Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना गर्भधारणेसाठी प्रयत्न करताना मिनी पिल (प्रोजेस्टिन ओन्ली पिल किंवा प्रोजेस्टेरॉन ओन्ली पिल)

मिनी पिल (प्रोजेस्टिन ओन्ली पिल किंवा प्रोजेस्टेरॉन ओन्ली पिल)

मिनी पिल (प्रोजेस्टिन ओन्ली पिल किंवा प्रोजेस्टेरॉन ओन्ली पिल)

In this Article

स्त्रीबीजांसोबत मिलनासाठी शुक्राणू कठोर परिस्थितीतून प्रवास करतात. एकदा त्यांची भेट झाल्यावर अंडे फलित होते आणि परिणामी गर्भधारणा होते. गर्भधारणा आणि गर्भारपण रोखण्यासाठी मिनीपिल्स तयार केल्या जातात, त्यामुळे संभोगानंतर गर्भधारणा होऊ नये म्हणून बऱ्याच स्त्रिया त्यांना प्राधान्य देतात.

मिनीपिल्स म्हणजे काय?

मिनीपिल बर्थ कंट्रोल औषधे म्हणजे तोंडाने घ्यायच्या गर्भनिरोधक गोळ्या असतात ज्यामध्ये हार्मोन प्रोजेस्टिन असते. या गोळ्यांमध्ये, इतर जन्म नियंत्रण गोळ्याच्या तुलनेत फारच कमी प्रोजेस्टिन असते. ह्या मिनीपिल्स गर्भाशयाची श्लेष्मल त्वचा पातळ करतात, अशा प्रकारे शुक्राणूंना अंड्यांपर्यंत पोहोचण्यापासून हे गोळी प्रतिबंधित करते. स्त्रियांसाठी दिवसातून एक गोळी घेण्याची शिफारस केली जाते.

प्रोजेस्टिन ओन्ली पिल्स कोण घेऊ शकते?

स्तनपान देणाऱ्या माता प्रोजेस्टिनओन्ली पिल्स घेऊ शकतात. गर्भवती नसलेल्या ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या तरुण स्त्रियांना देखील या गोळ्या घेण्यास परवानगी आहे. या गोळ्या स्तनपान करणाऱ्या मातांसाठी सर्वोत्तम कार्य करतात.

ह्या गोळ्या कोण घेऊ शकत नाही?

आपले कामाचे वेळापत्रक अनियमित असल्यास, मळमळ किंवा उलट्यांचा त्रास होत असल्यास किंवा आपले वजन ७० किलोपेक्षा जास्त असल्यास आपण या गोळ्या घेऊ शकणार नाही. योनीतून रक्तस्त्राव, यकृत रोग, उच्च रक्तदाब आणि इतर तीव्र रोगांचा इतिहास असलेल्या रुग्णांना या गोळ्या न घेण्याचा सल्ला दिला जातो. तसेच, या गोळ्या घेत असताना तुम्हाला ओटीपोटात दुखणे, योनीतून रक्तस्त्राव होणे किंवा मळमळ जाणवत असेल तर ताबडतोब त्या घेणे थांबवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

स्तन कर्करोगाच्या रुग्णांनी या गोळ्या वापरणे टाळलेच पाहिजे तसेच या गोळ्या घेण्यामुळे इतर गुंतागुंत निर्माण होऊ शकतात.

प्रोजेस्टिनओन्ली पिल्स वापरण्याचे फायदे

प्रोजेस्टेरॉन ओन्ली पिल्स वापरण्याचे हे फायदे आहेतः

  • ह्या गोळ्या ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रिया घेऊ शकतात
  • एकत्रित गर्भ निरोधक गोळ्या किंवा इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टिन गोळ्यांच्या तुलनेत त्यांचे कमी दुष्परिणाम आहेत
  • स्तनपान देणाऱ्या स्त्रियांसाठी ह्या गोळ्या देखील आदर्श आहेत कारण त्यांच्या स्तनपानाचे उत्पादन कमी होत नाही
  • ह्या गोळ्या घेतल्यास रक्तदाब पातळी वाढत नाही
  • मिनीपिल्स मासिक पाळीपूर्वीचा तणाव देखील कमी करतात

प्रोजेस्टिनओन्ली पिल्स वापरण्याचे तोटे

ह्या गोळ्या घेण्याचे तोटे खालीलप्रमाणे आहेतः

  • मळमळ, औदासिन्य आणि कमी सेक्स ड्राईव्ह इत्यादी हे औषधे घेण्याचे सामान्य दुष्परिणाम आहेत
  • ह्या गोळ्या एक्टोपिक गर्भधारणा रोखत नाहीत
  • ७० किलोपेक्षा जास्त वजनाच्या स्त्रियांसाठी या गोळ्या घेणे प्रभावी ठरू शकत नाही
  • ह्या गोळ्या दररोज एकाच वेळी घेतल्या गेल्या नाहीत तर गर्भधारणा रोखण्यासाठी प्रभावी ठरत नाहीत
  • ह्या गोळ्यांमुळे काही दुष्परिणाम होतात जसे की पाळी वेळेवर न येणे किंवा मध्येच रक्तस्त्राव होऊन तो बरेच दिवस राहणे

प्रोजेस्टिनओन्ली गोळ्या कशा कार्य करतात?

या गोळ्यांमधील प्रोजेस्टिन संप्रेरक अंडाशयाद्वारे स्त्रीबीज सोडण्याचे कार्य रोखतो आणि फलनाची शक्यता कमी करण्यासाठी गर्भाशयाच्या मुखाला दाट करतो. ह्या गोळ्या गर्भाशयाचे अस्तर पातळ करतात जे शुक्राणूंना स्त्रीबीजापर्यंत पोहोचण्यापासून प्रतिबंधित करतात.

प्रोजेस्टिन पिल्सची प्रभावीता

प्रोजेस्टिनओनली पिल्स (पीओपी) मध्ये केवळ इस्ट्रोजेन नसून केवळ प्रोजेस्टेरॉन असते, त्यामुळे ह्या गोळ्या जन्म नियंत्रण पिल्सपेक्षा कमी प्रभावी होतात. ह्या गोळ्या स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी बनवल्या गेल्या आहेत, स्तनपान देताना बाळाच्या जन्मानंतर बाळावर त्याचा परिणाम होत नाही. प्रोजेस्टिन पिल्सचा प्रभावीपणा म्हणजे प्रत्येक वर्षी १०० पैकी २ ते ९ स्त्रिया गरोदर होतात आणि गरोदरपणा प्रतिबंधित करण्यात यशाचा दर हा ८७% ते ९९.% इतका असतो. (ह्याचे कारण म्हणजे काही स्त्रिया सूचनांप्रमाणे ह्या गोळ्या दररोज घेत नाहीत)

जेव्हा या गोळ्या दररोज आणि वेळोवेळी सूचनांनुसार घेतल्या जातात तेव्हा यश दर १००% असतो.

मिनी पिल्सचे धोके आणि दुष्परिणाम

प्रोजेस्टेरॉनओन्ली पिल्सचे दुष्परिणाम आणि जोखीम घटक गरोदरपणाच्या लक्षणांसारखेच आहेत. ते खालीलप्रमाणे आहेतः

  • मूड स्विंग, मळमळ आणि उदासीनता
  • हृदयविकाराचा झटका, स्तनाचा कर्करोग, रक्त गुठळ्या आणि स्ट्रोकचा धोका कमी
  • स्तन कोमलता, मुरुम आणि डोकेदुखी
  • असमान वजन वाढणे
  • अनियमित मासिक पाळी
  • दररोज आणि वेळेवर घेतले नाही तर फार प्रभावी नाही कारण दर ९ पैकी १ स्त्रिया दर वर्षी या गोळ्या वापरुन गर्भवती होतात

प्रोजेस्टिनओन्ली पिल्स कशा घ्याव्यात?

संभोग सुरू करण्यापूर्वी पहिल्या दिवशी या गोळ्या घ्याव्यात. मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी ह्या गोळ्या घेण्यास सुरुवात करणे योग्य आहे. तुम्ही गोळी घेण्यापूर्वी, तुमच्या कौटुंबिक इतिहासाबद्दल, आधीची वैद्यकीय स्थिती आणि तुम्ही घेत असलेल्या इतर औषधांबद्दल डॉक्टरांशी बोलू शकता. ह्यामुळे तुम्हाला गोळी कधी घ्यावी, कशी घ्यावी किंवा जास्त परिणामकतेसाठी डोस किती घ्यावा हे समजण्यास मदत होईल.

जर तुम्ही गोळी घेण्यास विसरलात किंवा तुम्ही गोळी घेण्याचे वेळापत्रक पाळू शकत नसाल तर तुमच्या डॉक्टरांशी बँकअप प्लॅनविषयी बोलून घ्या.

मी स्तनपान देत असल्यास प्रोजेस्टिनओन्ली पिल्स घेऊ शकते का?

हा एक सामान्य प्रश्न आहे जो बहुतेक स्त्रिया विचारतात. याला साधे उत्तर आहे, होय. आपण स्तनपान देत असल्यास प्रोजेस्टिनओन्ली पिल घेतली जाऊ शकते. या गोळ्या घेतल्यास बाळाला कुठलेही नुकसान होणार नाही.

तुम्ही तुमची मिनी पिल घ्यायची विसरल्यास काय करावे?

मिनी पिल्स वेळेवर घेतल्या पाहिजेत आणि जरी ती घेण्यास २ किंवा ३ तास उशीर झाला तरी त्या अद्याप प्रभावी असतील. तथापि, त्यापेक्षा जास्त उशीर झाल्यास, आपण एकाच दिवशी दोन गोळ्या घेऊ शकता परंतु या गोळ्या घेताना कमीतकमी दोन तासांचे अंतर असावे.

दुसर्‍या दिवसापासून, मिनी पिल आपल्या नेहमीच्या वेळी घ्या आणि वेळ पाळण्यास विसरू नका. तुम्ही एखादे दिवशी तुमची मिनी पिल घेण्याचे विसरल्यास, गर्भारपणाची शक्यता कमी करण्यासाठी संभोगा दरम्यान कंडोम सारखी बॅकअप पद्धत वापरा.

खरं तर, तुम्ही ज्या दिवशी गोळी घेण्याचे विसरता त्या दिवशी लैंगिक संबंधांपासून दूर रहावे किंवा अतिरिक्त गर्भनिरोधक पद्धती वापरल्या पाहिजेत. जर तुम्ही ह्या गळ्या घेणे बंद केले तर तुम्ही पुढील २ दिवस बॅकअप पद्धती वापरल्या पाहिजेत कारण काही औषधे शरीरातून बाहेर पाडण्यासाठी वेळ घेतात.

तुम्ही गोळी घेण्याचे विसरल्यास गर्भवती होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच, तुम्ही तुमचे वेळापत्रक नीट पाळावे.

मिनीपिल घेतल्यावर उलट्या झाल्यास काय करावे?

जर तुम्ही मिनीपिल घेतल्याच्या दोन तासांत उलटी झाल्यास, सर्व काही ठीक आहे. पण त्याआधी उलटी झाल्यास, आणखी एक गोळी घ्या. तथापि, जर तुम्हाला सतत उलट्या झाल्यास किंवा एका पेक्षा जास्त दिवसांसाठी अतिसार झाल्यास तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

अशी कोणती औषधे आहेत जी प्रोजेस्टिनओन्ली पिल अकार्यक्षम करतात?

काही औषधे आणि हर्बल पूरक गोळ्या ह्या औषधाच्या कार्य करण्याच्या पद्धतीवर परिणाम करतात. ही औषधे प्रोजेस्टेरॉन ओन्ली पिल्स सोबत रिऍक्शन करू शकतात; म्हणून या औषधाच्या गोळ्या घेण्यापूर्वी आपल्या सध्याच्या पूरक गोळ्या आणि औषधोपचारांबद्दल आपल्या डॉक्टरांशी बोलणे चांगले

तुम्ही सुरुवातीला प्रोजेस्टिनओन्ली पिल घेणे सुरू करता तेव्हा तुम्हाला बॅकअप पद्धत वापरण्याची आवश्यकता आहे?

याचे उत्तर होअसेल. विशेषत: आपण ते वेळेवर न घेतल्यास आणि तुम्ही जेव्हा पहिल्यांदा प्रोजेस्टिनओन्ली पिल घेण्यास प्रारंभ करता तेव्हा तुम्हाला बॅकअप पद्धतीची आवश्यकता असेल. या गोळ्यासमवेत संभोगापूर्वी शुक्राणूनाशक असलेले कंडोम वापरणे ही एक पसंतीची बॅकअप पद्धत आहे.

मिनी पिलमुळे उद्भवणाऱ्या वैद्यकीय समस्या सूचित करणारी चिन्हे आणि लक्षणे

मिनी पिल कॉन्ट्रॅसेप्टिव्हची ज्ञात चिन्हे आणि लक्षणे गर्भावस्थेसारखीच आहेत. या गोळ्या घेत असताना कधीकधी तुम्हाला मळमळ, उलट्या, अतिसार, नैराश्य आणि कमी सेक्स ड्राईव्हचा अनुभव येऊ शकतो. जर तुम्ही मिनी पिल्सच्या प्रभावामध्ये हस्तक्षेप करणारी कोणतीही औषधे घेत असाल तर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांशी बोलण्याची आवश्यकता असू शकते.

प्रोजेस्टिनओन्ली पिल्स अनियोजित गर्भधारणा रोखण्याचा सर्वात विश्वासार्ह मार्ग नसला तरी वेळेवर आणि नियमितपणे घेतल्यास त्या नक्कीच प्रभावी असतात. मिनी पिल्स घेण्यापूर्वी तुमच्या तब्येतीविषयी किंवा जुनाट आजार असल्यास त्याविषयी विश्वासू डॉक्टरांशी बोला.

आणखी वाचा:

स्त्रियांची प्रजननक्षमता वाढवण्यासाठी १६ उत्तम योगासने
गर्भपातानंतर लैंगिक संबंध ठेवण्याआधी किती वेळ वाट पाहावी?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article