In this Article
हा कालावधी म्हणजे बाल्यावस्थेचा शेवट आणि लहानपणाची सुरुवात आहे. तुमच्या बाळाने गेल्या वर्षभरात नवजात बाळ ते एक लहान मूल असा झपाट्याने विकासात्मक प्रवास केला आहे.
व्हिडिओ: 1 वर्षाच्या बाळाचे टप्पे
12 महिन्यांच्या बाळाच्या वाढीचा तक्ता
गाठलेले विकासात्मक टप्पे | वेगाने होणारे विकासात्मक टप्पे |
आधार घेऊन उभे राहता येते | आधाराशिवाय उभे राहू शकते |
एकटे काही पावले टाकू शकतात | लांब अंतर एकटे चालू शकतात |
साधे शब्द बोलू शकतात | साधी वाक्ये बोलू शकतात |
कृतीचे अनुकरण करू शकतात | कृती लक्षात ठेऊन स्वतःची स्वतः करू शकतात |
साध्या सूचनांना प्रतिसाद देऊ शकतात | अवघड सूचना समजू शकतात. |
आवाजाची नक्कल करू शकतात | आवाज आणि त्याचा स्रोत लक्षात ठेवू शकतात |
वस्तूचे शेवटचे ज्ञात ठिकाण लक्षात ठेवू शकतात | वस्तू त्यांच्या योग्य ठिकाणी ठेवू शकतात |
वस्तू पकडण्यासाठी हातांचा वापर करू शकतात |
वस्तू पकडण्यास आणि उचलण्यास सक्षम असतात
|
तर्जनीचा वापर करू शकतात | सर्व बोटांवर अधिक नियंत्रण आहे |
हात आणि डोळ्यांचा समन्वय चांगला असतो |
हात/डोळे /पाय यांचा समन्वय विकसित केला आहे
|
1 वर्षाचे होईपर्यंत बाळाने गाठले पाहिजेत असे विकासाचे टप्पे
तुमच्या बाळाने अखेर एक वर्षाचा टप्पा गाठला आहे! तो आता स्वतःचे स्वतः फिरू शकतो, स्वतःचे स्वतः खाऊ शकतो. ओळखीच्या गोष्टी आणि लोकांकडे निर्देश करू शकतो आणि मूलभूत सूचना देखील समजू शकतो. तुमचे बाळ दिवसा कमी झोपण्यास सुरुवात करेल, रात्री कमी वेळ झोपेल . या वयातील बहुतेक मुलांना दुपारच्या वेळी झोपेची गरज भासते, परंतु त्यांना यापुढे सकाळी झोपण्याची गरज भासणार नाही.
त्यांच्या आहाराचे प्रमाण देखील बदलते. आधी मुख्यतः दूध आणि मऊ अन्न खाणारे बाळ आता घन पदार्थ खाऊ लागते. परंतु हे घनपदार्थ बाळाला खाण्यासाठी सहज सोपे असले पाहिजेत, जसे की टरबूज (बिया नसलेले), आंबा, केळी आणि पपई इत्यादी. अशा प्रकारे, आपण पौष्टिक नाश्त्यासाठी फळांचा एक वाडगा घेऊ शकता. ही फळे बाळे खाऊ शकतील. इतर क्षेत्रात सुद्धा बाळाचा विकास होण्यास सुरुवात होईल. त्याची चर्चा आपण खालीलप्रमाणे करूयात.
1. संज्ञानात्मक विकास
संज्ञानात्मक विकासाच्या अंतर्गत तुमच्या बाळाचे विचार आणि मेंदूचे एकूण कार्य समाविष्ट असते. तुमच्या बाळाने एका वर्षाच्या आत केलेला संज्ञानात्मक विकास खाली दिलेला आहे.
- जेव्हा तुम्ही त्याचे खेळणे एखाद्या गोष्टीखाली लपवता तेव्हा तुमचे बाळ गोंधळत नाही. ज्या वस्तूखाली खेळणे लपवले आहे ते दूर सारून बाळ खेळण्यापर्यंतपोहोचू शकतो हे त्याला आत्तापर्यंत समजले आहे.
- जर तुम्ही तुमच्या बाळाची खेळणी एकाच ठिकाणी ठेवली तर, तो दररोज त्याच ठिकाणी खेळणी शोधत राहील. ह्यावरून असे लक्षात येते कि त्याची दृश्य स्मरणशक्ती आणि माहिती आठवण्याची क्षमता सुधारत आहे.
- आत्तापर्यंत, तुमच्या बाळाने वस्तु-संज्ञाचे मजबूत संबंध विकसित केले आहेत. जर तुम्ही त्याला कुत्रा कुठे आहे असे विचारले तर तो दाखवेल!
- तुमचे बाळ विशिष्ट वस्तूंचा योग्य वापर करण्यास सक्षम असेल. उदाहरणार्थ, निरीक्षणात काही महिने घालवल्यानंतर, तुमच्या बाळाला त्याच्या कंगव्याने केस कसे विंचरायचे हे कळेल आणि फोनची कोणती बाजू कानाला धरायची आणि कुठल्या बाजूने बोलायचे हे सुद्धा लक्षात येईल.
2. शारीरिक विकास
तुमच्या बाळाची शारीरिकदृष्ट्या वाढ होते आहे आणि ज्या वस्तू हाताळण्यासाठी कौशल्य अपेक्षित आहे अश्या वस्तू बाळ आता हाताळू शकते. खाली दिलेल्या बाळाच्या शारीरिक विकासाच्या लक्षणांवर लक्ष ठेवा.
- आता तुमचे बाळ स्वतःचे स्वतः उभे राहू शकते आणि काही सेकंदांसाठी तसेच उभे राहू शकते कारण त्याचे स्नायू आणि सांधे त्याच्या शरीराचे वजन सहन करण्यास पुरेसे मजबूत आहेत.
- तुमचा 1वर्षाचा मुलगा आता कुठल्याही आधाराशिवाय चालण्याचा प्रयत्न करेल, अगदी काही पावले सुद्धा टाकेल.
- आतापर्यंत, तुमचे बाळ बोटे, अंगठे वापरून हाताच्या मुठी वळवेल. वस्तू काढून पुन्हा जागेवर ठेवू लागेल. तर्जनी कशी वापरायची हे देखील शिकेल.
- बाळाचा हात-डोळा समन्वय सुधारेल आणि आता अंतरांचा अधिक चांगल्या प्रकारे न्याय करू शकेल.
3. भाषा आणि संप्रेषण कौशल्ये
तुमच्या बाळाला आता संवाद कसा साधायचा हे शिकण्यात खूप रस असेल. ह्या वयात बाळ खूप प्रगती करेल. तुमचे बाळ करू शकेल अश्या काही गोष्टी खाली दिलेल्या आहेत –
- तुमचे बाळ आता साध्या सूचना आणि विनंत्या समजू शकते. तुमच्या विनंतीला प्रतिसाद देऊन कृती करू लागेल.
- जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाशी आता बोलता, तेव्हा बाळ सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करेल. बाळाचे बोलणे अजूनही अस्पष्ट वाटू शकते.
- तुमचे मूल आता तुमच्याशी संवाद साधण्याच्या प्रयत्नात तुम्ही बोललेल्या शब्दांचे अनुकरण करू लागेल.
- बाळ इतर ध्वनी आणि कृतींचे अनुकरण करू लागेल. जर तुम्ही बाळाला टाटा केले तर तो तुमची कॉपी करण्याचा प्रयत्न करेल. जर बाळाला कुत्र्याचे भुंकणे ऐकूआले , तर तो आवाजाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू शकतो.
- तुमचे बाळ “उह ओह!” सारखे उद्गार वापरण्यास सुरवात करेल.
- मान हलवणे आणि “नाही” असे ठामपणे सांगणे या वयात अनेकदा नाराजी व्यक्त करण्यासाठी किंवा बाळाला ज्या गोष्टींमध्ये सहभागी व्हायचे नसते तेव्हा नकार दर्शवण्यासाठी वापरले जाते.
4. सामाजिक आणि भावनिक विकासाचे टप्पे
तुमच्या बाळाचा स्वभाव आणि त्याच्या भावना व्यक्त करण्याची क्षमता आता विकसित होऊ लागेल. ह्या लक्ष देण्यासारख्या काही गोष्टी आहेत:
- जर बाळ कशालातरी घाबरत असेल तर ते त्याच्या पालकांना घट्ट धरून ठेवेल. पूर्ण अंधार झाल्यावर जेव्हा तुम्ही त्याला दिसणार नाही तेव्हा त्याला भीती वाटू लागेल आणि तो ती दर्शवेल.
- नवीन लोकांमध्ये गेल्यावर बाळ लाजेल किंवा घाबरेल. नवीन लोकांकडे जायला संकोच करेल.
- 1वर्षांची मुले अनेकदा त्यांच्या पालकांच्या प्रतिक्रियेची आणि संयमाची परीक्षा घेतात. जमिनीवर वस्तू फेकतात किंवा अन्न खाण्यास नकार देतात.
- जसजसा बाळाचा सामाजिक बंध वाढेल, तसतसे त्याला फक्त काही लोक आवडू लागतील.
- खेळात इतरांचे अनुकरण करण्यात त्याला आनंद मिळेल.
केव्हा काळजी करावी?
प्रत्येक मुलाचे विकासाचे टप्पे गाठण्याचे वेळापत्रक वेगवेगळे असते. त्यामुळे प्रत्येक मुलाला विकासासाठी कोणतीही जबरदस्ती करू नका. परंतु काही लक्षणे अशी असतात की ज्याद्वारे बाळाच्या विकासाविषयी प्रश्न निर्माण होऊ शकतो. तुम्हाला खालीलपैकी काही लक्षणे आढळल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- बाळाला आधार देऊन सुद्धा उभे राहता येत नाही
- बाळ स्वतःचे स्वतः बसू शकत नाही आणि जेव्हा बसवले जाते तेव्हा आधाराची गरज भासते.
- बाळाच्या दृष्टीक्षेपात असल्या तरी लपलेल्या वस्तू शोधू शकत नाही आणि उघड करू शकत नाही.
- टाटा करण्यासारख्या साध्या हावभावांचे सुद्धा अनुकरण करत नाही.
- एकही शब्द बोलत नाही.
- बाळ पोटाने पुढे सरकते आणि रांगताना पाय ओढते.
- कोणत्याही गोष्टीकडे बोट दाखवत नाही.
आपल्या मुलाला टप्पे गाठण्यासाठी मदत करण्याचे मार्ग
विकासाचे टप्पे गाठण्यासाठी बाळाला जबरदस्ती करणे योग्य नाही. तुमच्या मुलाचा जलद आणि सुलभ विकास होण्यासाठी तुम्ही दररोज काही गोष्टी करू शकता. येथे काही उपाय आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या बाळाला 1 वर्षांचे टप्पे गाठण्यात मदत करू शकता:
- तुमचे मूल त्याच्या भाषेचे कौशल्य विकसित करत असताना, तुम्ही काय करत आहात, तुम्ही पुढे काय कराल आणि तुम्ही काय पहाल याचे वर्णन करण्याचा प्रयत्न करा.
- जर तुम्हाला काय वाटते त्याचे बाळापुढे वर्णन केल्यास त्याला भावना समजण्यास मदत होईल.
- परस्परसंवादी चित्र पुस्तके आपल्या मुलास वाचून दाखवा.
- तुमच्या मुलासोबत ब्लॉक ट्रान्सफरसारखा गेम खेळा. ह्या खेळामध्ये तुम्ही ब्लॉकने भरलेला एक बॉक्स आणि एक रिकामा बॉक्स बाळासमोर ठेवा. आता हे ब्लॉक्स एका बॉक्समधून दुसऱ्या बॉक्समध्ये कसे टाकायचे ते दाखवा. यामुळे त्याची बोटांची निपुणता आणि हातांची चपळता विकसित होण्यास मदत होते.
आतापासून, तुमचे बाळ सतत इकडे तिकडे फिरत राहणार आहे, त्याच्या सभोवतालच्या जगाचा शोध घेत आहे आणि शिकत आहे. तो हातातील वस्तू टाकून प्रयोग करण्यास सुरवात करेल आणि कदाचित तुमचे ऐकण्यास नकार देईल. ह्याचे कारण म्हणजे त्याचा जिज्ञासू स्वभाव होय. तुम्हाला तुमच्या बाळाला काही क्रियाकलाप करू नकोस असे सांगावेसे वाटत असेल तर तुम्ही एकटे नाही. हे तुमच्या मुलासाठी शोध घेण्याचे आणि शिकण्याचे वय आहे. काही धोका नसेल तर मुलांना वेगवेगळे क्रियाकलाप शोधू द्या. त्याऐवजी, ते एक्सप्लोर करत असताना जवळ रहा. ते करू शकतील आणि करू शकणार नाहीत अशा गोष्टी त्यांना हळूवारपणे शिकवा आणि संयम ठेवा.
आणखी वाचा:
तुमच्या ११ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास
१३ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास