Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य ख्रिसमस 2023: नाताळ सणासाठी 110 सर्वोत्तम शुभेच्छासंदेश, मेसेजेस आणि कोट्स

ख्रिसमस 2023: नाताळ सणासाठी 110 सर्वोत्तम शुभेच्छासंदेश, मेसेजेस आणि कोट्स

ख्रिसमस 2023: नाताळ सणासाठी 110 सर्वोत्तम शुभेच्छासंदेश, मेसेजेस आणि कोट्स

नाताळचा सण आता (ख्रिसमस) जवळ आला आहे. तुम्हाला आणि तुमच्या मुलांना कदाचित मित्रमैत्रिणीसाठी आणि कुटुंबातील सदस्यांसाठी सुंदर ख्रिसमस कार्ड बनवायचे असतील किंवा त्यांना ख्रिसमसचे संदेश पाठवायचे असतील. तुम्हाला नाताळच्या शुभेच्छांसाठी मदत हवी असल्यास, आम्ही येथे तुमच्या मदतीसाठी आहोत! आमच्याकडे काही छान ख्रिसमस कोट्स आणि शुभेच्छासंदेश आहेत. तुम्ही किंवा तुमचे मूल हे शुभेच्छासंदेश प्रियजनांना पाठवलेल्या कार्डवर लिहू शकाल. तुम्ही त्यांना या नाताळच्या शुभेच्छा देखील पाठवू शकता आणि त्यांना शुभेच्छा देऊ शकता! नाताळ हा सुट्टीचा आणि आनंदाचा काळ आहे. हा शुभेच्छा देण्याघेण्याचा काळ आहे. त्यामुळे सर्वत्र आनंद आणि प्रेम पसरवा!

110 सर्वोत्तम ख्रिसमस संदेश, शुभेच्छा आणि कोट्स

आपल्याला कुटुंबातील प्रत्येक सदस्य, नातेवाईक आणि मित्रांना सणासुदीच्या निमित्ताने ख्रिसमसच्या विशेष आणि अनोख्या शुभेच्छा द्यायच्या असतात. म्हणून, आम्ही ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा आणि ख्रिसमसच्या कोट्सची एक यादी करून ठेवली आहे. ही यादी तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना आणि प्रियजनांना शुभेच्छा देण्यासाठी वापरू शकता.

1.तुम्हाला ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा पाठवत आहे. आशा आहे की ख्रिसमसचा सण आणि येणारे नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंददायी असेल!

2. या ख्रिसमसमध्ये तुम्हाला तुमच्या प्रियजनांकडून खूप प्रेम मिळो. आम्ही आशा करतो की तुम्हाला पुढे एक सुंदर वर्ष आणि उदंड आयुष्य लाभो.

3. मेरी ख्रिसमस, माझ्या प्रिय मित्रा! आम्‍ही आशा करतो की तुम्‍हाला तुमच्‍या कुटुंबासोबत ख्रिसमस आनंदात साजरा करता येवो. हा तुमचा दिवस आनंद, हशा आणि शुद्ध प्रेमाने भरलेला जावो!

4. हिवाळ्यातील रात्री तुमच्या कुटुंबासोबत घरामध्ये वेळ घालवण्यासाठी आणि गप्पा तसेच हसण्यासाठी एक सुंदर वेळ आहे. मला आशा आहे की या ख्रिसमसमध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवला आहे. तुम्हाला ख्रिसमसच्या शुभेच्छा आणि तुमचे नवीन वर्ष आनंदात जावो!

5. कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीशिवाय ख्रिसमस आणि नवीन वर्ष असू शकत नाही. आशा आहे की तुम्ही हा सणाचा काळ तुमच्या कुटुंबियांसोबत आणि जवळच्या मित्रांसोबत घालवत असाल. तुमचा ख्रिसमसचा सण आनंदात जावो!

6. ख्रिसमस आला आहे आणि मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याचा हा काळ आहे. तुम्हाला ख्रिसमसच्या आणि नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा!

7. हा ख्रिसमस आणि नवीन वर्ष तुमच्या जीवनात सर्व काही चांगले आणि शांती घेऊन येवो. या ख्रिसमसमध्ये आपल्या कुटुंबासह आनंदी वेळ घालवा!

8. आम्ही तुम्हाला ख्रिसमसच्या शुभेच्छा पाठवल्या नाहीत तर आमचा ख्रिसमस उत्सव अपूर्ण राहील. तर, मी तुम्हाला मेरी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो.

9. ख्रिसमसची सजावट तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. घरी या आणि हसत रहा, तुमची उपस्थिती आमचा हा ख्रिसमस आणखी सुंदर करेल.

10. या ख्रिसमसमध्ये, देवदूतांनी आपल्या सर्वांना आशीर्वाद द्यावा अशी आमची इच्छा आहे. आम्ही आशा करतो की लोक एकमेकांवर प्रेम करतील आणि त्यांचा आदर करतील, आनंदाने एकत्र राहतील. मेरी ख्रिसमस!

11. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना भेटवस्तू देऊन आणि त्यांना रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित करण्यापेक्षा ख्रिसमस साजरा करण्याचा कोणताही चांगला मार्ग नाही. आशा आहे की तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत हा सणाचे पारंपरिक जेवण करून ख्रिसमस साजरा करत आहात. मेरी ख्रिसमस!

12. ख्रिसमससाठी कोणालाही मिळू शकणारी सर्वोत्तम भेट म्हणजे त्यांच्या कुटुंबाचे प्रेम! तुम्हाला ख्रिसमसच्या खूप शुभेच्छा!

13. ख्रिसमसमध्ये चमचमणाऱ्या दिव्यांप्रमाणेच लहान मुलांचे डोळे चमकत असतात. तुम्हाला आणि तुमच्या मुलांना ख्रिसमसच्या शुभेच्छा!

14. नाताळ हा आनंदाचा सण आहे. हा प्रेम व्यक्त करण्याचा, कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येण्याचा आणि मित्रमंडळी सोबत वेळ घालवण्याचा सण आहे. तुमचा ख्रिसमस चांगला जावो!

15. ख्रिसमससाठी मला हवी असलेली भेट म्हणजे तुमचे प्रेम आणि आपुलकी,आणि ते आपल्या दोघांमध्ये आयुष्यभर टिकेल. ख्रिसमसच्या शुभेच्छा!

16. आपण अनोळखी लोकांबद्दल जागरूक असले पाहिजे, परंतु या ख्रिसमसमध्ये आपल्या सर्वांसाठी भेटवस्तू आणणाऱ्या सांताक्लॉजचे आपण स्वागत करूया. ख्रिसमसच्या शुभेच्छा!

17. हा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्याच्या अनेक कारणांपैकी सांताक्लॉज हे फक्त एक कारण आहे.

18. येत्या वर्षासाठी प्रत्येकाला मिठी आणि अखंड प्रेम भेट देऊया. मेरी ख्रिसमस!

19. येणारे वर्ष आनंदाच्या प्रसंगांनी भरलेले जावो आणि तुमच्या यशाचे नवीन मार्ग खुले होवोत. देव तुम्हाला आशीर्वाद देवो आणि मेरी ख्रिसमस!

20. ख्रिसमस हा एक सण आहे. हा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणतो कारण आपण सर्वजण आनंदास पात्र आहोत.

ख्रिसमसच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा

21. खरा ख्रिसमस झाडाच्या सजावटीवर किंवा सांताने आणलेल्या भेटवस्तूंमध्ये नाही. तो हृदयात असतो. नाताळच्या खूप शुभेच्छा!

22. मला आशा आहे की ह्या शांत आणि पवित्र रात्री सांता आज रात्री माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी भेटवस्तू घेऊन येईल. मेरी ख्रिसमस!

23. हे पवित्र दिवस सर्वोत्तम आहेत. मेरी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!

24. वरून आपल्याकडे पाहणाऱ्यांचे स्मरण करूया आणि आपल्या ख्रिसमसच्या सेलिब्रेशनद्वारे त्यांच्या आठवणी जपू या. मेरी ख्रिसमस!

25. देवाचे आशीर्वाद सर्वांना मिळू दे. मेरी ख्रिसमस!

26. तुमचे प्रियजन तुमच्या सोबत असल्यास ख्रिसमसचा उत्सव पूर्ण होईल. मेरी ख्रिसमस!

27. ख्रिसमससाठी तुम्हाला मिळणाऱ्या सर्वोत्तम भेटवस्तू म्हणजे तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवणे. माझ्याकडून तुम्हाला ख्रिसमसच्या शुभेच्छा. मेरी ख्रिसमस!

28. तुम्ही ख्रिसमस कसा साजरा करता याने काही फरक पडत नाही, तुम्ही तो कोणासोबत साजरा करता हे जास्त महत्त्वाचे आहे. आशा आहे, तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत ख्रिसमसची रात्र घालवत आहात. मेरी ख्रिसमस!

29. ख्रिसमस हा प्रेम आणि आपुलकी शेअर करण्याचा दिवस आहे. ज्यांना प्रेमाची सर्वात जास्त गरज आहे त्यांना प्रेम द्या. मेरी ख्रिसमस!

30. ह्या डिसेंबरमध्ये, आपण ख्रिसमस एकत्र साजरा करूया आणि पुढील वर्षांसाठी आनंद आणि प्रेम जपून ठेवूया. मेरी ख्रिसमस!

31. तू, माझा सर्वात जवळचा मित्र आहेस, ख्रिसमससाठीची सर्वोत्तम भेट आहे. मला सांताकडून इतर कशाचीही गरज नाही. मेरी ख्रिसमस!

32. चमकणारे दिवस आणि चमचमणारे मार्ग आपली वाट पाहत आहेत. ख्रिसमस आला आहे आणि आता सर्वकाही चांगले होईल. मेरी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!

33. ख्रिसमसची जादू एक संसर्गजन्य आहे, कारण त्यामुळे आनंद आणि शांती दूरवर पसरते.

34. तुमच्या प्रियजनांसाठी काहीतरी खास करून हा सण त्यांच्यासाठी खास बनवा. ह्या सणाची ते पुढील वर्षी सुद्धा आठवण काढतील.

35. ख्रिसमस एका दिवसासाठी साजरा केला जाऊ शकतो, परंतु या प्रसंगाची भावना आयुष्यभर टिकली पाहिजे. मेरी ख्रिसमस!

36. सुट्टीचा आनंद आणि नवीन वर्षाची आनंदी सुरुवात तुमच्या आयुष्यात येऊ दे. माझ्या ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा स्वीकारा आणि तुमचा हा सणाचा काळ चांगला जावो.

37. ख्रिसमस म्हणजे सर्व ह्रदये आनंदाच्या क्षणांनी भरण्याचा आणि सर्वत्र हसू पसरवण्याचा काळ आहे तुम्ही सुद्धा ह्या मिशनमध्ये सामील व्हा!

38. अनंत आनंद आणि प्रेम आणि समृद्धी घेऊन हा सण येवो. आम्ही आपणास ख्रिसमसच्या शुभेच्छा देतो!

39. तुमचा नाताळ आनंदात जावो आणि येणारे वर्ष तुमच्या आयुष्यात भरभराटीचे जावो. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा. मेरी ख्रिसमस!

40. हा आनंदाचा काळ आणि आठवणी कायमस्वरूपी लक्षात राहतील. सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा!

नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

41. या ख्रिसमसला विशेष बनवूया जेणेकरून आपल्याला तो वर्षानुवर्षे लक्षात राहील.ख्रिसमसच्या शुभेच्छा!

42. तुम्ही एक सुंदर व्यक्ती आहात आणि तुम्ही सर्वात सुंदर ख्रिसमसच्या शुभेच्छांना पात्र आहात. म्हणून मी मी तुम्हाला अनेक शुभेच्छा देतो!

43. येणारे वर्ष तुमच्यासाठी सर्वात उज्ज्वल असू द्या. मला आशा आहे की तुम्ही आयुष्यात तुम्हाला हवे असलेले सर्वकाही साध्य कराल. मेरी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!

44. या ख्रिसमसमला तुमचे कुटुंब आणि मित्रमैत्रिणीसोबत आनंद शेअर करा. ख्रिसमसच्या खूप शुभेच्छा!

45. हा ख्रिसमस तुम्ही माझ्या कुटुंबासोबत घालवावा अशी माझी इच्छा आहे कारण ख्रिसमसच्या दिवशी कोणीही एकटे नसावे.

46. ख्रिसमस ट्री आणि सांताशिवाय ख्रिसमस उत्सव ठीक आहे! पण मित्र आणि कुटुंबाशिवाय ख्रिसमस म्हणजे ख्रिसमस नाही. ख्रिसमसच्या खूप शुभेच्छा!

47. जर सांताने तुमच्यासाठी भेटवस्तू आणल्या नाहीत तर आजूबाजूला पहा. तुमच्या शेजारी असलेले लोक तुमची खरी भेट आहेत. त्यांच्यासोबत ख्रिसमस साजरा करा!

48. तुमचे सर्व दिवस उज्ज्वल आणि आनंदी असू द्या. तुमचा ख्रिसमस चांगला जावो!

49. संपूर्ण वर्षभर ख्रिसमसचा आनंद असल्याची कल्पना करा. तुमच्यासाठी ही माझी ख्रिसमसची शुभेच्छा आहे.

50. प्रत्येकासाठी ख्रिसमस हा उत्सव आणि शांतता यासाठीचा सर्वोत्तम मार्ग आहे. तुमचा ख्रिसमस चांगला जावो!

51. पांढरी दाढी असलेला आणि लाल कपडे घातलेला एखादा मोठा माणूस तुमच्या घरी आला तर घाबरू नका. तो तुम्हाला हवी असलेली ख्रिसमस भेट घेऊन येत आहे! तुमचा ख्रिसमस चांगला जावो!

52. 25 डिसेंबरचा दिवस कुटुंबातील सदस्य आणि प्रियजनांसोबत घालवावा. या, आमच्यासोबत हा सण साजरा करा आणि ख्रिसमसचा आनंद घ्या!

53. ख्रिसमसचा दिवस प्रियजनांसोबत घालवणे हाच खरा उत्सव! आशा आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबासह आनंद घेत असाल. मेरी ख्रिसमस!

54. कोणतेही प्रामाणिक प्रयत्न निष्फळ होऊ देऊ नका आणि येणारे वर्ष तुमच्यासाठी आशीर्वादांनी भरलेले जावो. सर्वांना ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

55. ज्यांना गरज आहे त्यांच्या जीवनात आनंद आणूया. मेरी ख्रिसमस! आशा आहे की तुम्ही तुमच्या सभोवतालच्या प्रत्येकाला आनंदी करत आहात!

56. जेव्हा आपले अंतःकरण प्रेमाने भरलेले असते आणि आपण देण्याच्या भावनेवर विश्वास ठेवतो तेव्हाच खरे तर ह्या सणाचे अस्तित्व असते. यंदाच्या ख्रिसमसमध्ये प्रेम पसरवा आणि आपला हा सण आनंदात जावो!

57. ख्रिसमस ट्री, केक आणि पांढर्‍या दाढीवाला लाल कपड्यातील सांताक्लॉज जेव्हा दिसू लागेल, तेव्हा ख्रिसमसचे दिवस सुरू आहेत हे जाणून घ्या! मेरी ख्रिसमस!

58. ख्रिसमस हा गाणी गाण्याचा काळ आहे, ख्रिसमस हा आनंदाचा काळ आहे. हा ख्रिसमस आणि नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंदाचे जावो अशी माझी इच्छा आहे.

59. ख्रिसमससाठी सर्वात मोठी भेट शांतता आहे आणि हीच नवीन वर्षाची सर्वात मोठी इच्छा आशा आहे. ह्या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे असू दे.

60. तुम्हाला मिळालेल्या भेटवस्तूंची संख्या मोजू नका. तुमच्या आसपास उभ्या असलेल्या लोकांची संख्या मोजा. सांता दरवर्षी तुमच्यासाठी आणतो त्या खऱ्या भेटवस्तू आहेत.

मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा

61. मी या ख्रिसमससाठी तुमच्यासाठी आनंद पाठवत आहे. जेव्हाही तुला माझी आठवण येईल तेव्हा तो उघड. मेरी ख्रिसमस!

62. तुमचा ख्रिसमसचा सण प्रेम आणि हास्याने भरून जावो. तुम्हाला हा ख्रिसमस आणि नवीन वर्ष उत्तम जावो.

63. या ख्रिसमसला तुम्हाला प्रत्येकाला भेटवस्तू पाठवण्याची गरज नाही. एक स्मितहास्य सगळीकडे पसरवा प्रत्येकासाठी ही सर्वोत्तम भेट आहे. मेरी ख्रिसमस!

64. ख्रिसमसची सर्वोत्कृष्ट व्याख्या म्हणजे देण्यातला आनंद आणि प्रेम. तुम्हाला ख्रिसमसच्या शुभेच्छा!

65. हा सण साजरा करण्यासाठी तुमच्याकडे सर्वात उंच ख्रिसमस ट्री असण्याची गरज नाही. परंतु तुमचे मित्र आणि कुटुंब एकत्र असणे आवश्यक आहे.

66. भेटवस्तू तात्पुरत्या असतात पण तुमच्या कुटुंबासोबत राहून तुम्हाला मिळणारा आनंद आणि प्रेम हे कायम टिकते. ती तुमची ख्रिसमस भेट असू द्या.

67. जेव्हा एल्व्ह आणि रेनडियर तुमचे दार ठोठावतात तेव्हा फक्त सांता देखील तिथे आहे हे जाणून घ्या. मेरी ख्रिसमस!

68. दिव्यांनी भरलेल्या ख्रिसमसचे स्वप्न पाहू या, उज्ज्वल वर्षाचे स्वप्न पाहू या. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी एक आनंददायी ख्रिसमस आणि नवीन वर्ष जावो!

69. या ख्रिसमसमध्ये आनंदी राहण्यास विसरू नका. ख्रिसमस वर्षातून एकदाच येतो आनंद घ्या! मेरी ख्रिसमस!

70. आपल्या सभोवतालच्या लोकांना आनंदी स्मितहास्य देऊन भेटवस्तू दिल्याने देण्याचा आनंद उत्तम प्रकारे अनुभवता येतो. ख्रिसमसच्या शुभेच्छा!

71. मला सर्वोत्तम भेटीसाठी सांताची गरज नाही. तू, माझी आई, माझ्या आयुष्यात मला मिळालेली सर्वोत्तम भेट आहे. तू माझा ख्रिसमस आहेस!

72. आनंदाचे दिवस आणि ख्रिसमसच्या दिवशी देण्यासाठी भेटवस्तू खरेदी करण्याची वेळ जवळ आली आहे. आपण उत्सव साजरा करू शकतो ह्या बद्दल परमेश्वराकडे कृतज्ञता व्यक्त करूयात. मेरी ख्रिसमस!

73. ख्रिसमसच्या झाडावरील चमकणारा तारा जीवनातील गडद क्षणांना आनंदाच्या प्रकाशाने भरून टाकतो. हे नवीन वर्ष नाताळच्या आनंदाने उजळून निघावे.

74. हिवाळ्याच्या थंड रात्री, उबदार शेकोटीजवळ बसून आम्ही ख्रिसमसची वाट पाहतो. पण प्रतीक्षा संपली. ख्रिसमस आला आहे. आनंद घ्या आणि ख्रिसमसचा उत्साह तुमच्या सभोवताली पसरवा! मेरी ख्रिसमस!

75. हातात हात घेणे, कार्ड्सची देवाणघेवाण करणे, भेटवस्तू देणे आणि दूरवरच्या लोकांना शुभेच्छा देणे. हे असे क्षण ख्रिसमसला आणखी खास बनवतात. मेरी ख्रिसमस!

76. ख्रिसमससाठी येथे नसलेल्यांना आठवणीत ठेवा. त्यांनी बेक केलेल्या कुकीज आणि त्यांनी शेअर केलेल्या कथांद्वारे त्यांना लक्षात ठेवा. मेरी ख्रिसमस!

77. ख्रिसमसच्या दिवशी येशूचा जन्म झाला आणि त्याने आपल्याला एकमेकांवर प्रेम करण्याचा धडा शिकवला. तो धडा कायम लक्षात ठेवूया.मेरी ख्रिसमस!

78. ख्रिसमस म्हणजे मैत्री आणि प्रेमाची देणगी आहे आणि त्यामुळे जग बदलू शकते. हे लक्षात ठेवून ख्रिसमसमध्ये तुमच्याभोवती प्रेम पसरवा! मेरी ख्रिसमस!

79. जसजशी घंटा वाजायला लागतात, आणि मनातून गाणे गुणगुणायला सुरुवात होते, तेव्हा जाणून घ्या की ख्रिसमस आला आहे आणि नवीन वर्ष येत आहे. मेरी ख्रिसमस!

80. हा ख्रिसमस, सर्वांना विश्वास आणि प्रेमाची भेट देऊन आशीर्वाद देण्यासाठी येत आहे. दुःखाचे दिवस संपू दे आणि आनंदाचे क्षण येऊ दे. मेरी ख्रिसमस!

नाताळ (ख्रिसमस)च्या खास शुभेच्छा

81. देवदूत तुमच्या कुटुंबाला स्वर्गातून आशीर्वाद देतील, ते तुम्हाला आनंद देतील. हा ख्रिसमस सर्व मुली आणि मुलांसाठी खूप छान असेल. खूप शुभेच्छा!

82. ख्रिसमस हा आपल्या प्रियजनांच्या आठवणींनी भरलेला दिवस आहे, काही आपल्यासोबत आहेत आणि काही आपल्याला वरून पाहत आहेत. नाताळच्या खूप शुभेच्छा!

83. ख्रिसमसचे खरे सार आपल्या प्रियजन आणि मित्रांसह सामायिक केलेल्या क्षणांमध्ये आहे. मला हा ख्रिसमस तुमच्यासोबत घालवायचा आहे.

84. आम्ही तुम्हाला एक सुंदर ख्रिसमस आणि समृद्ध नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो!

85. तुमचे जीवन हास्य, प्रेम आणि मैत्रीच्या भेटवस्तूंनी फुलू द्या. आनंददायी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

86. तुमचे प्रेम आणि आपुलकीमुळे माझा हा सण आनंदात जात आहे. मेरी ख्रिसमस!

87. या ख्रिसमसचे खुल्या हातांनी आणि खुल्या हृदयाने स्वागत करा आणि मानवजातीसाठी शांतता आणि पवित्रतेच्या आशेने तुमचे प्रेम दूरवर पसरवा.

88. टेबल सेट आहे, मिष्टान्न तयार आहेत, दिवे लुकलुकत आहेत आणि वातावरण थंड आहे. तुम्हा सर्वांना ख्रिसमस आणि नवीन वर्ष भरभराटीचे जावो!

89. या ख्रिसमसच्या सकाळी उठून एक अप्रतिम गाणे ऐकून आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीच्या हातात घ्या. मेरी ख्रिसमस!

90. या ख्रिसमसमध्ये सांता तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो हीच माझी इच्छा आहे. माझ्या प्रिय मित्रा, तुमचा आनंद घ्या!

91. या ख्रिसमसमध्ये तुम्हाला कदाचित पुरेशा भेटवस्तू सापडणार नाहीत, परंतु तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त हसरे चेहरे नक्कीच मिळतील. मेरी ख्रिसमस!

92. प्रत्येक ख्रिसमस हा आधीपेक्षा चांगला असतो. हा ख्रिसमस सर्वोत्कृष्ट होऊ द्या म्हणजे पुढचा ख्रिसमस आणखी चांगला असेल.

93. मित्र, कुटुंब, भेटवस्तू, प्रेम आणि आनंद हे सगळे घटक ख्रिसमस उत्कृष्ट बनविण्यात मदत करणारे आहेत. ख्रिसमस आणि नवीन वर्ष तुम्हाला उत्तम जावो!

94. तुम्ही जिंगल बेल्स ऐकाल तेव्हा तुम्हाला समजेल की सांता येत आहे आणि सर्वत्र आनंद आणि जल्लोष होईल. मेरी ख्रिसमस!

95. गाणी गाणाऱ्या गायकांचा आवाज ऐकू येणे म्हणजे तुम्ही त्यांच्यासोबत गाणी गाण्याचे संकेत आहेत. आपल्या ख्रिसमसचा आनंद घ्या आणि चांगला वेळ घालवा.

96. मिठ्यानी भरलेली टोपली, चुंबनांनी भरलेली सूटकेस आणि तुमच्या कुटुंबासाठी शुभेच्छांनी भरलेला बॉक्स पाठवत आहे. हा ख्रिसमस तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आनंदाचा जावो.

97. आम्ही तुम्हाला प्रेममय आणि आनंदी ख्रिसमसच्या शुभेच्छा देतो. देवाचे प्रेम अखंड राहो आणि नवीन वर्षात तुमची भरभराट होत राहो.

98. ख्रिसमसला “प्रेम”, “आनंद” किंवा “आशा” असे शब्दलेखन केले जाऊ शकते कारण ख्रिसमस हेच आहे. आणि या खऱ्या भेटवस्तू आहेत ज्या तुम्हाला मिळाल्या पाहिजेत. तुमचा ख्रिसमस आनंदी जावो!

99. चला आपल्या प्रिय येशूचे आपल्या जीवनात पुन्हा एकदा स्वागत करूया आणि त्याने आपल्या आजूबाजूच्या सर्वांमध्ये प्रेम आणि आपुलकी आणली. तुम्हाला ख्रिसमसच्या शुभेच्छा!

100. खरा चमत्कार म्हणजे येशूचा जन्म नाही. येशूची शिकवण जेव्हा आपण मनावर घेतो तेव्हा जादू होते आणि प्रत्येक आत्म्याशी दयाळूपणे वागायला शिकतो आणि प्रेम सर्वत्र पसरवतो.

101. तुमच्यासारखे लोकच नाताळचा सण आनंदी बनवतात. मेरी ख्रिसमस!

102. जरी ख्रिसमस हिवाळ्यात आला तरी, तुमचा आनंदी चेहरा आणि दयाळू हास्य मला नेहमीच माझ्यासाठी प्रेम घेऊन येते! मेरी ख्रिसमस!

103. माणसांनी भरलेल्या जगात, सांता व्हा. तुमचा आनंददायक आवाज, हशा आणि दयाळूपणा सर्वांना द्या. मेरी ख्रिसमस!

104. आपण खोडकर किंवा छान आहात हे सांताला नेहमी माहित असते. तर, एक अद्भुत, रोमांचक आणि आनंददायक ख्रिसमससाठी तयार व्हा!

105. गेले काही महिने तुमच्यासाठी सोपे नसले तरी, या ख्रिसमसला माझ्या प्रामाणिक शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे!

106. मेरी ख्रिसमस! आशा आहे की तुम्ही जास्त खर्च केला नाही , अर्थातच, मला पाहिजे असलेल्या भेटवस्तूंवर!

107. स्क्रूजने भरलेल्या जगात, ग्रिंच व्हा! निदान त्याच्याकडे एक गोंडस पिल्लू आहे. मेरी ख्रिसमस!”

108.तुझ्या चेहऱ्यावर कायम असेच हसू असुदे हीच देवाकडे प्रार्थना

109. तुम्हाला सगळ्यांची अथवा  ख्रिसमसला हमखास येते. आणि पुन्हा एकत्र यावेसे वाटते.  नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा

110. सांता घेऊन आला शुभेच्छा, तुम्ही सगळे आनंदात राहो हीच आमची इच्छा!

आता तुमच्याकडे 107 ख्रिसमसच्या शुभेच्छा आणि म्हणी आहेत. त्या तुम्ही तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना पाठवू शकता. आम्ही आशा करतो की तुम्ही तुमच्या आवडत्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून शुभेच्छा पाठवाल. सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा आणि प्रेम द्या. तुमचा ख्रिसमस नक्कीच आनंददायी असेल.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article