Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणातील डोकेदुखीवर ११ परिणामकारक घरगुती उपाय

गरोदरपणातील डोकेदुखीवर ११ परिणामकारक घरगुती उपाय

गरोदरपणातील डोकेदुखीवर ११ परिणामकारक घरगुती उपाय

गरोदरपणात स्त्री उत्साही तसेच चिंताग्रस्त असते. तिच्या आयुष्यात आनंद घेऊन येणाऱ्या छोट्या बाळाविषयी ती सतत विचार करत असते. गरोदरपणामुळे स्त्रीच्या शरीरात बरेच बदल घडतात तसेच डोकेदुखीमुळे अस्वस्थता येते. होय, गरोदरपणात डोकेदुखीचा अनुभव घेणे म्हणजे आजारपण, मळमळ किंवा थकवा जाणवण्याइतकेच सामान्य आहे. गरोदरपणात डोकेदुखी कोणत्याही वेळी उद्भवू शकते परंतु पहिल्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये ते अधिक सामान्य असते. तुम्ही गर्भवती असल्यास आणि हे लक्षण अनुभवत असल्यास, तुम्ही अर्थातच एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता किंवा डोकेदुखीसाठी नैसर्गिक उपायांचा पर्याय निवडू शकता.

गरोदरपणात डोकेदुखीची सामान्य कारणे

गरोदरपणात,हॉर्मोन्स मध्ये होणारे बदल आणि रक्ताच्या प्रमाणात वाढ झाल्याने डोकेदुखी होऊ शकते. गरोदरपणात डोकेदुखीची ही सर्वात सामान्य कारणे आहेत. परंतु गर्भवती असताना डोकेदुखी होण्याची इतर सुद्धा काही कारणे आहेत.

  • ताण
  • पावित्रा चांगला नसणे
  • झोपेचा अभाव
  • रक्तातील कमी साखर
  • कॅफेन
  • निर्जलीकरण

गरोदरपणात डोकेदुखीवर नैसर्गिक उपचार

डोकेदुखीच्या समस्येवर उपाय म्हणून घरगुती उपचारांवर अवलंबून राहणे चांगले आहे कारण डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतरच औषधे घ्यावीत. याव्यतिरिक्त, बाळांवर औषधांचे संभाव्य दुष्परिणाम आहेत त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणूनच, खालील घरगुती उपचार करून पहा आणि आपण कोणतीही औषधे न घेतल्यास डोकेदुखीपासून मुक्त होऊ शकता.

. भरपूर पाणी प्या

भरपूर पाणी प्या

 

हायड्रेटेड राहिल्यास गरोदरपणात डोकेदुखीपासून आराम मिळतो. गरोदरपणात आपल्या शरीरास ऊर्जा मिळण्यासाठी आणि एंजाइम व प्रथिनांचे योग्य रक्ताभिसरण सुनिश्चित करण्यासाठी हायड्रेटेड रहाणे महत्वाचे आहे. डोकेदुखी टाळण्यासाठी दररोज किमान ८ औंस पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

. कोल्ड कॉम्प्रेस वापरा

गरोदरपणात, डोक्यात वाढलेल्या रक्तवाहिन्यामुळे मायग्रेन होऊ शकते. कोल्ड कॉम्प्रेसमुळे रक्तवाहिन्या घट्ट होऊ शकतात आणि पेशी संकुचित होऊ शकतात आणि त्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. आपल्याला आवडत असल्यास आपण कोल्ड कॉम्प्रेस विकत आणू शकता किंवा आपण घरी कोल्ड कॉम्प्रेस बनवू शकता. ह्यासाठी तुम्हाला फक्त स्वच्छ टॉवेल आणि एक वाटी थंड पाण्याची आवश्यकता असेल. टॉवेल पाण्यात बुडवून घ्या आणि अतिरिक्त पाणी पिळून घ्या. आरामदायी पृष्ठभागावर झोपा आणि टॉवेल आपल्या कपाळावर आणि डोळ्यावर ठेवा आणि हलकेच दाबा. कोल्ड कॉम्प्रेस हे मायग्रेनसारख्या रक्तवहिन्यासंबंधी डोकेदुखीपासून मुक्तता मिळवण्यासाठीचा उपाय म्हणून ओळखले जाते.

. हॉट कॉम्प्रेस वापरा

रक्तवाहिन्या संकुचित झाल्यामुळे रक्ताभिसरण कमी होऊ शकते, त्यामुळे गरोदरपणात डोकेदुखी होऊ शकते. कोल्ड कॉम्प्रेस प्रमाणेच, शेकण्यामुळे रक्तवाहिन्यांचा विस्तार आणि मेंदूमध्ये रक्त प्रवाह वाढवून वेदना कमी होण्यास मदत होते. तणावामुळे होणाऱ्या डोकेदुखीमुळे चांगले उपचार केले जातात. त्यासाठी तुम्हाला स्वच्छ टॉवेल आणि एक वाटी गरम पाण्याची आवश्यकता असेल. टॉवेल गरम पाण्यात भिजवा आणि जास्तीचे पाणी पिळून काढा. कपाळ आणि मानेचा भाग शेका त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

. थोडे आले चावून खा

मळमळण्यावर नैसर्गिक उपाय म्हणून आल्याचा वापर केला जातो. मायग्रेनवर उपचार म्हणून आले वापरले जाते तसेच गरोदरपणात डोकेदुखीवर नैसर्गिक उपाय म्हणून देखील ते कार्य करते. आल्यामुळे प्रोस्टाग्लॅन्डिन्स अवरुद्ध होतात. त्यामुळे ते स्नायूंचे आकुंचन उत्तेजित करतात आणि डोकेदुखी टाळण्यास मदत होते. तुम्ही कच्चे आले खाऊ इच्छित नसल्यास तुम्ही आल्याचा चहा देखील बनवू शकता. आपण आल्याचा चहा कसा तयार करू शकता ते येथे दिलेले आहे.

साहित्य

  • १ इंच लांब आलं मूळ (किसलेले)
  • काही पेपरमिंट पाने (चिरलेली)
  • अर्धे लिंबू

पद्धत

मध्यम आचेवर दोन कप पाणी उकळवा, नंतर त्यात किसलेले आले आणि चिरलेली पेपरमिंटची पाने घाला. आणखी पाच मिनिटे उकळी येऊ द्या. गॅस बंद करा आणि एका कपमध्ये पाणी गाळून त्यात अर्धा लिंबू पिळून ढवळून घ्या. आल्याच्या चहामुळे डोकेदुखीपासून तुम्हाला त्वरित आराम मिळेल.

. एक झोप घ्या किंवा योग करा

एक झोप घ्या किंवा योग करा

कधीकधी झोपेचा अभाव डोकेदुखी आणि मायग्रेनला कारणीभूत ठरू शकतो; म्हणूनच जर आपल्याला असे वाटत असेल की झोप कमी झाल्यामुळे तुमचे डोके दुखत असेल तर एक झोप काढा, तुम्हाला बरे वाटेल. जर तुम्हाला जास्त वेळ झोपायचे असेल तर तुम्हाला चांगले वाटेल अशा गोष्टी करा.
जर तुम्हाला खूप जास्त ताणतणाव जाणवत असेल तर, योगासने करणे चांगले आहे त्यामुळे तुम्हाला बरेच फायदे होतील. योगामुळे तुमचा तणाव कमी होण्यास आणि तुम्हाला झोप येण्यास मदत होईल. गरोदरपणात तुमच्या शरीराला योग्य व्यायाम मिळतो आहे ना हे देखील सुनिश्चित करा.

. प्रसुतीपूर्व मसाज करून पहा

खांदा, मान आणि पाठीचा ताण कमी करण्यासाठी मसाज थेरपिस्टकडे जा. जर थेरपिस्टकडे जाणे तुम्हाला शक्य नसेल तर काही मसाज असे आहेत जे घरी केले जाऊ शकतात. आपल्या मानेच्या खाली आणि मनगटाजवळ हात चोळा. ट्रिगर पॉईंट्सबद्दल जागरूक रहा. अंगठा आणि तर्जनी मधील बिंदू टाळा. त्यामुळे कळा प्रवृत्त होऊ शकतात.

. पुदिना तेल वापरा

पुदिना तेलाचा त्वचेवर थंड प्रभाव पडतो आणि तणाव कमी होतो. पुदिना तेलामुळे डोकेदुखीची संवेदनशीलता देखील कमी होते. आपल्या तळहातावर पुदिना तेलाचे काही थेंब घ्या आणि काही सेकंद आपल्या तळव्यांमध्ये ते चोळा. आपल्या कपाळावर तेल लावा आणि एक मिनिट मालिश करा. सकारात्मक परिणामांसाठी झोपण्याआधी हे करा.

. ओमेगा ३ तेल वापरा

आपल्या आहारात तेलाचा वापर केल्याने सूज कमी होण्यास मदत होते. ओमेगा ३ फॅटी ऍसिड फॅटी फिशमध्ये आढळते आणि त्यामुळे डोकेदुखीची तीव्रता आणि कालावधी कमी होतो. आहारात ऑलिव्ह ऑईल आणि कॅनोला तेलाचा समावेश केल्यास ओमेगा ३ तेलाचा वापर वाढू शकतो. वैकल्पिकरित्या, ओमेगा ३ फॅटी ऍसिडच्या गोळ्या देखील घेतल्या जाऊ शकतात.

. लिंबाचा रस प्या

लिंबाचा रस प्या

लिंबाच्या रसाचे असंख्य फायदे आहेत आणि डोकेदुखीशी लढणे हे त्यापैकी एक आहे. लिंबाच्या रसामुळे पोटातील पेटक्यांपासून मुक्तता होते आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. गरोदरपणामुळे शरीरातील व्हिटॅमिन सीची पातळी कमी होऊ शकते, त्यामुळे डोकेदुखी उद्भवू शकते. लिंबू देखील शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि त्यामुळे रक्त परिसंचरण सुधारते आणि ते अँटीऑक्सिडेंट म्हणून कार्य करते.

लिंबाचा रस तयार करण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेले साहित्य:

  • अर्धा लिंबू
  • आले किसलेले (पर्यायी)
  • गरम (किंवा उबदार) पाण्याचा ग्लास

पाण्यात लिंबू पिळून त्यामध्ये थोडे आले घाला, हलवा आणि प्या. गर्भवती असताना घरी डोकेदुखीवर उपचार करण्यासाठी ही एक प्रभावी पद्धत आहे

१०. लव्हेंडर तेल

लैव्हेंडर तेल त्वचेला आराम देते आणि शांत करते. म्हणून, कपाळावर थोडे तेल मालिश केल्यास वेदना कमी होण्यास मदत होते.

गर्भधारणा डोकेदुखी दूर करण्यासाठी अतिरिक्त टिप्स

तुमहाला गरोदरपणात डोकेदुखीपासून आराम मिळण्यासाठी खाली काही टिप्स दिल्या आहेत.

  • दिवसभर थोडे खा आणि तुम्ही पुरेशी प्रथिने वापरत असल्याचे सुनिश्चित करा.
  • आपल्या आंघोळीच्या पाण्यात एप्सम साल्ट घाला आणि बरे वाटावे म्हणून कोमट पाण्याने अंघोळ घाला.
  • आपल्या शरीरावरचा ताणतणाव कमी करण्यासाठी अ‍ॅक्यूपंक्चर वापरुन पहा.
  • नियमित व्यायाम करा पण तो प्रमाणाबाहेर करू नका.
  • कॅफिन टाळा, कारण चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणाऱ्या उत्तेजक घटकांमुळे देखील डोकेदुखी होऊ शकते.
  • सर्वात वाईट परिस्थितीत, इतर कशाचाच उपयोग होत नसल्यास पॅरासिटामॉल टॅबलेट (६५० मिलीग्राम) घेण्याचा विचार करा.
  • सर्वसाधारणपणे, ही डोकेदुखी घरात खूप व्यवस्थापित केली जाते, परंतु खालील परिस्थतीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल.
  • वेदना असह्य होते.
  • डोकेदुखी सोबतच अस्पष्ट दृष्टी किंवा उजव्या ओटीपोटात वेदना आणि हात व चेहऱ्यास सूज असल्यास.
  • गर्भावस्थेच्या सहा महिन्यांनंतर डोकेदुखी सुरू होते, आणि ते टॉक्सॅमेमिया आणि प्रीक्लेम्पसियाचे लक्षण असू शकते.

डोकेदुखी ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकजण वेळोवेळी अनुभवत असतो. तथापि, गरोदरपणात ते गैरसोयीचे प्रमुख कारण असू शकते. वर नमूद केलेले घरगुती उपचार करून पहा, परंतु जर वेदना असह्य झाल्या तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्हाला निरोगी आणि सुरक्षित गरोदरपणाची शुभेच्छा!

आणखी वाचा:

गरोदरपणात भारतीय पद्धतीचे शौचालय वापरणे सुरक्षित आहे का?
गरोदरपणातील पचनसंस्थेशी संबंधित समस्येवर १२ घरगुती उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article