Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणातील सर्दीवर परिणामकारक घरगुती उपाय

गरोदरपणातील सर्दीवर परिणामकारक घरगुती उपाय

गरोदरपणातील सर्दीवर परिणामकारक घरगुती उपाय

गरोदरपणात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. सर्दीच्या इतर लक्षणांसह वाहणारे किंवा चोंदलेले नाक गर्भवती स्त्रियांना अस्वस्थ करते आणि औषधे घेणे देखील सुरक्षित मानले जात नाही. तथापि, नैसर्गिक उपाय करणे हा नक्कीच एक चांगला पर्याय आहे. पुढील लेखात, आपण गरोदरपणातील सर्दीसाठी सहज आणि सुरक्षित नैसर्गिक उपायांवर चर्चा करूया. ह्या उपायांचा तुम्हाला बरे वाटण्यासाठी तुम्ही प्रभावीपणे उपयोग करू शकता.

गरोदरपणातील सर्दीवर १५ नैसर्गिक उपाय

गरोदरपणात निरोगी राहण्याचा उत्तम मार्ग म्हणजे निरोगी जीवनशैली अंगीकारणे आणि संतुलित आहार घेणे. परंतु, जर तुम्हाला सर्दी झाली तर, गर्भवती असताना सर्दी आणि खोकल्यासाठी खालील घरगुती उपाय फायदेशीर ठरतील:

. नारळ तेल

नारळ तेल मोठ्या प्रमाणात अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्मांसाठी ओळखला जातो. नारळ तेलात ल्यूरिक ऍसिड असल्याने ते विषाणूभोवतीचा लिपिड लेप नष्ट करण्यास आणि व्हायरसच्या आवरणाचे विघटन करण्यास उपयुक्त ठरते. परिपक्वता रोखणे आणि विषाणूंची प्रथिने तयार होण्याचे कार्य प्रतिबंधित करते. नारळ तेल गरोदरपणात खूपच सुरक्षित असते आणि ते आतून व बाहेरून दोन्ही प्रकारे वापरले जाऊ शकते. थंडीपासून आराम मिळविण्यासाठी आपण कोणत्याही गरम पेयात एक चमचा खायचे नारळ तेल घालू शकता.

. लसूण

गरोदरपणात सर्दीपासून मुक्त करण्यासाठी लसूण चांगले कार्य करते. लसूण अँटीबैक्टीरियल, एंटीसेप्टिक आणि अँटीवायरल गुणधर्मांनी युक्त आहे आणि अशा प्रकारे लसूण सर्दी निर्माण करणार्‍या विषाणू आणि जिवाणूंचा सामना करण्यास मदत करते. काही वैद्यकीय अभ्यासानुसार, लसूण रक्तदाब कमी करते आणि रक्ताभिसरण चांगले ठेवते. गरोदरपणात कोलेस्ट्रॉलची पातळी राखण्यास देखील प्रभावी आहे. लसणामध्ये असलेले ऍलिसीन गरोदरपणात हे सर्व फायदे प्रदान करते.

लसूण

. आले

गरोदरपणात सर्दीसाठी एक उत्तम भारतीय घरगुती उपचार म्हणजे आले. हा मसाल्याचा पदार्थ उष्णता वाढवणारा म्हणून ओळखला जातो. आल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि संसर्गास कारणीभूत असलेले जिवाणू आणि विषाणूंशी लढण्यास मदत होते. तसेच आल्यामुळे तुम्हाला गरोदरपणात छातीत जळजळ होण्यापासून आराम मिळतो. आल्याचा एक छोटासा तुकडा किसून घ्या. पाण्यात उकळून त्यामध्ये मध आणि लिंबू घाला आणि प्या.

. ऍपल सायडर व्हिनेगर

ऍपल सायडर व्हिनेगर हा गरोदरपणातील सर्दी बरा करण्यासाठी एक अतिशय सुरक्षित आणि उपयुक्त उपाय आहे. ऍपल साइडर व्हिनेगरचे क्षारीय गुणधर्म विषाणूंकरिता प्रतिकूल वातावरण निर्माण करतात आणि अशा प्रकारे, त्यांचा नाश करतात. थंडीच्या अगदी सुरूवातीस किंवा गरोदरपणात सर्दीचे प्रथम लक्षण दिसताच ऍपल सायडर व्हिनेगर प्या. एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा ऍपल सायडर व्हिनेगर मिसळा. जास्तीत जास्त फायदे मिळविण्यासाठी तुम्ही ह्या मिश्रणाने आधी गुळण्या करून ते पिऊन टाकावे. तुम्ही दिवसातून दोन वेळा कोमट पाण्यात ऍपल सायडर व्हिनेगर पिऊ शकता.

. गरम चिकन सूप

गरोदरपणात सर्दीपासून मुक्त होण्याचा एक चवदार मार्ग म्हणजे गरम चिकन सूप. एंटीइंफ्लेमेटरी गुणधर्मांसह चिकन सूपमध्ये भरपूर प्रमाणात पोषण असते. चिकन सूप मध्ये आले, लसूण आणि लाल मिरची घाला, जे सूपला अधिक चांगले बनवते आणि सर्दीच्या लक्षणांचा सामना करण्यासाठी खरोखर चांगले कार्य करते.

गरम चिकन सूप

. मीठ पाणी

हे जितके सोपे वाटते तितकेच, सर्दीशी संबंधित विविध लक्षणे बरे करण्यास मीठ पाणी खूप प्रभावी आहे. मिठाचे पाणी आपल्या शरीरातून सर्दी खोकल्यास कारणीभूत जीवाणू आणि विषाणू बाहेर काढण्यास मदत करते. गरोदरपणात सर्दी आणि खोकला दूर करण्याचा हा एक अत्यंत सुरक्षित उपाय आहे. एक ग्लास गरम पाणी घ्या आणि त्यात अर्धा चमचा मीठ घाला. घसा खवखवण्यापासून आराम मिळविण्यासाठी ह्या द्रावणाने गुळण्या करा. तसेच चोंदलेल्या आणि भरलेल्या नाकापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही ह्या मिठाच्या पाण्याचे काही थेंब आपल्या नाकात सोडू शकता.

. कांदा

गरोदरपणात सर्दी आणि खोकला यावर कांदा हा सर्वात प्रभावी आयुर्वेदिक उपाय आहे. कांद्यामध्ये सल्फरिक संयुगे आणि क्वेर्सेटिन भरपूर प्रमाणात असतात आणि ते संक्रमणास कारणीभूत असलेले विविध प्रकारचे विषाणू आणि जिवाणू नष्ट करण्यास फायदेशीर ठरतात. तुम्ही कच्च्या स्वरूपात कांदे खाऊ शकता. हानीकारक जिवाणू किंवा विषाणू नष्ट करण्यासाठी तुम्ही तुमच्या पलंगाभोवती चिरलेले कांदे पसरवून ठेवू शकता. परंतु, काही गर्भवती स्त्रियांना कांद्याच्या वासामुळे खूप मळमळ होऊ शकते, म्हणूनच हा घरगुती उपाय वापरताना काळजी घ्या.

. मध आणि लिंबू

मध आणि लिंबू हे एक उत्कृष्ट संयोजन आहे जे गरोदरपणात थंडीपासून मुक्त होण्यासाठी उत्कृष्ट कार्य करते. एक ग्लास गरम पाणी घ्या आणि त्यात एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस घाला. चांगले मिसळा आणि हे मिश्रण दिवसातून तीन ते चार वेळा प्या. सर्दी होण्याची शक्यता असल्यास तुम्ही बरे झाल्यावर देखील हे पाणी पिऊ शकता. लिंबामधील व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते आणि मधातील सुखदायक गुणधर्मामुळे घसा खवखवणे कमी होते.

. भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ घ्या

गरोदरपणात स्वत: ला सजलीत ठेवणे फार महत्वाचे आहे आणि तुमच्या शरीरात पुरेसे द्रवपदार्थ असणे आवश्यक आहे. सर्दी झाल्यास तुमचे शरीर द्रव गमावते आणि गमावलेल्या द्रवाची भरपाई करण्यासाठी तुम्ही पाणी, आल्याचा चहा, लिंबू आणि मध चहा, मीठ पाणी, भाजी किंवा चिकन सूप किंवा ताज्या फळांचा रस पिऊ शकता.

१०. पुरेशी विश्रांती घ्या

जर तुम्हाला गरोदरपणात सर्दीचा त्रास होत असेल तर तुम्ही पुरेशी विश्रांती घेणे फार महत्वाचे आहे. आपल्या शरीरास संक्रमणास सामोरे जाण्यासाठी वेळ आणि उर्जा देण्यासाठी विश्रांती हा उत्तम मार्ग आहे. दिवसातून दोन ते तीन वेळा झोप घेतल्यास तुमच्या शरीरास भरपूर प्रमाणात विश्रांती आणि आराम प्रदान करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

११. वाफ घ्या

सर्दीमुळे होणारी श्लेष्मा साफ करण्यासाठी वाफ खूप प्रभावी आहे. गरम पाण्याच्या भांड्यातून थेट वाफ घ्या किंवा ह्युमिडिफायर वापरा. गरम पाण्यात काही नीलगिरीचे थेंब घातल्यास ते खरोखर चांगले कार्य करते. घसा खवख्यातून मुक्त होण्यासाठी वाफ घेणे देखील फायदेशीर आहे.

वाफ घ्या

१२. चांगले खा

अन्नामुळे तुमच्या शरीराला उर्जा मिळते आणि जेव्हा तुमचे शरीर कोणताही रोग किंवा आजाराविरूद्ध लढत असते तेव्हा अधिक ऊर्जा आवश्यक असते. एकाच वेळी खूप जेवण न घेता थोडे थोडे वारंवार खा. ताजी फळे आणि भाज्या, शेंगदाणे, मांस आणि दुग्धजन्य पदार्ध, संपूर्ण धान्य पुरेशा प्रमाणात खाल्ले पाहिजे ज्यायोगे तुम्हाला सर्दीशी लढा देण्यास उर्जा मिळेल.

१३. छातीवर लावण्यासाठी रब

बाजारामध्ये उपलब्ध असलेले छातीवर लावण्यासाठीचे रब, घसा आणि सायनस साफ करण्यास आणि छातीतील कफ दूर करण्यात उत्कृष्ट आहेत. तथापि, गर्भवती महिला तीव्र गंधास संवेदनशील असू शकतात आणि छातीवर लावल्यावर जाणवणारा थंडपणा त्यांना आवडत नाही. तथापि, ते वापरण्याचा आणखी एक मार्ग आहे, ज्याचा खरोखर उपयोग होतो. झोपण्यापूर्वी रब पायांना लावून त्यावर मोजे घाला. ह्यामुळे तुम्हाला खोकला आणि सर्दीपासून आराम मिळण्यास मदत होते.

१४. हलका व्यायाम

तुम्हाला वाटत असेल तर काही हलके व्यायाम करा. सक्रिय राहणे आपल्या शरीराला उबदार करते आणि तुम्हाला बरे करते आणि तुम्ही लवकर पूर्ववत होता. व्यायामामुळे प्रतिकारशक्ती देखील निर्माण होते, म्हणून गरोदरपणात काही सुरक्षित व्यायाम करून पहा.

१५. आपले डोके उंचावर ठेवा

नाक चोंदलेले असताना झोपल्यावर श्वास घेण्यास त्रास होतो. तुमचे डोके दोन किंवा तीन उश्या घेऊन उंचावर ठेवा जेणेकरून तुम्हाला रात्रीच्या वेळी श्वास घेण्यास सोपे जाईल आणि शांत झोप लागेल.

गरोदरपणात सर्दी झालेली असताना वर नमूद केलेले घरगुती उपचार खूप प्रभावी आहेत. या घरगुती उपचारांमुळे स्त्रियांवर वेगवेगळा प्रभाव पडू शकतो म्हणून तुमच्यासाठी योग्य असणारा घरगुती उपाय निवडा. तथापि, जर घरगुती उपायांचा उपयोग झाला नाही तर वैद्यकीय सल्ला घ्या.

आणखी वाचा:

गरोदरपणातील खोकल्यासाठी १० परिणामकारक घरगुती उपचार
गरोदरपणात छातीत जळजळ होणे: लक्षणे, कारणे आणि उपचार

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article