In this Article
अभिनंदन, तुमचे बाळ आता ४४ आठवड्यांचे झाले आहे! काळ किती वेगाने पुढे सरकतो, नाही का? ४४ व्या आठवड्यात, आपली आवडती खेळणी मागण्यासाठी तुमचे बाळ आता वेगवेगळे शब्द बोलू लागलेले असेल. तो ‘दादा’ किंवा ‘मम्मा’ असेहीम्हणू लागतो. ह्या वयात तुमचे बाळ आता स्वतंत्रपणे उभे राहू लागेल आणि चालू लागेल. आता बाळ आत्मविश्वासाने फर्निचरच्या बाजूने फिरेल, रांगेल आणि बसेल. त्याच्या पहिल्या वाढदिवसाला आता फक्त आठ आठवडे बाकी आहेत!
४४ आठवड्यांच्या बाळाचा विकास
बाळ ४४ आठवड्यांचे होईपर्यंत, बाळाचा शब्दसंग्रह विकसित होईल. तो आता जास्त वेळ बडबड करू लागेल. त्याच्या आवडत्या व्यक्ती किंवा वस्तू दाखवण्यासाठी आवाज करू लागेल. तुमच्या बाळाशी बोलत राहा आणि वाचत राहा जेणेकरुन त्याच्या भाषेचा पाया पक्का होईल. तुमच्या ४४–आठवड्याच्या बाळाशी योग्य संभाषण करणे तुम्हाला मूर्खपणाचे वाटत असले तरी आमच्यावर विश्वास ठेवा. तो तुमचे बोलणे ऐकत असेल आणि माहिती त्याच्या मेंदूत साठवून ठेवेल! जर तुम्ही तुमच्या बाळाला बाटलीने दूध पाजत असाल, तर त्याचे बाटलीतून दूध पिणे बंद करण्याची हीच वेळ आहे. तुम्ही त्याला २४ महिन्यांपर्यंत स्तनपान करू शकता,परंतु बाटलीतून दूध देणे मात्र तुम्ही बाळ १२ महिन्यांचे होईपर्यंतच करू शकता, त्यामुळे तुम्ही तुमच्या बाळाच्या आहाराचे वेळापत्रक आणि वर्तनाच्या आधारे त्याची बाटली सोडवण्याचे प्रयत्न करू शकता. खरंच, बाटलीचे दूध सोडवण्यासाठी आणि आहारामध्ये घन पदार्थ वाढवण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. बाळाला ३ वेळा जेवण आणि २ वेळा स्नॅक देताना घरगुती अन्न द्या.
आणखी वाचा: तुमच्या १० महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास
४४–आठवड्याच्या बाळाचे विकासात्मक टप्पे
४४–आठवड्याच्या बाळाचे विकासाचे टप्पे खाली दिलेले आहेत त्यावर तुम्ही लक्ष ठेवू शकता
- तुमचे बाळ रडण्याव्यतिरिक्त इतर मार्गांनी त्याला काय हवे आहे हे सूचित करेल.
- तुमचे बाळ कपमधून स्वतःचे स्वतः पाणी पिऊ लागेल.
- जर तुम्ही बाळाकडे चेंडू टाकला तर बाळ पुन्हा तुमच्याकडे तो फेकेल.
- तुमचे बाळ ‘मामा‘ किंवा ‘दादा‘ असे शब्द स्पष्ट बोलेल.
- तुमचे बाळ त्याचा अंगठा आणि तर्जनी यांच्यामध्ये एखादी वस्तू उचलण्यास सक्षम असेल.
- तुमचे बाळ एका ओळीच्या सूचना आणि हावभावांना प्रतिसाद देऊ लागेल. उदाहरणार्थ, तुमचा हात धरून तो तुम्हाला ‘ते मला द्या‘ असे सांगू शकेल.
- तुमचे बाळ कदाचित एकटे उभे राहू लागेल.
- तुमचे बाळ चालायला सुरुवात करू शकेल.
- तुमचे बाळ बडबड करण्यात तरबेज होईल.
- तुमचे बाळ पुढे पाऊल टाकण्यासाठी रोलिंग स्टूल सारख्या फर्निचरचा वापर करेल.
आणखी वाचा: १० महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे
बाळाला आहार देणे
तुमचे ४४–आठवड्याचे बाळ आता बाटली सोडून कपचा वापर करू लागेल आणि फॉर्म्युला दूध सोडून गाईचे दूध पिण्यास सुरुवात करेल. तुमच्या बाळाला सकाळी, मध्यरात्री, दुपारी, मध्यान्हीला, रात्री आणि मध्यरात्री जेव्हा जाग येईल तेव्हा तो फॉर्मुला दूध घेऊ शकतो. तुम्ही बाळाला कपमधून फॉर्मुला देऊ शकता. तुमचे बाळ बाटलीच्या तुलनेत कपतून कमी दूध पिऊ शकते, पण ते ठीक आहे. पुढील दोन महिन्यांमध्ये दुधाचे प्रमाण कमी करण्याचे तुमचे ध्येय आहे.
जेवणाच्या वेळी, तुम्ही बाळाला कपमधून पाणी देऊ शकता. जर त्याला मध्यरात्री दूध पिण्याची सवय असेल, तर त्याचे दूध सोडणे कठीण होईल, परंतु तुम्ही त्याचे लक्ष विचलित करण्यासाठी आरामदायी वस्तू त्याला देऊन त्याच्या झोपेच्या दिनचर्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू शकता, हळूहळू तुमच्या बाळाला बाटलीशिवाय झोप लागण्याची सवय होईल. १ वर्षापर्यंत, तुमच्या बाळाने दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांच्या दररोज ४–६ सर्व्हिंगसह घन पदार्थ खाणे आवश्यक आहे. तुमचे बाळ १२ महिन्यांचे झाल्यावर फॉर्म्युला ऐवजी फुल क्रीम दूध द्या. कमी चरबीयुक्त दुधामध्ये (आणि उत्पादने) जास्त साखर असते आणि त्यामुळे ते टाळले पाहिजे
आणखी वाचा: १० महिन्याच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे विविध पर्याय
बाळाची झोप
झोपेच्या वेळी तुम्ही तुमच्या बाळाला बाटलीने दूध पाजत नसाल, तर त्याला बरे वाटण्यासाठी एखादी वस्तू द्या. जर तुम्ही तुमच्या बाळाला झोपायला मदत करण्यासाठी पॅसिफायर दिले आणि मध्यरात्री ते त्याच्या तोंडातून बाहेर पडले तर ते पुन्हा तोंडात घालणे हे एक आव्हान असेल. परंतु चांगली गोष्ट अशी आहे कि तुमचे बाळ ८ महिन्यांचे झाल्यावर ते स्वतःहून शिकेल. त्याच्या हातात पॅसिफायर परत ठेवून आणि त्याचा हात त्याच्या तोंडाकडे नेऊन पॅसिफायर तोंडात कसे घालायचे हे तुम्ही त्याला दाखवू शकता. असे वारंवार करा, आणि तो ते स्वतः करायला शिकेल. ह्या वयात तुमचे बाळ जास्त वेळा बोलत असेल आणि वेगवेगळे आवाज काढत असेल त्यामुळे फक्त झोपताना पॅसिफायरचा वापर करा कारण इतर वेळी पॅसिफायरमुळे त्याच्या तोंडात अडथळा येईल आणि त्याला नवीन शब्द वापरण्यापासून प्रतिबंधित करेल. तसेच, तुमचे बाळ दोन वर्षांचे झाल्यावर पॅसिफायर वापरणे बंद करा कारण त्यामुळे बाळाच्या दातांना त्रास होऊ शकतो.
४४–आठवड्याच्या बाळाची काळजी कशी घ्यावी ह्यासाठी टिप्स
खाली काही उपाय दिलेले आहेत ज्यादारे तुम्ही तुमच्या ४४ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेऊ शकता:
- तुमच्या बाळाला फॉर्म्युला किंवा गायीचे दूध दिल्यानंतर त्याचे दात व्यवस्थित घासावेत. झोपेच्या वेळी बाळाच्या दाताभोवती दूध साठल्याने दात किडण्यासाठी एक उत्तम वातावरण तयार होते, म्हणून झोपण्यापूर्वी तुमच्या बाळाचे दात घासणे हा नित्यक्रम बनवा.
- तुमच्या बाळाला चालायला मदत करण्यासाठी तुम्ही कदाचित ‘चालायला मदत करणारी‘ खेळणी वापरत असाल, परंतु ही खेळणी तुमच्या लहान बाळाची गरज बनवू नका. त्याची हालचाल आणि स्नायू बळकट करण्यासाठी त्याला चालू द्या.
- तुमच्या बाळाला कधीही पाण्यात म्हणजेच बाथटब मध्ये एकटे सोडू नका, बाथटबमध्ये पाणी उथळ असले तरी, त्यात तुमच्या बाळाला एकटे सोडू नका कारण त्यात नेहमीच बुडण्याचा धोका असतो.
- बाथरूमचे दरवाजे बालरोधक असलेल्या हँडलने सुसज्ज करा जेणेकरून तुमचे बाळ आत जाऊ शकणार नाही. टॉयलेटच्या जागा नेहमी बंद करा.
- तुमच्या स्नानगृहाभोवती नॉन–स्किड मॅट्स ठेवा जेणेकरून तुमचे बाळ घसरून पडणार नाही.
- जेव्हा तुमचे बाळ धोकादायक परिस्थितीत दिसते तेव्हा ‘नाही‘ शब्द वापरा. असे केल्याने तुमच्या बाळाला शब्दाचे वजन आणि त्याचा अर्थ समजण्यास मदत होईल.
- जेव्हाही तुमचे बाळ स्ट्रोलरमध्ये, कारच्या सीटवर किंवा उंच खुर्चीवर बसलेले असेल तेव्हा नेहमी पट्टा घाला.
चाचण्या आणि लसीकरण
सहसा, तुमच्या बाळाचे डॉक्टर या टप्प्यावर तुमच्या बाळाची कोणतीही वैद्यकीय तपासणी करत नाहीत. परंतु, काही चाचण्या केल्या जाऊ शकतात.
१. चाचण्या
तुमच्या बाळाचे डॉक्टर तुमच्या बाळाची रक्त तपासणी करू शकतात, जर त्याला अॅनिमिया किंवा इतर विकारांची लक्षणे दिसली तर त्याचे हिमोग्लोबिन/शिसे/लोह पातळी तपासण्यासाठी ह्या चाचण्या केल्या जातात.
२. लसीकरण
६ ते १८ महिन्यांच्या दरम्यान, तुमच्या बाळाला आयपीव्ही (पोलिओ) लसीचा तिसरा डोस आणि हिपॅटायटीस बी लसीच्या अंतिम डोसची आवश्यकता असेल.
खेळ आणि उपक्रम
तुम्ही ४४ आठवड्यांच्या तुमच्या बाळासोबत खालील खेळ आणि क्रियाकलाप खेळू शकता. हे खेळ आणि उपक्रम त्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देतील.
१. लपवा आणि शोधा
हा खेळ तुमच्या बाळाला विभक्त होण्याची चिंता दूर करण्यास मदत करेल कारण तो तुम्हाला पाहू शकत नसतानाही तुम्ही जवळ आहात हे त्याला समजेल. परंतु, आपल्या बाळाला जास्त काळ एकटे सोडू नका.
२. चेंडू खेळा
तुमच्या बाळाच्या बाजूला बसा आणि बाळासोबत चेंडू खेळा. तुम्ही त्याला चेंडू परत तुमच्याकडे टाकण्यास शिकवू शकता, अशा प्रकारे तो खेळाचा आनंद घेईल आणि त्याची मोटर कौशल्ये देखील विकसित होतील.
३. पॉइंट गेम
तुमच्या बाळाला चित्राच्या पुस्तकातील गोष्टी दाखवून बाळाला नाव सांगण्यास सांगा. तुमच्या बाळाला त्रास होत असल्यास तुम्ही त्यांची नावे शिकवू शकता.
४. पॅटी केक गेम
तुमच्या बाळाला पॅटी केक खेळातील हाताच्या हालचाली आणि हावभाव शिकवा. हा खेळ त्याच्या हातांचे समन्वय कौशल्य विकसित करण्यात मदत करेल.
५. धावा आणि पाठलाग करा
तुमच्या बाळाच्या मागे धावून त्याला पकडण्याचा प्रयत्न करा किंवा त्याला तुम्हाला पकडण्यास सांगा. असे केल्याने त्याचे मोटर कौशल्य सुधारेल. परंतु, खूप वेगाने धावू नका!
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
आपण खालील परिस्थितींमध्ये डॉक्टरांचा सल्ला घ्यावा:
- काहीवेळा तुमचे बाळ हवी ती गोष्ट मिळण्यासाठी तांडव करेल आणि त्यामुळे त्याचा श्वास कोंडला जाऊ शकतो. परंतु, तुम्ही हार मानू नका कारण त्याला काही हवे असल्यास असे करण्याची त्याला वाईट सवय लागेल. तुम्ही एकदा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता कारण काहीवेळा लोहाची पूरक औषधे दिल्याने बाळाचे असे वागणे कमी होऊ शकते.
- जर तुमचे बाळ लहान असताना पडले आणि त्याच्या डोक्याला सूज आली, कापले किंवा जखम झाली किंवा पुढचा दात तुटला तर तुम्ही डॉक्टरांचा किंवा दंतचिकित्सकाचा सल्ला घ्यावा.
लहान मुलांचे डोके प्रौढांपेक्षा जास्त जाड असते, त्यामुळे तुमचे ४४–आठवड्याचे बाळ पडल्यास आणि डोक्याला लागले तर खूप काळजी करण्याची गरज नाही. बाळाला मिठी मारून किंवा स्तनपान देऊन बाळ शांत होऊ शकते!