Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अन्न आणि पोषण बाळाच्या आहारात पनीरचा समावेश करणे – फायदे आणि पाककृती

बाळाच्या आहारात पनीरचा समावेश करणे – फायदे आणि पाककृती

बाळाच्या आहारात पनीरचा समावेश करणे – फायदे आणि पाककृती

तुमचे बाळ आता सहा महिन्यांपेक्षा मोठे झालेले असल्याने तुम्ही त्याच्या आहारात नवीन चविष्ट पदार्थांचा समावेश करण्याचा विचार करत असाल. तुमच्या बाळाने आतापर्यंत मऊ वरण भात खाण्यास सुरूवात केलेली असेल, परंतु जर तुम्ही आठवड्यातून एकदा पनीर खात असाल तर तुमच्या लहान बाळाला सुद्धा पनीर देण्याचा तुम्ही विचार करीत असाल. पनीर हे खूप चविष्ट आणि पौष्टिक असल्याने बाळाच्या आहारात त्याचा केव्हा समावेश केला पाहिजे ह्याचा विचार तुम्ही पुढील दोन कारणांसाठी करावा: .पनीर हा एक दुग्धजन्य पदार्थ आहे आणि २. तुमचे बाळ खूपच लहान असल्याने बाळाची पचनसंस्था नाजूक असल्याने बाळ कसा प्रतिसाद देईल ह्याचा तुम्हाला अंदाज नसतो! त्यामुळेच तुमच्या बाळाला पनीर कधी द्यावे ह्याची माहिती करून घेऊयात.

आपल्या बाळाच्या आहारात पनीरचा समावेश कधी करावा?

बाळ एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे झाल्यानंतर अनेक डॉक्टर आणि तज्ञ बाळाच्या आहारात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. तोपर्यंत, बाळाला फक्त आईचे दूध किंवा फॉर्म्युला मिल्क द्यावे.

जर तुमचे बाळ ८ ते ९ महिन्यांचे असेल तर तुम्ही पनीरचा एक छोटासा तुकडा बाळाला देऊ शकता आणि त्यावर बाळाच्या प्रतिक्रिया कशी येते ह्यावर लक्ष ठेवू शकता. काही महिन्यांनंतर, तुम्ही पनीरचे प्रमाण आठवड्यातून चार वेळा सुमारे दोन क्यूब्सपर्यंत वाढवू शकता.

पनीरचे पौष्टिक मूल्य

१०० ग्रॅम पनीरचे पौष्टिक मूल्य साधारणपणे खालीलप्रमाणे

 • ७२ कॅलरीज
 • २० ग्रॅम प्रथिने
 • ९३.५ पाणी
 • ४ मिलीग्राम कोलेस्टेरॉल
 • .४ ग्रॅम कर्बोदकांमधे
 • १३१ मिलीग्राम तंतुमय पदार्थ
 • .३ ग्रॅम साखर
 • ४ ग्रॅम चरबी
 • २१ एमसीजी व्हिटॅमिन बी१
 • १८१ mcg व्हिटॅमिन बी २
 • १४३ mcg व्हिटॅमिन बी ३
 • ७१ एमसीजी व्हिटॅमिन बी ६
 • mcg व्हिटॅमिन बी १२
 • १९. mcg व्हिटॅमिन ए
 • ९ मिलीग्राम व्हिटॅमिन सी
 • १३ एमसीजी व्हिटॅमिन ई
 • ७ एम सी जी व्हिटॅमिन के
 • २० मिग्रॅ कोलीन
 • ४२० मिग्रॅ कॅल्शियम

बाळाच्या आहारात पनीरचा समावेश करण्याचे फायदे

आपल्या बाळाच्या आहारात ताजे, निरोगी आणि चवदार पनीर समाविष्ट केल्यास त्याचे बाळाला विविध आरोग्य विषयक फायदे होतात. त्यापैकी काही फायदे पुढीलप्रमाणे

. हाडांच्या विकासासाठी मदत करते

आपल्या बाळाच्या आहारात पनीर समाविष्ट केल्याने बाळाची हाडे मजबूत होण्यास मदत होते कारण पनीर हा कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे.

. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते

पनीरमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात व्हिटॅमिन असतात आणि ते बाळाची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.

. हाडांच्या कूर्चेच्या निर्मितीमध्ये मदत होते

हाडांच्या कूर्चाच्या निर्मितीमध्ये व्हिटॅमिन बी महत्वाची भूमिका बजावते. पनीरमध्ये व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असल्याने बाळाच्या शरीरास त्याची मदत होते.

. बाळाच्या एकूण वाढीस मदत करते

पनीरमध्ये प्रथिने आणि चरबी चांगल्या प्रमाणात असते. बाळाच्या वाढीच्या आणि विकासाच्या वर्षांमध्ये आवश्यक असलेले सर्व महत्त्वपूर्ण पोषण देण्यास पनीर मदत करते. पनीरमध्ये असलेली विविध पोषक मूल्ये शारीरिक प्रक्रिया आणि शरीराच्या कार्यावर परिणाम करतात आणि बाळाची वाढ योग्य प्रकारे होते.

. निरोगी केस आणि त्वचा

पनीरमध्ये भरपूर व्हिटॅमिन बी, फॅटी ऍसिड्स (ओमेगा ३ आणि ओमेगा ६) तसेच अँटीऑक्सिडंट्स असल्याने त्वचा मऊ राहण्यास आणि केस निरोगी ठेवण्यासाठी मदत होते तसेच त्यामुळे केसांचा पोत आणि सौंदर्य राखले जाते.

बाळाला किती प्रमाणात पनीर देता येईल?

सुरुवातीला, आपल्या बाळाचे वय ८९ महिने झाल्यावर त्याला पनीरचे फक्त दोन लहान क्यूब्स देणे चांगले. जर तुमच्या लहान मुलाला ते आवडत असेल आणि त्याचे शरीर त्याला चांगला प्रतिसाद देत असेल, तर तुम्ही हळूहळू पनीरचे प्रमाण वाढवू शकता.

घरी पनीर कसे करायचे?

जर तुम्हाला बाजारात मिळणारे पनीर नको असेल तर तुम्ही ते घरी तयार करू शकता.

साहित्य

 • १ लिटर फुल क्रीम दूध
 • अर्धा कप दही किंवा दोन लहान चमचे लिंबाचा रस

पद्धत

 1. एक भांडे घ्या आणि त्यात ताजे दूध घाला
 2. भांडे मंद आचेवर ठेवा आणि काही मिनिटे तसेच राहूद्या
 3. जेव्हा दुध उकळते तेव्हा त्यात दही किंवा लिंबाचा रस घाला आणि सतत हलवा
 4. थोड्याच वेळात दुधात दही तयार होण्यास सुरुवात होईल
 5. आता गॅस बंद करा, पाणी काढून घ्या आणि पनीर मऊ कपड्यात ठेवा
 6. कापडाला घट्ट गाठ बांधा आणि सिंकच्या वर लटकवा. जास्तीचे पाणी निचरायला सुरुवात होईल
 7. एकदा पाणी पूर्णपणे निथळले की त्यातून पनीर काढा. एका मोठ्या प्लेटवर सेट होऊ द्या.

तुम्हाला वाटल्यास तुम्ही मीठ देखील घालू शकता. सुमारे ३० मिनिटांनंतर, तुम्ही ते वापरू शकता किंवा फ्रिजमध्ये ठेवू शकता

 1. हे पनीर बाळालाही दिले जाऊ शकते. दुसऱ्या दिवशी वापरण्यासाठी हवे असल्यास , ते फ्रिज मध्ये ठेवणे चांगले

घरी पनीर कसे करायचे?

लहान मुलांसाठी झटपट आणि सोपी पाककृती पनीर भात

तुमच्या लहान मुलासाठी काही सोप्या पनीर पाककृती येथे आहेत. आपल्या बाळाचे वय ९ महिने इतके झाल्यावर तुम्ही त्याच्या आहारात खालील पाककृतींचा समावेश करू शकता.

. पालक आणि पनीर भात

साहित्य

 • चिरलेला पालक /२ कप
 • शिजवलेला भात /२ कप
 • चिरलेला पनीर १० ग्रॅम
 • तूप /२ टीस्पून

कृती

 1. एक कढई घ्या आणि त्यात थोडेसे तूप घाला. त्यामध्ये शिजवलेला भात घाला आणि हलवा. एक मिनिट शिजू द्या
 2. पनीरचे तुकडे, पालकाची पाने, थोडे पाणी घालून हे सर्व ३५ मिनिटे शिजू द्या
 3. गॅस बंद करा आणि सर्व्ह करा

. ब्लूबेरी डिलाईट

साहित्य

 • चिरलेली ब्लूबेरी
 • मॅश केलेले केळे /
 • पनीर १० ग्रॅम
 • व्हॅनिला १ थेंब
 • चिमूटभर दालचिनी पावडर

कृती

 1. ब्लेंडरमध्ये सर्व मिश्रण एकत्र करा
 2. ब्लेंडर मध्ये घालून बाळाला खाता येईल असे बारीक करून घ्या
 3. एका भांड्यात काढून घ्या आणि आपल्या बाळाला द्या

. सफरचंद पनीर

साहित्य

 • बारीक केलेले सफरचंद /
 • ग्राउंड फ्लेक्स/४ टीस्पून
 • पनीर१० २० ग्रॅम
 • दालचिनी पूड

कृती

 1. एक कढई घ्या आणि त्यात थोडे पाणी घालून सफरचंदच्या फोडी घाला
 2. सफरचंदाच्या फोडींचे तुकडे होऊ न देता काही मिनिटे गरम करा
 3. एका वाडग्यात पनीर कुस्करून घ्या. नंतर त्यावर सफरचंदचे तुकडे घाला. थोडी दालचिनी पावडर शिंपडा
 4. त्यावर थोडे जवस घाला आणि आता डिश सर्व्ह करण्यासाठी तयार आहे

. फ्रुट पनीर

साहित्य

 • चिरलेली पिकलेली केळी /
 • पनीरचे छोटे तुकडे १०२० ग्रॅम
 • पिकलेली पपई /२ कप

कृती

एका भांड्यात सर्व साहित्य एकत्र करून बाळाला द्या.

. पनीर तांदूळ पुरी

साहित्य

 • वाफवलेले ताजे मटार३ टीस्पून
 • पनीरचे लहान तुकडे १०२० ग्रॅम
 • शिजवलेला भात /२ कप
 • एक चिमूटभर काळी मिरी
 • एक चिमूटभर कांदा पावडर

कृती

 1. मटार वाफवून घ्या आणि १०१५ मिनिटे बाजूला ठेवा
 2. नंतर, मटार, थोडी कांदा पावडर, शिजवलेला भात आणि मिरपूड एका ब्लेंडरमध्ये घाला आणि ते एकत्र करून प्युरी बनवा
 3. प्युरीमध्ये पनीर घालून चमच्याने मिक्स करावे

6. पीच, पेअर, पनीर

साहित्य

 • पनीर १० ग्रॅम
 • पीच
 • पेअर /

कृती

एक भांडे घ्या आणि सर्व साहित्य एकत्र करा आणि आपल्या बाळाला द्या.

. फुलकोबी आणि पनीर

साहित्य

 • फुलकोबी ४५ पाकळ्या
 • पनीर १० ग्रॅम

कृती

 1. फुलकोबीची ४५ छोटी फुले घ्या आणि दहा ते पंधरा मिनिटे वाफवून घ्या
 2. मऊ झाल्यावर थंड होऊ द्या
 3. एक उथळ डिश घ्या, त्यात वाफवलेली फुलकोबी ठेवा आणि पनीर कुस्करून घ्या. काही मिरपूड शिंपडा आणि बाळाला द्या.

ह्या लेखामध्ये लहान बाळांसाठी पनीरच्या पौष्टिक आणि चवदार पाककृती दिलेल्या आहेत. तुमच्या बाळाचा वयाचा विचार करून हळूहळू त्याच्या आहारात पनीरचा समावेश करा. तुमच्या बाळाची नक्कीच निरोगी वाढ होईल आणि तुमच्याप्रमाणेच बाळाला सुद्धा पनीरचे सर्व पदार्थ आवडतील.

आणखी वाचा:

बाळांना काकडी देणे सुरक्षित आहे का?
बाळांसाठी लिंबू सुरक्षित आहे का?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article