In this Article
तुमच्या बाळाने एकदा ६ महिन्यांचा टप्पा गाठला की, बाळाला आवश्यक पोषकद्रव्ये मिळण्यासाठी तुम्ही हळूहळू बाळाला घनपदार्थांची ओळख करून दिली पाहिजे. तुमच्या बाळाला एकंदरीत निरोगी आहार देण्यासाठी स्तनपान किंवा फॉर्म्युला फिडींग सोबत एखादा घनपदार्थ आहार पूरक ठरू शकतो. बीटरूट हा तुमच्या बाळासाठी घनपदार्थांचा एक उत्कृष्ट पौष्टिक पर्याय आहे. परंतु, तुमच्या बाळासाठी हा पर्याय सुरक्षित असल्याची खात्री करण्यासाठी बाळाला कोणताही नवीन खाद्यपदार्थ देण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
बीटरूट लहान बाळांसाठी सुरक्षित आहे का?
बर्याच भाज्यांप्रमाणे, बीटरूट लहान बाळांसाठी सुरक्षित आहे. एकदा बाळाने घन पदार्थ खाण्यास सुरुवात केली की तुमच्या लहान बाळाला तुम्ही बीटरूट देऊ शकता. पोषक तत्वांनी भरलेले, बीटरूट लहान बाळांच्या विकासास मदत करण्यासाठी करते. बीटरूट देताना सुरुवातीला थोड्या प्रमाणात सुरुवात करा आणि बाळाला सहज पचेल अशा स्वरूपात ते द्या.
बीटरूटचे पौष्टिक मूल्य
बीटरूट अनेक पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे. बीटरूटचा सर्वसमावेशक पौष्टिक मूल्य तक्ता खाली दिलेला आहे.
पोषक तत्व | पोषण मूल्य प्रति १०० ग्रॅम |
पाणी | ८६.९ ग्रॅम |
प्रथिने | १.९५ ग्रॅम |
कार्बोहायड्रेट | ६.१८ ग्रॅम |
ऊर्जा | ३५ किलोकॅलरी |
लोह | ०.७६ मिग्रॅ |
फायबर | २.८ ग्रॅम |
फॉस्फरस | ३६.३ मिग्रॅ |
सोडियम | ६९.४ मिग्रॅ |
कॅल्शियम | १६ मिग्रॅ |
मॅग्नेशियम | ३३.२ मिग्रॅ |
झिंक | ०.३५ मिग्रॅ |
थायामिन | ०.०१ मिग्रॅ |
नियासिन | ०.२१ मिग्रॅ |
फोलेट | ९७.३ युजी |
व्हिटॅमिन सी | ५.२६ मिग्रॅ |
व्हिटॅमिन ए | ०.०९ मिग्रॅ |
व्हिटॅमिन K | २.९८ युजी |
व्हिटॅमिन ई | ०.०९ मिग्रॅ |
बाळाला बीटरूट कधी द्यायचे?
लहान बाळे बीट कधी खाऊ शकतात याबद्दल खात्री नाही? बाळ ८ ते १० महिन्यांचे झाल्यावर बाळाला बीटरुटची ओळख करून द्यावी . तुमच्या लहान बाळाच्या आहारात बीट समाविष्ट करण्यापूर्वी तुम्ही बाळाच्या डॉक्टरांशी चर्चा करू शकता. बीटरूटचे प्रमाण १ किंवा २ चमचे इतके मर्यादित ठेवा, कारण ते नायट्रेट्सने समृद्ध असते आणि ते तुमच्या बाळाला पचनास कठीण होऊ शकते. तुम्ही बीट शिजवू शकता किंवा वाफवू शकता कारण ते कच्च्या बीटपेक्षा जास्त फायदेशीर आहेत.
लहान बाळांसाठी बीटरूटचे आश्चर्यकारक आरोग्यविषयक फायदे
बीट हे पोषण आणि खनिजांचा चांगला स्रोत आहे, त्यामुळे बाळांच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर असते
१. जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध
बीटमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. त्यामध्ये जीवनसत्त्वे ए, बी, सी, के, आणि ई आणि पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह इ. घटकांचा समावेश असतो. बीटरूट हे लहान बाळांमध्ये अतिसारासह अनेक रोगांचा धोका टाळण्यासाठी आणि कमी करण्यासाठी चांगले असते. रातांधळेपणा, बेरीबेरी, अँगुलर स्टोमायटिस, मुडदूस, ग्लोसिटिस, ऑस्टिओमॅलेशिया, इ समस्यांवर बीटरूटचा चांगला उपयोग होतो.
२. ऍनिमियाचा धोका कमी होतो
लोहाचे प्रमाण भरपूर असलेले बीट तुमच्या बाळामधील ऍनिमियाचा धोका कमी करेल. लोह लाल रक्तपेशींच्या निर्मितीला प्रोत्साहन देते, शरीराच्या वेगवेगळ्या भागांना ऑक्सिजन पुरवते आणि तुमच्या बाळाच्या मेंदूच्या विकासातही मदत करते.
३. पचन वाढवते
बीटमध्ये भरपूर फायबर असते आणि त्यामुळे, पचन सुधारते आणि लहान बाळांना बद्धकोष्ठता होत नाही.
४. प्रतिकारशक्ती वाढवते
बीटरूटमध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील मदत होते. विशेषतः लहान बाळांसाठी हे महत्वाचे आहे कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती अजूनही विकसित होत आहे.
५. शरीर स्वच्छ करते
काकडी, गाजर आणि बीटाचा एकत्र रस पित्ताशय आणि मूत्रपिंड स्वच्छ करण्यासाठी ओळखला जातो.
लहान मुलांना बीटरूट्स खायला देताना घ्यावयाची काळजी
तुमच्या बाळाला हळूहळू बीट्सची ओळख करून द्या. बाळ एक वर्षाचे होण्यापूर्वी बाळाला १ किंवा २ चमच्यांपेक्षा जास्त रस देऊ नका. त्यानंतर, आपण प्रमाण थोडे वाढवू शकता, परंतु तरीही, प्रमाण कमी ठेवणे चांगले. तुमच्या बाळाला इतर भाज्या द्या. गाजर आणि बटाटे ह्या सारख्या भाज्या त्याला आवडतील. तुमच्या बाळाला बीटची चव आवडणार नाही आणि त्याची सवय व्हायला थोडा वेळ लागेल.
तसेच, बाळाला एका वेळी एकच भाजी किंवा फळ द्या. तुमचे बाळ बीटरूटवर प्रतिकूल प्रतिक्रिया देते की नाही हे पाहण्यासाठी चार दिवस वाट पहा. जर तुम्हाला एलर्जीची प्रतिक्रिया दिसली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
बाळासाठी बीट कसे शिजवावे?
जेव्हा तुम्ही तुमच्या बाळासाठी बीट शिजवता तेव्हा ते तयार करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते वाफवून घेणे किंवा उकडणे. त्यानंतर बाळाला बीटची प्युरी करून दिल्यास ती बाळाला पचनास सोपी जाते. बीट वाफवून घेतल्यामुळे व्हिटॅमिन ए बीटा–कॅरोटीन सुद्द्धा उपलब्ध होते. म्हणजेच बीटचे एकदा सेवन केल्यावर तुमच्या बाळाच्या शरीराला त्याचा सहजपणे उपयोग होतो.
ताजे मध्यम आकाराचे बीट (ते अधिक कोमल असल्यामुळे) घ्या आणि चांगले धुवा. बीटाचे हिरवे देठ कापून आणि सोलून घ्या. तुम्ही बीट नेहमी सोलून घ्यावे कारण त्याचे साल पचायला जड जाते, अगदी मोठ्या माणसांना सुद्धा ते पचणे कठीण होते. बीट शिजवण्यासाठी, आपल्याला खालील गोष्टींची आवश्यकता असेल:
- सॉसपॅनमध्ये पाणी उकळवा.
- बीट्सचे तुकडे करा आणि पाण्यात घाला.
- १५ मिनिटे किंवा बीट चांगले मऊ होईपर्यंत शिजवा.
- चांगले शिजल्यावर बीट काढून घ्या आणि थंड पाण्याखाली स्वच्छ धुवा.
- ब्लेंडरमध्ये बीट चांगले मऊ होईपर्यंत फिरवून घ्या.
लहान मुलांसाठी सोप्या घरगुती बीटरूट पाककृती
येथे काही सोप्या बीटरूट पाककृती आहेत. ह्या पाककृती तुमच्या बाळाच्या भाजीचा स्वाद वाढवू शकतात.
१. पर्पल पोटॅटो
ही रेसिपी बनवायला सोपी आणि तुमच्या बाळाला खायला देण्यासाठी मजेदार आहे.
लागणारे साहित्य:
- २ मध्यम बीटरूट
- १ गाजर
- २ बटाटे
- पाणी
कृती:
- सर्व भाज्या घुवून, सोलून घ्या आणि त्यांचे तुकडे करा.
- एका सॉसपॅनमध्ये थोडे पाणी उकळवा आणि त्यात कापलेल्या भाज्या घाला.
- ह्या भाज्या मऊ होईपर्यंत शिजवा.
- पाणी काढून टाका आणि ब्लेंडरमध्ये प्युरी करा.
- आपण चवीनुसार मीठ घालू शकता.
२. बीटरूट सूप
तुमच्या बाळाच्या पहिल्या बीटरूट अनुभवासाठी तुम्ही मधुर बीटरूट सूप देखील बनवू शकता.
लागणारे साहित्य:
- बीटरूट्स – ३
- बटाटा– १
- कांदा – १
- भाज्यांचे पाणी – २ कप
- दही – १/४ कप
कृती:
- बीटरूट आणि बटाटे सोलून बारीक करा आणि कांदा चिरून घ्या.
- एका सॉसपॅनमध्ये, दही वगळता सर्व साहित्य घाला. त्यात पाणी घालून उकळवा.
- भाज्या शिजल्या की चांगल्या मिक्स करून घ्या आणि प्युरी करा.
- या प्युरीमध्ये ताजे दही घाला.
३. बीटरूट प्युरी
बाळासाठी बीटची प्युरी हा तुमच्या लहान बाळाला बीटरुटची ओळख करून देण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.
लागणारे साहित्य:
- २ शिजवलेले बीट
- १/२ छोटा कांदा (किंवा गाजर)
- एक चिमूटभर जायफळ
- २ टेबलस्पून होममेड ऍपलसॉस
कृती:
- कांदा चिरून घ्या.
- कढईत थोडे तेल घालून चिरलेला कांदा परतावा.
- ब्लेंडरमध्ये सफरचंदासोबत बीट, तळलेले कांदे, जायफळ घालून प्युरी करा.
४. ऍपल बीटरूट लापशी
ही स्वादिष्ट सफरचंद बीटरूट लापशी बाळासाठी एक स्वादिष्ट डिश आहे.
लागणारे साहित्य:
- १ बीटरूट
- १ सफरचंद
- आले
- १/४ कप ओट्स
- १/२ कप दूध
कृती:
- बीट, सफरचंद आणि आले सोलून किसून घ्या.
- एका पॅनमध्ये सर्व साहित्य घालून पाच मिनिटे शिजवा.
- भाज्या शिजेपर्यंत आणि मऊ होईपर्यंत मिश्रण हलवा.
- आवश्यक असल्यास, एक नितळ पोत तयार करण्यासाठी तुम्ही दलियामध्ये अधिक दूध घालू शकता.
५. मॅश केलेले बीटरूट
तुमच्या बाळाला बीट देण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ते मॅश करून घेणे.
लागणारे साहित्य:
- २ बीट्स
- १ सफरचंद
- १ बटाटा
कृती:
- सर्व बीटरूट आणि बटाटे सोलून चिरून घ्या.
- बीटरूट मऊ होईपर्यंत वाफवून घ्या. तुम्ही शेवटी त्यामध्ये सफरचंद घालू शकता.
- मऊ झाल्यावर ते एकत्र मॅश करून त्याची प्युरी बनवा.
एकदा तुमचे बाळ घन पदार्थ खाण्यास तयार झाले की, बाळाला बीटसारख्या नवीन खाद्यपदार्थांची ओळख करून दिली पाहिजे. डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतरच बाळाला बीट देण्यास सुरुवात करा. एका वेळी एकच भाजी द्या आणि तुमच्या बाळाच्या शरीराला त्याची सवय होऊ द्या. जर तुमच्या बाळाला कोणत्याही अन्नपदार्थामुळे ऍलर्जी आली तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा:
बाळांसाठी द्राक्षे: आरोग्यविषयक फायदे आणि रेसिपी
बाळांसाठी कस्टर्ड – तुम्ही करून पाहू शकता अशा पाककृती