Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य २ महिन्याच्या बाळाची काळजी कशी घ्यावी त्याविषयी काही टिप्स

२ महिन्याच्या बाळाची काळजी कशी घ्यावी त्याविषयी काही टिप्स

२ महिन्याच्या बाळाची काळजी कशी घ्यावी त्याविषयी काही टिप्स

पहिल्यांदाच आई होताना, विशेषकरून २ ऱ्या महिन्याच्या टप्प्यावर बाळ जेव्हा खूप उत्साही आणि खेळकर होते तेव्हा बाळाची काळजी घेताना तुम्ही भारावून जाल. इथे बाळाची काळजी घेण्यासाठी काही टिप्स आणि सूचना आहेत ज्याची तुम्हाला नक्कीच मदत होईल.

दोन महिन्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी ७ सर्वोत्तम टिप्स

जर तुम्हाला अशी काळजी वाटत असेल की बाळ जास्त काही हालचाल किंवा हावभाव करत नाही तर काळजीचे काही कारण नाही. लक्षात ठेवा, बाळाचा विकास होत आहे आणि बाळ नवीन वातावरणाशी जुळवून घेत आहे आणि जेव्हा बाळ दोन महिन्यांचे होते तेव्हा बाळाचे क्रिबमधील खेळ सुरु होतात. तुमच्या २ महिन्यांच्या बाळाची काळजी कशी घ्यावी ह्याबाबत काही टिप्स इथे देत आहोत.

. स्तनपान

बाळाला जेव्हा भूक लागलेली असते तेव्हा बाळ रडू लागते. अशावेळी तुम्ही बाळाजवळ असले पाहिजे म्हणजे लगेच बाळाला स्तनपान देता येईल. बाळ मोठे होईल तसे स्तनपानाच्या वेळा बदलतील तसेच बाळाची भूक सुद्धा बदलेल. त्यामुळे तुम्ही बाळाची दुधाची पावडर आणून ठेवली आहे ना ते पहा. तसेच तुमच्याकडे स्तनपानाच्या जास्त बाटल्या फ्रिज मध्ये साठवून ठेवलेल्या आहेत ना ते पहा. आणि लक्षात ठेवा, २ महिन्यानंतर बाळ सक्रिय होईल नि त्यामुळे बाळाला स्तनपान देण्यासाठी तुम्हाला रात्रीचे खूप वेळा उठावे लागेल.

. रडणे

बाळाची जसजशी वाढ होऊ लागते आणि बाळाची मज्जासंस्था विकसित होते तसे बाळ जास्त रडू लागते. म्हणून जर तुम्हाला असे वाटत असेल की बाळाला दूध दिल्यावर ते रडण्याचे थांबेल तर तुम्ही पुन्हा विचार करा. बाळाची मज्जासंस्था विकसित होत असताना बाळाचे आकलनकौशल्य सुद्धा विकसित होते. बाळ तुम्हाला ओळखू लागेल आणि त्याच्या आजूबाजूच्या वातावरणाला प्रतिक्रिया देईल. म्हणून जेव्हा बाळ बाहेर येण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा बाळाला मिठी मारा, गाणी म्हणा किंवा हळूहळू झोका द्या त्यामुळे बाळ शांत राहील.

. विकासाचे टप्पे

इथे काही विकासाचे टप्पे दिले आहेत जे तुम्ही दुसऱ्या महिन्यात पडताळून बघू शकता. बाळाची मज्जासंस्था विकसित होत असल्याने बाळ तुम्हाला ओळखू लागेल तसेच बाळाला तुमचा वास सुद्धा लक्षात येईल कारण बाळाच्या संवेदना सुद्धा विकसित होऊ लागतील. जर मोठा आवाज झाला तर बाळाला त्याची भीती वाटते त्यामुळे बाळाच्या खोलीत अगदी कमीत कमी आवाज ठेवा. बाळाची दृष्टी सुधारल्यावर आजूबाजूच्या प्रत्येकाशी बाळाचा सुसंवाद वाढेल. बाळाला एखादे खेळणे दाखवून बाळाला पोटावर पालथे पडण्यास प्रोत्साहित करा. ह्या वयात तुम्ही बाळाला नवीन खेळण्याची ओळख करून देऊ शकता.

विकासाचे टप्पे

. वाढ

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या बाळाचे वजन आणि उंचीवर लक्ष ठेवले पाहिजे त्यामुळे सतत बाळाचे वजन आणि उंची ही योग्य रीतीने वाढत आहे ना ह्याकडे लक्ष द्या.

. लसीकरण

बाळाच्या सर्वोत्तम विकासासाठी बाळाच्या लसीकरणावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या बाळाला तुम्ही लसीकरणासाठी बालरोगतज्ज्ञांकडे न्या. लसीकरण झाल्यावर बाळ रडू लागेल त्यामुळे बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करा. लसीकरण पुढे ढकलण्याचा प्रयत्न करू नका, ते वेळेवर करून घ्या शेवटी बाळाची तब्येत महत्वाची आहे आणि तुमचे बाळ सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही सगळं काही करण्यास तयार असता.

. झोप

तुमच्या बाळाच्या झोपेच्या पॅटर्नचे निरीक्षण करा. तुमचे बाळ दिवसातून ९ ते १२ तास झोप काढेल आणि जरतेवढी झोप झाली नाही तर बाळ चिडचिड करेल. म्हणून तुमचे बाळ दूध पाजल्यावर आरामात आहे नाही आणि त्याला पुरेशी विश्रांती मिळत आहे ना ह्याकडे लक्ष द्या.

. बाळाच्या दिनचर्येसोबत समायोजित व्हा

आपण आपल्या बाळाच्या झोपेच्या नमुन्यांचा बारकाईने निरीक्षण करा आणि बाळ विश्रांती घेते तेव्हा तुम्ही सुद्धा विश्रांती घेणे आवश्यक आहे, कारण बाळ उठल्यावर पुन्हा तुम्हाला बाळाकडे लक्ष द्यावे लागणार आहे. बेबी मॉनिटर वापरा जेणेकरुन आपल्या बाळाच्या उठलेले लगेच तुम्हाला समजेल.

आणखी काही टिप्स

  • घरातील सर्व तीक्ष्ण कोपरे गोलाकार आहेत आणि इजा टाळण्यासाठी आपले अपार्टमेंट बेबीप्रूफ आहे याची खात्री करा
  • आपल्या लहान बाळाजवळ छोट्या वस्तू ठेवू नका, बाळ त्या तोंडात घालू शकते
  • या टप्प्यावर प्राण्यांना आपल्या बाळाजवळ देऊ नका कारण त्यांना ऍलर्जीचा धोका असतो
  • बाळ बाहेरच्या गोष्टींना कसा प्रतिसाद देते ते पहा जर काही अयोग्य वाटले तर लवकर त्याचे कारण शोधा
  • बाळाला जमिनीवर ठेवल्यावर बाळ पाय ताणून ठेवत आहे ना हे पहा, त्यामुळे बाळाच्या स्नायूंना व्यायाम होईल आणि ते रांगू लागेल
  • त्याच्या लसींची नोंद ठेवा; आपल्याला नंतर या माहितीची आवश्यकता भासेल
  • आपल्या बाळाला एकटे सोडू नका, बाळासाठी मॉनिटर वापरा

वर दिलेल्या टिप्सच्या आधारे तुम्ही तुमच्या २ महिन्यांच्या बाळाची योग्य काळजी घेऊन त्याला प्रेमाने सांभाळू शकता. लक्षात ठेवा की तुमच्या दोन महिन्यांच्या बाळाची काळजी घेणे ही पूर्ण वेळ जबाबदारी आहे, परंतु योग्य मार्गदर्शन घेतल्यास तुम्ही अगदी सहज बाळ सांभाळू शकता.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article