Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळाची काळजी कोरोनाविषाणूच्या उद्रेकादरम्यान तुमच्या बाळासाठी कुठल्या गोष्टी आणून ठेवल्या पाहिजेत ह्याची संपूर्ण यादी

कोरोनाविषाणूच्या उद्रेकादरम्यान तुमच्या बाळासाठी कुठल्या गोष्टी आणून ठेवल्या पाहिजेत ह्याची संपूर्ण यादी

कोरोनाविषाणूच्या उद्रेकादरम्यान तुमच्या बाळासाठी कुठल्या गोष्टी आणून ठेवल्या पाहिजेत ह्याची संपूर्ण यादी

जेव्हा आपल्या घरात लहान मूल असते, तेव्हा आपल्याकडे जवळजवळ प्रत्येक वेळी ‘बाळासाठी खरेदी करण्याच्या गोष्टी’ ची यादी असते. तुमच्या छोट्या बाळाची नियमित काळजी घेणे सोपे काम नसते आणि कोव्हीड -१९ कोरोनाव्हायरस साथीच्या काळात, ते चिंताजनक होऊ शकते.

कोविड -१९च्या केसेसची संख्या झपाट्याने वाढत असताना, गोष्टी पुन्हा सामान्य होईपर्यंत आपण घरीच राहिले पाहिजे. या काळात आपल्याला घाबरून जाण्याची गरज नाही, त्याऐवजी स्वतःसाठी आणि आपल्या बाळासाठी सर्व गोष्टींची तयारी करून ठेवा. इतर गोष्टींबरोबरच किराणा सामान, भाज्या, औषधे यांचा साठा करण्याव्यतिरिक्त, आपल्यासाठी काही आवश्यक गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या बाळासाठी आणून ठेवू शकता.

कोरोनाव्हायरसच्या उद्रेकादरम्यान तुमच्या बाळासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची यादी खालीलप्रमाणे:

१. बेबी फूड किंवा फॉर्म्युला

बेबी फूड किंवा फॉर्म्युला

सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बाळांना फक्त स्तनपान दिले पाहिजे, यात काही शंका नाही, परंतु जर अंगावरचे दूध पुरेसे येत नसेल तर त्यांना स्तनपानासोबत फॉर्मुला सुद्धा द्यावा लागतो. तुम्ही तुमच्या बाळाला स्तनपानासोबत फॉर्म्युला दूध देत असल्यास सारखे बाहेर जाणे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या  बाळासाठी फॉर्म्युल्याचे किमान दोन पॅक किंवा दोन आठवडे पुरतील इतके पॅक आणून ठेवले पाहिजेत. आपल्या बाळाच्या बालरोगतज्ञांनी शिफारस केलेला एखादा फॉर्म्युला निवडा आणि साठवण्यापूर्वी त्याची समाप्ती तारीख तपासा.

जर तुमच्या बाळाने घन पदार्थ घेण्यास सुरुवात केलेली असेल तर बाळांसाठी सीरिअल्स देखील आणून ठेवणे चांगले.

२. दुधाच्या बाटल्या

दुधाच्या बाटल्या

जर तुमचे मूल बाटलीने दूध पीत असेल तर कमीतकमी २-३ दुधाच्या बाटल्या खरेदी करून ठेवा  जेणेकरून तुम्हाला एकच बाटली वारंवार धुवावी लागत नाही आणि ती निर्जंतुक न करता वापरता येईल. आपल्याकडे पुरेशा बाटल्या असल्यास, आपण वापरण्यापूर्वी बाटल्या पूर्णपणे कोरड्या टाकू शकता. येथे आम्ही बाटल्या खरेदी करण्याची एक टीप देत आहोत आणि ती म्हणजे ह्या बाटल्याबीपीए-मुक्त आणि अँटी-कोलिक असाव्यात. अशा बाटल्यांमुळे बाळाला गॅसचा त्रास होत नाही. घाईघाईत बाटल्यांची खरेदी करण्याआधी उत्पादन तपशील काळजीपूर्वक वाचा.

३. कपडे

कपडे

आपल्या बाळाकडे आधीच दोन महिने पुरेसे कपडे असू शकतात, परंतु जास्तीच्या खूप आवडलेल्या आणि आरामदायक पोशाखांसाठी नेहमीच जागा असते, नाही का? ओनेसीज, टी शर्ट्स आणि शॉर्ट्स, रॉम्पर्स, नाईट सूट, मोजे, मिटन्स आणि बरेच काही – आपल्याकडे पुरेशा प्रमाणात आहे ह्याची खात्री करा. सध्याच्या कोरोनाव्हायरसच्या उद्रेकादरम्यान हे अधिक महत्वाचे आहे आणि शक्य तितक्या वेळा कपडे धुऊन निर्जंतुक करणे चांगले. हे करण्यासाठी आपल्याला पुरेसे आणि अधिक अतिरिक्त कपडे आवश्यक आहेत.

४. औषधे

औषधे

आपल्या बाळाची रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसल्यामुळे, बाळाला संसर्ग होण्याची आणि बाळ आजारी पडण्याची अधिक शक्यता असते. सध्या तुम्ही घरी असल्यामुळे तुम्ही तुमच्या बाळाच्या बालरोगतज्ञांकडे जाऊन औषधे आणून ठेवणे आवश्यक आहे. ह्या काळात जर तुमचे बाळ आजारी पडले तर हे तुमच्या जवळ असणे जरुरी आहे.

५. डायपर

डायपर

घरात बाळ असल्यावर बाळाचे डायपर कायम लागतात. तुम्ही बाळाचे एक किंवा दोन महिन्यांचे डायपर्स आणून ठेवले तरीसुद्धा हे पुरेसे आहेत का असे तुम्हाला वाटू शकेल. बाळाला दिवसभर दूध द्यावे लागत असल्याने डायपर सतत बदलावे लागते. त्यामुळे डिस्पोझेबल डायपर्स, कापडी लंगोट आणि डायपर पँट्स आणून ठेवा आणि वेळोवेळी ते बदलत रहा.

६. डायपर रॅश क्रीम

डायपर रॅश क्रीम

डायपर रॅश होणे मुलांमध्ये अत्यंत सामान्य आहे, बहुतेक सर्व बाळांना काही प्रमाणात डायपर रॅश होते, परंतु उन्हाळ्याच्या तीव्र महिन्यांमध्ये हे अधिक सामान्य आहे. जर आपल्या बाळाची त्वचा संवेदनशील असेल तर उन्हाळ्यात डायपर रॅश होण्याची शक्यता जास्त असते. ग्रीष्म ऋतू मध्ये होणारी अत्यधिक उष्णता आपल्या बाळाच्या डायपरमध्ये उष्णता निर्माण करू शकते, ज्यामुळे त्याच्या त्वचेला त्रास होऊ शकतो आणि डायपर रॅश होऊ शकते. घाम आणि अस्वच्छ लंगोट किंवा डायपर ह्यामुळे ते आणखी वाढते.

डायपर रॅश सहजपणे व्यवस्थापित करण्यासाठी, चांगल्या प्रतीच्या डायपर रॅश क्रीममध्ये गुंतवणूक करा.परबेन-मुक्त आणि एक कृत्रिम रंग नसलेली एक क्रीम खरेदी करा. ह्या घटकांमुळे ऍलर्जी आणि पुरळ होते. आपल्या बाळाच्या सौम्य त्वचेवर डायपर रॅश क्रीम प्रभावीपणे उपचार करते आणि आपल्या बाळाच्या त्वचेला मऊ ठेवते. अशा वेळी आपल्या मुलास आरामदायक ठेवण्यासाठी डायपर रॅश क्रिम्सचा स्टॉक करून ठेवणे चांगले.

७. बेबी वाइप्स

बेबी वाइप्स

बेबी वाईप्सचा अगदी कशासाठी सुद्धा उपयोग होतो. आपण त्यांचा वापर डायपर काढल्यानंतर स्वच्छ करण्यासाठी, बाळाने दूध बाहेर काढल्यानंतर ते स्वच्छ करण्यासाठी, अस्वच्छ पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी आणि अगदी आपल्या कपड्यांवरील थुंक साफ करण्यासाठी सुद्धा करू शकता. बेबी वाईप्समुळे नव्याने पालक झालेल्या लोकांचे जीवन सोपे होऊ शकते. वाईप्स खरेदी करताना, अल्कोहोल आणि सुगंध मुक्त वाईप्स खरेदी करा आणि ते बाळाच्या त्वचेसाठी योग्य असल्याची खात्री करा.

८. स्नॅक्स

स्नॅक्स

दर दोन तासांनी बाळांना दूध देणे आवश्यक आहे  आणि जर तुमच्या बाळाने घनपदार्थ घेण्यास सुरुवात केलेली असेल तर तुमच्यासारखेच दोन जेवणाच्या मध्ये बाळाला दूध घेणे आवडेल. पण बाळांच्या बाबतीत आपण कायमच निरोगी स्नॅक्सची निवड केली पाहिजे. तुम्ही तुमच्या बाळाला अति गोड पदार्थ किंवा तळलेले स्नॅक्स देणे टाळावे.

आपण आपल्या बाळासाठी, संपूर्ण धान्य, जसे की नाचणी आणि ओट्सपासून बनवलेले पोषक स्नॅक्स खरेदी करा. तुम्ही त्याच्यासाठी खजूर, बेरी आणि पावडर काजू देखील खरेदी करू शकता. कृत्रिम रंग घातलेले स्नॅक्स देणे टाळा.

९. मॉइश्चरायझर आणि बेबी ऑइल

मॉइश्चरायझर आणि बेबी ऑइल

आपल्या बाळाची त्वचा मऊ आणि गुळगुळीत ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर आणि बेबी ऑइल विकत घ्या. तुमच्या आवडत्या ब्रँडच्या दोन बाटल्या मॉइश्चरायझर आणि बेबी ऑइल खरेदी करू शकता परंतु त्याचा साठा करू नका. आपण त्या नंतर देखील खरेदी करू शकता.

१०. बेबी पावडर

बेबी पावडर

बेबी पावडर उन्हाळ्यात अगदी आवश्यक आहे. त्यामुळे बाळाची त्वचा कोरडी राहील उन्हाळ्यामध्ये त्वचेचा क्षोभ रोखण्यास सुद्धा मदत होते. (त्वचा जेव्हा कपड्यांवर घासली जाते किंवा बाळांच्या बाबतील डायपर वर तेव्हा त्वचा क्षोभ होतो).दिवसातून दोनदा किंवा तीनदा आपल्या बाळाच्या त्वचेवर पावडर वापरा त्याला घाम मुक्त ठेवा.

११. सॅनिटायझर

सॅनिटायझर

घरात बाळ असताना तुम्ही स्वच्छता राखली पाहिजे, परंतु ह्या कोरोना काळात, हात धुणे आणि सॅनिटायसरचा वापर करणे हे संसर्ग रोखण्याचे मार्ग आहेत. म्हणून हॅन्ड सॅनिटायझरच्या काही मोठ्या बाटल्या (६०% पेक्षा जास्त अल्कोहोल सामग्रीसह) घरात ठेवा आणि वारंवार वापरा. कुटुंबातील प्रत्येकास बाळाला स्पर्श करण्यापूर्वी त्याचा वापर करण्यास सांगा.

१२. खेळणी

खेळणी

खेळणी कदाचित ‘बाळासाठी अत्यावश्यक वस्तू’ म्हणून पात्र नसतील, कोरोनाव्हायरसच्या उद्रेकाच्या काळात आपण घरात लॉक असताना आपले बाळ अस्वस्थ होईल. आणि तुम्ही घरून काम करत असताना बाळाचे मनोरंजन करण्यासाठी (किंवा त्याचे लक्ष विचलित करण्यासाठी) तुमच्याकडे पुरेशी खेळणी असणे आवश्यक असेल.  म्हणून सर्व आकारांची खेळणी खरेदी करा. कोडी सोडण्यापासून ते कप्स स्टॅकिंग करण्याचा खेळ तसेच ब्लॉक ते ट्रेनचे सेट्स आणि संगीत खेळण्यापर्यंत सर्व प्रकारची खेळणी खरेदी करा आणि नक्कीच तुम्ही त्या खेळण्यांचे आभार मानाल!.

कोरोनाव्हायरसच्या उद्रेकादरम्यान तुम्ही तुमच्या बाळासाठी खरेदी करणे आवश्यक आहे. पालकांनो, तयार राहा, आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी घरात किती काळ राहावे लागेल हे आपल्याला ठाऊक नाही, म्हणून कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आणून ठेवा आणि आपल्या बाळाची काळजी घ्या.

आणखी वाचा:

कोरोनाविषाणू विषयी प्रत्येक पालकाला पडणारे १३ प्रश्न
कोरोनाविषाणूचा उद्रेक झालेला असताना, तुमच्या मुलाला व्यस्त ठेवण्यासाठी घरात करता येतील असे १५ क्रियाकलाप

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article