाळाची वेगळे होण्याची चिंता दूर करण्यास मदत करू शकतो. टॉवेलने तुमचा चेहरा लपवा आणि पुन्हा करा. ह्यामुळे ते तुम्हाला पाहू शकत नसले तरीसुद्धा तुम्ही शारीरिक रित्या उपस्थित आहात हे त्यांना समजेल.

. टाळ्या वाजवणे

टाळ्या वाजवण्याचा खेळ खेळा आणि तुमच्या बाळालाही प्रोत्साहन द्या. हा खेळ त्याला हाताच्या हालचालींचे समन्वय साधण्यास मदत करू शकतो.

. डोळे, नाक आणि तोंड

तुम्ही तुमच्या बाळाला त्याचे डोळे, नाक आणि तोंड कुठे आहेत ते दाखवायला सांगा. हा खेळ त्याला शरीराच्या वेगवेगळ्या भागांची नावे शिकण्यास मदत करू शकतो.

. नृत्य आणि गाणे

तुमचे बाळ आता चालण्यास सक्षम होणार असल्याने, तुम्ही त्याच्यासोबत नाचून आणि गाऊन त्याच्या हालचालींना आणखी प्रोत्साहन देऊ शकता.

बाळ आता नाचून आणि गाऊन त्याच्या हालचालींना आणखी प्रोत्साहन देऊ शकता

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

तुमच्या ४०आठवड्याच्या बाळाच्या विकासाबाबत पुढील गोष्टींसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या:

 • पुढील एका महिन्यातील तुमच्या बाळाचा आहार, झोप, सुरक्षितता आणि विकास तसेच ४० आठवड्याचे बाळामध्ये विकासाचे कोणते टप्पे अपेक्षित आहेत ह्यासारख्या विषयांवर मार्गदर्शन मिळवण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
 • तुम्ही तुमच्या बाळाच्या आहारात कोणते नवीन पदार्थ जोडू शकता याची पुष्टी करण्यासाठी तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता. तुमच्या बाळाच्या आहारात तुम्ही मासे, मांस, अंड्याचा पांढरा भाग आणि लिंबूवर्गीय पदार्थ इत्यादींचा समावेश कधी करू शकता (जर तुम्ही आधीच ओळख करून दिली नसेल तर ) आणि तुम्ही तुमच्या बाळाचे स्तनपान आणि बाटली कधी सोडवायला सुरुवात करू शकता ह्याविषयी तुमच्या डॉक्टरांशी बोलून ठरवू शकता.

४० व्या आठवड्यात, तुम्ही तुमच्या बाळामध्ये शारीरिक आणि भाषेचा विकास झालेला पहाल. परंतु, जर तुमचे बाळ इकडे तिकडे हालचाल करत नसेल किंवा काही शब्द बोलत नसेल तर काळजी करू नका. त्याला थोडा वेळ द्या, प्रत्येक बाळाचा त्याच्या स्वतःच्या पद्धतीने विकास होईल. तुमचे बाळ नक्कीच हालचाल करू लागेल आणि तुम्ही जे बोलता त्याची पुनरावृत्ती करू लागेल.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article