Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ आरोग्य बाळांना होणाऱ्या बद्धकोष्ठतेवर १२ घरगुती उपाय

बाळांना होणाऱ्या बद्धकोष्ठतेवर १२ घरगुती उपाय

बाळांना होणाऱ्या बद्धकोष्ठतेवर १२ घरगुती उपाय

आपल्या बाळाला शौचास नीट होत नाही किंवा शी करताना त्रास होत आहे असे तुमच्या लक्षात आले तर बाळाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्याच्या सवयी, फॉर्मुला दूध किंवा इतर काही आजारपणं ही सुद्धा बद्धकोष्ठतेची इतर कारणे असू शकतात. बाळांना होणाऱ्या बद्धकोष्ठतेला तुम्ही घरगुती उपायांद्वारे प्रभावीपणे सामोरे जाऊ शकता.

बाळांमध्ये आढळणारी बद्धकोष्ठतेची चिन्हे

  1. शौचास करताना अस्वस्थता
  2. कडक आणि कोरडे मल
  3. चिडचिड करणे आणि अधिक वेळा थुंकणे
  4. शौचास करताना वेदना होणे
  5. पोटदुखी आणि सूज येणे
  6. शौचामधून रक्त पडणे

बाळांमधील बद्धकोष्ठतेवर १२ नैसर्गिक उपाय

आपल्या मुलाला वेदना होताना आणि अस्वस्थतेत पाहून खूप त्रासदायक वाटू शकते. बाळांना होणाऱ्या बद्धकोष्ठतेसाठी काही नैसर्गिक उपाय खालीलप्रमाणे आहेत ज्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो.

. सफरचंद रस

प्रौढांप्रमाणेच बाळांमध्ये सुद्धा आहारात तंतुमय पदार्थ नसल्यामुळे बद्धकोष्ठता निर्माण होऊ शकते. सफरचंदांमध्ये असलेले पाण्यात विरघळणारे तंतुमय पदार्थ बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. तुम्ही सफरचंदच्या सालांसह रस करू शकता आणि तो रस तुमच्या बाळाला बाटली किंवा सिपरने पिण्यास देऊ शकता. दिवसभरात एक बाटली बाळाला दिल्यास बाळाला शौचास करण्यास मदत होते.

.काळे मनुके

लहान मुलांमधील बद्धकोष्ठतेवर काळ्या मनुक्यांचा रस खूप प्रभावी आहे. काळे मनुके हे नैसर्गिक रेचक आहेत. बाळाला शौचास सुलभ होण्यासाठी काळे मनुके चांगले काम करतात. त्यासाठी काळे मनुके खाल्ल्यावर चार ते पाच तास लागू शकतात.

. ब्राउन शुगर

जर तुमच्या मुलाचे वय एक वर्षापेक्षा जास्त असेल तर ब्राऊन शुगर सोल्यूशन बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यासाठी चमत्कार करू शकते. तुम्ही अर्धा चमचा साखर अर्धा औंस पाण्यात मिसळून दिवसातून दोनदा तुमच्या बाळाला हे द्रावण देऊ शकता. पांढऱ्या साखरेऐवजी ब्राऊन शुगर किंवा पाम शुगर वापरण्याचा सल्ला दिला जातो.

. सेंद्रीय नारळ तेल

जर तुमच्या बाळास शौचास साफ होत नसेल किंवा मल जाण्यात अडचण असेल तर सेंद्रीय नारळ तेल खरोखर चांगले कार्य करते. जर तुमच्या बाळाचे वय सहा महिन्यांपेक्षा जास्त असेल तर तुमच्या बाळाच्या अन्नात दोन ते तीन मिलीलीटर नारळ तेल तुम्ही घालू शकता. जर तुमच्या बाळाचे वय सहा महिन्यांपेक्षा कमी असेल तर तुम्ही नारळ तेल आपल्या बाळाच्या गुद्द्वाराभोवती लावू शकता.

. टोमॅटो

६ महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या बाळांमध्ये बद्धकोष्ठतेचा सामना करण्यासाठी टोमॅटो अत्यंत फायदेशीर ठरतात. सुलभ शौचासाठी तुम्ही तुमच्या बाळास टोमॅटोचा रस देऊ शकता. एक कप पाण्यात एक लहान टोमॅटो उकळा. मिश्रण थंड होऊ द्या आणि नंतर ते गाळून घ्या. बद्धकोष्ठता होऊ नये म्हणून रोज तीन ते चार चमचे आपल्या बाळाला द्या.

. बडीशेप

बडीशेपचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत आणि हे बियाणे पाचक प्रश्नांवर उपचार करण्यासाठी खूप प्रभावी असतात. एका कप पाण्यात एक चमचा बडीशेप उकळून घेऊ शकता आणि हा काढा थंड झाल्यावर गाळून दिवसातून तीन ते चार वेळेला तुमच्या बाळाला देऊ शकता. जर तुमचे बाळ ६ महिन्यांपेक्षा छोटे असेल तर आईने दिवसातून दोनदा बडीशेप खाल्ली पाहिजे.

बडीशेप

. पपई

पपई फायबरचा समृद्ध स्रोत आहे आणि बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यासाठी खूप प्रभावी आहे. सहा महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी पपई हा बद्धकोष्ठतेवर चांगला उपाय आहे. आतड्यांसंबंधी हालचाली नियमित करण्यासाठी बाळाला पपईचा स्मॅश करून किंवा त्याची स्मूदी करून दिली पाहिजे.

. पेअर्स

पेअर्स मध्ये पेक्टिन आणि आहारातील फायबर समृद्ध प्रमाणात असतात. तुमच्या बाळाला पेअर्सचा रस पातळ स्वरूपात दिला जाऊ शकतो. म्हणून, दोन औंस रस समान प्रमाणात पाण्यात मिसळा आणि तुमच्या बाळाला शौचास सुलभ होण्यास मदत करा. वयाच्या चार महिन्यांनंतर बाळाला पेअर दिले जाऊ शकते.

. द्रवपदार्थ

आपल्या बाळाच्या आहारात पुरेसे द्रवपदार्थ नसल्यामुळे बद्धकोष्ठता उद्भवू शकते. म्हणूनच, जर आपल्या बाळाचे वय ६ महिन्यांपेक्षा जास्त असेल तर तुमच्या बाळाच्या आहारात तुम्ही पुरेसे द्रवपदार्थ समाविष्ट करू शकता. सूप, फळांचे रस, दूध आणि पाणी हे द्रवपदार्थांचे काही पर्याय आहेत. तुमच्या शरीरात पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थ असल्यास त्याने शौचास होण्यास मदत होते.

१०. कोमट पाण्याने अंघोळ

तणावग्रस्त स्नायूंना शांत करण्यासाठी आणि त्यांना आराम मिळण्यासाठी कोमट पाण्याने अंघोळ घालणे हा एक आदर्श मार्ग आहे. बद्धकोष्ठता झाल्यास कोमट पाण्याने अंघोळ केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. तुमच्या बाळासाठी कोमट पाण्याने बाथटब भरा आणि त्यामध्ये काही चमचे बेकिंग सोडा घाला. त्यामुळे गुदाशयचे स्नायू उघडण्यास आणि आतड्यांची हालचाल होण्यास मदत होईल.

११. मालिश

बाळाला शौचास होण्यासाठी पोटाचा मसाज करणे हा एक चांगला उपाय आहे. घड्याळाच्या दिशेने पोटाला मालिश केल्यास उपयोग होतो. तुम्ही त्यासाठी बाळांसाठीचे चांगले तेल वापरू शकता.

१२. व्यायाम

प्रौढांप्रमाणेच, लहान मुलांनी देखील शौचाचा त्रास होऊ नये म्हणून सतत हालचाल करणे आणि व्यायाम करणे आवश्यक आहे. जर तुमचे बाळ रांगत असेल तर तुम्ही तुमच्या बाळाला घरात हालचाल करण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकता. जर तुमचे बाळ लहान असेल तर तुम्ही बाळाचे पाय पुढे मागे, वर्तुळाकारात फिरवून त्यास मदत करू शकता. नवजात बाळाच्या बद्धकोष्ठतेसाठी हा एक सर्वात प्रभावी उपाय आहे.

तुमच्या बाळावर घरगुती उपचारांचा अवलंब करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर तुमच्या बाळास योग्य आहार मिळत नसेल, बाळाचे वजन कमी होत असेल किंवा शौचातून रक्त येत असेल तर तात्काळ वैद्यकीय मदत घ्या.

आणखी वाचा:

बाळांच्या तापावर सर्वोत्तम ९ परिणामकारक घरगुती उपाय
लहान बाळांना होणाऱ्या कोरड्या खोकल्याचा सामना कसा कराल?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article