Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) सर्वोत्तम फादर्स डे कोट्स, शुभेच्छा संदेश आणि मेसेजेस

सर्वोत्तम फादर्स डे कोट्स, शुभेच्छा संदेश आणि मेसेजेस

सर्वोत्तम फादर्स डे कोट्स, शुभेच्छा संदेश आणि मेसेजेस

फादर्स डे अगदी जवळ आलेला आहे आणि या दिवशी आपल्या वडिलांना खास वाटावे म्हणून आपण बरेच प्रयत्न करीत असालच. तुम्ही त्यांच्यासाठी एक चांगली भेट खरेदी करुन त्यांच्यासाठी सुंदर कार्ड बनवण्याचा विचार करीत असाल. तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते ते सांगण्यासाठी तुम्हाला योग्य शब्दांची आवश्यकता असेल. योग्य शब्द जुळवणे अवघड असू शकते, म्हणूनच आम्ही तुम्हाला थोडी मदत करण्याचा विचार केला आहे. आम्ही तुमच्यासाठी काही प्रेरणादायक कोट्स आणि संदेश घेऊन आलो आहोत ज्याचा तुम्ही तुमच्या वडिलांना शुभेच्छा देण्यासाठी उपयोग करू शकता! इथे फादर्स डे च्या काही छान शुभेच्छा आणि संदेश दिलेले आहेत ते पहा.

फादर्स डे साठी मुलींकडून वडिलांसाठी कोट्स

तुम्ही वडिलांची लाडकी मुलगी आहात का? तुम्ही तुमच्या वडिलांना ते तुमच्यासाठी किती खास आहेत हे सांगू शकता.

 • बरेचजण म्हणतात की वडील हे बोटींसारखे आहेत जे आवश्यक असल्यास मागे सरकतात आणि जेव्हा योग्य असेल तेव्हाच पुन्हा सुरुवात करतात. पण माझे वडील दीपस्तंभासारखे आहेत. त्यांच्या प्रेमामुळे आम्ही जीवनात योग्य मार्गाला लागलो.
 • माझे वडील मी नेहमी आनंदी राहावे म्हणून धडपडत असतात, आणि माझ्या डोळ्यात कधीही अश्रू येऊ देत नाही.
 • पती आपल्याकडे राणी म्हणून पहात नाही, परंतु वडील नेहमीच आपल्या मुलींकडे लहान राजकुमारी म्हणून पाहतात.
 • माझे वडील मला नेहमी सांगतात की मी खरोखरच लवकर मोठी होत आहे. मुली कितीही वेगाने मोठ्या झाल्या तरी वडील त्यांच्याकडे लहान राजकुमारी म्हणूनच बघतात.
 • वडिलांपेक्षा आपल्या मुलीवर जगात कोणीच जास्त प्रेम करू शकत नाही.
 • प्रत्येक यशस्वी मुलीच्या पाठीमागे तिचे वडील असतात.
 • वडील आणि मुलगी यांच्यातील प्रेम अखंड असते.
 • काही लोकांचा हिरो वर विश्वास नसतो परंतु ते माझ्या वडिलांना अजून भेटलेले नाहीत.

फादर्स डे साठी मुलींकडून वडिलांसाठी कोट्स

फादर्स डे साठी मुलांकडून वडिलांसाठी कोट्स

वडिलांचा आणि मुलाचा एक वेगळा बंध असतो जो शब्दात सांगता येत नाही. मुलगी वडिलांची छोटी राजकन्या असली तरी मुलगा म्हणजे वडिलांचे प्रतिबिंब असते. आपल्याला वडिलांबद्दल किती अभिमान आहे हे आपल्या वडिलांना कळवायचे असल्यास या खास कोट्सची मदत घ्या

 • जेव्हा माझे वडील मला भेटवस्तू देतात तेव्हा आम्ही दोघेही आनंदित होतो. परंतु मी जेव्हा एखादी भेट देतो तेव्हा माझ्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू का असतात हे मला माहिती नाही.
 • जवळजवळ प्रत्येकजण वडील बनू शकतो. पण मुलांनी प्रेमाने बाबा म्हणण्यासाठी काय करावे लागते हे माझ्या वडिलांनी शिकवले आहे.
 • आपल्यापेक्षा आपल्या मुलाने अधिक यशस्वी व्हावे अशी प्रत्येक वडिलांची इच्छा असते. पण मला माहित आहे की मी कधीही माझ्या वडिलांसारखा होणार नाही.
 • माझे वडील शांत आहेत आणि खूप कमी बोलतात. आणि ते ठीक आहे. कारण ते मला आनंदी ठेवणे, मी रडत असताना मला शांत करणे आणि माझ्या आयुष्यासाठी योग्य धडे शिकविणे यासाठी खूप कमी शब्द बोलले आहेत.
 • मी बर्‍याच सुपरहिरो कॉमिक्स वाचल्या आहेत. पण तरीही माझ्या वडिलांइतकेच सशक्त आणि सामर्थ्यवान सुपरहिरो मला सापडला नाही.
 • वडील आपल्यापेक्षा जास्त सामर्थ्यवान असतात आणि अगदी काळोख असलेली रात्र सुद्धा त्याच्या उपस्थितीने दिवस बनतो.

एका मुलीकडून वडिलांसाठी फादर्स डेच्या शुभेच्छा

आपल्या वडिलांना या खास दिवशी द्यायच्या शुभेच्छा शक्य तितक्या मनापासून असणे आवश्यक आहे. आपण हे कसे करू शकता हे येथे दिलेले आहे.

 • बाबा, मी तुझ्यावर प्रेम करते. तू माझ्या रात्रीच्या आकाशातील सर्वात चमकदार तारा आहेस, माझ्या आकाशगंगेतील एक चमकणारा तारा जो मला दर्शवितो की तो नेहमीच माझ्यासाठी आहे. .
 • तुम्ही माझे रोल मॉडेल आहात आणि त्याचा मला अभिमान वाटतो. प्रत्येकजण मला सांगत राहतो की सुपरहीरो अस्तित्वात नाहीत, परंतु ते अद्याप तुम्हाला भेटले नाहीत. तुम्ही स्वतः खूप व्यस्त असता आणि तरीही माझ्यासाठी वेळ काढता. बाबा खूप खूप आभारी आहे.
 • माझ्या लाडक्या वडिलांना फादर्स डेच्या शुभेच्छा. तुम्ही म्हणता तसे मी लवकर मोठी होत आहे आणि मी लवकरच एक स्त्री होईल. माझे कितीही वय झाले तरीही बाबा, मी नेहमीच तुमची लहान मुलगी राहीन.
 • धन्यवाद बाबा, तुम्ही माझ्यासोबत नेहमीच असता . नेहमीच तुम्ही आमच्यावर प्रेम केलेत व काळजी घेतलीत. तुम्ही आमच्याबरोबर शेअर केलेल्या सर्व क्षणांसाठी तसेच आम्हाला शिकवलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद.
 • प्रत्येकजण मला सांगत असतो की मी आईसारखी दिसते. पण मला हे सांगायचं आहे की मी आई सारखी असले तरीही मला वडिलांसारखे व्हायचे आहे. मला एक मजबूत आणि अद्भुत व्यक्तीसारखे व्हायचे आहे. तुम्हाला खूप धन्यवाद बाबा.
 • बाबा, तू माझं पहिलं प्रेम आहेस. तू माझ्या आयुष्यातला प्रकाश आहेस आणि माझी काळजी घेणारा अद्भुत माणूस आहेस. माझा मुलगासुद्धा तुमच्यासारखा व्हावा अशी माझी इच्छा आहे. फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!
 • माझ्याकडे राजपुत्र आहे म्हणून मी राजकन्या नाही, परंतु माझे वडील एक राजा आहेत म्हणून मी राजकन्या आहे.
 • फादर्स डे ला मी तुमच्यासोबत नाही हे मी खूप मिस करते. परंतु तुम्ही माझा आठवणी मध्ये आहात. तुमचा हा दिवस आनंदात जावो अशी मी आशा करते.
 • मी जेव्हा लग्न करिन तेव्हा माझे वडील थोडा काळ माझा हात धरतील. परंतु माझा हृदयात त्यांचे स्थान अखंड राहील.
 • कितीही वर्षे गेली तरीही बाबा, मी नेहमीच तुमची लहान मुलगी आहे जी मनापासून तुझ्यावर प्रेम करते!

एका मुलीकडून वडिलांसाठी फादर्स डेच्या शुभेच्छा

एका मुलाकडून वडिलांसाठी फादर्स डे च्या शुभेच्छा

येथे मुलाकडून वडिलांसाठी काही शुभेच्छा दिलेल्या आहेत.

 • जेव्हा कोणी मला विचारेल की, मोठे झाल्यावर काय व्हायचे आहे, मी त्यांना सांगतो की मी कुणीही झालो तरी मला माझ्या वडिलांसारखे माणूस व्हायचे आहे. फादर्स डे च्या शुभेच्छा, प्रिय बाबा!
 • बाबा, मला अपयशाची भीती वाटू नये म्हणून शिकवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा मी पडतो तेव्हा मला मदत न केल्याबद्दल धन्यवाद, मला धूळ झटकून पुन्हा उठून पुढे जाणे शिकवल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही सर्वोत्तम आहात बाबा!
 • प्रत्येक वेळी जेव्हा मी कॉमिक्स वाचतो, तेव्हा माझ्याही आयुष्यात एक सुपर हिरो असावा असे मला वाटत असे. परंतु जन्मल्यापासून माझ्यासोबत एक सुपर हिरो होता आणि तो म्हणजे तुम्ही बाबा. फादर्स डे च्या शुभेच्छा!
 • मी रात्रीच्या चमकणाऱ्या ताऱ्यासारखे व्हावे अशी माझी ईच्छा नाही. मी माझ्या वडिलांसारखे होऊ इच्छितो जे सगळे घर प्रकाशमय करतात. फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!
 • बाबा, मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे मी सांगू शकत नाही. आपण आमच्यासाठी खूप बलिदान दिले आहे आणि ते मी कधीही विसरू शकत नाही. माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे बाबा!
 • माझ्या आनंदाच्या आणि दुःखाच्या प्रसंगात तुम्ही मला सर्वात आधी आठवता बाबा कारण तुम्ही मला खूप आनंद दिलेला आहे. माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे बाबा!
 • प्रिय बाबा, मला जगातील नेते किंवा पौराणिक ध्येयवादी नायकांमधील प्रेरणादायक लोक शोधावे लागले नाहीत. तुम्ही माझे प्रेरणास्थान आहात. फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा.
 • फादर्स डेच्या शुभेच्छा, बाबा! मला आवश्यक असलेले प्रेम आणि मार्गदर्शनासह दररोज माझ्यासोबत असल्याबद्दल धन्यवाद.
 • आपण आमच्या कुटुंबासाठी केलेल्या सर्व त्यागांबद्दल आणि आमच्या जीवनात सर्व प्रेम व आनंद आणल्याबद्दल आमच्या अंतःकरणातून धन्यवाद. फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!

एका मुलीकडून वडिलांसाठी फादर्स डे संदेश

जर तुम्ही तुमच्या वडिलांपासून दूर असाल तर दुःखी होऊ नका. तुम्ही त्यांना नेहमीच एक गोड संदेश पाठवू शकता. तुम्ही सुरुवात करण्यासाठी काही कल्पना शोधत असल्यास, आमची मदत घ्या!

 • अहो बाबा! मला माहित आहे की आपला दिवस खास करण्यासाठी मी घरी नाही, परंतु मी येथे तो साजरा करीत आहे. तुम्ही आणि आई नेहमीच माझ्याबरोबर असता. फादर्स डेच्या शुभेच्छा, बाबा!
 • बाबा, माझ्यावर नेहमी विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता आणि मला ठाऊक आहे की तुमचा पाठिंबा असल्यास मी कशालाही सामोरे जाऊ शकतो! फादर्स डेच्या शुभेच्छा, बाबा! मी तुमच्यावर खूप प्रेम करतो!
 • बाबा, नेहमीच माझ्यासोबत असल्याबद्दल धन्यवाद. मला माहित आहे, आपण जितके प्रेम करता तितके कोणीही माझ्यावर करणार नाही.
 • बाबा, ही तुमच्याबद्दलची गोष्ट आहे. तुम्ही एक शब्दही न बोलता मला खूप शिकवलं आहे. मला तुमच्यासारखे व्हायचे आहे. बाबा, तुमच्यावर माझे खूप प्रेम आहे. फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!
 • फादर्स डेच्या शुभेच्छा, बाबा! मला माहित आहे की तुम्ही माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करता आणि मला माहित आहे की मी तुझी आवडती मुलगी आहे.
 • फादर्स डे ला मी तुम्हाला मिस करते आहे, परंतु मी तुमच्याबद्दल विचार करीत आहे आणि तुमचा दिवस चांगला जावो ही आशा करते.

एका मुलाकडून वडिलांसाठी फादर्स डे संदेश

फादर्स डे ला मुलगा आपल्या वडिलांना पाठवू शकतो असे काही संदेश येथे आहेत!

 • आपण एक महान बाबा आहात आणि आपण एक मस्त मित्र आहात. आमच्यासोबत तुम्ही नेहमीच असल्याबद्दल धन्यवाद!
 • माझी इच्छा आहे की मी तुमच्यासारखे मोठे व्हावे. पण त्याहीपेक्षा मला असे वाटते की मला तुमच्यासारखे वडील व्हायचे आहे. आपण एक अद्भुत पिता आहात, बाबा!
 • सर्वोत्कृष्ट वडिलांना मी प्रेम आणि धन्यवाद पाठवित आहे.
 • बाबा, तुम्ही माझी प्रेरणा आहात. मी आशा करतो की एक दिवस, मी तुमच्यासारखे वडील होऊ शकतो. फादर्स डेच्या शुभेच्छा!
 • बाबा, मी तुमच्यावर किती प्रेम करतो हे व्यक्तिशः आठवण करुन देण्यासाठी मी तेथे तुमच्यासोबत असायला हवे होते.
 • एका अद्भुत वडिलांना फादर्स डेच्या शुभेच्छा. बाबा तुमच्यावर माझे खूप प्रेम आहे. फादर्स डे च्या तुम्हाला शुभेच्छा!

फादर्स डे साठीचे हे कोट्स आणि शुभेच्छा संदेश तुम्हाला तुमच्या खोल भावना व्यक्त करण्यात मदत करू शकतात. शक्य त्या सर्व प्रकारे तुमचे वडिलांप्रती असणारे प्रेम दर्शवा. आपल्या वडिलांना तुमचे त्यांच्यावर किती प्रेम आहे आणि तुम्ही त्यांची किती काळजी करता हे कळू द्या.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article