Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे गर्भधारणा: ९वा आठवडा

गर्भधारणा: ९वा आठवडा

गर्भधारणा: ९वा आठवडा

गर्भारपण हे आयुष्यातील मोठे वळण आहे. वैज्ञानिक प्रगतीमुळे तुम्ही तुमच्या गर्भारपणात प्रत्येक आठवड्याला बाळाचा विकास नक्की कसा होतोय ह्याची माहिती करून घेऊ शकता. गर्भारपणाचा ९ वा आठवडा हा तुमच्या गर्भारपणातील सर्वात महत्वाचा आठवडा आहे.

ह्या काळात तुमचे बाळ जे आतापर्यंत भ्रूण असते ते गर्भामध्ये विकसित होते. तुमचं बाळ आतापर्यंत पाण्यात वाटाणा ठेवल्यासारखे दिसत होते,  पण ९ व्या आठवड्यात ते माणसासारखे दिसू लागते.

गर्भारपणाच्या ९व्या आठवड्यातील तुमचे बाळ

तुमचे बाळ आता ऑलिव्ह किंवा द्राक्षाएवढे असते आणि बाळाचे वजन फक्त २ ग्रॅम इतके असते!

तथापि, ९ वा आठवडा हा गर्भारपणाचा महत्वाचा टप्पा असतो कारण तुमचं बाळ आता भ्रूण नसून त्याचे गर्भात रूपांतर झाले आहे. भ्रूणावस्थेत मेंदू आणि हृदय यासारखे महत्वाचे अवयव तयार झालेले असतात. परंतु गर्भावस्थेत ते विकसित होतात! आता डोळे (पण पापण्या नसलेले), स्नायू आणि मज्जातंतू तयार होण्यास सुरुवात होते.

बाळाचा आकार केवढा असतो?

बाळाचा आकार केवढा असतो?

जेव्हा तुम्ही ९ महिन्यांचे गरोदर असता तेव्हा बाळाचा आकार फक्त १ इंचाएवढा असतो. जरी बाळाचे शरीर आणि महत्वाचे अवयव तयार होण्यास सुरुवात झालेली असली तरीही बाळ जेमतेम चेरी एवढे वाटते आणि अजूनही बाळाचे वजन हे २ ग्रॅम्स पेक्षा कमी असते.

शरीरात होणारे बदल

तुमचे बाळाचे रूपांतर भ्रूणातून गर्भात झाल्यामुळे तुम्ही तुमच्या शरीरात बदल अनुभवू शकता.

काही स्त्रियांना कंबरेकडचा भाग जाड झाल्यासारखा वाटेल. तुमचे स्तन आता आणखी हळुवार आणि दुखरे होतील. तुमच्या वजनात जास्त फरक पडणार नाही, परंतु काही जणींना मळमळ आणि उलट्यांचा त्रास होईल आणि त्यामुळे वजन कमी झाल्याचा अनुभव येईल.

९व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

गर्भारपणाच्या ९व्या आठवड्यात काही सामान्य लक्षणे दिसतात ती खालीलप्रमाणे,

  • मनःस्थितीत बदल: गरोदरपणात संप्रेरकांच्या पातळीत होणाऱ्या बदलांमुळे मनःस्थितीत बदल होत असतात.
  • नाक चोंदणे: प्रोजेस्टेरॉन च्या वाढलेल्या पातळीमुळे नाकाला आतील बाजूस सूज आल्यामुळे नाक चोंदले जाते.
  • थोडेसे पोट फुगल्यासारखे वाटणे: प्रोजेस्टेरॉन ची वाढलेली पातळी, पचनसंस्थेवर परिणाम करते आणि त्यामुळे पोट फुगल्यासारखे वाटते.

गर्भधारणेच्या ९व्या आठवड्यात पोटाचा आकार

तुमच्या पोटाच्या आकारात फारसा फरक पडलेला नाही, आणि ते तुम्ही गरोदर राहण्याच्या आधी जसे होते साधारण तसेच दिसते. जर तुमचे वजन खूप जास्त वाढलेले असेल तर तुम्ही गर्भार आहात हे थोडे समजू शकते. अर्थात, तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या कंबरेकडचा भाग थोडा लठ्ठ झाला आहे. गर्भाशयाची वाढ होऊ लागल्याने तुमचे पोट मजबूत असणे जरुरीचे आहे. काही स्त्रियांचे वजन कमी होते. हे खूप सामान्य आहे कारण तुमचे जे काही खाल ते उलटी द्वारे बाहेर पडते.

गर्भधारणेच्या ९व्या आठवड्यातील सोनोग्राफी

गर्भधारणेच्या ९व्या आठवड्यातील सोनोग्राफी

गर्भारपणातील हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे कारण तुम्हाला तुमचे डॉक्टर अल्ट्रासाऊंड करण्यास सांगू शकतात आणि तुम्हाला तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू येतील!

तसेच ह्या अल्ट्रासाऊंड मुळे तुम्हाला गर्भविषयी महत्वाची माहिती मिळेल उदा: भ्रूणाची अवस्था, गर्भाशय आणि महत्वाचे म्हणजे गर्भारपणाचा काळ. जर सगळं नॉर्मल असेल तर तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके १३०-१५० इतके असतील. तसेच अल्ट्रासाऊंड मुळे बाळाची हालचाल सुद्धा समजते. तुम्हाला तुमच्या बाळाची हालचाल पोटामध्ये जाणवण्याची अजून वेळ आहे.

आहार कसा असावा?

आहार कसा असावा?

गर्भारपणात स्त्रियांना २ प्रकारच्या टोकाच्या भावना असतात, एकतर खूप मळमळ किंवा उलट्या नाहीतर जंक फूड किंवा चमचमीत खावेसे वाटते. किंबहुना काही आई होणाऱ्या स्त्रियांमध्ये काही वेळा आजारपणामुळे वजनात घट होते.

तुमच्या गर्भारपणाच्या ९ व्या आठवड्यात तुम्ही तुमचा आहार दिवसातून ६ वेळा घ्या, कारण एकाच वेळी सगळे खाल्ल्यास तुम्हाला उलटी होण्याची शक्यता असते. तुम्ही तुमचा नेहमीचाच आहार घ्या परंतु त्यामध्ये प्रथिने, पौष्टिक भाज्या आणि फळांचा समावेश करा. तुम्ही नाश्त्याच्या वेळी सुकामेवा घेत आहेत ना ह्याची खात्री करा कारण प्रथिनांचा तो एक उत्तम स्रोत आहे.

तुम्ही आरोग्यपूर्ण आहार घ्या. खूप गोड़ किंवा उग्र वास असलेले पदार्थ खाऊ नका कारण त्यामुळे तुम्हाला उलटी होऊ शकते.

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स

इथे काही टिप्स दिल्या आहेत त्या तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत.

हे करा

  • थोड्या थोड्या वेळाने पौष्टिक अन्न खा, त्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियमित राहील.
  • खूप पाणी प्या आणि सजलीत रहा.
  • ध्यानधारणा आणि योगाचे काही सोपे प्रकार करा, ज्यामुळे संप्रेरकांमुळे शरीरावर होणारे नकारात्मक परिणाम कमी होतील.

हे करू नका

  • रेडिएशन टाळा कारण त्यामुळे तुमच्या बाळावर परिणाम होऊ शकतो.
  • खूप व्यायाम करू नका त्यामुळे निर्जलीकरणाचा (Dehyadration) धोका उद्भवू शकतो.
  • कॅफेन घेणे टाळा कॅफेनमुळे नीट झोप लागत नाही (Insomnia).
  • कच्च्या दुधाची उत्पादने आणि पाश्चराईझ न केलेले दूध वापरणे बंद केले पाहिजे कारण अशा दुधामध्ये जिवाणू असू शकतात आणि त्यामुळे संसर्ग आणि फूड पॉयझनिंग होऊ शकते.

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट तुम्ही घेतली पाहिजे आणि ती म्हणजे आरामदायक ब्रा. आधीच तुमचे स्तन हळुवार झालेले आहेत आणि त्यांचा आकार अजूनही वाढणार आहे त्यामुळे आरामदायक ब्रा घ्या.

जर तुम्ही अजूनही गर्भारपणाविषयी ची पुस्तके विकत घेतली नसतील तर ती विकत घ्या त्यामुळे तुमचा मळमळ आणि थकव्यापासून थोडे दुर्लक्ष होईल होते. बऱ्याच स्त्रियांसाठी हा सैल कपडे, नवीन पँट्स खरेदी करण्याचा काळ आहे.

तुम्हाला खूप आरामाची गरज असते आणि तुम्हाला काही वेळा अस्वस्थता जाणवेल, त्यामुळे तुम्ही काही आरामदायी उशा आणून ठेऊ शकता. तोंडाची आणि दातांची काळजी घेणे हे सर्वात महत्वाचे आहे, तुमची चांगले टूथब्रशेस आणि माऊथवॉश आणून ठेऊ शकता, कारण तुमचे तोंड ह्या काळात कोरडे पडते.

तुमची त्वचा खूप कोरडी पडेल त्यामुळे चांगले मॉइश्चरायझर आणून ठेवा, जर तुम्हाला वासाची संवेदना असेल तर वास नसलेली उत्पादने घ्या.

तुमच्या गर्भारपणाच्या ९व्या महिन्यात जरी तुम्ही गरोदर दिसत नसलात तरीही तुम्हाला मॉर्निंग सिकनेस, डोकेदुखी तसेच गरोदरपणाची इतर लक्षणे दिसण्यास सुरुवात होईल. तुमचे शरीर संप्रेरके तयार करण्यात कार्यरत असते. त्यामुळे बाळाला पूरक वातावरण तयार होते.

मागील आठवडा: गर्भधारणा: ८वा आठवडा

पुढील आठवडा: गर्भधारणा: १०वा आठवडा

संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article