Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) शिक्षण लहान मुलांसाठी रामायणातील 16 रंजक कथा

लहान मुलांसाठी रामायणातील 16 रंजक कथा

लहान मुलांसाठी रामायणातील 16 रंजक कथा

रामायण हे भारतीय महाकाव्यांपैकी एक आहे. हे महाकाव्य प्रसिद्ध वाल्मिकी ऋषींनी लिहिलेले आहे. हा प्रसिद्ध हिंदू धर्मग्रंथ काव्यात्मक संस्कृतमध्ये रचला गेला. रामायण ही वाईटावर चांगल्याच्या विजयाची कथा आहे. श्रीरामाने आपल्या पत्नीला म्हणजेच सीतेला वाचवण्यासाठी रावणाचा वध केला. हे महाकाव्य प्रेम, भक्ती, धैर्य आणि शौर्य यांचा खरा अर्थ समजून घेण्यास मदत करते. ह्या लेखामध्ये लहान मुलांसाठी रामायणातील काही लघु कथा दिलेल्या आहेत. चला रामायणातील शिकण्यायोग्य कथा वाचूयात.

मुलांसाठी रामायणातील लघुकथा

रामायण हे मूळ महाकाव्य संस्कृतमध्ये लिहिलेले आहे आणि लहान मुलांना संस्कृत भाषा समजणे कठीण होऊ शकते. म्हणून तुमच्या लहान मुलांसाठी, मराठी भाषेतून रामायणाच्या काही लघुकथा इथे दिलेल्या आहेत.

राम-सीता-लक्ष्मण

1. हनुमानाला बजरंगबली का म्हणतात?

प्रत्येक गोष्टीबद्दल उत्सुकता असलेल्या हनुमानाने एकदा सीतेला कुंकू लावताना पहिले आणि विचारले, “सीता माता, तुझ्या कपाळावर कुंकू का लावतेस?” हनुमानाच्या कुतूहलाने सीतेला आनंद झाला आणि तिने उत्तर दिले, “मी हे श्रीरामांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून लावते.” हे ऐकून हनुमानाने आपले संपूर्ण शरीराला शेंदूर लावले. ते पाहून श्रीराम हसू लागले. त्यांनी हनुमानाला जवळ बोलावले आणि म्हणाले, “तुझे माझ्यावरील प्रेम आणि भक्ती पाहून मी विस्मित झालो आहे आणि आतापासून लोक तुला बजरंगबली म्हणूनही ओळखतील.” बजरंगबली या शब्दातील “बजरंग” म्हणजे नारंगी.

2. श्रीरामांची बहीण शांता हिची कथा

श्रीरामांना तीन भावांव्यतिरिक्त एक बहीणही होती. याबद्दल फार लोकांना माहिती नाही. असे म्हणतात  की राजा दशरथच्या चारही मुलांना त्यांची बहीण शांता हिच्याबद्दल सांगितले गेले नव्हते. शांता ही राजा दशरथ आणि कौशल्य राणीची सर्वात मोठी मुलगी होती. राणी कौशल्या हिला वर्शिनी नावाची मोठी बहीण होती, तिला स्वतःचे मूल नव्हते. एकदा कौसल्येला भेटल्यावर तिने बाळाची मागणी केली. राजा दशरथने आपली कन्या शांता वर्शिणी  तिला देण्याचे मान्य केले.

3. हनुमानाला सीतेचा मोत्याचा हार ग्रहण करण्याची कथा

युद्धातून विजयी होऊन परत आल्यानंतर श्रीराम युद्धात मदत करणाऱ्या प्रत्येकाला बक्षीस देत होते. जेव्हा त्यांनी हनुमानाला भेट म्हणून काय हवे आहे असे विचारले तेव्हा हनुमानाने काहीही घेण्यास नकार दिला. हे पाहून सीतेने हनुमानाला तिचा मोत्याचा हार दिला. हनुमानाने ती भेट स्वीकारली आणि तो प्रत्येक मोती दाताने तोडू लागला. आश्चर्यचकित होऊन सीतेने हनुमानाला मोती का तोडत आहे असे विचारले. त्यावर हनुमानाने उत्तर दिले की तो मोत्यांमध्ये रामाला शोधत आहे, परंतु तो त्याला सापडत नाही. दरबारातील मंत्री हनुमानाची त्याच्या भक्तीबद्दल थट्टा करू लागले आणि त्यांच्यापैकी एकाने हनुमानाला विचारले की त्याच्या शरीरात राम आहे का? आणि हनुमानाने आपली छाती आपल्या हातांनी फाडली आणि त्याच्या हृदयात राम आणि सीतेची प्रतिमा होती. त्यांच्या या भक्तीभावाने सर्वांनाच धक्का बसला आणि सर्वांनी हनुमानाचे कौतुक केले.

4. खारीची कथा

रावणाने सीतेचे अपहरण करून तिला लंकेला नेले होते. सीतेला परत मिळवण्यासाठी रामाला एक महासागर पार करावा लागला. संपूर्ण वानर सेना आणि सर्व प्राणी श्रीरामांना पूल बनवण्यासाठी मदत करू लागले. श्रीराम त्यांच्या संपूर्ण सैन्याचे समर्पण आणि उत्कटता पाहून खूप प्रभावित झाले. एक छोटीशी खारुताई सुद्धा न थांबता काम करत असल्याचं श्रीरामांच्या लक्षात आलं. खारुताईने तिच्या तोंडात छोटे-छोटे दगड उचलले आणि खड्ड्याजवळ टाकले. खारुताईचा उत्साह पाहून एका माकडाने तिची चेष्टा केली की तिने मोठ्या दगडापासून दूर राहावे नाहीतर ती चिरडून जाईल. माकडाला हसताना पाहून इतर सर्व प्राणीही त्या चिमुकलीची चेष्टा करू लागले. छोटीशी खारुताई दुखावली गेली आणि रडू लागली. अस्वस्थ झालेली खारुताई धावत श्रीरामांकडे गेली आणि त्यांच्याकडे तक्रार केली. श्रीरामांनी सगळ्यांना जवळ बोलावले आणि लहान खारुताईने फेकलेले खडे, दोन दगडांना कसे जोडत होते ते दाखवले. कोणतेही योगदान लहान-मोठे नसते, असेही श्रीरामांनी सांगितले. कोणतेही काम करण्यापूर्वी त्यामागचा हेतू आणि भक्ती महत्त्वाची आहे. खारुताईच्या परिश्रमाचे कौतुक करून, श्रीरामांनी खारुताईच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. श्रीरामांनी हळुवार पाठीवर हात फिरवल्यामुळे तिच्या पाठीवर तीन पट्टे उठले. ह्या घटनेपूर्वी खारुताईच्या पाठीवर हे चट्टे नव्हते असे म्हणतात. मुलांसाठी ही एक उत्तम नैतिक कथा आहे. ह्या कथेद्वारे त्यांना छोट्या कामाचे महत्व कळते.

5. रावणाला दहा डोकी कशी?

ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी रावणाने अनेक वर्षे कठोर तपस्या केली. एके दिवशी ब्रह्मदेवांना प्रसन्न करण्यासाठी त्याने आपले मस्तक कापण्याचा निर्णय घेतला. जेव्हा त्याने त्याचे डोके कापले तेव्हा ते पुन्हा वाढले. जोपर्यंत ब्रह्मदेव प्रसन्न होत नाही तोपर्यंत तो आपले मस्तक कापत राहिला. रावणाच्या भक्तीमुळे ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेवाने रावणाला दहा डोकी असतील आशीर्वाद दिला आणि रावण सर्वात महान आणि शक्तिशाली राजा बनला. रावणाची दहा डोकी ही सहा शास्त्रे आणि चार वेदांचे प्रतीक आहेत ज्यामध्ये त्याने प्रभुत्व मिळवले होते.

6. मंदोदरी आणि सीतेची कथा

सीता ही जनक राजाची मुलगी आहे हे सर्वांना माहिती आहे. परंतु, रामायणातील एका संदर्भानुसार मंदोदरी ही सीतेची माता होती. असे मानले जाते की रावणाने मारलेल्या सर्व संतांचे रक्त एका मोठ्या भांड्यात साठवले होते. गृत्समदा ह्या एका ऋषींनी तपश्चर्या करण्यासाठी आणि लक्ष्मीला आपली कन्या म्हणून प्राप्त करण्यासाठी दर्भ गवतातून मिळवलेले दूध एका भांड्यात साठवले. गृत्समदाच्या घरात डोकावून रावणाने दुधाचे भांडे घेतले आणि दूध त्याच्या रक्ताच्या भांड्यात ओतले. या वाईट कृत्याने मंदोदरीला इतका राग आला की तिने मडक्यातील सामग्री पिऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. रावणाच्या मडक्यातील सामग्री पिऊन मंदोदरी मरण पावली नाही. त्याऐवजी ती सीतेपासून गरोदर राहिली. सीता म्हणजे लक्ष्मीचा एक अवतार होता. सीतेच्या जन्मानंतर मंदोदरीने बाळाला कुरुक्षेत्रात सोडले आणि अशा प्रकारे जनक राजाला सीता सापडली.

7. हनुमानाच्या जन्माची कथा

हनुमान जन्माची ही कथा मुलांसाठी खूप मनोरंजक आहे. एके दिवशी राजा दशरथ संतती होण्यासाठी यज्ञ करत होते आणि त्याच वेळी अंजना पुत्रप्राप्तीसाठी श्रीशंकराची पूजा करत होती. अग्निदेवता अग्नीने राजा दशरथला प्रसाद दिला. हा प्रसाद तीन दशरथाच्या तीन पत्नींमध्ये वाटून घ्यावा लागला. दैवी हस्तक्षेपामुळे गरुडाने काही प्रसाद हिसकावून टाकला. वायुदेवतेने हा प्रसाद अंजनाच्या हातात दिला, आणि तिने तो खाल्ला. यानंतर लवकरच तिने हनुमानाला जन्म दिला.

8. श्रीरामाच्या बंधूंच्या अवताराची कथा

श्रीराम श्रीविष्णूचा अवतार आहे. असे म्हणतात की श्रीरामाचे भाऊ लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे शेषनाग (वैकुंठात भगवान विष्णूचे आसन असलेले बहुमुखी नाग), शंख (भगवान विष्णूचे शंख) आणि सुदर्शन चक्र (भगवान विष्णूचे शस्त्र) चे अवतार आहेत.

श्रीरामाच्या बंधूंच्या अवताराची कथा

9. शूर्पणखेची कथा

शूर्पणखा ही रावणाची बहीण होती. राम आणि रावण यांच्यातील शूर्पणखा कारणीभूत होती. युद्धामागे शूर्पणखा कशी कारणीभूत होती या कथेच्या वेगवेगळ्या आवृत्त्या आहेत. तरीही, वाल्मिकीच्या आवृत्तीनुसार, शूर्पणखेने श्रीरामांकडे लग्नाचा प्रस्ताव आणला, परंतु त्यांनी तिचा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर ती लक्ष्मणकडे वळली. लक्ष्मणानेही तिचा प्रस्ताव नाकारला आणि म्हणून तिने सीतेला इजा करण्याचा निर्णय घेतला. रामाच्या सांगण्यावरून लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले. अपमानित आणि निराश होऊन ती रावणाकडे गेली. राम आणि लक्ष्मण यांचा बदला घेण्यासाठी सीतेचे अपहरण केले.

10. श्रीरामाच्या मृत्यूची कहाणी

जेव्हा श्रीरामांच्या मृत्यूची वेळ आली तेव्हा श्रीरामांनी हनुमानाला फसवले. हनुमानाने यमाला रामाचे प्राण घेऊ दिले नाही आणि त्यामुळे श्रीरामांना मृत्यू येणे अशक्य होते. हनुमानाचे लक्ष विचलित करण्यासाठी श्रीरामांनी आपली अंगठी एका भेगेमध्ये टाकली आणि हनुमानाला ती घेऊन येण्यास सांगितले. हनुमानाने किड्याचे रूप घेतले आणि भेगेच्या आत उडी मारली. नाग लोक जेथे राहतात तेथे तो पोहोचला. त्याने नागलोकचा राजा वासुकीला अंगठी मागितली. वासुकीने तशाच अंगठ्याच्या ढिगाऱ्याकडे बोट दाखवले आणि त्या सर्व रामाच्या अंगठ्याचा ढीग पाहून हनुमानाला धक्काच बसला.  त्याला रामाने फसवल्याचे वासुकीने सांगितले.

11. रावणाच्या आत्म्याची कथा

असे म्हणतात की, रामाशी युद्धासाठी जाण्यापूर्वी, रावणाने आपला आत्मा अग्नी-अक्ष नावाच्या संन्याश्याकडे ठेवला होता. त्या संन्याशाने रावणाच्या आत्म्याचे रक्षण करायचे होते आणि तो परत येईपर्यंत त्याला सुरक्षित ठेवायचे होते. युद्धादरम्यान, रावणाला मारलेल्या बाणांपैकी एकही बाण त्याला इजा करू शकत नाही हे पाहून रामाला आश्चर्य वाटले. रावणाच्या आत्म्याचे रहस्य रामाच्या एका मित्राला माहित होते, ज्याने रावणाचे रूप घेतले होते आणि त्याचा आत्मा परत करण्यास सांगण्यासाठी तो संन्याश्याकडे गेला. आत्मा मुक्त होताच रामाने रावणाचा वध केला.

12. लक्ष्मणाच्या झोपेची कथा

वनवासाच्या काळात लक्ष्मणाला राम आणि सीतेचे रक्षण करायचे होते आणि त्यासाठी त्याला झोप नको होती. झोप येऊ नये म्हणून लक्ष्मण निद्रा देवी जवळ गेला आणि तिला चौदा वर्षांची झोप परत घेण्यास सांगितले. चौदा वर्षे तुझ्या वतीने दुसऱ्या कोणाला तरी झोपावे लागेल असे सांगून देवीने होकार दिला. लक्ष्मण त्याची पत्नी उर्मिला हिच्याकडे गेला  आणि माझ्यावतीने तू झोपशील का असे विचारले. ह्या प्रश्नावर तिने होकार दिला. उर्मिला चौदा वर्षे झोपली. अश्या प्रकारे उर्मिलेने लक्ष्मणाला रामाला मदत करण्यासाठी मदत केली.

13. हनुमानाच्या मृत्युदंडाची कहाणी

एकदा नारदांनी प्रवृत्त केल्यामुळे हनुमानाने नकळत विश्वामित्राचा अपमान केला. हे घडले जेव्हा हनुमानाने रामाच्या दरबारात सर्व ऋषींना नमस्कार केला परंतु विश्वामित्रांना अभिवादन केले नाही ह्यामागचे कारण म्हणजे ते जन्माने संत नव्हते. विश्वामित्र रागावले आणि त्यांनी रामाला हनुमानाला मृत्युदंड देण्याची आज्ञा केली. फाशीची शिक्षा झाली, पण बाण किंवा ब्रह्मास्त्र सुद्धा हनुमानाला इजा करू शकले नाही. कारण हनुमान रामाचे नामस्मरण करत होते.

14. कुंभकरणच्या झोपेची कथा

एकदा श्रीब्रह्मदेवाने रावण, विभीषण आणि कुंभकर्ण या तिन्ही भावांना एक इच्छा विचारली. कुंभकर्णाची  बुद्धी आणि पराक्रम इंद्रदेवाला माहिती होती. त्यामुळे कुंभकर्णाने शाश्वत झोपेची इच्छा मागितली. रावणाला आपल्या भावाची दुर्दशा पाहता आली नाही आणि म्हणून ब्रह्मदेवाला आपल्या भावाची इच्छा परत घेण्याची विनंती केली. भगवान ब्रह्मदेव संपूर्ण इच्छा पूर्ववत करू शकले नाहीत, परंतु त्यांनी कुंभकर्ण अर्धे वर्ष झोपेल आणि उरलेले अर्धे वर्ष जागे राहील असे सांगितले. रामाशी युद्ध करताना कुंभकर्ण  झोपला होता, त्याला उठवण्याचे अनेक प्रयत्न झाले.

15. रामाच्या विजयाची कथा

रावणाने आपल्या विजयासाठी युद्धाच्या शेवटी यज्ञाचे आयोजन केले होते. परंतु त्यासाठी अशी एक अट  होती की यज्ञ चालू असताना रावण तेथून निघून जाऊ शकत नाही. जेव्हा रामाला या यज्ञाची माहिती मिळाली तेव्हा त्याने रावणाचे लक्ष विचलित करण्यासाठी अंगदला वानरांच्या टोळीसह पाठवले, परंतु सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. शेवटी अंगदने रावणाची पत्नी मंदोदरीला केसांनी ओढून त्याच्यासमोर नेले. मंदोदरी रावणाला मदतीची याचना करत राहिली, पण तो हलला नाही. राम आणि सीतेचे उदाहरण घेऊन मंदोदरीने रावणाची निंदा केली तेव्हा रावण यज्ञातून उठला आणि युद्धात पराभूत होऊन मारला गेला.

16. जेव्हा हनुमानाने श्रीरामांच्या आज्ञेचे पालन करण्यास नकार दिला

राज्याभिषेक सोहळ्यानंतर हनुमान दुःखी झाला. तो कोपऱ्यात डोळे मिटून भगवान रामाचे ध्यान करत बसला. त्याच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. हे सीतेच्या लक्षात आले आणि त्यांनी श्रीरामाला ह्याविषयीची माहिती दिली. रामाने हनुमानाला सांगितले की त्याच्या भक्तीच्या बदल्यात तो त्याला काहीही देऊ शकत नाही. फक्त त्याला सोबत घेऊन वैकुंठाला जाऊ शकतो. हनुमानाने श्रीरामांना विचारले की तो वैकुंठामध्ये श्रीरामांसोबत असेल का? त्यावर श्रीरामांनी होय असे उत्तर दिले, परंतु मी श्रीविष्णूच्या रूपात असेन असे श्रीराम म्हणाले.

“भगवान महाविष्णु कारण आहेत आणि श्रीराम परिणाम आहेत.”

हनुमानाने उत्तर दिले की, जिथे श्रीराम नसतील तिथे मी जाणार नाही असे उत्तर हनुमानांनी दिले आणि तो अयोध्येत परत येऊन  श्रीरामाचे ध्यान करत राहिला.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. रामायण मुलांना कोणता धडा शिकवते?

रामायण मुलांना चांगले कर्म करण्याचे आणि इतरांना मदत करण्याचे महत्त्व शिकवते. त्यांना चांगल्या मार्गाचे अनुसरण करण्यास प्रोत्साहित करते कारण शेवटी, चांगल्याचा विजय होतो आणि वाईटाचा पराभव होतो. मुलांनी श्रीराम आणि हनुमानाच्या कथा वाचल्यास त्यांना प्रेरणा मिळू शकते.

2. रामायण कथेतील प्रमुख पात्रे कोण आहेत?

दशरथ, राम, सीता, भरत, हनुमान, रावण, कौशल्या आणि लक्ष्मण ही रामायण कथेतील मुख्य पात्र आहेत.

3. मुलांसाठी सर्वोत्कृष्ट रामायण पुस्तके कोणती आहेत?

मुलांसाठी काही रामायण पुस्तके आहेत:

  1. कहानी पुरानी
  2. ज्युनिअर कुंभकर्ण
  3. टेल मी अबाऊट रामायणा
  4. लाइट्स फॉर द ब्लू प्रिन्स – अ स्टोरी ऑफ दिवाली
  5. रामायणा इन पिक्चर्स

रामायणातील या लघुकथांमध्ये उत्तम मूल्ये आणि धडे आहेत. या कथा तुमच्या मुलासाठी केवळ मनोरंजकच नाहीत, तर ह्या कथा त्यांना राम आणि रावण यांच्यातील युद्धात पराभूत झालेल्या विविध कथांबद्दल जाणून घेण्यास देखील मदत करतील. हिंदू पौराणिक कथा रंजक आहेत.  तुमच्या मुलांना हिंदू पौराणिक कथांबद्दल अधिक माहिती होण्यासाठी त्यांना कृष्ण कथा देखील तुम्ही सांगू शकता.

आणखी वाचा:

लहान मुलांसाठी श्रीगणेशाच्या रंजक बोधकथा
लहान मुलांसाठी श्रीकृष्णाच्या सर्वोत्तम कथा

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article