Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अन्न आणि पोषण बाळांसाठी जायफळ – फायदे आणि कसे वापरावे?

बाळांसाठी जायफळ – फायदे आणि कसे वापरावे?

बाळांसाठी जायफळ – फायदे आणि कसे वापरावे?

आपल्याला अन्नात मसाला घालण्यास आवडते कारण ते अन्नास नवजीवन देते (आणि ते चवदार बनवते). आपण वापरत असलेल्या विविध मसाल्यांमुळे अन्नपदार्थाला चव तर येतेच पण त्याचे विविध औषधी गुणधर्मसुद्धा असतात. आयुर्वेदानुसार, विविध वैद्यकीय समस्या बऱ्या करण्यास वेगवेगळ्या औषधी वनस्पती आणि मसाले मदत करतात. काही लोक बाळांना ते देण्याची शिफारस करतात असा एक मसाल्याचा पदार्थ ज्यामुळे आपल्या बाळाला फायदा होऊ शकेल तो म्हणजे जायफळ. होय, जायफळ आपल्या लहान बाळासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. आपण हा सुगंधित मसाला कसा वापरू शकता आणि आपल्या बाळाला याचा काय फायदा होईल याबद्दल आपण विचार करत असाल तर तुम्ही पुढील लेख वाचण्याची आमची शिफारस आहे.

जायफळ म्हणजे काय?

जायफळ एक सुगंधित आणि उबदार मसाला आहे जो जायफळाच्या झाडापासून मिळवला जातो. हा सुगंधित मसाला आता जगभरात विविध पाककृतीमध्ये वापरला जातो आणि त्याचे औषधी गुणधर्म सुद्धा आहेत. खाद्यपदार्थांचा मसाला तयार करण्यासाठी आणि विविध वैद्यकीय आजार बरे करण्यासाठी शतकानुशतके भारतीय संस्कृतीत त्याचा उपयोग होत आहे. बाळासाठीही त्याचे बरेच फायदे आहेत असे मानले जाते.

बाळाच्या आहारात जायफळ केव्हा समाविष्ट करावे?

आईने बाळाला घन आहार देण्यास सुरुवात केल्यास जायफळ (जैफल) बाळाच्या आहारात जोडले जाऊ शकते. तथापि, तुम्ही तुमच्या बाळाच्या आहारात कोणताही मसाल्याचा पदार्थ समाविष्ट करण्याआधी किमान सहा महिने वाट पाहणे चांगले होईल. मसाले मुलांसाठी बर्‍याच वेळा सुरक्षित असतात, परंतु कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी अन्नप्राशनविधीच्या वेळी तो देण्याची शिफारस करतात. बाळ सहा महिन्यांचे होईपर्यंत तुम्ही थांबणे गरजेचे आहे.

बाळाच्या आहारात जायफळ केव्हा समाविष्ट करावे?

जायफळाचे पौष्टिक मूल्य

जर आपल्याला या सुगंधित मसाल्याचे पौष्टिक मूल्य जाणून घ्यायचे असेल तर खालील सारणी पहा. या टेबलमध्ये नमूद केलेली मूल्ये १०० ग्रॅम जायफळमधील अंदाजे मूल्ये आहेत

पोषण मूल्य
कॅलरी ५२५
एकूण चरबी ३५ ग्रॅम
कोलेस्टेरॉल
साखर २८ ग्रॅम
आहारातील फायबर २० ग्रॅम
कॅल्शियम
लोह ३ मिलिग्रॅम
फॉस्फरस २१० मिलिग्रॅम
पोटॅशियम ३५१ मिलिग्रॅम
जस्त .३ मिलीग्रॅम
फोलेट ७५ मसीजी
रिबॉफ्लेविन ५५ मसीजी
व्हिटॅमिन सी ३ मिलिग्रॅम
व्हिटॅमिन ए १०० आय

जायफळाचे बाळांच्या आरोग्यासाठी फायदे

जायफळ आपल्या छोट्या बाळास विविध प्रकारचे आरोग्यविषयक फायदे देऊ शकते आणि जर आपण आपल्या बाळास नियमितपणे जायफळ दिले तर बाळास बराच फायदा होऊ शकतो. काही फायदे खालीलप्रमाणे आहेतः

. पोटाच्या समस्या दूर ठेवते.

आपल्या बाळाला जायफळ देणे त्याच्या पोटासाठी फायद्याचे ठरू शकते. बाळांना गॅस किंवा पोटशूळ होण्याची शक्यता असते. पण जायफळाचा त्याच्या आहारामध्ये समावेश केल्यास अशा समस्या कमी होऊ शकतात. जायफळ बाळाच्या पोटातील पेटके किंवा वेदना दूर करण्यात देखील मदत करू शकते.

. यामुळे बाळास चांगली झोप लागण्यास मदत होते.

बर्‍याच काळापासून माता प्रभावीपणे आपल्या बाळांसाठी जायफळ वापरत आहेत कारण हा सुगंधित पदार्थ बाळाला चांगली झोप लागण्यास मदत करतो. जेव्हा तुम्ही हा मसालेदार पदार्थ आपल्या बाळाच्या दुधात मिसळता तेव्हा आपल्या बाळास शांत वाटू शकते आणि तो शांत झोपू शकतो. तसेच, जायफळाचा वापर पोटाच्या समस्या कमी करण्यासाठी फायदेशीर आहे, पोटाच्या समस्येमुळे कधीकधी बाळाच्या झोपेत अडथळा येऊ शकतो.

यामुळे बाळास चांगली झोप लागण्यास मदत होते.

. अपचनाची समस्या दूर होऊ शकते.

लहान बाळांची पचनसंस्था पूर्णपणे परिपक्व नसल्याने त्यांना अपचन होऊ शकते. तुम्ही तुमच्या बाळाच्या आहारामध्ये विविध प्रकारच्या घन पदार्थांचा समावेश करता तेव्हा त्याची अपरिपक्व पचनसंस्था सहजपणे कार्य करू शकत नाही आणि त्याला पोटदुखी, गॅस किंवा अतिसार देखील होऊ शकतो. बाळांना अतिसारासाठी जायफळ देणे ह्या आजाराच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी प्रभावी ठरू शकते.

. सर्दी आणि खोकल्यावर उपचार करण्यासाठी मदत करू शकते.

हा अभूतपूर्व मसाला शरीराला उबदारपणा प्रदान करतो आणि अशा प्रकारे बाळांमध्ये सर्दी आणि खोकल्याच्या लक्षणांवर उपचार करण्यात मदत होते. बाळाच्या सर्दीसाठी जायफळ देणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे

बेबी फूडसाठी जायफळ कसे निवडावे आणि संग्रहित कसे करावे?

जेव्हा जेव्हा आपल्या लहान बाळासंबंधित कोणतीही गोष्ट असते तेव्हा आपल्याला ती सर्वोत्कृष्ट हवी असते. आणि जेव्हा आपण आपल्या बाळासाठी जायफळ खरेदी करण्याचा विचार करता तेव्हा आपल्याला उत्कृष्ट दर्जेदार जायफळ हवे असते म्हणूनच आम्ही शिफारस करतो की आपण बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही गोष्टीच्या तुलनेत सेंद्रिय प्रकार खरेदी करा. तसेच, शक्यतो नवीन जायफळ खरेदी करा कारण या मसाल्याचा चव आणि सुगंध काळानुसार कमी होतो. आकाराकडेही लक्ष द्या, आकार जितका मोठा असेल तितके चांगले.

हा सुगंधित मसाला साठवण्यासाठी आम्ही शिफारस करतो की तुम्ही तो हवाबंद डब्यात, शक्यतो काचेच्या भांड्यात साठवा. आधी सांगितल्याप्रमाणे हा मसाला त्याच्या विलक्षण सुगंध आणि चवीसाठी वापरला जातो आणि जेव्हा जायफळ जास्त काळ हवेच्या संपर्कात येते तेव्हा हे दोन्ही गुण गमावतात. आपला संग्रहित मसाला तपासत रहा; जर तुम्हाला असे वाटले की फ्रेश सुगंध आणि चव राहिली नाही तर नवीन जायफळ आणण्याची वेळ झाली आहे असे समजा.

आपल्या बाळाला जायफळ कसे द्यावे?

ह्या मसाल्याच्या पदार्थाचे विविध आरोग्यविषयक फायदे जाणून घेतल्यानंतर आम्हाला माहित आहे की आपल्या बाळाच्या आहारात ह्या पदार्थाचा समावेश करण्याचं मोह तुम्हाला झालेला असावा. आपल्या बाळाच्या आहारात ह्याचा समावेश करण्याआधी प्रथम तो बारीक दळणे आवश्यक आहे. त्यासाठी एक दगड किंवा सहाण घ्या आणि स्वच्छ धुवा. नंतर जायफळ धुवून स्वच्छ करा, आता दगडावर दूध किंवा पाण्याचे काही थेंब घाला आणि त्यावर जायफळ गोलाकार किंवा पुढे मागे फिरवा. काही मिनिटांत, आपल्याला पेस्ट सारखी सुसंगतता मिळाली पाहिजे. आपण ही पेस्ट चमच्यामध्ये घेऊ शकता आणि आपल्या बाळाचे दूध, लापशी, तृणधान्ये इत्यादीत घालू शकता.

आपल्या बाळाला जायफळ कसे द्यावे?

शिफारस केलेला डोस किती आहे?

बाळांसाठी जायफळचे खूप फायदे आहेत. तथापि, जेव्हा आपल्याला बाळाची काळजी वाटते तेव्हा आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आपल्या बाळाचे वय सहा महिने होईपर्यंत तुम्ही जायफळ किंवा इतर कोणतेही खाद्यपदार्थ किंवा पेय बाळाला देऊ नये. जर आपल्या बाळाचे वय सहा महिन्यांपेक्षा जास्त असेल तर आपण उन्हाळ्यामध्ये दिवसातून एकदा ०. ५ मिग्रॅ जायफळ आणि हिवाळ्यात दिवसातून दोनदा ०.५ मिग्रॅ देऊ शकता. तथापि, आपल्या बाळाच्या बालरोगतज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच जायफळ बाळाच्या आहारात समाविष्ट करा.

जायफळ आपल्या बाळाला देताना घ्यावयाची खबरदारी

बाळाच्या आहारात हा जायफळ घालण्यापूर्वी आपण पुढील खबरदारी घ्यावी:

  • वापरण्याआधी जायफळ स्वच्छ धुवून घ्या जेणेकरून त्यावरील घाण आणि धुळीपासून सुटका होईल.
  • बाळासाठी जायफळाचे अनेक फायदे आहेत ह्यात काही शंका नाही परंतु शिफारस केलेल्या डोसपेक्षा कधीही जास्त देऊ नका.
  • जायफळ बारीक करून घ्या जेणेकरून आपल्या बाळाच्या घशात त्याचे तुकडे अडकणार नाहीत.
  • काही मुलांना जायफळाची ऍलर्जिक प्रतिक्रिया येऊ शकते, जर तुमच्या बाळाला ऍलर्जी असेल तर हा मसाला त्याला पुन्हा देणे टाळा.
  • जायफळामुळे शरीरात उष्णता निर्माण होते, पण काही मुलांना हा बदल सहन होत नाही म्हणून लक्षणे पहा आणि ह्या मसाल्याचा वापर थांबवा.

बऱ्याच नवीन माता आपल्या मुलांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी जायफळ वापरतात. तथापि, आम्ही शिफारस करतो की तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच बाळाच्या आहारात जायफळाचा समावेश करा. प्रत्येक बाळ वेगळे आहे आणि म्हणूनच ते विविध पदार्थ आणि मसाल्यांवर भिन्न प्रतिक्रिया देऊ शकते म्हणून सावधगिरी बाळगा!

आणखी वाचा:

केळं बाळांसाठी चांगले आहे का?
बाळांसाठी नाचणी – आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article