Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) शिक्षण मुलांसाठी प्राण्यांच्या सर्वोत्तम ३० बोधकथा

मुलांसाठी प्राण्यांच्या सर्वोत्तम ३० बोधकथा

मुलांसाठी प्राण्यांच्या सर्वोत्तम ३० बोधकथा

आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या माध्यमांमधून आपण सतत शिकत असतो. शिकण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्वात सोप्या आणि सुलभ माध्यमांपैकी एक म्हणजे गोष्टी किंवा कथा.  शतकानुशतके, मुलांना सांगितल्या जाणार्‍या कथा कल्पनारम्य आणि साहसी आहेत.  ह्या कथांमधून आपण आपली संस्कृती आणि परंपरा आपल्या मुलांपर्यंत पोहोचवतो. ह्या कथा अनेकदा आपल्या मुलांना मौल्यवान असे नैतिक धडे  देऊन त्यांना शिक्षित करण्यात मदत करतात. जेव्हा मुले ही नैतिक मूल्ये ऐकतात किंवा वाचतात तेव्हा त्यांना त्यांचे महत्त्व समजते. ह्या नैतिक मूल्यांचे पालन का केले पाहिजे हे सुद्धा ही मुले शिकत असतात. म्हणून आपण आपल्या लहान मुलांना अशा नैतिक कथा वाचण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. ह्या लेखामध्ये, आम्ही मुलांसाठी काही मनोरंजक नैतिक कथा अगदी संक्षिप्त स्वरूपात दिलेल्या आहेत. चला तर मग त्यांच्यावर एक नजर टाकूया.

व्हिडिओ: लहान मुलांसाठी सिंह आणि उंदराची बोधकथा

लहान मुलांसाठी छोट्या ३० प्राण्यांच्या कथा

मुलांना ज्ञान देणे हे पालकांचे सर्वात मोठे काम आहे. कधीकधी मुलांसाठीच्या कथांमध्ये निर्जीव वस्तू किंवा प्राण्यांचा वापर केल्याने ह्या कथा मजेदार बनवण्यासाठी मदत होते. असे म्हणता येईल की लहान मुलांच्या प्राण्यांच्या कथा शहाणपणाने भरलेल्या असतात. ह्या कथा सुसंगत आणि समजण्याजोग्या पद्धतीने मांडल्या जाऊ शकतात. त्यामुळे आम्हाला आमचे अनुभव आमच्या मुलांना योग्य पद्धतीने सांगता येऊ शकतात.

तुमच्या मुलांना नैतिक मूल्यांचे धडे देण्यास  मदत करण्यासाठी प्राण्यांच्या सर्वोत्तम लघुकथा येथे दिलेल्या आहेत

1. ससा आणि कासव

ससा आणि कासव

पृथ्वीवरील सर्वात वेगवान प्राण्यांपैकी एक आणि सर्वात मंद प्राणी यांच्यातील शर्यतीबद्दलची ही उत्कृष्ट कथा पिढ्यानपिढ्या सगळ्यांना आवडते आहे. ही कथा खरोखरच अनेक वर्षांपासून लहान मुलांना सांगितली जाते. ही कथा 2-6 वयोगटातील मुलांना गुंतवून ठेवते.

बोध: कुठलेही काम कमी लेखू नका, तुमचा अहंकार वाढू न देता तुम्हाला ते पूर्ण करता येईल याची खात्री करा. कधी कधी आव्हानाचा सामना करण्यासाठी मंद गती आणि संयम हे एक चांगले साधन मानले जाते.

2. मेंढीच्या वेशात लांडगा

मेंढीच्या वेशात लांडगा

एका लांडग्याची ही खूप जुनी गोष्ट आहे. ह्या कथेमध्ये एक लांडगा मेंढराच्या कातडीचा ​​वापर करून स्वतःचा वेश बदलतो. आणि इतर मेंढयांची समजून फसवणूक केली जाते. या कथेमध्ये एक महत्त्वाचा धडा आहे. हा धडा आपण सर्वांनी आपल्या जीवनात कधीतरी शिकला पाहिजे.

बोध: दिसणे फसवे असू शकते. कधीही लोकांच्या किंवा परिस्थितीच्या दर्शनी मूल्यावर जाऊ नये. थोडी सावधगिरी बाळगल्यास स्वतःचे संरक्षण करता येते.

3. तीन लहान डुक्कर

तीन लहान डुक्कर

डुकरांच्या मूर्खपणाचे वर्णन करणारी एक कथा आहे. ही डुकरे आपल्या आईचे ऐकत नाहीत आणि तकलादू घरे बांधतात. ही एक अशी कथा आहे जिच्यामुळे तुमच्या लहान मुलांमध्ये तुम्ही उत्सुकता निर्माण करू शकता आणि मोठ्या वाईट लांडग्याच्या सस्पेन्सने तुमच्या लहान मुलाला मंत्रमुग्ध करू शकता.

बोध: या कथेतून मुलांना शिकवले जाते की एखादे काम उत्तमरीत्या करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच ते काम लगेच करून टाकणे महत्त्वाचे आहे. तुमच्या कृतींची सचोटी आणि प्रेरणा खूप पुढे जाण्यास मदत करते.

4. कावळा आणि मडके

कावळा आणि मडके

लहानाचे मोठे होताना प्रत्येकाने ऐकलेली आणि वाचलेली ही एक कथा आहे. एक कावळा त्याची तहान भागवण्यासाठी कसा प्रयत्न करतो हे ह्या कथेत सांगितलेले आहे. तसेच कधीही हार न मानण्याची त्याची वृत्ती ह्या कथेतून दिसून येते. कावळा आपली कल्पकता आणि साधनसंपत्ती वापरून आपली समस्या सोडवतो आणि आनंदाने उडून जातो.

बोध: प्रतिकूलतेच्या पहिल्या लक्षणांवर हार मानू नका. कोणतीही समस्या सोडवण्यासाठी आणि तुमची ध्येये आणि स्वप्ने साध्य करण्यासाठी तुमच्या आजूबाजूला जे आहे त्याचा वापर करा.

5. गोल्डीलॉक्स आणि तीन अस्वल

गोल्डीलॉक्स आणि तीन अस्वल

अस्वलाच्या घरात शिरून ते घरात नसताना त्यांच्या घराचा वापर करणाऱ्या एका मुलीची ही गोष्ट आहे. जेव्हा अस्वलाचे कुटुंब तिच्यावर नाराज होते तेव्हा बिघडलेली मुलगी शेवटी तिचा धडा शिकते.

बोध: तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर तुमच्या कृतींचे काय परिणाम होतात याचा नेहमी विचार करा, खासकरून जेव्हा तुमच्या कृतींचा त्यांच्यावर थेट परिणाम होतो तेव्हा जरूर विचार करण्याची गरज असते.

6. आंबट द्राक्षे

आंबट द्राक्षे

भुकेल्या कोल्ह्याची ही कथा आहे. तो द्राक्षांपर्यंत पोहोचू शकत नाही. काही वेळा प्रयत्न केल्यावर, तो द्राक्षे आंबट असल्याचे घोषित करतो आणि प्रयन्त सोडून देतो. शेवटी तो भुकेलाच राहतो.

बोध: यश मिळेपर्यंत प्रयत्न करा आणि पराभूत होऊ नका. इतर गोष्टींना दोष देण्यापेक्षा पराभवाचा स्वीकार करा आणि तुमच्या अपयशातून शिका

7. मांजरीच्या गळ्यात कोण घंटा बांधणार?

मांजरीच्या गळ्यात कोण घंटा बांधणार

उंदरांच्या कुटुंबाची आणि घरावर राज्य करणाऱ्या मांजरीची ही कथा आहे. मांजरीची चाहूल लागण्यासाठी तिच्या गळ्यात घंटा बांधण्याविषयीची चर्चा ह्या कथेमध्ये केली जाते.

बोध: कृती करेपर्यंत काहीतरी करण्याबद्दल बोलणे चांगले असते. हे अप्रिय आणि कठीण असू शकते. वरवर चांगल्या वाटणाऱ्या कल्पनांचे तोटे ओळखणे महत्वाचे आहे.

8. शिकारी आणि ससा

शिकारी आणि ससा

सशाचा पाठलाग करणाऱ्या शिकारी प्राण्याची ही कथा आहे. शिकारी थकतो आणि पाठलाग सोडून देतो. शेळ्यांच्या कळपाने थट्टा केल्यावर, शिकारी सांगतो की ससा वेगाने पळत होता कारण तो त्याच्या जीवासाठी लढत होता.

बोध: प्रोत्साहन दिल्यास परिणाम चांगला होतो. कोणत्याही कामात प्रेरणा हा महत्त्वाचा घटक असतो.

9. कुरूप पिल्लू

कुरूप पिल्लू

एका बदकाची ही खूप सुंदर कथा  आहे. बदकाला वाटते कि त्याचे सर्व भाऊ आणि बहिणी तसेच त्याचे मित्र देखील त्याच्यापेक्षा अधिक सुंदर आहेत. पूर्णपणे निराश होऊन, तो आपले कुटुंब सोडून तलावाच्या एका निर्जन भागात जातो. तो गेल्यावर काही भेट देणारे पक्षी त्याला सांगतात की तो आता एक सुंदर हंस बनला आहे.

बोध: प्रत्येकजण सुंदर असतो

10. दोन मांजरी आणि एक माकड

दोन मांजरी आणि एक माकड

दोन बोक्यांची ही कथा आहे. लोण्याच्या गोळ्यासाठी दोघे भांडत असतात. एक माकड त्यांना पाहते आणि लोण्याच्या गोळ्याचे सामान भाग करून देतो असे सांगते . दोन समान भाग केल्यानंतर माकड म्हणते की हे दोन सामान भाग नाहीत आणि तो मोठ्या भागातून थोडे लोणी खातो. सगळे लोणी संपेपर्यंत माकड असे करत राहते.

बोध: दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ.

11. सिंह आणि उंदीर

सिंह आणि उंदीर

सिंहाला जेव्हा शक्य होईल तेव्हा मदत करण्याचे वचन दिल्यावर उंदराचा जीव वाचवणाऱ्या सिंहाची ही कथा आहे.  काही वेळातच, सिंह शिकारींनी लावलेल्या जाळ्यात अडकतो. लहान उंदीर सिंहाला संकटात पाहतो आणि पटकन जाळे कुरतडून सिंहाला मुक्त करतो.

बोध: कोण चांगला मित्र बनू शकतो हे तुम्हाला कधीच माहीत नाही म्हणून प्रत्येकाशी दयाळूपणे वागा. सर्वजण तुमच्याशी सुद्धा दयाळूपणे वागतील.

12. खेड्यातील आणि शहरी उंदीर

खेड्यातील आणि शहरी उंदीर

शहरातील उंदीर त्याच्या चुलत भावाला भेटतो जो त्याला सोयाबीनच आणि भात खायला देतो. शहरातील उंदीर अन्नाकडे बघून नाक मुरडतो आणि त्याच्या चुलत भावाला केक खाण्यासाठी शहरात घेऊन जातो. ते जेवत असताना दोन कुत्रे जीव वाचवण्यासाठी धावणाऱ्या उंदरांचा पाठलाग करतात.

बोध: ज्याचा उपभोग घेता येत नाही अशा सुखसोयींकडे पाहण्यापेक्षा तुम्ही शांततेत उपभोगता येणाऱ्या सामान्य गोष्टींमध्ये आनंदी असणे चांगले.

13. माकड आणि मगर

माकड आणि मगर

ही कथा दोन मित्रांची आहे- एक माकड आणि एक मगर. माकड ज्या झाडावर राहत होते त्या झाडावरून मगरीला रोज एक सफरचंद द्यायचे. मगरीची पत्नी लोभी असते आणि माकडाचे हृदय मागते. मगर माकडाला पाठीवर आपल्या पत्नीकडे घेऊन जातो. माकडाच्या सगळे लक्षात येते. तो मगरीला सांगतो की त्याचे हृदय झाडावर आहे आणि ते आणण्यासाठी त्यांनी परत जावे लागेल. ते परत आल्यावर माकड किनाऱ्यावर चढून पळून जाते.

बोध:तणावपूर्ण परिस्थितीतही शांत राहणे आणि स्पष्टपणे विचार केल्याने तुम्हाला मदत होते.

14. हत्ती आणि त्याचे मित्र

हत्ती आणि त्याचे मित्र

जुनो नावाचा एक हत्ती एकाकी होता आणि त्याने जंगलातील इतर प्राण्यांशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला. परंतु, इतर प्राण्यांनी जूनोच्या आकारामुळे त्याच्याशी खेळण्यास नकार दिला. एके दिवशी, सर्व प्राणी वाघाला पाहून पळून जात होते. वाघाला जे प्राणी सापडतील ते प्राणी वाघ खात होता. हत्ती वाघाला एक लाथ मारतो आणि वाघ पळून जातो. जुनो आता सर्वांचा मित्र होतो.

बोध:तुमच्या अंगभूत क्षमता हे तुमचे सर्वोत्तम गुण आहेत आणि तुमच्या यशाचे कारण आहेत.

15. मूर्ख सिंह

मूर्ख सिंह

सिंह भुकेलेला असतो आणि भक्षाच्या शोधात जातो. त्याला एक गुहा सापडते. गुहेत राहणारा कोल्हा  बाहेर गेलेला असतो. गुहेत बसून सिंह प्राण्याची वाट पाहण्याचा निर्णय घेतो. गुहेच्या मालकाला म्हणजेच कोल्ह्याला मात्र गुहेजवळ आल्यावर काहीतरी गडबड झाल्याचा संशय येतो. कोल्हा गुहेला त्याच्या हाकेला उत्तर देण्यास सांगतो. मूर्ख सिंह उत्तर देतो आणि कोल्हा पळून जातो.

बोध:घाईत, आपण चुकीचे निर्णय घेतो. कृती करण्यापूर्वी नेहमी शांत राहून सर्व पर्यायांचा विचार केला पाहिजे.

16. माकड आणि डॉल्फिन

माकड आणि डॉल्फिन

डॉल्फिन वादळात माकडाला वाचवतो आणि ते पोहत एका बेटावर जातात. तुला बेट माहिती आहे का असे डॉल्फिन माकडाला विचारतो. माकड म्हणतो की त्याला हे बेट माहित आहे आणि खरं तर तो बेटाचा राजकुमार आहे. डॉल्फिन माकडाला बेटावर सोडून पोहत निघून जातो आणि निर्जन बेटावर माकड एकटे राहते.

बोध:बढाया मारून तुम्हाला काहीही मिळत नाही. तुम्ही काय बोलता त्याबद्दल सावधगिरी बाळगा, तुम्हाला प्रत्यक्षात त्यानुसार वागावे लागेल.

17. हुशार बेडूक

हुशार बेडूकएका तलावात जलचर प्राण्यांचा एक मोठा समुदाय असतो.  त्या सर्वांना एकमेकांशी खेळायला आवडत असते. एके दिवशी, दोन मच्छीमार तलावात उतरतात. आणि प्राण्यांना खेळताना पाहतात. तलावात मासेमारी करण्याबद्दल बोलतात पण उशीर झाला म्हणून ते तिथून निघून जातात. मच्छीमार परत येण्यापूर्वी सगळ्यांनी पळून जावे असे बेडूक सगळ्यांना सांगतो. परंतु, प्रत्येकजण मच्छीमार आल्यावर आपण पळून जाऊ शकतो असा विश्वास बाळगतो आणि तिथेच थांबतो. मच्छीमार दुस-या दिवशी मजबूत जाळी घेऊन येतात आणि तलावात सोडलेल्या बेडकाशिवाय सर्वांना पकडतात.

बोध: सावधगिरी बाळगणे चांगले. जोखमींचे मूल्यांकन करणे हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

18. दोन शेळ्या

दोन शेळ्या

एक छोटीशी खाडी होती ज्यावर एक पडलेले झाड होते. एक शेळी झाडावरून चालत खाडी पार करण्याचा निर्णय घेते. मात्र, पलीकडच्या बाजूने दुसऱ्या शेळीच्या मनात देखील हीच कल्पना येते आणि तीही त्या पडलेल्या झाडावरून येत असते. पडलेले झाड त्यांना एकमेकांच्या पुढे जाण्याइतके रुंद नव्हते. दोन्ही शेळ्या खूप गर्विष्ठ आणि हट्टी होत्या. दुसर्‍याला पुढे जाऊ देत नव्हत्या. त्यांनी त्यांची शिंगे एकमेकींवर रोखली आणि एकमेकांवर जोरदार हल्ला केला. काही वेळातच झाड तुटून दोन्ही शेळ्या खाडीत पडल्या.

बोध: हट्टीपणा तुम्हाला पुढे घेऊन जाणार नाही. जर तुम्ही तुमच्या अभिमानाला इतर सर्व गोष्टींपेक्षा महत्त्व देत असाल तर तुम्हाला त्रास होईल.

19. मैत्री

मैत्री

ही एक पेप्सी कुत्र्याची कथा आहे. हा कुत्रा रस्त्यावरच्या कुत्र्यांशी खेळत नसतो. कारण त्याला वाटले की रस्त्यावरची कुत्री खूप गलिच्छ आहेत. एके दिवशी, त्याचा मालक बाहेर असताना दोन चोर घरात येतात आणि त्याला गोणीत ढकलण्याचा प्रयत्न करतात. तो मदतीसाठी आरडाओरडा करतो आणि अचानक रस्त्यावर राहणारे कुत्रे येते आणि चोरांचा चावा घेत. त्यामुळे चोर पळून जातात. पेप्सी त्याचा धडा शिकतो आणि त्याच्या रस्त्यावरच्या कुत्र्यांशी मैत्री करतो

बोध: एखाद्याच्या परिस्थितीनुसार किंवा त्यांच्या मालकीच्या वस्तूंच्या आधारावर कधीही भेदभाव करू नये. मैत्री महत्वाची आहे.

20. गर्जना करणारा सिंह

गर्जना करणारा सिंह

शेरू सिंहाला कोणतीही पूर्वसूचना न देता शक्य तितक्या जोरात गर्जना करून सर्वांना घाबरवायला आवडायचे. लवकरच, त्याच्या गर्जनेला जंगलातील प्रत्येकजण कंटाळला होता आणि सगळ्यांनी त्याच्याशी खेळणे बंद केले. एक दिवस त्याने रिंकूला त्याच्यासोबत चेंडू खेळायला पटवले. जसजसा खेळ अधिक तीव्र होत गेला, तसतसा शेरू गर्जना करू लागला आणि रिंकूने चेंडू जोरात पास केला. चेंडू त्याच्या घशात अडकला आणि तो काढण्यासाठी संपूर्ण जंगलाला मदत करावी लागली. शेरूने पुन्हा कधीही विनाकारण गर्जना न करण्याची शपथ घेतली.

बोध: आपल्याला केवळ मजा येते म्हणून आपल्या सभोवतालच्याना त्रास देऊ नये.

21. आळशी गाढव

आळशी गाढव

मंबू एक आळशी गाढव होता आणि त्याच्या मालकाने त्याला दिलेले काम टाळण्याचा तो नेहमी प्रयत्न करीत असे. एके दिवशी तो घरातून पळून गेला. धोब्याने त्याला शोधायला सुरुवात केली. तो शेतात झोपला असता धुळीचे प्रचंड वादळ सुरू झाले. घाबरून मंबूने घरी जाण्याचा निर्णय घेतला. धोबी आपल्याला मारहाण करेल अशी भीतीही त्याला वाटत होती. मंबू सुरक्षित असल्याने धोब्याला आनंद झाला. मंबूला स्वतःची लाज वाटली आणि त्याने पुन्हा कधीही आळशीपणा न करण्याचे ठरवले.

बोध: तुम्ही तुमचे काम नेहमी प्रामाणिकपणे केले पाहिजे.

22. दुष्ट साप

दुष्ट साप

कावळ्याचे दांपत्य जेव्हा शिकार करायला जायचे तेव्हा एक दुष्ट साप त्यांची अंडी चोरून नेत असे. खूप चिंता वाटल्याने दुःखी अंतःकरणाने त्यांनी कोल्ह्याला मदत मागितली. कोल्ह्याने त्यांना राजकुमारी नदीत अंघोळीला आली कि तिचा हार चोरण्यास सांगितला .  कावळ्यांनी हार चोरला आणि हार सापाच्या बिळात टाकला. राजकन्येच्या रक्षकांनी हार परत घेण्यासाठी कुदळाने खोदले तेव्हा सापाला राग आला. पहारेकऱ्यांनी सापाला मारून हार काढून घेतला.

बोध: जो कोणी वाईट कर्म करतो त्यांना त्यांच्या कर्माची फळे भोगावी लागतात.

23. उंदीर आणि साधू

उंदीर आणि साधू

एका मांजरीने एका साधूच्या घरात उंदराचा पाठलाग केला. त्याची दुर्दशा पाहून साधूने उंदराचे कुत्र्यामध्ये रूपांतर केले. काही दिवसांनंतर कुत्रा साधूच्या घरात पळत आला कारण सिंह त्याचा पाठलाग करत होता. हे पाहून साधूने कुत्र्याचे सिंहात रूपांतर केले. सिंह जंगलात गेला आणि दुसर्‍या सिंहाचा पराभव केला आणि जंगलावर राज्य केले काही दिवसांनी तो साधूच्या घरी त्याला खाऊन टाकण्यासाठी गेला. साधूने ताबडतोब सिंहाला परत उंदीर बनवले आणि त्याला कधीही परत येऊ नकोस असे सांगितले.

बोध: ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नका.

24. शेळी

शेळी

आशा बाहेर जात होती आणि तिने तिच्या मोलकरणीला बाहेर काही काम करायला जात असल्यास दरवाजा बंद करण्याची सूचना केली. थोड्या वेळाने मोलकरीण दार न लावता बाहेर गेली. एक बकरी घरात शिरली आणि आशाच्या बेडरूममध्ये धावली. तिने आरशात दुसरी बकरी पाहिली आणि त्यावर आरसा फोडून टाकला. उद्ध्वस्त झालेला आरसा पाहण्यासाठी आशा घरी आली आणि तिने आपल्या मोलकरणीला कामावरून लगेच काढून टाकले

बोध: आपले काम नीट पार पाडणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

25. गायीची घंटा

गायीची घंटा

नासिर त्याच्या वडिलांच्या गायींची काळजी घेत होता. प्रत्येक गाईकडे एक सुंदर घंटा होती. एके दिवशी, एक अनोळखी व्यक्ती जवळ आला आणि त्याने सर्वात सुंदर गायीची घंटा मोठ्या किमतीत विकत घेण्याची ऑफर दिली. नासिर सहमत झाला आणि घंटा विकली, परंतु गाय कुठे गेली हे त्याला आता सांगता आले नाही. अनोळखी व्यक्तीने नासिरची गाय वाट चुकण्याची वाट पाहिली आणि नंतर ती चोरली. नासिर रडत घरी गेला तिथे त्याचे वडील त्याच्यावर खूप चिडले.

बोध: विचारांमध्ये लोभ नसावा.

26. कोल्हा आणि करकोचा

कोल्हा आणि करकोचा

ही एका हुशार कोल्ह्याची कथा आहे. एकदा कोल्हा करकोच्याला रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित करतो परंतु त्याला उथळ भांड्यात सूप देतो. करकोचा लांब चोचीमुळे उथळ भांड्यातील सूप पिऊ शकत नाही. दुसऱ्या दिवशी, करकोचा कोल्ह्याला रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित करतो आणि त्याला अरुंद भांड्यात सूप पिण्यासाठी देतो. यावेळी, करकोचा सूपचा आस्वाद घेतो, तर कोल्ह्याला त्याची चूक कळून तो भुकेल्या पोटी घरी जातो.

बोध: स्वार्थी होऊ नका कारण ते कधीतरी तुमच्याकडे परत येईल.

27. कोल्हा आणि बकरी

कोल्हा आणि बकरी

एके दिवशी जंगलात एकटे फिरत असताना एक दुर्दैवी कोल्हा विहिरीत पडतो. स्वतःहून बाहेर पडू शकत नाही, तो मदतीची वाट पाहतो. वाटेवरून एक शेळी जात असलेली कोल्ह्याला दिसते आणि त्याला विचारते की तो विहिरीत का पडला आहे. हुशार कोल्हा उत्तर देतो की मोठा दुष्काळ पडणार असल्याने तो पाण्याची खात्री करत आहे. निष्पाप शेळी त्याच्यावर विश्वास ठेवते आणि तेच करण्यासाठी ती सुद्धा विहिरीत उडी मारते. बिचार्‍या शेळीला विहिरीत टाकून कोल्हा वेगाने माथ्यावर पोहोचण्यासाठी बकरीच्या पाठीवर उडी मारतो.

बोध: अडचणीत असलेल्या माणसाच्या सल्ल्यावर कधीही विश्वास ठेवू नका.

28. डुक्कर आणि सिंह

खूप कडक ऊन असलेल्या दिवशी, सिंह आणि डुक्कर एकाच वेळी पाणी पिण्यासाठी एका लहान पाणवठ्यावर पोहोचतात. आधी पाणी कोणी प्यावे यावरून त्यांच्यात भांडणे सुरू होतात. लवकरच त्यांच्या लक्षात आले की वर गिधाडे आहेत आणि ते मेजवानी साठी त्यांच्यापैकी एकाची किंवा दोघांची शिकार करण्याच्या विचारात आहेत. डुक्कर आणि सिंहाने मग भांड्याचे नाही असे ठरवले. एकत्र पाणी प्यायले आणि आपापल्या वाटेला निघाले.

बोध: जे भांडण करतात त्यांच्या पराभवाचा फायदा घेण्यासाठी इतरांकडून अनेकदा प्रयत्न केला जातो.

29. कुत्रा आणि सावली

ही एका कुत्र्याची कथा आहे. त्याला एकदा मांसाचा तुकडा सापडतो. तो मांसाचा तुकडा घरी घेऊन जात असताना त्याला ओढ्यावरील पूल पार करावा लागतो. तो त्यावरून चालत असताना, त्याला त्याचे प्रतिबिंब पाण्यात दिसते आणि त्याला असे वाटते की हा तसाच मांसाचा तुकडा असलेला दुसरा कुत्रा आहे. मग कुत्रा लोभी होतो आणि तो मांसाचा तुकडाही घेण्याचा निर्णय घेतो. तो प्रतिबिंब पाहतो आणि त्याचे तोंड उघडताच त्याचा मांसाचा तुकडा पाण्यात पडतो आणि अदृश्य होतो.

बोध: हातचे सोडून पळत्याच्या मागे धावू नका.

30. मूर्ख ससा

मूर्ख ससा

मूर्ख सशाच्या डोक्यावर एक कोळशाचे गोळे पडतात आणि त्याला वाटते की आकाश कोसळते आहे आणि शक्य तितक्या वेगाने धावतो. जाताना तो इतर सर्व प्राण्यांना आकाश कोसळत असल्याचे सांगतो आणि जंगलातील प्राण्यांमध्ये भीती पसरवतो. जंगलाचा राजा सिंह हा गोंधळ पाहतो आणि त्याला समजले की सशाने पसरवलेली ही भीती आहे. ससा खरोखर मूर्ख होता.

बोध: तुम्ही कोणावर विश्वास ठेवता ह्याची काळजी घ्या नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. प्राण्यांच्या दंतकथा म्हणजे काय?

प्राण्यांची दंतकथा ही मुलांसाठी एक नैतिक धडा असलेली कथा असते. ह्या कथांमध्ये कथेचे मुख्य पात्र म्हणून प्राणी असतात. मुलांना महत्त्वाची नैतिक मूल्ये शिकवण्यासाठी हे प्राणी माणसाप्रमाणे वागतात आणि बोलतात.

2. लहान मुलांच्या कथांमध्ये प्राण्यांची पात्रे का वापरली जातात?

कथा मुलांना शिक्षित करण्यास आणि त्यांना नैतिक धडे शिकण्यास मदत करतात. कधीकधी कथेमध्ये मानवी घटक असल्यास मुलांसाठी ते खूप कठीण किंवा भीतीदायक असू शकते. म्हणून, कथांमध्ये प्राण्यांचा वापर केला जातो कारण प्राण्यांची पात्रे असल्यामुळे त्यांना कथा सहज समजण्यास मदत होते आणि मुलांसाठी, काही प्रमाणात भावनिक अंतर वाढते.

नैतिक कथा हा लहान मुलांच्या जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे. कारण  त्यामुळे एक मजबूत नैतिक चारित्र्य तयार होण्यास मदत होते. तसेच त्यांच्यामध्ये सद्गुण रुजवले जातात. असे म्हटले जाते की लहान मुलांचे मन ह्या कथांमुळे खूप प्रभावित होते. आपण त्यांच्या बालपणात त्यांच्यामध्ये काही मूल्ये बिंबवतो ती कायम राहतात. प्राण्याची कथा मराठीत वाचल्याने शाब्दिक संग्रह वाढतो आणि मुलांमधील सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळते. मुलांसाठी उत्कृष्ट नैतिक कथा घ्या आणि मजेदार कथांद्वारे आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या.

आणखी वाचा:

मुलांसाठी मराठीतून अकबर बिरबलाच्या गोष्टी
कोल्ह्याला द्राक्षे आंबट ही बोधकथा मराठीमध्ये

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article